शेतकर्याची आत्महत्या

कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून युवा शेतकर्याची आत्महत्या 


हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे मानसिंग तांडा येथील एका युवा शेतकर्याने सततची नापिकी, कर्जबाजारीला कंटाळून कोणतेतरी विषारी औषध प्राषण करून जीवनयात्रा संपविल्याची घटना काल घडली आहे.

तालुक्यातील टाकराळा - मानसिंग तांडा येथील तरुण शेतकरी शिवाजी पांडू जाधव वय ३८ वर्ष हा शेतकारी गत काही वर्षापासून अति पाऊस व अल्प पाऊस पडत असल्याने नुकसानीत येत असलेल्या शेती मुळे विवंचनेत होता. सदर शेतकर्याने भारतीय स्टेट बैन्केतून कर्ज उचलले होते, तसेच या वर्षीच्या अवर्षणाने खरिपाच्या पेरनीचाही खर्च निघत नसल्याने पुरता हतबल झाला होता. वातावरणातील बदलाने पाऊस पडत नसल्याने आघाडी शासनाने जिल्हा दुष्काळाच्या छायेत जाहीर करूनही नुकसानग्रस्त शेतकर्यांना कर्ज माफी, नुकसान भरपाई अथवा कोणतीही मदत जाहीर केली नाही. आता तर निवडणूक लागण्याच्या तोंडावर नाकर्तेपणा झाकण्यासाठी राजीनामे देऊन हात झटकल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा मावळली. पाऊस बेपत्ता झाल्याने उरली - सुरली पिकेसुद्धा वाळू लागल्याने व मावा, खोकड, लाल्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली. त्यामुळे तो अधिकच चिंताग्रस्त बनला होता. त्यात मुला - बाळांचे शिक्षण मुलीचे लग्न हि चिंता सुद्धा सतावत होती अशी माहिती शेतकर्याची मात्नी देवकाबाई हिने प्रस्तुत प्रतिनिधीस दुखद अंतकरणाने बोलताना दिली. 

अखेर दि.३० रोजी कोणतेतरी विषारी औषध प्राषण करून तरुण शेतकर्याने मृत्यूला जवळ केले आहे. या बाबत तामसा पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरचा करता व्यक्ती गेल्यामुळे या परिअवरच आधारवड हरवला असून, यातून सावरण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्याच्या कुटुंबीयास तातडीची मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शेतकर्याची आत्महत्या हि आघाडी शासनाच्या नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण असल्याचे या भागातील मतदार नागरीकातून बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारास याचा फटका सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी