झाडाला लागला कि आंबा

अहो आश्चर्यंम थांबा,...झाडाला लागला कि आंबा...



हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील सधन शेतकरी तथा पुरस्कार विजेते विजयअप्पा बंडेवार यांच्या मालकीच्या शेतातील आंब्याच्या झाडाला ऐन दिवाळीच्या सनात कैर्या लागल्याचे दिसून आल्याने, अहो आश्चर्यंम थांबा,...झाडाला लागला कि आंबा... असे उद्गार श्री साई दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या तोंडून निघत आहेत. 

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सधन शेतकरी विजय बंडेवार यांचे फार्महाउस टेंभी रस्त्यावर आहे. याच ठिकाणी शेतात श्री साईबाबाचे मंदिर असून, दर गुरुवारी भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात. दिवाळीच्या निमित्ताने अनेकजणांनी दर्शनसाठी हजेरी लावली मात्र या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडाला दिवाळीच्या काळात आंबे लागद्ल्याचे दिसून आले आहे. हि माहिती समजताच जो तो कुतूहलाने आंबे पाहण्यासाठी जात असल्याने अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. निसर्ग नियमानुसार आंब्याच्या बहार वसंत ऋतूमध्ये मोहर येउन होळीच्या सनानंतर आंब्याच्या कैर्या पहावयास मिळतात. मात्र या वर्षी ऐन दिवाळीच्या सनात आंब्याला कैर्या लागडल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. त्यामुळे बदलत्या काळामुळे निसर्गही बदलला तर नाही ना..असा प्रश्न आंबे पाहणार्यांना पडला आहे. 

याबाबत भ्रमण ध्वनिवरून तालुका कृषी अधिकारी श्री दावलबाजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, १२ मासी झाडाच्या प्रकारात अनुवांशिक गुणामुळे कोणत्याही रुतून फळे लागतात. मात्र या फलाना गोडवा नसतो, ते अल्पायुषी असतात..त्याचा उपयोग केवळ लोणचे व थंड पेय पुरताच केला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी