गुंठेवारीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ,यापुढे मुदतवाढ नाही
2001 पुर्वीच्या अनाधिकृत मालमत्ता नियमित करण्याची अंतिम सुवर्णसंधी
नांदेड(अनिल मादसवार)मालमत्ताधारकांची वाढती मागणी लक्षात घेऊन 2001 पुर्वीच्या अनाधिकृत मालमत्ता व बांधकामे नियमित करण्याच्या गुंठेवारी योजनेला पुन्हा मुदतवाढ मिळाली असून आता 31 डिसेंबर 2013 पर्यंत मालमत्ता धारकांना आपले प्रस्ताव दाखल करता येतील. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार अंतिम संधी देण्यासाठी ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यापुर्वी दाखल झालेले आणि फ़ेटाळण्यात आलेल्या प्रस्तावातील मालमत्ताधारकांविरुध्द कारवाई करण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या मालमत्ता नियमित करुन संभाव्य नुकसान टाळावे असे आ.......