काँग्रेसच्या तालुका सचिव शिवसेनेत



हिमायतनगर(वार्ताहर)काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव तथा नाभिक समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील दलाल कार्यकर्त्यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस ला आणखीन एक जबरदस्त धक्क्याचा सामना करावा लागला, यावरून काँग्रेस पक्षातील निष्ठावन्ताची गळती रोकण्यात ते अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील यांचे शालेय जीवनातील जिवलग मित्र दिलीप शिंदे हे गत अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात हिमायतनगर तालुका सचिव पदावर कार्यरत होते. काँग्रेसचे आमदार तथा विद्यमान उमेदवार जवळगावकर यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्याने तथा काही मिनी दलाल आमदारांनी चार वर्षात एकाधिकार शाही सुरु केली. त्यामुळे एकेक करत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिट्ठी देत इतर पक्षात सामील होत आहेत. आजघडीला काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना विरोधकांसह स्वकीयांच्या प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. काँग्रेसपक्षात राहून जीव गुदमरू लागल्याने शिवसेनच्या नागेश पाटील यांच्या नेतृत्वाला मान्य करून भगवी दस्ति परिधान केली, एवढेच नव्हे तर नाभिक समाज बांधवांच्या आदेशाने हा निर्णय घेतल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले. कारण काँग्रेसच्या आमदाराने गत पाच वर्षात केवळ सग्या - सोयार्यांचा विकास केला असून, निष्ठावंत व तळमळीन एकाम करणाऱ्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय केल्यानेच मी काँग्रेस पक्षाचा त्याग केल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली आहे. आता मी धनुष्यबाण हाती घेतला असून, काँग्रेस मधील हुकुमशाही प्रवृत्तीचा नायनाट करून नागेश पटालांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.याच कार्यक्रमात नाभिक समाज, मातंग समाज संघटना यासह अन्य संघटना च्या शेकडो पदाधिकार्यांनी प्रवेश केला. यावेळी मंचावर माजी जी.प.सदस्य बाबुराव कदम, हिमायतनगर पंचायत समितीच्या सभापती आडेलाबाई हातमोडे, प.स.सदस्य बालाजी राठोड, डॉ. संजय पवार, राम ठाकरे, परमेश्वर पानपट्टे, मोरे काका सरसमकर, संदीप भुरे, साईनाथ धोबे, रवींद्र दमकोंडवार, जफर भाई, महेमूद खान, हानुसिंग ठाकूर, गजानन चायल, साहेबराव चव्हाण, केवलदास सेवनकर यांच्यासह अनेक जेष्ठ शिवसैनिक मान्यवर, कार्यकर्ते, मतदार बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी