विजयादशमी



हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील परमेश्वर मंदिर मैदानात बजरंग दल मंडळाच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम दसर्याच्या दिवशी सायंकाळी संपन्न झाला. या वेळी हजारोच्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता.

आयोजीत रावण दहन कार्यक्रमाची तयारी गात आठ दिवसापासून सुरु होती. जवळपास ४० फुट उंचीच्या रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यासाठी शहरातील युवक देविदास शिंदे, गजानन चायल, कुणाल राठोड, गोविंद शिंदे, गजानन मांगुळकर आदींसह अनेक बजरंग दलाच्या युवकांनी मेहनत घेतली होती. प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी पारंपारिक दसर्याची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर शुक्रवारी ८.३० वा. फटक्याच्या अतिषबाजीत रावणाच्या पुतळ्याचे दहन जय श्री राम..च्या जयघोषात करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सरसम, टेंभी, पोटा, आदीसह अनेक ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. या मिरवणुकीत युवकांनी भिमगीताच्या तालावर डान्स करून शहर वासियांचे लक्ष वेधले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी