ढगाळ वातावरण

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यात सोयाबीन कापणी, काढणीसाठी शेतकर्‍यांची धावपळ चालू झाली असताना, ढगाव वातावरण निर्माण झाल्याने, हाताशी आलेली पिके जाण्याची भीती बळीराजाकडून व्यक्त होत आहे. तर आता पूस झाला तर कपाशीच्या पिकांना फायदेशीर ठरेल असेही शेतकर्‍यांना वाटत आहे.

खरीप हंगामातील अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन मोठ्या प्रमाणात नुकसानीत आले आहे. सोयाबीनचे बीज भरलेले नसल्याने शेतकर्यांना सोयाबीन काढणीत फक्त १ ते २ क्विंटलचा उतारा येत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात केलेला खर्च निघण्याची अशा मावळली आहे. आता तुरीचे व ज्वारीचे पिक बहरात आले असताना शुक्रवार पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीला तर थोड्या प्रमाणात पाऊस झाला, मात्र यामुळे काढून ठेवलेले सोयाबीन, ज्वारी काळी पडून तुरीचे फुल गळून किडी - आळीचा प्रादुर्भाव होऊन पुन्हा शेतकर्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे असे नुकसान होत असले तरी दुसरीकडे पावसाभावी वाळू लागलेल्या कापसाला या पावसामुळे जीवदान भेटण्याची शक्यता आहे.

या पावसामुळे शेतकर्याचे पांढरे सोने समजल्या जाणारे कपाशी व रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांना समाधानकारक पाऊस झाला तर फायदा होईल, मात्र तुरळक प्रमाणात पाऊस पडून केवळ ढगाळ वातावरण दिसत असल्याने पुन्हा बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. २०१४ च्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. शेतीमालाचे नुकसान व कमी भाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे नव्याने स्थापन होणार्या सरकारने लक्ष देवून शेतकर्यांना आर्थिक कोंडीतून सोडविण्यासाठी भरीव मदत मिळवून देवून कापूस, सोयाब्विन, ज्वारी यासह अन्य ओइकन हमी भाव मिळवून दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी