औरंगाबाद(प्रतिनिधी)खंबाळा(ता. किनवट ,जि. नांदेड) येथील दोनशे हेक्टर जमीन निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. भूसंपादन कारवाईत सहा कोटी ८९ लाख ३५ हजार ९०४ रुपयांचा अपहार झाला. या अपहार प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यू. चांदीवाल व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ..........