जी.प.शाळेत

हिमायतनगर जी.प.शाळेत शिक्षकांच्या मनमानी कारभार.. 


हिमायतनगर(अनिल मादसवार)गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे शहरातील जी.प.शाळेतील शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्ट्यापूर्वीच शाळेला दांडी मारण्याचा मनमानी कारभार सुरु केला आहे. परिणामी मराठी - उर्दू शाळेचा शैक्षणिक दर्जा ढासळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचे पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यानि केला आहे.  

आर .टी.ई. २००९ या सारखा कायदा येऊनही त्यांची अंमलबजावणी हिमायतनगर तालुक्यात खर्या अर्थाने केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जबाबदार गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या जाणीवपुर्वक दुर्लक्षामुळे तालुक्यातील बहुतांश शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक मनमानी पद्धतीने कारभार चालवीत असल्याने तसेच अनेक ठिकाणी प्रभारी राज चालविल्या जात असल्याने शिक्षणाच्या आयच घो झाला आहे. याचाच फायदा दांडी बहाद्दर शिक्षक घेत असल्याने वाट्टेल त्या वेळी शाळेत येणे व जाने असा कारभार होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुंवात्त ढासळली आहे. याचे जवंत उदाहरण म्हणजे हिमायतनगर शहरातील सर्वात जुनी असलेल्या जी.प.हायस्कूलवर पहावयास मिळत आहे. गत अनेक वर्षापासून हि शाळा या ना त्या कारणाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात येत असून, गटशिक्षण अधिकारी मात्र पालकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.  

शहरातील जी.प.शाळेवर मराठी आणि - उर्दू अशी पहिली ते दहावी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र यांना शिकविणारे शिक्षक आळी - पळीने मनमानी तथा अनाधिकृत पद्धतीने शाळेतून  दांडी मारत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरु होण्याच्या वेळेला अनेकदा गैर हजार राहणे आणि शाळा सुटण्याच्या पूर्वीच अर्ध्यातूनच सुट्टी मारून परत जाने हा नित्यक्रमच बनला आहे. त्यामुळे येथील शाळा हि रेल्वे वेळापत्रकानुसार चालविली जाते काय..? असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी विधाराला आहे. शाळेत अनेक सुविधांचा अभाव असून या प्रश्नाकडे तालुक्याचे नेते तथा जबाबदार अधिकारी सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामुळे विधार्थी - विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, शौच्चालय, घाणीचे साम्राज्य, अवेळी भरविली जाणारी शाळा यासह अन्य गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

एवढेच नव्हे तर मधेच एखादी सुट्टी आली तर दुसर्या दिवशी सुद्धा अघोषित सुट्टी देत शाळेवर हजेरी टाकून शाळा सोडून दिली जाते. असाच काहीसा प्रकार दि.०४ शनिवारी जी.प.शाळा हिमायतनगर येथे उघडकीस आले आहे. सकाळी ८ वाजता हजार झालेले शिक्षक पुन्हा सकाळी ९.१५ वाजता नंदीग्राम एक्सप्रेसने, नांदेड, भोकरसह आपल्या गावाकडे निघून गेले आहेत. हि बाब पालकांच्या लक्षात येताच  त्यांनी शाळा गाठली असता सेवक शाळेला कुलूप लावून जात असल्याचे दिसून आले. या बाबतची तक्रार पालकांनी गटशिक्षण अधिकार्याकडे केली. मात्र त्यांनी तुम्ही तक्रार द्या मग काय करायचे ते आम्ही बघू असे सांगत अकलेचे तारे तोडले. हि बाब काहींनी पत्रकारांना सांगितल्याचे समजतच शिक्षण विस्तार अधिकारी श्री संगपवाड हे १० वाजता शाळेवर हजार झाले. अवेळी पलायन करून दांडी मारण्याच्या प्रकारची चौकशी केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सलाम खुरेशी, शे.मैनोद्दीन, अ.गन्नि, मो.कुरेशी, शे.मुसा, आदीसह अनेक पालक, पत्रकार उपस्थित होते.   

याबाबत पंचनाम्यासाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी श्री संगपवाड यांनी सांगितले कि, शाळेची वेळ सकाळी ७.४० ते ११.४० असताना शाळेला १० वाजताच कुलूप लावल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती घेऊन एका दिवसात खुलासा सदर करण्यात यावा असे मुख्याध्यापकांना सुचित केले आहे. तसा अहवालही वारीष्टाकडे पाठविला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी