NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 29 अक्तूबर 2014

दिव्याखाली अंधार

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी म्हणवी तसी झाली नसल्याने हिमायतनगर ग्रामपंचायतीचा कारभार.. दिव्याखाली अंधार असे म्हणण्याची वेळ गावकर्यांवर आली असून, शहरातील बाजार चौक व चौपाटीत बसविण्यात आलेल्या सौर उर्जेचे दिवे अजूनही सुरूच झाले नसताना एजन्सीने बिले अदा कोणत्या आधारावर करण्यात आली..? असा प्रश्न ग्रामस्त विचारीत आहेत.

सन २०१३-१४ मध्ये हिमायतनगर शहरात जी.प.अंतर्गत निधीतून विजेची बचत व्हावी आणि रात्रीला दिवसाचा प्रत्यय यावा या उद्दात हेतूने शहरात शेकडो दिवे बसविण्यात आले. तसेच तालुक्यातील अनेक गावात समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आठ ते दहा अश्या प्रमाणात सौर दिवे मंजूर करण्यात आले होते. परंतु बहुतांश गावात सौर दिवे न बसविताचा जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या निधी घश्यात उतरविण्याचा प्रयत्न त्या - त्या भागातील जी.प.सदस्यांना हाताशी धरून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

असाच काहींसा प्रकार हिमायतनगर शहरातील सौर उर्जेच्या दिव्याबाबत घडला असून, शहरातील पोलिस स्थानकाजवळील बाजार चौकात आणि रात्रीला १० वाजेपर्यंत गजबजून राहणारी शहरातील चौपाटी भागातील ग्रामीण रुग्णालयाजवळ असे दोन मोठे सौर दिवे वर्षभरापूर्वी बसविण्यात आले आहेत. सदरचे सौर उर्जेचे दिवे बसविणाऱ्या पुण्याच्या एजन्सीने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे दिव्याचे काम केले आहे. दिवे बसविण्यात आल्यापासून ते आजतायगात रात्रीला याचा उजेड पडला नसल्यामुळे दिव्याखाली अजूनही अंधारच असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरीकातून पुढे येत आहेत. एवढेच नव्हे तर बसविण्यात आलेल्या दिव्याच्या बैटर्या गायब झालेल्या असून, दिव्यावरील सौरउर्जा आकर्षित करून वीज साठविणाऱ्या प्लेट सुद्धा उडून गेलेल्या प्रत्यक्ष दर्शी दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी केवळ खांब, सौर दिवा, पेट्या आणि लोखंडी प्लेटचा सांगाडा शिल्लक असल्याचे चित्र दिसत आहे. हा सर्व प्रकार ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

शहरातील अनेक प्रभागातील चौका - चौकाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सौर दिवे बंद पडले असून, शहानिशा केली असता या दिव्याच्या बैटर्या चोरीला गेल्याने दिवे बंद असल्याचे दिसून येत आहे. सौर दिवे बसविणाऱ्या एजन्सीकडे पाच वर्ष गैरंटीची व दुरुस्तीची हमी असताना बंद पडलेले दिवे सुरु करण्याची तसदी घेतली जात नसल्याने शासनाच्या योजना अधिकारी व राजकीय पुढार्यांच्या स्वर्थासाठीचा आहेत काय..? असा सवाल ग्रामस्त विचारीत आहेत. अनेकदा दिवेबंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या संबंधिताना दिली मात्र पाहुत, करुत, एजन्सिवाल्याना सांगतो, असे आश्वासने मिळत असल्याने दिवाळीतही या दिव्याखाली अंधारचा असल्याचे दिसून आले आहे. शासनाची हि सौ दिव्याची योजना हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात कुचकामी ठरत असल्याचा आरोप विकासप्रेमी नागरीकातून केला जात आहे.

याबाबत हिमायतनगरचे ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, आम्ही संबंधित एजन्सीला दिवे बंद झाल्याची माहिती दिली. दिवाळीमुळे ते येऊ शकले नाहीत, तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेले दिवे लवकरच सुरु होतील.

या बाबत गटविकास अधिकारी गंगावणे यांच्याशी विचारणा केली असता सौर दिव्याचे ते काम आमच्या अखत्यारीत येत नसून, जिल्हा परिषद सदस्य व संबंधित एजन्सी आणि ग्रामपंचायतीचे आहे. त्याची दुरुस्ती व चालू आहेत कि नाही हे त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवार, 27 अक्तूबर 2014

ग्राम स्वच्छतेचा संदेश

भजनी दिंडीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छतेचा संदेश


हिमायतनगर(बी.आर.राठोड)स्वच्छतेचे महत्व ग्रामवासियांना कळावे या उद्दात हेतूने माधव महाराज भिसीकर व नेहरू नगर येथील महिला- पुरुष भजनी मंडळाच्या वतीने कार्तिक शुद्ध ४ सोमवारच्या शुभ मुहूर्तावर प्रभात दिंडीच्या माध्यमातून संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांची भजने गावून जनजागृती केल्याचे चित्र दिसून आले आहे. 

कार्तिक मास हा धार्मिक दृष्ट्या पवित्र महिना मानल्या जातो, या महिन्यात बहुतांश भजनी मंडळे ग्रामदेवतेच्या मंदिरापासून दिंडीला प्रारंभ करतात. आणि गल्लो गल्ली फिरून परत त्याचा मंदिरात दिंडीचे विसर्जन करतात. मात्र नेहरू नगर येथील तरुण कार्यकर्ता योगेश चीलकावार याने पारंपारिक दिंडीला स्वच्छतेची जोड देवून स्वच्छ भारत..निरोगी भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोडीचा संदेश जनतेपर्यंत पोन्चविण्याचा प्रयत्न करताना दिसून आला आहे. स्वच्छतेचे महत्व ग्रामवासीयांच्या गाली उतरवीत म्हणून दिंडी समोर हाती झाडू घेवून भजनी मंडळाच्या महिला -पुरुष व बालगोपलाना घेवून रस्ते स्वच्छ करीत केर - कचर्याची विल्हेवाट गल्लो गल्ली फिरत लावीत होते. हे दृश्य पाहून अनेक जन स्वेच्छेने झाडू घेवून दिंडीत सहभाग घेतल्याचे दिसून आले. या दिंडीत बाबुराव शिंदे, शंकरराव चव्हाण, गंगाधर गड्डमवार, जयवंतराव सरणकटेवार, कोंडाबा जाधव, मारोतराव मेंडके, बालाजी मानपुरेवार, शंकर गोडबर्लेवार, रामू धोने, बाबुराव चव्हाण, कानबा पाटील, लक्ष्मीबाई गड्डमवार, रेनुकाबाई शिंदे, रुखामाबी गुड्डेटवार, सारजाबाई गड्डमवार, लक्ष्मीबाई ढोणे, आडेलाबाई गड्डमवार, रुखमाबाई सरणकटेवार, वंदना एडके, लक्ष्मीबाई जाधव, नागाबाई मादसवार, पद्मिनाबाई शेळके, मीराबाई गोडबर्लेवार यांच्यासह लहान बालकांनी सहभाग घेतला होता. 

विशेषतः हि दिंडी ग्रामपंचायत कार्यालायासामोरून मार्ग क्रमान करीत असताना ग्रामपंचायत ऐवजी भजनी मंडळाने ग्राम स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली तर नाही ना.. असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात होता. 

झाडाला लागला कि आंबा

अहो आश्चर्यंम थांबा,...झाडाला लागला कि आंबा...हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील सधन शेतकरी तथा पुरस्कार विजेते विजयअप्पा बंडेवार यांच्या मालकीच्या शेतातील आंब्याच्या झाडाला ऐन दिवाळीच्या सनात कैर्या लागल्याचे दिसून आल्याने, अहो आश्चर्यंम थांबा,...झाडाला लागला कि आंबा... असे उद्गार श्री साई दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या तोंडून निघत आहेत. 

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सधन शेतकरी विजय बंडेवार यांचे फार्महाउस टेंभी रस्त्यावर आहे. याच ठिकाणी शेतात श्री साईबाबाचे मंदिर असून, दर गुरुवारी भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात. दिवाळीच्या निमित्ताने अनेकजणांनी दर्शनसाठी हजेरी लावली मात्र या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडाला दिवाळीच्या काळात आंबे लागद्ल्याचे दिसून आले आहे. हि माहिती समजताच जो तो कुतूहलाने आंबे पाहण्यासाठी जात असल्याने अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. निसर्ग नियमानुसार आंब्याच्या बहार वसंत ऋतूमध्ये मोहर येउन होळीच्या सनानंतर आंब्याच्या कैर्या पहावयास मिळतात. मात्र या वर्षी ऐन दिवाळीच्या सनात आंब्याला कैर्या लागडल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. त्यामुळे बदलत्या काळामुळे निसर्गही बदलला तर नाही ना..असा प्रश्न आंबे पाहणार्यांना पडला आहे. 

याबाबत भ्रमण ध्वनिवरून तालुका कृषी अधिकारी श्री दावलबाजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, १२ मासी झाडाच्या प्रकारात अनुवांशिक गुणामुळे कोणत्याही रुतून फळे लागतात. मात्र या फलाना गोडवा नसतो, ते अल्पायुषी असतात..त्याचा उपयोग केवळ लोणचे व थंड पेय पुरताच केला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले. 

रविवार, 26 अक्तूबर 2014

ढगाळ वातावरण

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यात सोयाबीन कापणी, काढणीसाठी शेतकर्‍यांची धावपळ चालू झाली असताना, ढगाव वातावरण निर्माण झाल्याने, हाताशी आलेली पिके जाण्याची भीती बळीराजाकडून व्यक्त होत आहे. तर आता पूस झाला तर कपाशीच्या पिकांना फायदेशीर ठरेल असेही शेतकर्‍यांना वाटत आहे.

खरीप हंगामातील अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन मोठ्या प्रमाणात नुकसानीत आले आहे. सोयाबीनचे बीज भरलेले नसल्याने शेतकर्यांना सोयाबीन काढणीत फक्त १ ते २ क्विंटलचा उतारा येत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात केलेला खर्च निघण्याची अशा मावळली आहे. आता तुरीचे व ज्वारीचे पिक बहरात आले असताना शुक्रवार पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीला तर थोड्या प्रमाणात पाऊस झाला, मात्र यामुळे काढून ठेवलेले सोयाबीन, ज्वारी काळी पडून तुरीचे फुल गळून किडी - आळीचा प्रादुर्भाव होऊन पुन्हा शेतकर्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे असे नुकसान होत असले तरी दुसरीकडे पावसाभावी वाळू लागलेल्या कापसाला या पावसामुळे जीवदान भेटण्याची शक्यता आहे.

या पावसामुळे शेतकर्याचे पांढरे सोने समजल्या जाणारे कपाशी व रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांना समाधानकारक पाऊस झाला तर फायदा होईल, मात्र तुरळक प्रमाणात पाऊस पडून केवळ ढगाळ वातावरण दिसत असल्याने पुन्हा बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. २०१४ च्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. शेतीमालाचे नुकसान व कमी भाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे नव्याने स्थापन होणार्या सरकारने लक्ष देवून शेतकर्यांना आर्थिक कोंडीतून सोडविण्यासाठी भरीव मदत मिळवून देवून कापूस, सोयाब्विन, ज्वारी यासह अन्य ओइकन हमी भाव मिळवून दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

शुक्रवार, 24 अक्तूबर 2014

आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्कारा

जनतेने टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करीन.. आ.नागेश पाटील


हिमायतनगर(अनिल मादसवार)जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिल्याने जनतेच्या विश्वासास पात्र राहून काम करीन असे अभिवचन नवनिर्वाचित आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. ते तालुक्यातील मौजे भोंडनीतांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी मंचावर माजी जी.प.सदस्य बाबुराव कदम कोळीकर, डॉ.संजय पवार, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, बाबुराव कदम विरसनीकर, बंडू पाटील आष्टीकर, विवेक देशमुख, विजय वळसे, शंकर पाटील, केशव हरण, गजानन पाटील यांची उपस्थिती होती. 

मौजे दाबदारी/भोंडनीतांडा येथे दीपावली निमित्त विद्यमान पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड यांनी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्काराचे व दिवाळीनिमित स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी नागेश पाटील यांना फेटा, शाल-श्रीफळ व रामराव महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. आमदारांचे आगमन होतच फटक्याच्या आतीशबाजीने व ढोल तश्याच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हदगाव - हिमायतनगर मतदार संघातील शिल्लक असलेला विकासाचा अनुशेष येत्या पाच वर्षाच्या काळात पूर्ण करणार आहे. ग्रामीण भागातील दुर्गम खेड्यांना बार माही पिण्याच्या पाण्याची सोय व पक्क्या रस्त्याने जोडण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार असून, सामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. शासकीय कार्यालयात जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्रथम प्राधान्य देवून शासकीय कामासाठी कोणत्याही कार्यालयात नागरिकांना खेटे मारावे लागणार नाहीत याची काळजी घेतल्या जाईल. सध्या शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडला असून, सरकार स्थापन होताच विधानसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यासाठी सरकारला साकडे घालणार असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. 


भोंडनीतांडा येथील जगदंबा मंदिर व संत सेवालाल महाराजाच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देवून प्रथम येथून विकास कामाना सुरुवात करणात असल्याचे त्यांनी सांगून नारळ फोडून भूमिपूजन केले. यावेळी एकनाथ पाटील, राजेश जाधव, लक्ष्मण जाधव, अनिल भोरे, वसंत राठोड, यांच्यासह हजारो शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.

मंगलवार, 21 अक्तूबर 2014

हार्दिक शुभेच्छा

मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


" नांदेड न्युज लाइव्ह " 
च्या सर्व वाचकांना व त्यांच्या कुटुंबियांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
 
शुभेच्छुक - 
अनिल मादसवार
(संपादक नांदेड न्युज लाइव्ह) 

फसू नका...!

राष्ट्रवादीच्या बिनशर्त पाठींब्याचा चेंडूला फसू नका...!
महाराष्ट्रात भापला विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने व शिवसेनच्या ताठर भूमिकेमुळे सरकार बनविणे व ते स्थिर असावे यासाठी सध्या सर्वच पक्ष खलबते करीत आहेत. खरे तर सेना - भजपा यांचे सरकार बनून विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. पण सेनला स्वत:च्या स्वाभिमानासाठी भगवा ध्वजाची काळजी वाटत नाही हे महराष्ट्राचे व मराठी माणसाचे दुर्दैव होय. 

या सगळ्या रणधुमाळीत राष्ट्रवादी पक्षाने मोठ्या सोज्वळपनाचा  आव आणून भाजपा सरकार बनवीत असेल तर आम्ही त्या सरकारला बाहेरून बिनशर्त पाठींबा देण्याची घोषणा केली आहे. कारण महाराष्ट्रात स्थिर सरकार विकास होण्यासाठी आवश्यक आहे. मात्र अत्यंत हेतू पुरस्सर सेनेपासून भाजपला तोडण्याचा हा डाव आहे. भाजपने रणांगणात सर्व पक्षांना चित्त करून बहुमताच्या जवळ पक्षाला आणून ठेवले आहे. हे भाजपचे यश धुळीस मिळविण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा नाकारता येत नाही.   

विधानसभेत सरकार स्थापण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठींब्याचा अर्थ असाही असू शकतो कि, आखाड्यात मिळविलेला विजय टेबल डिप्लोमैसीट भाजपला पराभूत करणे काही तरी कुरापत काढून अविश्वास ठराव आणून विधान सभेत पराभव करून त्यांचा वचपा काढण्याचे षडयंत्रहि असू शकते.

भाजपने अगदी शेवटी पर्यंत सेनेबरोबर राहण्यासाठी प्रयत्न करावा. त्यात यश मिलो अथवा न मिळो भगव्याची शान राखण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न केले. हे लोकांना कळने आवश्यक आहे. तेंव्हा सावधान ..! बिनशर्त पाठींब्याचा फसवा चेंडू राष्ट्रवादीच्या अंगणात परतवून लावा..! 
                                                                                                                        जेष्ठ पत्रकार - भास्कर दुसे 

सोमवार, 20 अक्तूबर 2014

आकाश भोरे

आकाश भोरे याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

हिमायतनगर(वार्ताहर)उस्मानाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कराटे स्पर्धेत हिमायतनगर येथील विद्यार्थी आकाश मोरे याने घवघवीत यश संपादन केले आहे. तुळजाभवानी  स्टेडीयम येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सेन्साई खंडू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात आकाश संजय भोरे यांनी यश संपादन केले. त्याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, त्याच्या निवडीबद्दल आ.नागेश पाटील आष्टीकर, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविर्चंद श्रीश्रीमाळ, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम, सेन्साई सुशीलकुमार चव्हाण, रामभाऊ ठाकरे, अनिल भोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, रामा गाडेकर,  योगेश चीलकावर, सुमित कागणे, राजू कदम, शुभम सांगणवार, शुभांगी गाजेवार, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, फिरदोस, आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.   

शुक्रवार, 17 अक्तूबर 2014

शेतकऱ्यांची लुट सुरूच ..

सोयाबीन - कापसाची कवडीमोल दारात खरेदी ..शेतकऱ्यांची लुट सुरूच ..


हिमायतनगर(अनिल मादसवार)अवघ्या ४ दिवसावर दिवाळीचा सन येवून ठेपला असून, खरीप हंगामात झालेल्या पावसाच्या अवकृपेने हवालदिल झालेला शेतकरी तोकड्या प्रमाणात निघालेली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र येथेही व्यापार्यांनी शेतकर्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली असून, शेतकऱ्यांचे पांढरे सोने, सोयाबीनची कवडीमोल दराने खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याजोगा प्रकार केला जात आहे. या प्रकाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकर्यांमधून होत आहे.

निसर्गाचा कोप आणि सत्ताधारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उदासिनता याचा पुरता फटका शेतक-याला बसला असून पावसाच्या अवकृपेमुळे नुकसानीत आलेल्या शेतकर्यांनी हाती आलेल्या पिकांच्या उत्पादनावर सध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी कापूस, सोयाबीनचे निघालेले तोकडे उत्पादन बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत. याच संधीचा फायदा घेऊन येथील भुसार व्यापार्यांनी कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या अभयामुळे शेतकर्यांना विविध कारणे सांगून सोयाबीन प्रतिक्विंटल ३००० ते ३१०० रुपये दराने खरेदी करत आहेत. तर कापसाची खरेदी करताना कापूस ४००० ते ४१०० रुपये दराने खरेदी केली जात आहे. मुग - ५५०० आणि उडीद ४००० ते ४५०० रुपये दराने खरेदी होत आहे. परिणामी अगोदरच घटलेल्या उत्पन्नाने नुकसानीत आलेला शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ऐन दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांची काय सोय करावी या विवंचनेत सापडला आहे. निसर्गाच्या अवकृपेने झालेले नुकसान व आता कवडीमोल दराने होत असलेल्या खरेदीमुळे शेतकयांच्या उत्पादनाचा खर्चही निघेल कि नाही..? हि चिंता शेतकर्यांना सतावित आहे. 

परिणामी दिवाळीनिमित्त माहेरी येणाऱ्या लेकीबाळीची दिवाळी अंधारातच साजरी करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही अश्या जळजळीत प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून समोर येत आहेत. खरीपात पेरणीवर झालेला खर्च, करावी लागलेली दुबार - तिबार पेरणी, पावसाअभावी खराब झालेली पिके, यामुळे शेतक-यांना प्रती बॅग ७ ते १० हजार रुपयांचा खर्च करावा लागला. मात्र उत्पादन हाती आले तेंव्हा मालाला भाव मिळत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे पणन महासंघ व कृषी उत्त्पन्न बाजार समितीने लक्ष देवून सोयाबीनला प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० हजार व कापसाला प्रतिक्विंटल ७००० ते ८००० रुपये भाव द्यावा अशी रास्त अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.  

गुरुवार, 16 अक्तूबर 2014

हदगाव - हिमायतनगर ७० टक्के मतदान

हदगाव/हिमायतनगर(वार्ताहर)अख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात सरासरी ६९.९५ टक्के मतदान मतदारसंघात झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे ८५.४६ टक्के झाले. एकूण ९४२ पैकी ८०५ मतदारांनी हक्क बजावला तर हदगाव शहरातील केंद्र क्रमांक ९६ वर सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे. येथे ८५५ पुरुष तर ६५५ महिला असे एकूण १५१० मतदार आहेत. यातील ३८९ पुरुष तर २७० महिला असे एकूण ६५९ मतदारांनी म्हणजेच ४३.६४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक विभागातून प्राप्त झाली आहे.

हदगाव मतदारसंघात बुथनिहाय झालेले मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बूथ -५६. कौठा ८६६ मते ६९.५६%
बूथ -५७. वारगंटकळी ५९२ मते ८५.४३%
बूथ -५८. डोल्हारी ८६२ मते ७०.२५%
बूथ -५९. गोर्लेगाव ५७१ मते ८३.४८%
बूथ -६0. गोर्लेगाव ५०७ मते ७३.४८%
बूथ -६१. हदगाव ४३३ मते ५१.५५%
बूथ -६२. हदगाव ३९६ मते ४६.३७%
बूथ -६३. हदगाव ५९५ मते ५५.५० %
बूथ -६४. हदगाव ११0७ मते ६८.५९%
बूथ -६५. हदगाव ८५९ मते ६८.२८%
बूथ -६६. हदगाव ८९0 मते ६0.४२%
बूथ -६७. रूई धा. ८६0 मते ७९.0४%
बूथ -६८. रूई धा ५५६ मते ७२.२८%
बूथ -६९. तलंग ५८४ मते ७८.१८%
बूथ -७0. तलंग ५५३ मते ७३.०५%
बूथ -७१. पिंपरखेड ८३२ मते ७०.९३%
बूथ -७२. पिंपरखेड ९११ मते ७०.४६%
बूथ -७३. अंबाळा ६१८ मते ८०.४७%
बूथ -७४. अंबाळा ५४१ मते ७३.३१%
बूथ -७५. हदगाव ८१६ मते ५७.८३%
बूथ -७६. हदगाव ७४४ मते ४९.५७%
बूथ -७७. हदगाव ७२० मते ५४.६३%
बूथ -७८. हदगाव ४०५ मते ४७.५९%
बूथ -७९. हदगाव ४६९ मते ४९.४७%
बूथ -८0. हदगाव ४५२ मते ५२.३८%
बूथ -८१. हदगाव ५१३ मते ६१.६६%
बूथ -८२. हदगाव ३८३ मते ५०.०७%
बूथ -८३. बाभळी ६१० मते ६८.३१%
बूथ -८४. बाभळी बेलमंडळ ५३२ मते ३७.६१%
बूथ -८५. एकंबा ७५० मते ७८.८६%
बूथ -८६. धानोरा ९७४ मते ७५.५६%
बूथ -८७. मंगरूळ ४४० मते ६३.४९%
बूथ -८८. मंगरूळ ३९४ मते ६०.२४%
बूथ -८९. शिबदरा ६४९ मते ७५.५५%
बूथ -९0. बोरगडी १०२२ मते ८५.१०%
बूथ -९१. शिरजंती ६९२ मते ६१.१३%
बूथ -९२. शिरजंती ८५७ मते ६९.११%
बूथ -९३. पळसापूर १०५८ मते ८४.८४%
बूथ -९४. बनचिंचोली ५६५ मते ७५.०३%
बूथ -९५. बनचिंचोली ४६५ मते ६२.२५%
बूथ -९६. हदगाव ५०५ मते ५७.००%
बूथ -९७. हदगाव ६५९ मते ४३.६४%
बूथ -९८. हदगाव ४५३ मते ४३.७७%
बूथ -९९. हदगाव ३१८ मते ४५.३६%
बूथ -१00. हदगाव ५३१ मते ६२.९९%
बूथ -१0१. हदगाव ६०७ मते ६२.९७%
बूथ -१0२. पळसा ७५० मते ६०.१०%
बूथ -१0३. पळसा ६०८ मते ६६.७४%
बूथ -१0४. पळसा ८३१ मते ६६.११%
बूथ -१0५. उचांडा ९१७ मते ७७.४५%
बूथ -१0६. करमोडी ७०८ मते ७८.२३%
बूथ -१0७. बरडशेवाळा ८६१ मते ६९.१६%
बूथ -१0८. बरडशेवाळा ६७८ मते ६३.६६%
बूथ -१0९. डोंगरगाव ५८७ मते ७९.६५%
बूथ -११0. डोंगरगाव क. ६५४ मते ७०.१०%
बूथ -१११. वाटेगाव, फळी ९४९ मते ७८.०४%
बूथ -११२. दिघी ५२८ मते ७६.३०%
बूथ -११३. टेंभुर्णी ३६६ मते ७५.९३%
बूथ -११४. कार्ला पी. ७४८ मते ७५.८६%
बूथ -११५. वडगाव ७४७ मते ७३.८९%
बूथ -११६. हिमायतनगर (क) ५६८ मते ७०.१२%
बूथ -११७. हिमायतनगर (स) ३७७ मते ५९.३७%
बूथ -११८. हिमायतनगर (क्यु)३६१ मते ६२.७८%
बूथ -११९. हिमायतनगर (प) ५९४ मते ६६.८९%
बूथ -१२0. हिमायतनगर ७५२ मते ५९.३१%
बूथ -१२१. हिमायतनगर ८२१ मते ६६.५३%
बूथ -१२२. हिमायतनगर ७०४ मते ६१.९२%
बूथ -१२३. हिमायतनगर ६६३ मते ६८.२८%
बूथ -१२४. हिमायतनगर ६५९ मते ६८.१५%
बूथ -१२५. हिमायतनगर ४२७ मते ६७.७८%
बूथ -१२६. हिमायतनगर ६६९ मते ६२.७६%
बूथ -१२७. हिमायतनगर ४६६ मते ५५.५४%
बूथ -१२८. हिमायतनगर ३७६ मते ५१.६५%
बूथ -१२९. हिमायतनगर ७१५ मते ६०.९५%
बूथ -१३०. हिमायतनगर ५५२ मते ६६.११%
बूथ -१३१. विरसणी (न.अ.) ५१६ मते ६४.३४%
बूथ -१३२. विसरणी गाव ७१५ मते ८५.०२%
बूथ -१३३. हडसणी ६४९ मते ७२.१२%
बूथ -१३४. हडसणी ६५४ मते ७०.१०%
बूथ -१३५. गारगव्हाण ७७३ मते ६१.३०%
बूथ -१३६. बामणी ६७९ मते ७८.६८%
बूथ -१३७. शिबदरा ८९० मते ७१.४९%
बूथ -१३८. कवना ४७३ मते ५९.०५%
बूथ -१३९. कवना ७०२ मते ६७.९६%
बूथ -१४0. ल्याहरी ४९५ मते ७०.९२%
बूथ -१४१. ल्याहरी ४३० मते ६७.६१%
बूथ -१४२. हरडफ ५५२ मते ८१.३०%
बूथ -१४३. हरडफ ५४५ मते ८०.५०%
बूथ -१४४. हरडफ ५९३ मते ७०.५१%
बूथ -१४५. खडकी ब. ५०९ मते ७३.६६%
बूथ -१४६. खडकी ८७४ मते ७३.९४%
बूथ -१४७. धारपूर प. ७४२ मते ६९.६७%
बूथ -१४८. सवना ८८७ मते ६९.९५%
बूथ -१४९. एकघरी ९३९ मते ८३.१३%
बूथ -१५०. वाघी ८१७ मते ८०.८९%
बूथ -१५१. कामारी ४८८ मते ५७.०४%
बूथ -१५२. कामारी ५५८ मते ६९.४९%
बूथ -१५३. कामारी ४५७ मते ७६.४२%
बूथ -१५४. कामारी ६२७ मते ६०.७०%
बूथ -१५५. रावणगाव त. ५८९ मते ६५.२३%
बूथ -१५६. रावणगाव त. ४८९ मते ७१.७०%
बूथ -१५७. लिंगापूर ४३६ मते ६८.४५%
बूथ -१५८. दगडवाडी ५४५ मते ७०.९६%
बूथ -१५९. उमरी द. ४६५ मते ७१.५४%
बूथ -१६०. उमरी द. ४२८ मते ६२.३०%
बूथ -१६१. पिंगळी ४८६ मते ७०.२३%
बूथ -१६२. पिंगळी ४५४ मते ७१.५०%
बूथ -१६३. चिंचगव्हाण ८१७ मते ६८.१४%
बूथ -१६४. चिंचगव्हाण ८०५ मते ७७.०३%
बूथ -१६५. जगापूर ६५३ मते ६३.३४%
बूथ -१६६. केदारगुडा ६२२ मते ७१.०९%
बूथ -१६७. कामारवाडी, पि. ४०९ मते ८४.१६%
बूथ -१६८. जवळगाव ८०६ मते ८३.५२%
बूथ -१६९. जवळगाव ७९७ मते ८७.५८%
बूथ -१७०. सरसम बु. ५९६ मते ७०.०४%
बूथ -१७१. सरसम बु. ७३९ मते ६९.५९%
बूथ -१७२. सरसम बु. ८२३ मते ६८.८२%
बूथ -१७३. टेंभी ८१४ मते ६४.४०%
बूथ -१७४. पार्डी ५५६ मते ६४.१३%
बूथ -१७५. चिंचोर्डी ५६३ मते ७१.६३%
बूथ -१७६. महादपूर ७७७ मते ७३.८६%
बूथ -१७७. आंदेगाव ५६६ मते ७८.६१%
बूथ -१७८. आंदेगाव ५११ मते ६७.६८%
बूथ -१७९. खैरगाव ६४६ मते ७४.५१%
बूथ -१८०. वाळकी खु. ९५७ मते ७४.४७%
बूथ -१८१. धानोरा ९२८ मते ७५.५७%
बूथ -१८२. कोळगाव ८०५ मते ७२.३९%
बूथ -१८३. डोरली ५०४ मते ७०.८९%
बूथ -१८४. डोरली टा. ४३९ मते ६६.४१%
बूथ -१८५. तळेगाव ६११ मते ७३.१७%
बूथ -१८६. तळेगाव ५६० मते ७२.९२%
बूथ -१८७. माळझरा ८९२ मते ७९.२९%
बूथ -१८८. खरबी ६३७ मते ७६.५६%
बूथ -१८९. कंजारा बु. १०११ मते ७६.७७%
बूथ -१९०. वाशी ६४५ मते ७४.८३%
बूथ -१९१. दरेसरसम, भिष्याची वाडी. ३९२ मते ७८.७१%
बूथ -१९२. दरेसरसम ७६३ मते ८२.५८%
बूथ -१९३. करंजी ६९८ मते ८१.६४%
बूथ -१९४. पारवा खुर्द ७५२ मते ७४.४६%
बूथ -१९५. पारवा खुर्द ३१५ मते ७७.४०%
बूथ -१९६. वटफळी ९०३ मते ७४.३८%
बूथ -१९७. आष्टी ५६१ मते ७१.३७%
बूथ -१९८. आष्टी ५७९ मते ७१.०४%
बूथ -१९९. आष्टी ५७९ मते ७६.८९%
बूथ -२००. आष्टी ४६७ मते ६२.६०%
बूथ -२0१. वाळकी बु.५६७ मते ७४.०२%
बूथ -२0२. वाळकी बु. ३१६ मते ५६.१३%
बूथ -२0३. पाथरड ७२५ मते ८१.३७%
बूथ -२0४. पाथरड ६७६ मते ६९.६९%
बूथ -२0५. वडगाव बु. ८८८ मते ७२.९७%
बूथ -२0६. नव्हा ६५२ मते ७२.४४%
बूथ -२0७. नव्हा ३९१ मते ७४.६२%
बूथ -२0८. चोरंबा खु. ४८४ मते ६९.९४%
बूथ -२0९. मनाठा ४११ मते ६२.४६%
बूथ -२१0. मनाठा ३३१ मते ५३.०४%
बूथ -२११. मनाठा ५७८ मते ४६.३५%
बूथ -२१२. मनाठा ४५६ मते ५२.४७%
बूथ -२१३. मनाठा ५८० मते ६६.८२%
बूथ -२१४. वरट ८०६ मते ७५.४०%
बूथ -२१५. वरवट २९४ मते ६९.८३%
बूथ -२१६. तरोडा ६५९ मते ७२.९०%
बूथ -२१७. चोरंबा बु. ७९३ मते ७६.९९%
बूथ -२१८. पांगरी ५९१ मते ७०.२७%
बूथ -२१९. एकराळा ४९५ मते ७५.३४%
बूथ -२२0. तामसा ५४३ मते ५८.८३%
बूथ -२२१. तामसा ५४० मते ६६.४५%
बूथ -२२२. तामसा ४६० मते ६५.५३%
बूथ -२२३. तामसा ४०५ मते ६२.५०%
बूथ -२२४. तामसा ५४१ मते ६०.२४%
बूथ -२२५. तामसा ४७३ मते ५९.७२%
बूथ -२२६. तामसा ६१२ मते ६८.८४%
बूथ -२२७. तामसा ८६१ मते ६९.६६%
बूथ -२२८. तामसा ६९८ मते ५९.९१%
बूथ -२२९. तामसा ३४५ मते ५८.४८%
बूथ -२३0. तामसा ३९१ मते ५९.६०%
बूथ -२३१. उमरी (ज.) ७६५ मते ६८.३६%
बूथ -२३२. उमरी (ज.) ७३३ मते ७८.९३%
बूथ -२३३. पोटा खु. ४४२ मते ७७.४१%
बूथ -२३४. सोनारी ८७२ मते ८०.८२%
बूथ -२३५. वाळक्याचीवाडी ७४४ मते ७९.८३%
बूथ -२३६. वाळक्याचीवाडी ८३७ मते ७७.४३%
बूथ -२३७. पवना ६९९ मते ६६.०१%
बूथ -२३८. पवना ७३९ मते ७६.९०%
बूथ -२३९. दूधड ५३३ मते ८०.७६%
बूथ -२४0. पोटा बु. ६९४ मते ७४.७८%
बूथ -२४१. पोटा बु. ६०९ मते ६८.८९%
बूथ -२४२. पोटा बु. ७४८ मते ८४.३३%
बूथ -२४३. कांडली बु. ८०२ मते ६९.३८%
बूथ -२४४. कांडली बु ८५१ मते ६४.९६%
बूथ -२४५. वायपना बु. ५१२ मते ६७.८१%
बूथ -२४६. वायपना बु. ५०२ मते ७३.९३%
बूथ -२४७. रावणगाव म. ६२३ मते ७६.०७%
बूथ -२४८. रावणगाव म. ५०४ मते ८१.४२%
बूथ -२४९. सावरगाव ९५० मते ७१.११%
बूथ -२५0. सावरगाव ८३९ मते ६८.४१%
बूथ -२५१. जांभळा कृष्ण ५२९ मते ६५.३१%
बूथ -२५२. दाबदरी ९७३ मते ७६.३७%
बूथ -२५३. वडगाव खु. ६७४ मते ७०.९५%
बूथ -२५४. पारवा बु. ४२१ मते ६९.२४%
बूथ -२५५. पारवा बु. ६४० मते ६६.६७%
बूथ -२५६. येवली ७२९ मते ६५.०९%
बूथ -२५७. येवली ६०७ मते ६४.७१%
बूथ -२५८. वायपना बु. ७८७ मते ७०.९०%
बूथ -२५९. शिवपुरी ५०८ मते ७३.८४%
बूथ -२६०. जांभळा ८७० मते ६८.२४%
बूथ -२६१. जांभळा ४१४ मते ७५.४१%
बूथ -२६२. जांभळा ३६९ मते ७८.०१%
बूथ -२६३. चोरंबा न. ८५२ मते ७६.२८%
बूथ -२६४. चोरंबा १७३ मते ५९.०४%
बूथ -२६५. चोरंबा ३४७ मते ६४.६२%
बूथ -२६६. निमगाव ७७४ मते ७२.५२%
बूथ -२६७. निमगाव ९९७ मते ७०.९६%
बूथ -२६८. चांभरगा ८२७ मते ६५.९०%
बूथ -२६९. चाभरा ५०५ मते ६९.२७%
बूथ -२७०. चाभरा ५४६ मते ७०.५४%
बूथ -२७१. चाभरा तांडा ५८८ मते ७५.३८%
बूथ -२७२. मालेगाव ८५१ मते ७४.३२%
बूथ -२७३. खरटवाडी ८६१ मते ७६.४७%
बूथ -२७४. दिग्रस ५२८ मते ७०.०९%
बूथ -२७५. दिग्रस ४४६ मते ५८.६८%
बूथ -२७६. वाई ८७९ मते ७०.५५%
बूथ -२७७. पिंपळगाव ४३२ मते ६४.३८%
बूथ -२७८. पिंपळगाव ४५२ मते ६५.१३%
बूथ -२७९. राजवाडी ४८२ मते ७५.७९%
बूथ -२८०. घोगरी ५९७ मते ७२.३६%
बूथ -२८१. घोगरी ५४२ मते ६८.७८%
बूथ -२८२. घोगरी ५९४ मते ७४.३४%
बूथ -२८३. चिकाळा ५६० मते ७४.३७%
बूथ -२८४. चिकाळा ५३७ मते ७४.७९%
बूथ -२८५. लोहा ८३३ मते ७१.३८%
बूथ -२८६. लोहा २६२ मते ६९.१३%
बूथ -२८७. लोहा ५८४ मते ६६.५१%
बूथ -२८८. माडवा व. ५९६ मते ६९.२२%
बूथ -२८९. माडवा व. ७५५ मते ७२.७४%
बूथ -२९0. सोनाळा ७२९ मते ७०.३०%
बूथ -२९१. रोडगी ५९३ मते ७३.१२ %
हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील २ लाख ६६ हजार ५३४ मतदारापैकी १ लाख ८६ हजार ४३७ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात १ लाख ४0 हजार ७५६ पुरुषापैकी १ लाख २९२ जणांनी मतदान केले, त्याची टक्केवारी ७१.२६ होते. एकूण महिला मतदार १ लाख २५ हजार ७७७ आहेत. यातील ८८ हजार १४५ महिलांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६८.४९ होते. सरासरी ६९.९५ टक्के मतदान झाले.

भगवाच फडकणार..!

हदगाव - हिमायतनगर मध्ये भगवाच फडकणार..!

हदगाव/हिमायतनगर(वार्ताहर)सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान शांततेत संपन्न झाल्यानंतर सर्वत्र विधानसभेचे निवडणुकीचा अंदाज बांधला जात आहे. हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात फक्त भगवाच फडकणार असल्याची चर्चा कार्यकर्ते, मतदारांचा चावडी, चौक- चौकातील चर्चेतून ऐकावयास मिळत आहे.  

सन २००९ च्या निवडणुकीपासून शिवसेनेत प्रवेश करून नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात सर्व लहान, थोर, वयोवृद्ध नागरिक, युवकांच्या जनसंपर्क वाढविला. कोणतीही सत्ता नसताना एका सत्ताधार्याला लाजवेल असे सामाजिक, धार्मिक कार्य त्यांनी करून सामन्यांची सहानुभूतीची मिळविली होती. हीच सहानुभूतीची लाट त्यांना या निवडणुकीत फायद्याची ठरली असून, त्यामुळेच नागेश पाटील यांचा विजय हि काळ्या दगडावरची रेष असल्याचे ग्रामीण भागातील दुधवाले, शेतकरी, लहान - मोठे व्यापारी, मजूरदार यांच्या तोंडून बोलले जात आहे. 

गत निवडणुकीत शिवसेनेचा बालेल्कील्ला असलेला मतदार संघ हा अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याच्या सहानुभूतीला जनतेने साथ देवून काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील यांना निवडून दिले होते. पाच वर्षाच्या काळात त्यांनी कोट्यावधीची विकास कामे केली, परंतु त्यांच्या विकास कामांना त्यांच्या सोबत असलेल्या चांडाळ चौकडीने दृष्ठ लावले त्यामुळेच बहुतांशी विकास कामे अजूनही कागदोपत्रीच आहेत. त्यातच त्यांनी केलेला विकासाच्या डोंगराचा गवगवा पाहून सामान्य मतदारांनी या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्याचे ठरविले. आणि छोट्या मोठ्या कामासाठी दलाली तथा मीच आमदाराच्या जवळचा म्हणवणाऱ्या मिनी आमदारांचे नाक ठेचून काढण्यासाठी शिवसेनचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाला पसंती देत भागव्याकडे कौल दिल्याचे सामान्य मतदार सांगित आहेत.     

तसेच भारिपचे उमेदवार बळीराम भुरके यांचा ग्रामीण भागात चांगला प्रभाव पडल्याने आदिवासी पट्टा संपूर्ण एकक गट्टा मतदान हे त्यांच्याकडे वळले असल्याचे चित्र मतदानाच्या दरम्यान दिसून आले आहे. तर काँग्रेस मधून नाराज होऊन बिएसपीच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले जाकेर चाऊस यांना ग्रामीण भागातील मुस्लिम, दलित बांधवांनी कौल दिल्याने काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजपचा पाहिजे तेवढा परिणाम जाणवला नाही, मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना शिवसेनेकडे वळविल्याचे बोलले जात आहे. एकूणच हे सर्व चित्र पाहता हदगाव - हिमायतनगर मतदार संघात भगवाच फडकणार..! असल्याचे बोलले जात आहे. मतदान संपल्यानंतर रात्री ०९ वाजल्यापासून यावर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि पैजा लावल्या जात आहेत. दि.१९ रविवारी मतमोजणी होणार असल्याने रविवारी दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रविवार, 12 अक्तूबर 2014

निकालापूर्वीच विजयाची लाट

शिवसैनिक - मतदार पेटून उठल्याने निकालापूर्वीच विजयाची लाट

हिमायतनगर(वार्ताहर)हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला रोकण्यासाठी मात्तब्बर पुढार्यांनी धडपड सुरु करून वेगवेगळ्या प्रकारे दिशाभूल करीत आहेत. मात्र या अफवांचे खंडन करीत युवासैनिक नागेश पाटलां साठी रात्रंदिवस एक करत आहेत. ग्रामीण भागात मतदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद व यंदा कोणत्याही परीस्थित बदल घडविणार असा विश्वास बोलून दाखवीत असल्याने शिवसैनिकात उत्साह संचारला आहे. परिणामी निकालापूर्वीच शिवसेनेच्या विजयाची लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर व ठीक ठिकाणी कोरणार बैठकांवर भर दिला आहे. सर्व सामान्य जनतेशी संवाद साधत शेतकरी, बेरोजगारी, उद्योग धंदे, माज्रांच्या हाताला काम व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन आपली भूमिका स्पष्ट करीत असल्याने अनेकांचे मत परिवर्तन होत आहे. त्यांच्या या अवाहनाला अनेक समाज संघटनांनी त्यांना पाठींबा दिला असल्याने शिवसेनच्या मतांची आकडेवारी झपाट्याने वाढू लागली आहे. तसेच हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागातील वाडी - तांड्यावर युवा शिवसैनिक व बरजंगदलाच्या तरुणांच्या जल्लोषाने मतदार संघातील वातावरण भगवेमय झाले आहे. त्यातच मागील पाच वर्षाच्या काळात सामान्य जनतेच्या सुख - दुखात सहभागी होऊन केलेल्या सामाजिक कार्यामुळे सहानुभूतीची निर्माण झालेली लाट हि नागेश पाटलांच्या जमेची बाजू बनली आहे. विद्यमान आमदाराच्या दलाल कार्यकर्त्यांनी केलेली निकृष्ठ विकासाची कामे व चांडाळ चौकडीचा विकास पाहता जो तो परिवर्तनाची भाषा बोलत आहे. 

खुद्द उमेदवार सर्व सामान्य मतदारांशी थेट संपर्क साधत असल्यामुळे जनसामान्यात मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख गत पाच वर्षात केलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे झाली आहे. तसेच ऐनवेळी  सुभाष वानखेडे यांनी सोडलेली साथ पाहता शिवसैनिक व सामान्य मतदार संतापला आहे. वानखेडे यांनी केलेल्या गद्दारीचा तो राग प्रत्यक्ष मतपेटीतून दाखून देण्यासाठी युवा शिवसैनिक व मतदार पेटून उठला आहे. परिणामी जीवाचे रान करून यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा वाघ धनुष्यबाण उचलणार..एकच वादा.. नागेश दादा.. अश्या घोषनाने बदल घडविण्यासाठी युवा शिवसैनिक रात्र - दिवस प्रचार फेर्या काढून मतदारांची सहानुभूती मिळवत आहेत. ग्रामीण भागात प्रचारासाठी गेलेल्या शिवसैनिकाला भगवी लाट दिसत असल्यामुळे निकालापूर्वी शिवसेनेच्या विजयाचे वारे वाहू लागले आहे. याचा प्रत्यय दाखवून देण्यासाठी दि. १५ रोजीच्या मतदान प्रक्रियेची वाट पहावी लागणार असून, विजयाचा निकाल दि.१९ अक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.  

शुक्रवार, 10 अक्तूबर 2014

जी.प.हायस्कूलची झाडा - झडती..हिमायतनगर(अनिल मादसवार)जी.प.हायस्कूल समस्येच्या गर्तेत सापडले असून, शिक्षकांचा मनमानी कारभार व मुख्याध्यापकाच्या नाकर्तेपणामुळे एकेकाळी नावाजलेली शाळा आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे शाळेच्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे. या संबंधित बाबीची दखल घेऊन मागील काही दिवसापूर्वी वर्तमान पत्रातून प्रकाशित झालेल्या बातम्यांची दखल घेत कुंभकर्णी झोपेतून जागे झालेल्या शिक्षण विभागाने आज दि.१० रोजी जी.प. शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी मडावी यांनी शाळेला भेट देवून तपासणी केली. आणि शाळेच्या दुरवस्थेची पाहणी केली. यावेळी उपस्थित पालकांनी अनेक समस्यांचा पाढा मडावी यांच्यासमोर वाचला.

शाळेत झालेल्या अनेक भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी शालेय व्याव्साथापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प.नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीत सन २००९ - १० वर्षात शाळा खोली बांधकाम अंतर्गत खेळणी साहित्यासाठी प्राप्त झालेल्या निधीत एक लाख पन्नास हजाराचा अपहार तत्कालीन सरपंच व मुख्याध्यापकाने केला असल्याची तक्रार पालकांनी केली होती. शिक्षकांच्या अपडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा होत असून, एक पिढी बरबाद होत असल्याची तक्रार पालकांनी मडावी यांच्याकडे केली.

त्यानुषंगाने सध्याचे मुख्याध्यापक यांची तात्काळ उचलबांगडी करून मुख्याध्यापक पदाचा कार्यभार गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याकडे सोपविण्यात येवून मुख्यालई न राहणाऱ्या शिक्षकांचे घर भाडे तात्काळ बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही पालकानी शाळेत सुविधा मिळत नसेल तर सांगा सर्व विद्यार्थ्यांच्या टीश्या काढून अन्यत्र शिकवू असा संतापजनक सवाल केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणाची सोय याच शाळेत उपलब्ध करून देणार असल्याचे ठोस आश्वासन उपस्थित पालकांना दिल्याने उपस्थितांनी राग आवरला. परंतु त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होईल..? कि ये रे मागल्या प्रमाणे परिस्थिती राहील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इमारतीची पाहणी करताना अनेक गैरसोई निदर्शनास आल्या यात शौच्चालयाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांसह शीक्षकांना लघुशंकेसाठी उघड्यावर आडोसा शोधण्याची वेळ आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आणि कुलुपबंद (बालभवन)प्रयोग शाळेतील साहित्यावर साचलेली धुळीच्या थराने शिक्षण अधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी याच शाळेचे माजी शिक्षक जलील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेमूद खान पठाण, जफर महमद खान, जुनेद खान, डॉ.जहूर खान, मिर्झा मुजाहिद, असलम कुरेशी, स.आदिल, अ.अफरोज, स.अ.अजीज मौलाना, असद मौलाना आदींची उपस्थिती होती.

काँग्रेसच्या तालुका सचिव शिवसेनेतहिमायतनगर(वार्ताहर)काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव तथा नाभिक समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील दलाल कार्यकर्त्यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस ला आणखीन एक जबरदस्त धक्क्याचा सामना करावा लागला, यावरून काँग्रेस पक्षातील निष्ठावन्ताची गळती रोकण्यात ते अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील यांचे शालेय जीवनातील जिवलग मित्र दिलीप शिंदे हे गत अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात हिमायतनगर तालुका सचिव पदावर कार्यरत होते. काँग्रेसचे आमदार तथा विद्यमान उमेदवार जवळगावकर यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्याने तथा काही मिनी दलाल आमदारांनी चार वर्षात एकाधिकार शाही सुरु केली. त्यामुळे एकेक करत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिट्ठी देत इतर पक्षात सामील होत आहेत. आजघडीला काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना विरोधकांसह स्वकीयांच्या प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. काँग्रेसपक्षात राहून जीव गुदमरू लागल्याने शिवसेनच्या नागेश पाटील यांच्या नेतृत्वाला मान्य करून भगवी दस्ति परिधान केली, एवढेच नव्हे तर नाभिक समाज बांधवांच्या आदेशाने हा निर्णय घेतल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले. कारण काँग्रेसच्या आमदाराने गत पाच वर्षात केवळ सग्या - सोयार्यांचा विकास केला असून, निष्ठावंत व तळमळीन एकाम करणाऱ्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय केल्यानेच मी काँग्रेस पक्षाचा त्याग केल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली आहे. आता मी धनुष्यबाण हाती घेतला असून, काँग्रेस मधील हुकुमशाही प्रवृत्तीचा नायनाट करून नागेश पटालांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.याच कार्यक्रमात नाभिक समाज, मातंग समाज संघटना यासह अन्य संघटना च्या शेकडो पदाधिकार्यांनी प्रवेश केला. यावेळी मंचावर माजी जी.प.सदस्य बाबुराव कदम, हिमायतनगर पंचायत समितीच्या सभापती आडेलाबाई हातमोडे, प.स.सदस्य बालाजी राठोड, डॉ. संजय पवार, राम ठाकरे, परमेश्वर पानपट्टे, मोरे काका सरसमकर, संदीप भुरे, साईनाथ धोबे, रवींद्र दमकोंडवार, जफर भाई, महेमूद खान, हानुसिंग ठाकूर, गजानन चायल, साहेबराव चव्हाण, केवलदास सेवनकर यांच्यासह अनेक जेष्ठ शिवसैनिक मान्यवर, कार्यकर्ते, मतदार बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

गुरुवार, 9 अक्तूबर 2014

मुस्लिम मतदारात नाराजीहदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात उमेदवारांनी प्रचाराचा धुराला उडवायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात मतदानाची तारीख अवघ्या पाच दिवसावर येउन ठेपली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी सभा, ग्रामीण भागात कॉर्नर बैठका, तर दररोदार मतदारांच्या गाठी भेटी घेऊन मतदारांची मने वळविन्यावर सर्वानीच भर दिला आहे. एकूण पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारावरून पंचरंगी लढतीचे चिन्ह दिसत असले तरी खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारात होणार आहे.

दरम्यान हिमायतनगर येथे दि.०८ रोजी आठवडी बाजारच्या दिवशी खा. राजीव सातव यांची जाहीर सभा आयोजित केली होती. संपन्न झालेल्या प्रचार सभेत वक्त्यांच्या भरकटलेल्या भाषणबाजीने मुस्लिम मतदारामध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून येत आहे. परिणामी हा वर्ग अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे तथा बि.एस.पी.चे.उमेदवार जाकेर चाऊस यांच्याकडे वळण्याची शक्यता बळावली आहे. काँग्रेसच्या सभेत अनेक वक्त्यांनी आपली भाषणे करून विरोधकांवर टीकेचा भडीमार केला. काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या एका नूतन कार्यकर्त्याने तर भाषणबाजी केली, जाता जाता मात्र त्यांनी शेवटी आम्ही भी पाटील आहोत आमच्या नादाला लागल्याने काय होईल सांगता येणार नाही असा दम भरल्याने उपस्थित मुस्लिम समाज बंधावात निरुत्साह पसरला आहे. नेहमीच येथील मुस्लिम समाज हा भाजपा, शिवसेना बाबत नाराजी व्यक्त करीत काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करतात. मात्र सदर वक्त्याच्या मराठाशाही वक्तव्याने काँग्रेस उमेदवाराला आमची मते नको आहेत का..? अशी चर्चा शहरात सुरु आहे.

एवढेच नव्हे प्रमुख वक्ते खा. राजीव सातव यांचे भाषण झाले. त्यांच्या मार्मिक भाषणात मोदीवर चांगलेच टीकास्त्र सोडले तसेच बोर्डरवर पाकीस्थान गोळ्यांच्या फैरी झाडत असताना मोदी मात्र इकडे प्रचारात गुंतल्याचा आरोप केला. मोदी यांनी शपथ विधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले, त्यांच्याच बाजूला सेनेचे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे बसले असे सांगत खिल्ली उडविली. यावेळी थोडे भाषण भरकटत जावून मुस्लिम विरोधी सूचक वक्तव्य त्यांच्या तोंडूनही ऐकावयास मिळाले. मात्र तेंव्हाच त्यांनी सारवासराव करत " सिंघम रिटर्न .. माधवराव सुद्धा रिटर्न.. हिंगोली मतदार संघातील जनता भारी आणि हदगाव - हिमायतनगरची जनता तर लई भारी.." असे म्हणून जवळगावकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. परंतु सातव यांच्या या डायलोग बाजीच्या वक्तव्यामुळे समजदार को इशारा काफी है.. या उक्तीप्रमाणे पहिल्यांदा माधवराव यांचा पराभव झाला होता..त्याच पद्धतीने या निवडणुकीतही त्यांचा पराभव होईल असे तर त्यांना म्हणायचे नाही ना.. या बाबत सुजाण मतदारांमध्ये खल सुरु आहे.

खरे पाहता अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष व मुस्लिम मतदार असे समीकरण राहत आले आहे. काँग्रेसवाले मुस्लिमांची मते आपल्या घरचीच असल्याचे समजतात, परंतु सत्तेतील वाटा देण्यासाठी त्यांच्याकडून तत्परता दाखविली जात नाही. असा आजवरचा अनुभव जाणकारांचा आहे. म्हणूनच कि काय ..? काँग्रेसचे मातब्बर पुढारी तथा जी.प.सदस्य समद खान यांनी काँग्रेस मध्ये असताना सुद्धा बि.एस.पिचे उमेदवार जाकेर चाऊस यांचा पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी यावेळी मुस्लिम, ओबीसी, व बहुजनांची मते कमी होणार असल्याचे चिन्ह दिसून येत असल्याने जवळगावकर पराभवाच्या छायेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यासाठी काँग्रेस उमेदवारासोबत असलेले काही बिभीषणाची भूमिका वठविणारे कार्यकर्ते यास कारणीभूत ठरणार असल्याची चर्चा मतदारांच्या तोंडून ऐकू येत आहे.

फोडाफोडीची स्पर्धा सुरूच
--------------------------
दरम्यान या सभेत हिमायतनगर, वडगाव, खडकी येथील बर्याच्या शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर टेंभूर्णी व पवना तांडा, बोरगडी, यासह वाडी - तांड्यातील बर्याच काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागेश पाटील यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला. या दोन मातब्बर नेत्यामध्ये लागलेल्या या फोडाफोडीच्या चढा ओढीने २०१४ ची विधानसभा निवडणुकी अतिशय चुरशीची होणार आहे. तसेच बी.एस.पी.चे उमेदवार जाकेर चाऊस व भारीप बहुजन महासंघाचे उमेदवार डॉ.बळीराम भुरके या दोघानासुद्धा जातीय समीकरणाचा मोठा फायदा होणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप देशमुख, भाजपच्या लता कदम, मनसेचे सुरेश सारडा यांनि सुद्धा प्रचारात आघाडी घेतली असून, जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होईल याचा उलगडा १५ अक्टोबरच्या मतदानानंतर व १९ रोजीच्या निकालानंतर समोर येणार आहे. 

रविवार, 5 अक्तूबर 2014

काँग्रेसच्या भस्मासुराला हद्दपार करा

गेल्या ६० वर्षापासून जनतेला लुबाडणाऱ्या काँग्रेसच्या भस्मासुराला हद्दपार करा.. खा.राऊत


हिमायतनगर(अनिल मादसवार)काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच सरकार गोचीडप्रमाणे सत्तेला चिटकून बसले आहे. गेल्या १५ वर्षाच्या राजकारणी कारभारात शेतकर्यांना व सर्व सामान्यांना या सरकारने लुटलं, लुबाडला आहे. अश्या लबाड लांडग्याना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागाव. काँग्रेसच्या राक्षसरुपी भस्मासुराचा आगामी निवडणुकीत वध करून शिवसेनेच्या धनुष्य बाणाला विजयी करा असे आवाहन खा.विनायक राऊत यांनी केले. 

ते हिमायतनगर येथील शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पहिल्या जाहीर सभेत बोलत होते. या सभेला हिमायतनगर तालुक्यातून अथांग जनसमुदाय उपस्थित झाल्याने विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरल्याचे चित्र दिसून आले आहे. यावेळी मंचावर बबन थोरात, महिला आघाडीच्या प्रमुख लताताई फाळके, बाबुराव कदम कोळीकर, डॉ. संजय पवार, रामभाऊ ठाकरे, प.स.सभापती आडेलाबाई हातमोडे, हदगाव प.स.उपसभापती जयश्री देशमुख, जनाबाई कदम, माजी नगरसेविका शीलाताई गंधारे, अरुणा गिरी, विवेक देशमुख, बालाजी राठोड, राम राठोड, लक्ष्मण जाधव, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, आघाडी सरकारने सत्ता असताना देखील शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला नाही. परिणामी येथील शेतकरी शासनाच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या संदर्भात शिवसेना जाहीर सभेच्या निमित्ताने सत्ता येताच पहिले काम म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे हे काम शिवसेना करणार आहे, असे अभिवचन त्यांनी दिले. शिवशाहीची राजवट शेतकरी, व सामन्यांना अभिमानाने जीवन जगत यावे यासाठीचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न बघितले होते. साध्या सरपंचाला तीन वेळा आमदार, एक वेळा खासदार केले अश्यानी घाण  केली असे सांगत २० वर्ष सत्ता भोगून पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सुभाष वानखेडे यांचा खरपूस समाचार घेतला. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडत या कपाळ करंटे राज्यकर्ते काँग्रेसला गाडून टाका. तसेच बाळासाहेबाच्या नावावर केंद्रात सत्ता मिळविणाऱ्या  मोदीच्या अच्छे दिनावर टीका केली. गत १९९५ साली झालेल्या निवडणुकीत मीच जिल्हा संपर्क प्रमुख होतो. त्याकाळाप्रमाणे यावेळी सर्व उमेदवारांचे डीपोजिट जप्त होऊन नागेश पाटील यांच्या लाखाच्या मताधिक्याने विजय होईल असा ठाम विश्वास बोलून दाखविला. यावेळी नागेश पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. एकच वादा नागेश दादा अश्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून निघाला होता.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश  हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील १०१ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भंपकबाजी कामकाजाला कंटाळून दि.०५ रोजी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच बोरगाव ता. येथील सरपंच - उपसरपंच व सरसम येथील काही निष्ठावन्तानी नागेश पाटील यांच्या नेतृत्वाला मान्य करून भगवी दस्ति परिधान करून प्रवेश केला. यावेळी एकच वाद नागेश दादा..कोण आला रे कोण आला..शिवसेनेचा वाघ आला.. असा जयघोष झाला. यावेळी विनायक राउत, बबन थोरात, नागेश पाटील, बाबुराव कदम, लताताई फाळके, बालाजी राठोड, डॉ.संजय पवार, लक्ष्मण जाधव, प.स.सभापती आडेलाबाई हातमोडे, राम राठोड, विजय वळसे, शंकर पाटील यांच्यासह अनेक ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बंजारा टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य बालाजी राठोड यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर टीका करत हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पुतळा महापालिकेच्या प्रांगणात बसविण्या ऐवजी बंदिस्त ठेवला आहे. कोन्ग्रेस च्या सरकारने बनाजरा समाजाला कायम उपेक्षित ठेवले असल्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपला सर्वांचा विकास होणार आहे. त्यामुळे बहुसंख्य समाज बांधवांनी शिवसेनच्या पाठीशी राहून युवा नेते नागेश पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

माजी.जी.प.सदस्य बाबुराव कदम यांनी बोलताना सांगितले कि गत निवडणुकीत मी उमेदवार म्हणून उभा असताना आमच्यातीलच काही गद्दारांनी विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत आर्थिक तडजोड करून मला पाडले. हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या विकासासाठी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणाऱ्या नागेश पाटील यांच्या रुपात तरुण तडफदार वाघाला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करून विरोधकांचे उंबरवठे झिजविणार्या व जनतेशी गद्दारी करून स्वतःचे घर भरणार्यांना धडा शिकविण्यासाठी धनुष्यबाण या निशानिसामोरील बटन दाबून आष्टीकर  यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.  

प्रचार सभेत बोलताना महिला आघाडीच्या हदगाव तालुका प्रमुख लताताई फाळके म्हणाल्या कि, गत निवडणुकीत जनतेनी सहानुभूतीने हिमायतनगर हदगाव तालुक्यात काँग्रेसला निवडून दिले, मात्र तोच नेता असा बेवडा निघेल असे वाटले नव्हते. त्यांच्या या कारनाम्याच्या वास्तविकतेपासून सर्व जनता अन्नाभिन्न आहे. यांचे दाखविण्याचे वेगळे व खायचे वेगळे दात आहेत, त्यांनी विकासाच्या नावाखाली सरकारला अंधारात ठेवून आपलीच झोळी भरली आहे. हे ओळखून जनतेनी अश्या लुटारुणा धडा शिकवीत दूरदृष्टी नेतृत्व व विकासाभिमुक महाराष्ट्राचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी विधानसभेवर नागेश पाटील यांना मताधिक्याने पाठवावे असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवार नागेश पाटील बोलताना म्हणाले कि, विद्यमान आमदारांनी पाच वर्षाच्या काळात एकदाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविला नाही. हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश गावे हि सिंचनापासून वंचित आहेत. शेती मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी साहुकार व बैन्केच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. तर मनमानी पद्धतीने शेतीमाल खरेदी करीत असताना देखील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. एवढे सर्व घडत असताना शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी साधा पाठपुरावा करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले नाही. खालपासून ते वरपर्यंत त्यांचीच सत्ता असताना शेतकरी व बेरोजगार युवकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे सोडून केवळ स्वार्थासाठी रस्ते विकास कामाचा डांगोरा पिटला आहे. अश्या स्वार्थी व विकासाच्या नावाखाली भंपकबाजी करून स्वतःचा विकास करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्हे का म्हणून मतदान करणार..? असा सवाल करीत. मागील पाच वर्षाच्या काळात मी जर कोणते चांगले काम केले असे तुम्हाला वाटत असेल तर मला मतदान करा अन्यथा करू नका अशी भावनिक साद मतदारांना घातली. यावेळी एकच वादा... आता आमदार फक्त नागेश दादा..अश्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवसैनिक व मतदार बंदहावांची प्रचंड गर्दीने मैदान फुलले होते.

शनिवार, 4 अक्तूबर 2014

विजयादशमीहिमायतनगर(वार्ताहर)शहरातील परमेश्वर मंदिर मैदानात बजरंग दल मंडळाच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम दसर्याच्या दिवशी सायंकाळी संपन्न झाला. या वेळी हजारोच्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता.

आयोजीत रावण दहन कार्यक्रमाची तयारी गात आठ दिवसापासून सुरु होती. जवळपास ४० फुट उंचीच्या रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यासाठी शहरातील युवक देविदास शिंदे, गजानन चायल, कुणाल राठोड, गोविंद शिंदे, गजानन मांगुळकर आदींसह अनेक बजरंग दलाच्या युवकांनी मेहनत घेतली होती. प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी पारंपारिक दसर्याची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर शुक्रवारी ८.३० वा. फटक्याच्या अतिषबाजीत रावणाच्या पुतळ्याचे दहन जय श्री राम..च्या जयघोषात करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सरसम, टेंभी, पोटा, आदीसह अनेक ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. या मिरवणुकीत युवकांनी भिमगीताच्या तालावर डान्स करून शहर वासियांचे लक्ष वेधले होते.

जी.प.शाळेत

हिमायतनगर जी.प.शाळेत शिक्षकांच्या मनमानी कारभार.. 


हिमायतनगर(अनिल मादसवार)गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे शहरातील जी.प.शाळेतील शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्ट्यापूर्वीच शाळेला दांडी मारण्याचा मनमानी कारभार सुरु केला आहे. परिणामी मराठी - उर्दू शाळेचा शैक्षणिक दर्जा ढासळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचे पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यानि केला आहे.  

आर .टी.ई. २००९ या सारखा कायदा येऊनही त्यांची अंमलबजावणी हिमायतनगर तालुक्यात खर्या अर्थाने केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जबाबदार गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या जाणीवपुर्वक दुर्लक्षामुळे तालुक्यातील बहुतांश शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक मनमानी पद्धतीने कारभार चालवीत असल्याने तसेच अनेक ठिकाणी प्रभारी राज चालविल्या जात असल्याने शिक्षणाच्या आयच घो झाला आहे. याचाच फायदा दांडी बहाद्दर शिक्षक घेत असल्याने वाट्टेल त्या वेळी शाळेत येणे व जाने असा कारभार होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुंवात्त ढासळली आहे. याचे जवंत उदाहरण म्हणजे हिमायतनगर शहरातील सर्वात जुनी असलेल्या जी.प.हायस्कूलवर पहावयास मिळत आहे. गत अनेक वर्षापासून हि शाळा या ना त्या कारणाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात येत असून, गटशिक्षण अधिकारी मात्र पालकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.  

शहरातील जी.प.शाळेवर मराठी आणि - उर्दू अशी पहिली ते दहावी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र यांना शिकविणारे शिक्षक आळी - पळीने मनमानी तथा अनाधिकृत पद्धतीने शाळेतून  दांडी मारत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरु होण्याच्या वेळेला अनेकदा गैर हजार राहणे आणि शाळा सुटण्याच्या पूर्वीच अर्ध्यातूनच सुट्टी मारून परत जाने हा नित्यक्रमच बनला आहे. त्यामुळे येथील शाळा हि रेल्वे वेळापत्रकानुसार चालविली जाते काय..? असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी विधाराला आहे. शाळेत अनेक सुविधांचा अभाव असून या प्रश्नाकडे तालुक्याचे नेते तथा जबाबदार अधिकारी सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामुळे विधार्थी - विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, शौच्चालय, घाणीचे साम्राज्य, अवेळी भरविली जाणारी शाळा यासह अन्य गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

एवढेच नव्हे तर मधेच एखादी सुट्टी आली तर दुसर्या दिवशी सुद्धा अघोषित सुट्टी देत शाळेवर हजेरी टाकून शाळा सोडून दिली जाते. असाच काहीसा प्रकार दि.०४ शनिवारी जी.प.शाळा हिमायतनगर येथे उघडकीस आले आहे. सकाळी ८ वाजता हजार झालेले शिक्षक पुन्हा सकाळी ९.१५ वाजता नंदीग्राम एक्सप्रेसने, नांदेड, भोकरसह आपल्या गावाकडे निघून गेले आहेत. हि बाब पालकांच्या लक्षात येताच  त्यांनी शाळा गाठली असता सेवक शाळेला कुलूप लावून जात असल्याचे दिसून आले. या बाबतची तक्रार पालकांनी गटशिक्षण अधिकार्याकडे केली. मात्र त्यांनी तुम्ही तक्रार द्या मग काय करायचे ते आम्ही बघू असे सांगत अकलेचे तारे तोडले. हि बाब काहींनी पत्रकारांना सांगितल्याचे समजतच शिक्षण विस्तार अधिकारी श्री संगपवाड हे १० वाजता शाळेवर हजार झाले. अवेळी पलायन करून दांडी मारण्याच्या प्रकारची चौकशी केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सलाम खुरेशी, शे.मैनोद्दीन, अ.गन्नि, मो.कुरेशी, शे.मुसा, आदीसह अनेक पालक, पत्रकार उपस्थित होते.   

याबाबत पंचनाम्यासाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी श्री संगपवाड यांनी सांगितले कि, शाळेची वेळ सकाळी ७.४० ते ११.४० असताना शाळेला १० वाजताच कुलूप लावल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती घेऊन एका दिवसात खुलासा सदर करण्यात यावा असे मुख्याध्यापकांना सुचित केले आहे. तसा अहवालही वारीष्टाकडे पाठविला आहे. 

शुक्रवार, 3 अक्तूबर 2014

रोकने कठीण

शिवसेना उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना रोकने कठीण - बालाजी राठोड


हिमायतनगर/ हदगाव(वार्ताहर)दूरदृष्टी असलेले शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या झंजावाती प्रचारामुळे विरोधकांची हवा गुल झाली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी बंजारा समाज व बहुजन टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आई तुळजाभवानी, हिंदू र्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने शिवसेनेला रोकने कठीण आहे. असे मत बंजारा टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा दुधड गणाचे पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड यांनी व्यक्त केले. संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या उपस्थित हदगाव येथे हजारो  मनसे कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, युवा नेते नागेश पाटील आष्टीकर हे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेवून सिंचनाबाबत बोलणारे व्यक्तिमत्व आहेत. कोणत्याही पदावर नसताना त्यांनी उर्द्वा पैनगंगा प्रकालाच्या माध्यमातून कैनोल निर्मित्ती करून हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला लक्षात घेऊन लवकरच प्रशासन हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील वंचित भागात कैनोलचे प्रश्न मार्गी लागून परिसरात हरित क्रांती येईल. त्यामुळे अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढून उन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळून देण्यासाठी ठीक - ठिकाणी रस्ता रोको, आंदोलने केली, मात्र कुंभकर्णी झोपेतील काँग्रेस शासितानी पाऊस झाल्याचे कारण समोर करून हदगाव - हिमायतनगर तालुक्याला मदत मिळवून देण्यापासून वंचित ठेवले. काँग्रेसच्या नेत्यांनी विकासाच्या नावावर स्वतःचा विकास करून घेतला. अश्या ढोंगी लोकांना नेस्तोणाबूत करण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या नागेश पाटील यांना मतदारसंघाचा विकास करण्याची संधी देऊन धनुष्यबाणाला विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी.जी.प.सदस्य बाबुराव पाटील कोहळीकर, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख पांडुरंग मामा कोल्हे, डॉ. संजय पवार,   यांच्यासह हजारोच्या संखेत शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

गुरुवार, 2 अक्तूबर 2014

नागेश पाटीलांची चलतीहिमायतनगर(वार्ताहर)हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघ गेली १५ वर्ष शिवसेनेच्याच ताब्यात होता. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने हि जागा आपल्याकडे कायम केली. गेल्या चार - पाच वर्षात विकास कामाची नुसती जाहिरात बाजी झाली. प्रत्यक्षात विकासाची कामे कमी झाली, झालेल्यापैकी बहुतांश कामे नि निकृष्ठ झाल्याने जास्त बहुतांश मतदारात काँग्रेसच्या उमेदवार विषयी निरुत्साह दिसून येत आहे. या मतदार संघात युतीमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला त्यांच्या संघटनेच्या काळात अडगळीला टाकले. तर आघाडी मध्ये काँग्रेसने कधी राष्ट्रवादीला वर येऊ दिले नाही. युती आघाडी अशी बोंब झाली असल्याने खरी लढत शिवसेना व काँग्रेसच्या उमेदवारातच होईल असे स्पष्ट दिसून येत आहे.

त्यातच तत्कालीन आमदार तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांची नौटंकी ओळखून जनतेने कोणाला मतदान करायचे हे अगोदरच ठरविले आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार कदम यांच्या हातातील कमळ हे शिवसेनेच्या बाणावर परिणाम करेल असे वाटत नाही. याचाच फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे. तरी सुद्धा या मतापेक्ष जास्तीचे मते मिळविण्यासाठी शिवसैनिक कार्यकर्ते अंग झटकून एक - एक मत वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रतिक्रियेतून शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असल्याने आगामी विधानसभेचे आमदार नागेश पाटील हेच ठरतील असे सामान्य जनतेचे मत आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार देशमुख हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत, तसेच बसपाचे जाकेर चाऊस हत्तीवर स्वार झाले आहेत. भारीपकडून डॉक्टर भुरके व नाईक हे दोन आदिवासी समाजचे नेते सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण आदिवासी बांधवांचे एकगठ्ठा मतदान वळले आहे. बहुतांश ठिकाणी काँग्रेसची वोट बैंक असल्याने मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे. या सर्व बाबीचा विचार व सामान्य मतदारांच्या प्रतिक्रियेतून नागेश पाटील आष्टीकर हे आज घडीला विजयी उमेदवार आहेत असे म्हणण्यास वाव आहे. कारण दररोज शेकडो युवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आज तर मनसेचे जिल्हाप्रमुख व शाखाप्रमुख शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने शिवसेनेची वोट बैन्केचा आकडा वाढला आहे.

गत दोन दिवसापासून माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरले असून, त्यांच्या काळातील जुने मतदार व त्यांच्या बद्दल आस्था असणार्यांची संख्या मोठी आहे.

हजारो कार्यकर्ते शिवसैनेतहदगाव(शिवाजी देशमुख)मनसचेे जिल्हा सचिव डॉ.संजय पवार यांच्या सहीत हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील 71 मनसे शाखाप्रमुखांनी हदगाव येथील एका जाहीर प्रवेश सभेतुन शिवसैनेत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा नांदेड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी मनसेचे हजारो कार्यकत्यांनी शिवबंधन बांधले यामुळे हदगाव विधानसभा मतदारसंघातील सेनेची ताखत वाढली असुन या प्रवेश सभेचे मनसे कार्यकर्त्याच्या उपस्थित विरोधकांचे धाबे दणानले आहेत.

यावेळी माजी तालुका प्रमुख पांडूरंग कोल्हे, शिवसेनेचे विधानसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, माजी.जी.प.सदस्य बाबुराव कदम, शामराव चव्हाण, विवेक देशमुख, संभाजी लाडंगे, सुभाा जाधव, राम राठोड, रामु ठाकरे, गजानन पवार, रमेश घंटलवाड, सुधाकर महाजन, पुपातार्इ देशमुखे, सौ.लतातार्इ फाळके, यांची प्रमुख उपस्थिती होती. संतोष सोळंके, गणेश कदम, के.डी.देशमुख, दता मेंडके, कुलदीप मस्के, नंदकिशोर भोसले, कल्याण शिंदे, संजय नाथराव पेदे, भगवानराव सुर्यवंशी, लतातार्इ डोरले, विनायक मोरे, सचितानंद महाजन, दिलीप चौतमल, रामु चव्हाण, राजु तावडे, पाशा, वजीर, सुभाष देशमुख, संदिप सादुलवार, बालाजी कहाळे, रमेश पिन्नलवार, शिवाजी लामतुरे, संदिप उंचेवार, शंकर जळके, सचिन माने, प्रदिप गंघाळे, मंगेश रांजने, डॉ.मनोहर राठोड, गंगाबार्इ पुरी, सदानंद चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश सुर्यवंशी, बालाजी धोंगडे, नागोराव देशमुख, संजय माने, बालाजी दतराव वाघमारे, भारत हिरामन वाघमारे, अरुण शांताराम हडसणकर, गजानन गव्हाणे, विजय साबळे, विठल गंगाराम धनगरे, काशिनाथ फटाले, लिंबाजी कोल्हे, लयराम खानजोडे, तानाजी काबंळे, बालाजी वारकड, अरविंद शिंदे, रमेश हमंद, सिध्देश्‍वर अर्धापुरे, हिनतीन वानखेडे, बाबाराव नरवाडे, संतोष चव्हाण, राजु चव्हाण, ज्ञानेश्‍वर पवार, दतराव पवार, दतराव पवार,शिवाजी कदम, कमलकिशोर नरवाडे, गजानन नरवाडे, दिगाबंर तंत्रे, वैजनाथ गायकवाड, विणु वानखेडे, विलास वानखेडे, विणु शिंदे, विजय अडकिणे, गणेश कवाने, अरुण फटाले, सतिश वानखेडे, शिवशंकर वानखेडे, तानाजी शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष सोळंके, सतिश सोळंके, विजय गिरी, संदिप भादे, बालाजी चौतमल, गजानन पतंगे, सुधाकर तावडे, सुनिल शिंदे, अनिल शिंदे, प्रशांत चौतमल, गजानन निर्मल, अनिल कोकाटे, बंडु काकडे, राजेद्र जाधव, निर्गून जाधव, विजय शिंदे, किरण नरवाडे, पंजाब जाधव, लक्ष्मन जाधव, गणेश पौळ, रामेश्‍वर पडफळ, परमेश्‍वर कदम, संतोष सावतकर, रेश्माजी जाधव, रामेश्‍वर जाधव,ज्ञानेश्‍वर देशमुख, चिमन लोटे, एकनाथ कानोडे, देविदास पोत्रे, भगवान भुरके, गोविंद कहाळे,ज्ञानेश्‍वर डाखोरे, लिंबाजी कोल्हे, गणेश सुर्यवंशी, मनोज तपासकर, राजु झळके, तुकाराम गवले, जुनेद पाशा, रवि जाधव बालाजी कदम, अमोल वाढोनकर, नामदेव वानोळे, सुभाष डुकरे, शिवाजी शिंदे, अरविदं सरकटे, निवृती देवसरकर, गजानन माने, दिगाबंर देवसरकर, आदिसह हजारो कार्यकत्यांनी सेनेत प्रवेश घेतला.

रेल्वे वसाहत अंधारात

हिमायतनगर(अनिल मादसवार)महावितरण व रेल्वे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गत काही महिन्यापासून रेल्वे विभागात काम करणाऱ्या नागरिकांची वस्ती व रेल्वे प्लैटफॉर्म व मुख्य आवारातील हायमास्ट लाईट बंद पडल्याने परिसर अंधारातच असल्याचे चित्र हिमायतनगर भागात दिसून येत आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने रेल्वेने येणाऱ्या प्रवाशी व वस्तीतील नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे.

हिमायतनगर रेल्वे स्थानक हे तेलंगाना - विदर्भाच्या मध्यभागी असलेले मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शहरात आहे. बहुत प्रतीक्षेनंतर या ठिकाणी मीटरगेजचे ब्रोड गेजमध्ये रुपांतर झाले. यास जवळपास दहा वर्ष लोटले मातर अजूनही या ठिकाणी प्रवाशी व रेल्वे कर्मचार्यांसाठी आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी गैर्सोइत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. रेल्वे विभागातील कर्मचार्यांना मोडकळीस आलेल्या कोर्टर मध्येच रहावे लागत असून, रस्ते, शुद्ध पाणी व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही सोय उपलब्ध नाही. आता तर या समस्येत आणखीनच भर पडली असून, या भागातील विद्दुत पुरवठा गत काही महिन्यापासून बंद आहे. परिणामी रात्रीला अंधाराचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. या प्रकारची माहिती रेल्वे कर्मचार्यांनी वरिष्ठांना कालवून देखील याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने ऐन सणासुदीच्या काळातही हीच अवस्था असल्याने नागरिक व प्रवाश्यांना अडचणीट भर पडली आहे.

तर गत महिन्याभरापासून रेल्वे प्लैटफॉर्म सुद्धा अंधारातच असल्याने येणाऱ्या - जाणार्या प्रवाश्यांना विशेषतः महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील तालुक्याचे रेल्वे स्थानक असल्याने भुरटे चोर, पाकीट मारंचा सूळसुळाट वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री - मध्यरात्री येणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना अंधारामुळे चढणे- उतरणे जिकरीचे बनले असून, अश्या वेळी हिमायतनगर स्थानकावर आजवर अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे सर्वश्रुत आहे. तसेच दुसर्या रेल्वे प्लैटफॉर्म गाठण्यासाठी जीव धोक्यात टाकून पटरीवरून जावे लागत आहे. या प्रकारामुळे बर्याच दुर्घटना घडल्या असून, प्रशासनाने पादचारी उड्डाण पूल बनविण्यासाठी कोणतीही दखल घेतली नाही. तसेच स्थानकावर शौछालाय, सुरक्षेच्या पोलिस चौकी, प्लैटफॉर्मच्या दोन्ही बाजूने स्ट्रीट लाईट, साफ सफाई, पिण्याचे शुद्ध पाणी आदी असुविधेमुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झाला आहे. या समस्येकडे विभागीय रेल्वे अधिकार्यांनी लक्ष देऊन तातडीने समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली जात आहे.

विद्दुत दिवे बंद पडल्याने ऑटो पलटी
--------------------------------------
रेल्वे स्थानकाजवळील विद्दुत दिवे बंद झाल्याने दि.०२ अक्टोबर रोजी एका ऑटो पलटी झाल्याची घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून कोणाशी गंभीर दुखापत झाली नाही. मात्र रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या विद्दुत दिवे चालू करण्याकडे केले जात असलेल्या प्रकारामुळे हि घटना घडली अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व प्रवाशी वर्गणी व्यक्त केल्या आहेत. तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात यल्गार पुकारावा लागेल अशा इशारा प्रवाशी व शहरातील नागरिकांनी दिला आहे.

बुधवार, 1 अक्तूबर 2014

काँग्रेस म्हणजे

हदगाव / हिमायतनगर(वार्ताहर)दलित आणि मुस्लिम मतदारांना आपली वोट बैंक समजणाऱ्या काँग्रेसला एकाला चलोचा फंडा हदगाव / हिमायतनग विधानसभा मतदार संघात महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासाचा गवगवा होत असला तरी हा विकास सोयर संबंधाचा झाल्याच्या प्रतिक्रिया बहुजन समाजातील मतदारामधून उमटत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मतदार संघाच्या नावाखाली सोयर्या धायर्यांचा विकास जोमाने केला असल्याचे अनेक मतदारातून सांगण्यात येत आहे. परिणामी वोट बैंक समजली जाणारी दलित, मुइस्लिम, ओबीसी मतांची काँग्रेस ची टक्केवारी हळू हळू घसरताना दिसत आहे. सर्वसमान्य तला गाळातील मतदारांचा वापर केवळ निवडणुकी पुरताच होत असल्याने आता काँग्रेस पक्ष म्हणजे पाटलांची पार्टी झाल्याच्या छुपा प्रचार अनेक कार्यकर्ते करत आहेत. केवळ सत्तेसाठी इतरांना गृहीत धरत मलिदा लाटण्यासाठी मात्र सोयरे - धारये अश्या संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत असल्याने बहुजन समाजातील मतदार या वेळेस काँग्रेसला हात दाखविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

एवढेच नव्हे तर आमदारांच्या चेल्या - चपाट्यानी भरमसाठ प्रमाणात मिळालेल्या निधीवर डल्ला मारला असल्याचे अनेक निकृष्ठ विकास कामावरून दिसून येत आहे. त्यामुळे विकासाची डोंगरावर मात्र सोयर्यांचे शिखर उभे झाले असल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात येत असल्याने काँग्रेसच्या मुस्लिम, दलित, वोट बैन्केतील बैलन्स कमी होऊ लागले आहे. 

शेतकर्याची आत्महत्या

कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून युवा शेतकर्याची आत्महत्या 


हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे मानसिंग तांडा येथील एका युवा शेतकर्याने सततची नापिकी, कर्जबाजारीला कंटाळून कोणतेतरी विषारी औषध प्राषण करून जीवनयात्रा संपविल्याची घटना काल घडली आहे.

तालुक्यातील टाकराळा - मानसिंग तांडा येथील तरुण शेतकरी शिवाजी पांडू जाधव वय ३८ वर्ष हा शेतकारी गत काही वर्षापासून अति पाऊस व अल्प पाऊस पडत असल्याने नुकसानीत येत असलेल्या शेती मुळे विवंचनेत होता. सदर शेतकर्याने भारतीय स्टेट बैन्केतून कर्ज उचलले होते, तसेच या वर्षीच्या अवर्षणाने खरिपाच्या पेरनीचाही खर्च निघत नसल्याने पुरता हतबल झाला होता. वातावरणातील बदलाने पाऊस पडत नसल्याने आघाडी शासनाने जिल्हा दुष्काळाच्या छायेत जाहीर करूनही नुकसानग्रस्त शेतकर्यांना कर्ज माफी, नुकसान भरपाई अथवा कोणतीही मदत जाहीर केली नाही. आता तर निवडणूक लागण्याच्या तोंडावर नाकर्तेपणा झाकण्यासाठी राजीनामे देऊन हात झटकल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा मावळली. पाऊस बेपत्ता झाल्याने उरली - सुरली पिकेसुद्धा वाळू लागल्याने व मावा, खोकड, लाल्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली. त्यामुळे तो अधिकच चिंताग्रस्त बनला होता. त्यात मुला - बाळांचे शिक्षण मुलीचे लग्न हि चिंता सुद्धा सतावत होती अशी माहिती शेतकर्याची मात्नी देवकाबाई हिने प्रस्तुत प्रतिनिधीस दुखद अंतकरणाने बोलताना दिली. 

अखेर दि.३० रोजी कोणतेतरी विषारी औषध प्राषण करून तरुण शेतकर्याने मृत्यूला जवळ केले आहे. या बाबत तामसा पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरचा करता व्यक्ती गेल्यामुळे या परिअवरच आधारवड हरवला असून, यातून सावरण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्याच्या कुटुंबीयास तातडीची मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शेतकर्याची आत्महत्या हि आघाडी शासनाच्या नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण असल्याचे या भागातील मतदार नागरीकातून बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारास याचा फटका सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.