बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले, महावितरणच्या सुलतानी कारभारामुळे शेतकरी हैराण...
हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाला पाणी देणे गरज असताना महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याचा सुलतानी कारभार सुरु केला आहे. कोणतीही पूर्व सूचना तथा मासिक बिलाचे वाटप करण्यापूर्वीच विद्दुत पुरवठा तोडल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.अश्या प्रकारे शेतकर्यांना वेठीस धरून महावितरण कंपनी काय सध्या करतेय असा सवाल शेतकरी व सामान्य वीज ग्रःकातून विचारला जात आहे. ...........