जी.प.हायस्कूलची झाडा - झडती..



हिमायतनगर(अनिल मादसवार)जी.प.हायस्कूल समस्येच्या गर्तेत सापडले असून, शिक्षकांचा मनमानी कारभार व मुख्याध्यापकाच्या नाकर्तेपणामुळे एकेकाळी नावाजलेली शाळा आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे शाळेच्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे. या संबंधित बाबीची दखल घेऊन मागील काही दिवसापूर्वी वर्तमान पत्रातून प्रकाशित झालेल्या बातम्यांची दखल घेत कुंभकर्णी झोपेतून जागे झालेल्या शिक्षण विभागाने आज दि.१० रोजी जी.प. शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी मडावी यांनी शाळेला भेट देवून तपासणी केली. आणि शाळेच्या दुरवस्थेची पाहणी केली. यावेळी उपस्थित पालकांनी अनेक समस्यांचा पाढा मडावी यांच्यासमोर वाचला.

शाळेत झालेल्या अनेक भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी शालेय व्याव्साथापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प.नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीत सन २००९ - १० वर्षात शाळा खोली बांधकाम अंतर्गत खेळणी साहित्यासाठी प्राप्त झालेल्या निधीत एक लाख पन्नास हजाराचा अपहार तत्कालीन सरपंच व मुख्याध्यापकाने केला असल्याची तक्रार पालकांनी केली होती. शिक्षकांच्या अपडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा होत असून, एक पिढी बरबाद होत असल्याची तक्रार पालकांनी मडावी यांच्याकडे केली.

त्यानुषंगाने सध्याचे मुख्याध्यापक यांची तात्काळ उचलबांगडी करून मुख्याध्यापक पदाचा कार्यभार गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याकडे सोपविण्यात येवून मुख्यालई न राहणाऱ्या शिक्षकांचे घर भाडे तात्काळ बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही पालकानी शाळेत सुविधा मिळत नसेल तर सांगा सर्व विद्यार्थ्यांच्या टीश्या काढून अन्यत्र शिकवू असा संतापजनक सवाल केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणाची सोय याच शाळेत उपलब्ध करून देणार असल्याचे ठोस आश्वासन उपस्थित पालकांना दिल्याने उपस्थितांनी राग आवरला. परंतु त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होईल..? कि ये रे मागल्या प्रमाणे परिस्थिती राहील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इमारतीची पाहणी करताना अनेक गैरसोई निदर्शनास आल्या यात शौच्चालयाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांसह शीक्षकांना लघुशंकेसाठी उघड्यावर आडोसा शोधण्याची वेळ आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आणि कुलुपबंद (बालभवन)प्रयोग शाळेतील साहित्यावर साचलेली धुळीच्या थराने शिक्षण अधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी याच शाळेचे माजी शिक्षक जलील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेमूद खान पठाण, जफर महमद खान, जुनेद खान, डॉ.जहूर खान, मिर्झा मुजाहिद, असलम कुरेशी, स.आदिल, अ.अफरोज, स.अ.अजीज मौलाना, असद मौलाना आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी