ग्राम स्वच्छतेचा संदेश

भजनी दिंडीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छतेचा संदेश


हिमायतनगर(बी.आर.राठोड)स्वच्छतेचे महत्व ग्रामवासियांना कळावे या उद्दात हेतूने माधव महाराज भिसीकर व नेहरू नगर येथील महिला- पुरुष भजनी मंडळाच्या वतीने कार्तिक शुद्ध ४ सोमवारच्या शुभ मुहूर्तावर प्रभात दिंडीच्या माध्यमातून संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांची भजने गावून जनजागृती केल्याचे चित्र दिसून आले आहे. 

कार्तिक मास हा धार्मिक दृष्ट्या पवित्र महिना मानल्या जातो, या महिन्यात बहुतांश भजनी मंडळे ग्रामदेवतेच्या मंदिरापासून दिंडीला प्रारंभ करतात. आणि गल्लो गल्ली फिरून परत त्याचा मंदिरात दिंडीचे विसर्जन करतात. मात्र नेहरू नगर येथील तरुण कार्यकर्ता योगेश चीलकावार याने पारंपारिक दिंडीला स्वच्छतेची जोड देवून स्वच्छ भारत..निरोगी भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोडीचा संदेश जनतेपर्यंत पोन्चविण्याचा प्रयत्न करताना दिसून आला आहे. स्वच्छतेचे महत्व ग्रामवासीयांच्या गाली उतरवीत म्हणून दिंडी समोर हाती झाडू घेवून भजनी मंडळाच्या महिला -पुरुष व बालगोपलाना घेवून रस्ते स्वच्छ करीत केर - कचर्याची विल्हेवाट गल्लो गल्ली फिरत लावीत होते. हे दृश्य पाहून अनेक जन स्वेच्छेने झाडू घेवून दिंडीत सहभाग घेतल्याचे दिसून आले. या दिंडीत बाबुराव शिंदे, शंकरराव चव्हाण, गंगाधर गड्डमवार, जयवंतराव सरणकटेवार, कोंडाबा जाधव, मारोतराव मेंडके, बालाजी मानपुरेवार, शंकर गोडबर्लेवार, रामू धोने, बाबुराव चव्हाण, कानबा पाटील, लक्ष्मीबाई गड्डमवार, रेनुकाबाई शिंदे, रुखामाबी गुड्डेटवार, सारजाबाई गड्डमवार, लक्ष्मीबाई ढोणे, आडेलाबाई गड्डमवार, रुखमाबाई सरणकटेवार, वंदना एडके, लक्ष्मीबाई जाधव, नागाबाई मादसवार, पद्मिनाबाई शेळके, मीराबाई गोडबर्लेवार यांच्यासह लहान बालकांनी सहभाग घेतला होता. 

विशेषतः हि दिंडी ग्रामपंचायत कार्यालायासामोरून मार्ग क्रमान करीत असताना ग्रामपंचायत ऐवजी भजनी मंडळाने ग्राम स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली तर नाही ना.. असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात होता. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी