फसू नका...!

राष्ट्रवादीच्या बिनशर्त पाठींब्याचा चेंडूला फसू नका...!
महाराष्ट्रात भापला विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने व शिवसेनच्या ताठर भूमिकेमुळे सरकार बनविणे व ते स्थिर असावे यासाठी सध्या सर्वच पक्ष खलबते करीत आहेत. खरे तर सेना - भजपा यांचे सरकार बनून विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. पण सेनला स्वत:च्या स्वाभिमानासाठी भगवा ध्वजाची काळजी वाटत नाही हे महराष्ट्राचे व मराठी माणसाचे दुर्दैव होय. 

या सगळ्या रणधुमाळीत राष्ट्रवादी पक्षाने मोठ्या सोज्वळपनाचा  आव आणून भाजपा सरकार बनवीत असेल तर आम्ही त्या सरकारला बाहेरून बिनशर्त पाठींबा देण्याची घोषणा केली आहे. कारण महाराष्ट्रात स्थिर सरकार विकास होण्यासाठी आवश्यक आहे. मात्र अत्यंत हेतू पुरस्सर सेनेपासून भाजपला तोडण्याचा हा डाव आहे. भाजपने रणांगणात सर्व पक्षांना चित्त करून बहुमताच्या जवळ पक्षाला आणून ठेवले आहे. हे भाजपचे यश धुळीस मिळविण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा नाकारता येत नाही.   

विधानसभेत सरकार स्थापण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठींब्याचा अर्थ असाही असू शकतो कि, आखाड्यात मिळविलेला विजय टेबल डिप्लोमैसीट भाजपला पराभूत करणे काही तरी कुरापत काढून अविश्वास ठराव आणून विधान सभेत पराभव करून त्यांचा वचपा काढण्याचे षडयंत्रहि असू शकते.

भाजपने अगदी शेवटी पर्यंत सेनेबरोबर राहण्यासाठी प्रयत्न करावा. त्यात यश मिलो अथवा न मिळो भगव्याची शान राखण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न केले. हे लोकांना कळने आवश्यक आहे. तेंव्हा सावधान ..! बिनशर्त पाठींब्याचा फसवा चेंडू राष्ट्रवादीच्या अंगणात परतवून लावा..! 
                                                                                                                        जेष्ठ पत्रकार - भास्कर दुसे 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी