रेल्वे वसाहत अंधारात

हिमायतनगर(अनिल मादसवार)महावितरण व रेल्वे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गत काही महिन्यापासून रेल्वे विभागात काम करणाऱ्या नागरिकांची वस्ती व रेल्वे प्लैटफॉर्म व मुख्य आवारातील हायमास्ट लाईट बंद पडल्याने परिसर अंधारातच असल्याचे चित्र हिमायतनगर भागात दिसून येत आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने रेल्वेने येणाऱ्या प्रवाशी व वस्तीतील नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे.

हिमायतनगर रेल्वे स्थानक हे तेलंगाना - विदर्भाच्या मध्यभागी असलेले मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शहरात आहे. बहुत प्रतीक्षेनंतर या ठिकाणी मीटरगेजचे ब्रोड गेजमध्ये रुपांतर झाले. यास जवळपास दहा वर्ष लोटले मातर अजूनही या ठिकाणी प्रवाशी व रेल्वे कर्मचार्यांसाठी आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी गैर्सोइत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. रेल्वे विभागातील कर्मचार्यांना मोडकळीस आलेल्या कोर्टर मध्येच रहावे लागत असून, रस्ते, शुद्ध पाणी व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही सोय उपलब्ध नाही. आता तर या समस्येत आणखीनच भर पडली असून, या भागातील विद्दुत पुरवठा गत काही महिन्यापासून बंद आहे. परिणामी रात्रीला अंधाराचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. या प्रकारची माहिती रेल्वे कर्मचार्यांनी वरिष्ठांना कालवून देखील याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने ऐन सणासुदीच्या काळातही हीच अवस्था असल्याने नागरिक व प्रवाश्यांना अडचणीट भर पडली आहे.

तर गत महिन्याभरापासून रेल्वे प्लैटफॉर्म सुद्धा अंधारातच असल्याने येणाऱ्या - जाणार्या प्रवाश्यांना विशेषतः महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील तालुक्याचे रेल्वे स्थानक असल्याने भुरटे चोर, पाकीट मारंचा सूळसुळाट वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री - मध्यरात्री येणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना अंधारामुळे चढणे- उतरणे जिकरीचे बनले असून, अश्या वेळी हिमायतनगर स्थानकावर आजवर अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे सर्वश्रुत आहे. तसेच दुसर्या रेल्वे प्लैटफॉर्म गाठण्यासाठी जीव धोक्यात टाकून पटरीवरून जावे लागत आहे. या प्रकारामुळे बर्याच दुर्घटना घडल्या असून, प्रशासनाने पादचारी उड्डाण पूल बनविण्यासाठी कोणतीही दखल घेतली नाही. तसेच स्थानकावर शौछालाय, सुरक्षेच्या पोलिस चौकी, प्लैटफॉर्मच्या दोन्ही बाजूने स्ट्रीट लाईट, साफ सफाई, पिण्याचे शुद्ध पाणी आदी असुविधेमुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झाला आहे. या समस्येकडे विभागीय रेल्वे अधिकार्यांनी लक्ष देऊन तातडीने समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली जात आहे.

विद्दुत दिवे बंद पडल्याने ऑटो पलटी
--------------------------------------
रेल्वे स्थानकाजवळील विद्दुत दिवे बंद झाल्याने दि.०२ अक्टोबर रोजी एका ऑटो पलटी झाल्याची घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून कोणाशी गंभीर दुखापत झाली नाही. मात्र रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या विद्दुत दिवे चालू करण्याकडे केले जात असलेल्या प्रकारामुळे हि घटना घडली अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व प्रवाशी वर्गणी व्यक्त केल्या आहेत. तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात यल्गार पुकारावा लागेल अशा इशारा प्रवाशी व शहरातील नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी