NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

रविवार, 31 अगस्त 2014

सहस्रकुंड धबधबा

नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबाप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गणेशाच्या स्वागताला दमदार पावसाने हजेरी लावली असून, हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. तेच पाणी विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला येउन मिळत असल्याने दि. ३१ रोजी दुपारी ११ वाजता नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा खळवळून वाहण्यास सुरुवात झाली असून, हळू हळू पाण्याची तीव्रता वाढत आहे. मागील अनेक महिन्यापासून निसर्गनिर्मित्त धबधब्याच्या विहंगम दृश्यापासून वंचित पर्यटकांच्या डोळ्याचे आता पारणे फिटणार आहेत. छाया- अनिल मादसवार(नांदेड न्युज लाइव्ह)  

शनिवार, 30 अगस्त 2014

इच्छापूर्ती विनायक

इच्छापूर्ती विनायक दर्शनाला गणेशोत्सवात विशेष महत्व...

हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोणा शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर निसर्गनिर्मित्त पांडवकालीन युगातील कनकेश्वर तलाव आहे. त्या काळात हस्तिनापुरच्या कुरुक्षेत्रात झालेल्या युद्धानंतर कौरवांपासून स्वतःला वाचविण्यासाठी पांडवानी वारणावती येथील याच तलावानजीक मंदिरात वास्तव्य केले होते. त्याकाळी सध्याच्या हिमायतनगर शहराचे नाव वारणावती होते, पांडवानी या तलावाला ओमचा आकार दिला. तर द्रोपदीने तलावात शुभ्र कमळाचे फुलं लाऊन मंदिर परिसराला सजविल्याची अख्याइका सांगितली जाते. त्यामुळे येथील वरद विनायकाचे हे मंदिर चंद्राच्या बिम्बावर वसलेले आहे. कालांतराने ये ठिकाणी गौंड  राज्याचे राज्य अस्तित्वात आले, त्या राजाने वारणावती शहराचे नाव बदलून वाढोणा तेवले. राजे शामबहादूर यांनी वाढोणा शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला होता. ते याच ठिकाणी राहून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहत शेतसारा वसूल करत असे. कालांतराने निजामशाही राजवटी सुरु झाली. त्या काळात हिमायतअली नावाचा सरदार वाढोणा जिल्ह्याला भेट देण्यासाठी आला होता. सर्व जाती - धर्माच्या लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर खुश होऊन हिमायतअली राजाने हिंदू - मुस्लिम समाजासाठी शेतीच्या स्वरूपात भव्य नजराणा बहाल केला. सरदारच्या या उपकाराची परतफेड म्हणून हिमायतअली नावाचे नामांतर करून वाढोणा शहराला हिमायतनगर नाव देण्यात आले. तेंव्हाच वाढोणा आज हिमायतनगर नावाने ओळखले जाते आहे. 

निजामाच्या राजवटीत येथील शिवमंदिरासह अन्य मंदिराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्या पासून मूर्तीचे रक्षण करण्यासठी येथील काही लोकांनी वरद विनायकाची मूर्ती लिंबाच्या झाडा खालील कंबरे इतक्या खोल खड्यात जपून ठेवली होती. तीच वरद विनायकाची मूर्ती तब्बल दीडशे वर्षानंतर याच अवस्थेत उन, वारा, पावसाचा अनुभव घेत राहिली. १९७८ ला तत्कालीन अवतारी पुरुष श्री संत पाचलेगावकर महाराज यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कनकेश्वर तलावासह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यावेळी गावातील गणेशभक्त व परिसरातील शेतकर्यांनी श्रमदान केले. त्या वेळी केलेला संकल्प पूर्ण करण्यासठी २५ वर्षानंतर नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती श्री प्रताप देशमुख सरसमकर यांच्या सहकार्याने गुरुवर्य लाखने महाराज, कांतागुरु आजेगावकर, यांच्या पुढाकारातून  मंदिर बांधकामाची सुरुवात करण्यात आली. यासाठी येथील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव काळात केला जाणारा अनधिक्रुत खर्च टाळून उर्वरित रक्कम व लोकवर्गणीतून व मजुरीचे पैसे वाचवत वरद विनायकाचे मंदिर उभे केले. उंच टेकडीवरील मंदिरात इच्छापूर्ती वरद विनायकाची विशाल मूर्ती मोठ्या कसोटीने नेण्यात येउन, विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आज हि मूर्ती सर्वाना आशीर्वाद देत असून, गणेश उत्सव पर्व काळात या ठिकाणी गणेश मूर्तीची पूजा- अर्चना महाभिषेक, महाप्रसादाच्या पंगती केल्या जातात. विनायकाच्या दर्शनाने अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे अनुभव भक्त सांगतात.   

येथील ओम आकराच्या कनकेश्वर तलावाच्या चंद्राच्या बिम्बावर नवसाला पावणाऱ्या इच्छापूर्ती श्री वरद विनायकाचे मंदिर आधुनिक स्वरूपात उभे आहे. यात विराजमान झालेली अष्ठभूजाधारी श्री वरद विनायकाची मूर्ती हि प्राचीन कालीन आहे. मंदिराचा गर्भगृह, समोरील प्रांगण, आणि गर्भग्रहा भोवति प्रदक्षिणापथ असे उंच टेकडीवरील मंदिराचे स्वरूप आहे. दर महिन्याची अंगारिका, गणेश, संकष्ठ चतुर्थी, श्रावण मास व गणेशोत्सवाच्या पर्व काळात विदर्भ - मराठवाड्यातील हजारो भाविक - भक्त दर्शनासाठी तोबा गर्दी करतात. शनिवारच्या संकष्ट चतुर्थी दिनी शहरासह विदर्भ- मराठवाड्या तील हजारो भक्त श्री वरद विनायक दर्शनसाठी गर्दी करतात. 

या तलावात पावसाच्या जमा झालेले पाण्यात जिवंत पांढर्या कमळाचे अस्तित्व आहे, परंतु पावसा अभावी हे तलाव या वर्षी कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे निसर्गरम्य तलावातील दृश लोप पावल्याने गणेश दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांना मोहित करणारा मंदिर परिसराच्या नयनरम्य देखाव्य पासून  वंचित राहावे लागणार आहे. कायमरूपी निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासठी पर्यटन विकास महामंडळाने श्रीक्षेत्र दर्जा असलेल्या हिमायतनगर शहरातील वरद विनायक मंदिर व पांडवकालीन तलावाचा विकास करून अस्तित्व टिकून ठेवावे अशी रास्त मागणी गणेश भक्तांमधून होत आहे. 

शुक्रवार, 29 अगस्त 2014

बाप्पाचे स्वागत

हिमायतनगरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बाप्पाचे स्वागत 


हिमायतनगर(वार्ताहर)रेल्वे, ट्रक्टर, टेम्पोने शहरात आलेल्या बाप्पा गणेशाचे शहरातील बाल -गोपाल व युवकांनी ढोल ताशा व गणपती बाप्पा मोरया...च्या गजरात जल्लोषात स्वागत केले. तसेच मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी शहर व ग्रामीण परिसर गणेशाच्या जयघोषाने निनादून गेले. तर वरून राजानेही गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला व प्रतिष्ठापनेनंतर जोरदार हजेरी लाऊन बाप्पाचे स्वागत केल्याने शेतकरीहि आनंदात गणेशोत्सवात सामील झाले आहेत. 

भाद्रपद शुक्ल ४ दिनांक २९ सोमवारी अवघ्या देशभरात गणरायाचे आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी अनेक दिवसापासून दडी मारलेल्या वरून राजाने पूर्वसंध्येला व स्थापनेच्या दिवशी हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपलानी एकाच गर्दी केली होती. तालुक्यातील हजारो गणेश भक्त शहरात दाखल होऊन ट्रक्टर, ऑटो, जीप, दुचाकी, हाथगाडे, बैलगाडीसह अन्य वाहनाने गणेशाला आपल्या गावी प्रतिष्ठापना स्थळी घेऊन जातानाचे चित्र दिसून आले. गणेशोत्सव काळातील ११ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्या विक्रीचे स्टाल, काळलावीची फुले, फळे, यासह उपवासासाठी लागणारे व सजावटीच्या साहित्याने बाजारातील दुकाने फुलल्याचे दिसून आले आहे.    

तसेच शहरातील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक गणेश मंदिरात नांदेड न्युज लाइवह्चे संपादक तथा पत्रकार अनिल मादसवार यांच्या हस्ते सपत्निक दुग्ध व जलाभिषेक करण्यात येउन श्रीची स्थापना पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत झाली.  

मंगलवार, 26 अगस्त 2014

शेतकऱ्याचा मृत्यू

हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन पोळ्याच्या दिवशी नाल्याला आलेल्या पुराने कारला पी.येथील एका शेतकऱ्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना २५ च्या रात्री १० वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.२५ सोमवारी कोरड्या दुष्काळाचे सावट असताना सुद्धा बळीराजा आनंदाने अन्नदात्याच्या उत्सव पोळासन साजरा करण्यासाठी तयारीला लागला होता. सायंकाळी ५ वाजता पोळा असल्याने शेत चक्कर मारून येण्यासाठी शेतकरी दगडू पांडुरंग मोरे वय वर्ष ४० हे गेले होते. शेतातून निघण्यापूर्वी सायंकाळी ४ वाजताच हिमायतनगर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर ओसरताच घराकडे येत असताना रस्त्यावरील चिंतावार नाल्याला मोठा पूर आला होता. पोळ्याच्या मिरवणुकीचा वेळ होता असल्याने घाई गडबडीत नाला पारकरताना पुराचा जोराने शेतकरी वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. पोळ्याची वेळ झाली तरी शेतकरी घरी आले नाहीत म्हणून घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र नाल्याचा पूर ओसरेपर्यंत शेताकडे जाने जमले नाही. रात्रीला पुन्हा पाऊस कमी झाल्यावर शोध घेतलि असता, हिमायतनगर - ते कारला पी. या पांदन रस्त्यावर शेतकऱ्याचा मृतदेह पालत्या अवस्थेत आढळून आला.

या बाबतची माहिती पोलिसांना कळताच रात्रीला पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात येउन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दि.२६ रोजी सकाळी १२ वाजता मयत शेतकऱ्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात कारला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात पत्नी,२ मुली २ मुले असा परिवार आहे. पोळ्याच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यावर निसर्गाचा कोप झाल्याने परिवारावर दुखाचा डोंगर कोसळलं आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या योजनेतून तातडीची मदत द्यावी अशी मागणी हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

वृत्तपत्र लांबविले..

वृत्त प्रकाशित होताच ग्रामसेवकाची झोप उडाली...

हिमायतनगर(अनिल मादसवार)फौजदारी गुन्हा दाखल होऊनही ग्रामसेवक कर्तव्यावर कसा...? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच ग्रामसेवकाची झोप उडाली असून, सदरचे वृत्तपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे पर्यंत पोंचू नये म्हणून दाबदरी येथे आलेले सर्व वर्तमान पत्राचा गठ्ठाच गायब कार्यक्रम संपताच तातडीने गावातून पळ काढल्याचे दिसून आले आहे.

दोन वर्षापूर्वी कार्यरत ग्रामसेवक भारती यांनी शासनाकडून मंजूर योजनेतील कामे मनमानी पद्धतीने कागदावरच पूर्ण करून, रक्कम हडप केली. या प्रकारची होऊ नये म्हणून सर्व अधिकार्यांना धरून ग्रामसेवकाचा कारभार सुरूच होता. याबाबत चार ग्रामपंचायत सदस्यांनी चौकशीची मागणी करूनही वरिष्ठ अधिकार्याच्या अभयामुळे अजूनही भारती यांची मनमानी सुरूच होती. याबाबतची माहिती पत्रकारांना समजताच दि.२६ च्या अंकात फौजदारी गुन्हा दाखल होऊनही ग्रामसेवक कर्तव्यावर कसा...? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सदर ग्रामसेवकाची झोप उडाली. आज २६ रोजी तालुक्यातील मौजे दाबदरी येथे निर्मल भारत अभियाना अंतर्गत चालू असलेल्या शौचालय बांधकाम धारकांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच गाव हागणदारी मुक्त करण्यासंदर्भात आयोजित कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे आले होते. त्यामुळे त्यांच्या हातात छापून आलेल्या बातमीचे वृत्तपत्र पडू नये म्हणून सर्वचे पेपरचा गठ्ठा गायब केला. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर तातडीने त्या ठिकाणाहून पळ काढला, ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या बालाजी राठोड यांनी पेपर कुठे गेले असे विचाताचा गावातीलच एकाने सर्व पेपर ग्रामसेवकाने नेले असे सांगितल्याने ग्रामसेवकाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

अपहरकर्त्या ग्रामसेवकास निलंबित करा..मागणीचे निवेदन

दरम्यान अपहर कर्त्या ग्रामसेवक भारती यांच्यावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन येथील ग्राम पंचायत सदस्य संतोष बन्सी आडे, प्रल्हाद मोतीराम जाधव, सौ.शांताबाई गंगाराम जाधव, सौ.विमलबाई गणपत आडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देऊन निलंबित करण्याची मागणी केली आहे. यात तंटामुक्त समितीचे बांधकाम, मानव विकास योजनेतून बांधकाम, बी.आर.जी.एफ., एम.आर.ई. जी.एस., १३ वा वित्त आयोग, ग्राम पंचायत बांधकाम, स्मशान भूमी, पेयजल जी.प.शेष पाणी विभागाकडून आलेला बंधारा, इतर योजना मधील बंधारा, रस्ता, रोप वाटिका, राष्ट्रीय पाणलोट विकासाची कामे, ठक्कर बाप्पा योजनेतील कामे, ग्राम पंचायतीच्या मासिक बैठका, प्रोसिडिंग रेकोर्ड आदी मध्ये मोठ्या प्रमाणात अफरा - तफर करून अनेक कामे कागदोपत्री केली. तसेच अनेक वेळा ग्रामसभा न घेता, जवळपास सर्वच कामाचा निधी उचलून कामे न करता शासन व जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली आहे. या प्रकारची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे.

सोमवार, 25 अगस्त 2014

पोळा

वरून राज्याच्या वर्षावात वृषभराजाचा पोळा संपन्न

हिमायतनगर(अनिल मादसवार)भारतीय परंपरेनुसार वर्षातून एक वेळा येणाऱ्या वृषभराजाचा पोळा सन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला असून, येथील मारोती मंदिर परिसरात हजारो शेतकरी आपल्या सर्जा - राज्याची जोडी घेऊन उपस्थित झाले होते. ठरलेल्या वेळेवर पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठकात ०४ वाजून ४५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. ऐन लग्नाच्या काळात वरून राजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. परंतु लगेच पाऊस गायब झाल्याचे दिसून आले आहे.

श्रावण मासातील अमावास्येच्या गुरुवारी पोळ्याच्या सन आला असून, सकाळी ५ वाजताच उठून  शेतकर्यांनी पळसाच्या मेढ्या आणून लक्ष्मी मानल्या जाणर्या उकिरड्यावर, गावातील देवाला व घराच्या प्रवेश द्वाराच्या दॊन्हि बाजूने ठेऊन दर्शन घेतले. सकाळी हनुमंतरायाला शेंदुराचे लेप व झंडे लाऊन, पूजा - अर्चना करून नारळ व साखरेचा प्रसाद चढून पोळ्याच्या मिरवणुकीची तयारी केली. तर महिलांनी देखील सकाळच्या रामप्रहरी उठून सडा-संमार्जन करून पानात वापरला जाणारा चुना व गेरूने शेती अवजारे व मेड्याची पूजा - अर्चना केली. लग्न मुहूर्त सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांचा असल्याने लगेच बैलना अंघोळ घालून वार्निश, घुंगरमाळ, मोरके, कासरे, झुली, गोंडे, बेगडी, बाशिंग, नाडापुडी, नागेलीचे पान आदिने सजउन उत्सवाची जय्यत तयारी केली होती. येथील हनुमान मंदिर व ग्रामपंचायतीकडून लग्न मुहूर्ताची निश्चित वेळ सांगताच शेतकर्यांनी नवे वस्त्र परिधान करून आप -आपली बैल जोडी गावातील प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन मिरवणुकीत  सामील झाले. 

या दिवशी प्रथम बैलजोडीचा मान ग्रामपंचायतीचा असल्याने येथील सरपंच श्रीमती गंगाबाई शिंदे व त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर शिंदे, माजी जी.प.सदस्य समद खान यांच्या हस्ते मनाच्या बैलांची पूजा करून ढोल - ताश्याच्या गजरात पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली होती. पोळ्याची मिरवणूक येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात येउन हनुमान मंदिराकडे रवाना झाली. वाजत गाजत, नाचत पोळ्याची निघालेली मिरवणूक शहरातील लहान - थोरांसाठी आकर्षण बनली होती. शहरातील दक्षिण मुखी मारोती मंदिराजवळ पोहोन्चताच पुरोहितांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठकात विवाह सोहळा वरून राजाच्या साक्षीने अक्षदा टाकून थाटात पार पडला. यावेळी पोळा मिरवणुकीत शहरातील प्रमुख मान्यवर, राजकीय नेते, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, शेतकरी, नागरिक, लहान थोर मंडळीनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर लगेच पोळ्याची रीघ सुसाट वेगाने धावत सुटली, ते आपल्या घरी जाईपर्यंत थांबली नाही, घरी जाताच वृषभ राजाची आरती, महापुजा करून पुरण पोळीचे नैवेद्य दाखविण्यात आले. तर बळीराजाच्या पायावर काकडी फोडून मजूरदार व निमंत्रीताना ग्राम पंचायतीच्या वतीने पुरण पोळीचे भोजन देण्यात आले. उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता.          

बैलपोळ्यावर पावसाचे संकट 

यंदा नाही पाऊस पाणी टोपल्यातल्या पाण्याने बळीराजाची केली अंगधुनी..या वर्षीच्या खरीप हंगामात वरून राजाच्या अवकृपेमुळे शेतकर्यांना टोपल्यात पाणी घेऊन बैलांना अंघोळ घालावी लागली असून, बैल पोळ्याच्या सणावर पाणी टंचाई चे सावट दिसून आले आहे. मात्र लग्न लावण्यागोदर आभाळ गडगडून येउन पावसाने बळीराजाच्या लग्न सोहळ्याचे स्वागत वर्षावाने केल्याचे दिसून आले. परंतु म्हणावा तसा पाऊस झाला नाही, याची खंत शेतकर्यात दिसून आली आहे. 

रविवार, 24 अगस्त 2014

सचिवपदी योगेश चीलकावार

हुजपा विद्यालयाच्या विद्यार्थी परिषद सचिवपदी योगेश चीलकावार यांची निवड 


हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेच्या सचिवपदी कला शाखेचे योगेश चीलकावार यांची निवड लोकशाही मतदान पद्धतीने झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव पदाच्या निवडीसाठी लोकशाही पद्धतीने दि.२३ शनिवारी निवडणूक घेण्यात आली. सदर निवडणूक विद्यार्थी कल्याण विभागाकडून घेण्यात आली असून, हि निवडणूक विभाग प्रमुख प्रा.एम.पी.गुंडाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेत विविध शाखेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या निवडणुकीसाठी योगेश चीलकावार व परमेश्वर कराळे या दोन उमेदवारांनी नाव नोंदविले होते. दरम्यान दोन्ही गटाच्या उमेदवाराकडून आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. मात्र एकूण १५ मते असलेल्या मतदार विद्यार्थी - विद्यार्ठीनिनी अगोदरच आपला निर्धार पक्का केल्यामुळे योगेश चीलकावार यांस १३ मते तर परमेश्वर कराळे यास स्वतःचे एक व अन्य एक असे २ मते पडली. त्यामुळे क्रीडा प्रतिनिधी योगेश चीलकावार यांची ११ मताने विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. तर सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून परमेश्वर काळे, रासेयो. प्रतिनिधी म्हणून कु.सीमा कदम यांची निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.डी.के.माने, प्रा.एम.पी.गुंडाळे, डॉ.वसंत कदम, प्रा.डॉ.एस.एल.इंगळे यांनी काम पहिले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्ष सूर्यकांता पायील, सचिव देवेंद्र जोशी, प्राचार्य वसंत क्षीरसागर, हुजपा महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रकाश जैन, अनिल मादसवार, कानाबा पोपलवार, दत्ता शिरणे, अनिल भोरे, दिलीप शिंदे यांनी केले आहे.  

अण्णाभाऊ साठें

अण्णाभाऊ साठेंचे नाव मुंबई विद्यापीठाला देऊन गौरव करावा...प्रा.पंजाब शेरे
हिमायतनगर(वार्ताहर)अण्णभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवसाच्या शालेय शिक्षणावर साहित्याच्या विश्वात आपले नाव कोरले. अण्णाभाऊची साहित्य चळवळ हि मानव मुक्तीसाठी होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अक्षाला गवसणी घालणारी साहित्य निर्मित्ती, तळागाळातील गरीब, कष्ठकारी, कामगाराच्या उत्थानासाठी भरीव कामगिरी करतानाच अण्णाभाऊनि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार भारताबाहेर रशियात व सातासमुद्रापार केला. प्रस्थापित व्यवस्थेला चिरून टाकणारी साहित्य निर्मित्ती करताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे, अश्या साहित्य विश्वातील विश्वरत्नाचे नाव मुंबई मुंबई विद्यापीठाला देऊन कार्याचा गौरव करावा असे प्रतिपादन प्रा.पंजाब शेरे यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा.येथील मंडळाच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९४ वि जयंती प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर हिमायतनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कानबा पोपलवार, दलित महासंघाचे अध्यक्ष दत्ता शिराणे, प.स.सदस्य लक्ष्मीबाई भवरे, तालुका काँग्रेस सचिव दिलीप शिंदे, धम्मपाल मुनेश्वर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी दोन वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचीत्राची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.सोनकांबळे म्हणाले कि, अण्णाभाऊ साठे यांनी अपार कष्ठाने मानव मुक्ती व कल्याणासाठी प्रतिभाशाली साहित्य निर्मित्ती केली. त्यांच्या साहित्य मानवाच्या जगण्या - मारण्यावर आधारित होते. कल्पनेचे पंख घेता भरारी मारणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेने अण्णाभाऊच्या साहित्याची दखल घेतली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. समारोप अध्यक्षीय भाषणात पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम म्हणाले कि, साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांनी मानवाच्या कल्याणासाठी साहित्याची निर्मित्ती केली. त्यांचे पोवाडे, लावण्या आदींसह कादंबर्यांचे वाचन करून थोर महापुरुषाचे विचार आत्मसात करून, आपल्या भावी जीवनात प्रगती साधावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सरपंच पांडुरंग गाडगे, उपसरपंच रामराव कावळे मुन्ना खडकीकर, मुजीब सर, अनिल पवार, नामदेव सातलवाड, लक्ष्मण पाटील, शंकर कलाले, बंडू पाटील, विजय जाधव, नथु गाडगे, आदींसह मोठ्या प्रमाणात महिला - पुरुष नागरिक, जयंती मंडळाचे युवक उपस्थित होते. 

शुक्रवार, 22 अगस्त 2014

सन- उत्सव

कायद्याच्या चौकटीत राहून सन- उत्सव साजरे करा - अनिलसिंह गौतम 
हिमायतनगर(अनिल मादसवार)कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो कायद्याचा सर्वांनी आदर करायला पाहिजे. कायद्याने चालल्यास नुकसान शुन्य टक्के तर फायदा अधिक असतो. याची जाणीव सर्वांनी समजून घ्यायला हवी, म्हणून आगामी काळात होणार्या गौरी - गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले. 

ते हिमायतनगर पोलिस स्थानकात आयोजित गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दसरा, तथा निवडणुकी  संदर्भात आयोजित शांतता कमेटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व उत्सव आपले समजून एकोप्याने साजरे करावे. कायद्याचे पालन करत मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव - दुर्गाउत्सव स्थापना ते विसर्जन पर्यंत सुरक्षेची काळजी घ्यावी. उत्सव काळात बैनर, फलक लावण्यापूर्वी संस्थेची(ग्राम पंचायत) परवानगी घ्यावी, न्यायालयाचे नियम पाळून लोडीस्पिकर, वाद्याचा वापर करावा, वेळेत विसर्जन करावे, शांततेने उत्सव साजरे करावे. उत्सव काळात आमचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असतीलच त्यामुळे कोणीही कायद्याभंग करण्याचा प्रयत्न करू नये. जो कोणी कायदा विरोधी कृत्य करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. म्हणून मंडळासह सर्वांनी पोलिसांनी दिलेले तोंडी व लेखी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कायद्याचे नियम माहित करून घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तंत मुक्त समितीचे अध्यक्ष अनवर खान, प्रकाश कोमावार, सरदार खान, अनंता देवकते, संजय माने, गजानन चायल, राम सूर्यवंशी, गजानन मांगुळकर, रामदास रामदिनवार, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, प्रकाश जैन, अशोक अन्गुलवार, कानबा पोपलवार, दत्ता शिराने, दिलीप शिंदे, धम्मा मुनेश्वर, परमेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर पंदलवाड, पाशा खतीब, संजय मुनेश्वर, वसंत राठोड, यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.           

उत्कृष्ठ देखावे करणार्यास बक्षीस  

गत अनेक वर्षापासून गणेशोत्सव- दुर्गा उत्सव काळात उत्कृष्ठ देखावे, समाज उपयोगी कार्यक्रम, रक्तदान आदि प्रकारचे कार्यक्रम केल्या जातात. मात्र प्रशासनाकडून मंडळाला केवळ प्रमाणपत्र देऊन बोळवण केली जात असल्याची खंत उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर श्री गौतम यांनी गणेश मंडळाची नाराजी लक्षात घेऊन या वर्षी जातीय सलोखा, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुन हत्या, रक्तदान, पाणी आडवा पाणी जिरवा, दुष्काळी स्थिती यासह अन्य समाज उपयोगी देखावे सदर करतील त्यांना बक्षिसाच्या रुपात वैक्तिक ढाल व अन्य प्रकारचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले. तसेच वरिष्ठ जिल्हा स्तरावरून देण्यात येणारे प्रमाणपत्र सुद्धा मिळेल अशी ग्वाही दिली.   

गुरुवार, 21 अगस्त 2014

शालेय वयात संस्कार

हिमायतनगर(अनिल मादसवार)शालेय जीवन एक असे माध्यम आहे ज्या ठिकाणी आपल्यावर चांगले संस्कार घडविले जातात. परंतु संस्कारमय व चांगले बनणे हे आपल्याच हातात असून, त्यासाठी शालेय वयात विद्यार्थ्यांनी चांगल्या तेवढ्या गोष्टीचे अनुकरण करून संस्कार व शिस्तीचे पालन करावे. असे आवाहन हिमायतनगर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आशिष मारगोडे यांनी केले.

ते हिमायतनगर शहरातील हुजपा महाविद्यालयात विधी सेवा समिती व बार असोशियनच्या वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना माहिती देताना बोलत होते. यावेळी मंचावर सरकारी वकील शे.मुस्ताक, एड.शिंदे, एस.जाधव, एड.राठोड, क्लार्क कापसे, प्राचार्य वसंत क्षीरसागर, मुख्याध्यापिका खंबायतकर, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, शिपाई अहेमद, प्रा.भुरे, प्रा.डाके यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुढे बोलताना ते न्यायाधीश म्हणाले कि, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून चांगल्या त्या गोष्टी आत्मसात कराव्यात. शिक्षक वृन्दांकडून दिली जाणारी शिकवण हि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असते. म्हणून सर्वांचा आदर सन्मान करून उच्च शिक्षण घ्यावे तरच यश आपल्या पदरात पडेल असेही ते म्हणाले. या प्रसंगी एड. शिंदे यांनी शिक्षणाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे, कारण शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे असे करणार्यांना ०२ वर्ष सक्त मजुरी ०१ लाखाच्या दंडाची तरतूद असल्याचे सांगितले. सरकारी वकील एड. मुस्ताक यांनी महाराष्ट्र प्रदूषण व रेगिंग कायद्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने कोणत्याही विद्यार्थी - अथवा विद्यार्थीनीना त्रास देऊ नये नये अन्यथा त्यास २ वर्षाची शिक्षा व पाच वर्ष कोणत्याही शाळा - कॉलेजात प्रवेश बंदीची तरतूद असल्याचे सांगितले. एड. जाधव यांनी सायबर कायद्याची माहिती देऊन मोबाईल, फेसबुक आदीचा वापर चांगल्या माहितीच्या देवाण - घेवानसाठी वापर करावा, अयोग्य वापर व अश्लील एस.एम. एस. तथा छायाचित्र वापरणे, पाठविणे हा सायबर गुन्हा मनाला जातो असे सांगितले. तर एड.राठोड यांनी मालकी हक्क कायदा स्वरक्षणासाठी बनल्याचे सांगून कायद्यात नवनवीन बदल होतात, त्यासाठी सर्वांनी कायदा विरोधी पद्धत बदलली पाहिजे असे सांगितले.

या कार्याक्रमचे सूत्रसंचालन ताडकुले सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सूर्यप्रकाश जाधव यांनी मानले. कार्यक्रमच समारोप वन्दे मातरम या गीताने करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व अनेकांची उपस्थिती होती. 

खून


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील एकंबा येथील एका युवकाने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घुर्ण रित्या खून केला. आणि स्वतः आरोपी पती पोलिस स्थानकात हजार झाल्याची घटना दि.२० च्या रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील १५ वर्षापासून कविता- कैलास हे दोघे विवाहबद्ध झाले होते. सुखाचा संसार सुरु असताना पतीला दारूचे व्यसन जडले. आणि दोघ पती- पत्नी दाम्पत्यात भांडणे सुरु झाली. अनेक वेळा नातेवाईक, शेजारी - पाजारच्यानी समजावून सांगितले मात्र दोघातील भांडणे सूच होती. अश्याच पद्धतीने दि.२० बुधवारी पती घरी येताच दोघात कडाक्याचे भांडण झाले. या रागच्या भरात आरोपी पती कैलास विठ्ठल वाघमारे वय ३३ वर्ष याने कुऱ्हाड घेऊन पत्नीच्या डोक्यात मानेच्या बाजूने जबरदस्त वार केला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत पत्नीला मरण्यासाठी तडफडत सोडून स्वतः आरोपी पतीने हिमायतनगर पोलिस स्थानक गाठले. एकंबा येथून तो पाई आल्यामुळे रात्री ११ वाजेच्या दरम्यान पोलिस स्थानकात हजर होऊन घडलेली घटना कथन करून मीच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या बाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे यांना समजताच तातडीने हिमायतनगर स्टेशनला भेट दिली. तसेच त्यांच्या आदेशाने मध्यरात्री १.३० वाजता आरोपी कैलास वाघमारे याच्यावर कलम ३०२ खुनाचा गुन्हा करण्यात झाला आहे.

रात्रीलाच पोलिसांनी एकंबा गावातील घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. घटनेचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय कांबळे व मनिराम आडे, परशुराम राठोड हे करीत आहेत. या घटनेमुळे एकंबासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बुधवार, 20 अगस्त 2014

पायाभरणी शुभारंभ

आगामी काळात उर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढू..आ.जवळगावकर


हिमायतनगर(अनिल मादसवार)आई जगदंबा, कालीन्का मातेच्या आशीर्वादाने हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील विकास कामाला गती देण्याची शक्ती मिळाली असून, आगामी काळात उर्वरित विकास कामाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन आ. जवळगावकर यांनी दिले. ते हिमायतनगर(वाढोणा) येथील कालीन्का देवी मंदिराच्या सभामंडपाचे पायाभरणी शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी जी.प.सदस्य सुभाष राठोड, कृउबा.सभापती दत्तराम पाटील करंजीकर, जनार्धन ताडेवाड आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

सकाळी १२.३० मिनिटांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते २५ तीर्थक्षेत्र निधीतून मंजूर सभामंडपाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुरोहित साईनाथ बडवे यांच्या मधुर वाणीतील  मंत्रोचाराने झाला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, मागील काळात आजी - माजी मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने अनेक विकासाची कामे केली असून, हे सर्व आपण जनतेनी निवडून दिल्यामुळे करू शकलो असेही ते म्हणाले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष राजीव रामदिनवार, सेक्रेटरी रामकृष्ण मादसवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, शरद चायल, नारायण गुंडेवार, गणपत गुंडेवार, ज्ञानेश्वर शिंदे, विकास देवसरकर, सुरेश पळशीकर, बाळू चवरे, अभियंता मुधोळकर, मुरारी यंगलवार, रामराव मादसवार, पामेश्वर मादसवार, अ.जावेद अ.गन्नि, अनिल मादसवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.  

ओबीसीचा लाभ मिळून द्यावा

मूळ दासरी समाजाच्या नावातील चुकांची दुरुस्ती करून ओबीसीचा लाभ मिळून द्यावा  नांदेड(प्रतिनिधी)सबंध महाराष्ट्रात दासरी समाजाची संख्य केवळ तीन ते साढेतीन हजार एवढी आहे.  परंतु दासरी समाजातील जातीच्या नावातील चुकांमुळे हा समाज ओबीसी प्रवर्गात असूनही शासकीय लाभापासून वंचित आहे. याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष देऊन वंचित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

सबंध महाराष्ट्रात दासरी समाज अल्पसंख्यांक असून, अशिक्षित व आडणी आहे. हा समाज १९५० पासून (ओबीसी) इतर  मागास प्रवर्गामध्ये समाविष्ठ आहे. परंतु याचा कोणताही लाभ या समाजाला मिळत नाही. कालांतराने १९८० नंतर याद्यातील काना, मात्रा, वेलांटी, आदी चुकांमुळे दासारीचे दासर झाले आहे. त्यामुळे हा दासरी समाज ओबीसी च्या आरक्षणाशी जोडला गेला नाही. खरे पाहता दासरी / दासर / माला दासरी / होला दासरी आम्ही सर्व एकच आहोत. सावांची रोटी- बेटी, व्यवहार सुरळीत चालू आहे. परंतु हा समाज दोन आरक्षणामध्ये विभागल्या गेल्यामुळे कोणत्याच आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा समाज शासनाच्या सर्व लाभांपासून वंचित आहे. या समाजाकडे शासनाने लक्ष देऊन दासरी समजला ओबीसी या एकाच  प्रवर्गात समाविष्ठ करून लाभ मिळवून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आ.माधव पाटील जवळगावकर यांच्याकडे करण्यात आली आहे. गुरुवारी नांदेड येथे मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी निवेदन कर्त्यांना दिले आहे. यावेळी मुरहारी यंगलवार, रामराव मादसवार, नरसिंगा मादसवार, चंद्रकांत मादसवार, गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार, प्रशांत बोम्पीलवार, सोपान बोम्पीलवार, काशिनाथ पोरजवार, गजानन अल्लडवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.   

वीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी

वाऱ्यामुळे उरली -सुरली पिके आडवी..
बळीराज्याच्या चिंतेत भर 

 

हिमायतनगर(वार्ताहर)तालुका परिसरात विजांचा कडकडात व वादळी वाऱ्यात बुधवारी ३ वाजता पावसाने हजेरी लावली असून, पाऊस कमी तर विजांचा कडकडाट जास्त असा अनुभव हिमायतनगर वासियांना आला असून, दरम्यान परिसरात वीज कोसळून गाय - म्हैस ठार झाली असून, हरी कोंडीबा बोथीन्गे हा शेतकरी जखमी झाला आहे.

ऐन बुधवारच्या आठवडी बाजारच्या दिवशी दुपाई ३ वाजेच्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट व पावसाला सुरुवात झाली. अर्धातास झालेल्या या पावसामुळे व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली होती. शहर व काही परिसरात पाऊस झाला परंतु ग्रामीण भागात बर्याच ठिकाणी पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान विजांच्या कडकडाटात सिरंजनि शिवारातील वीज कोसळल्यामुळे आखाड्यावर बांधून असलेली कचरु नारायण वासुदेव या शेतकर्याची गाय दगावली आहे. यात शेतकर्याचे ३० हजाराचे नुकसान झाले आहे. तर हिमायतनगर शहरा नजीकच्या गणेशवाडी शिवारातील आखाड्यावर वीज कोसळून हरी कोंडीबा बोथीन्गे या शेतकर्याची दुभती म्हैस ठार झाल्याने ५० हजारचे नुकसान झाले आहे. तर या घटनेत हरी नामक शेतकरी जखमी झाला असून, त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुधवारच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतातील उभी कापसाची पिके आडवी झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अगोदरच शेतकरी कोरड्या दुष्काळाने नुकसानीत आलेल्या पिकामुळे हैराण असून, उर्वरित पिकांना जपताना बुधवारी पाऊस कमी तर वारे जास्त आल्यामुळे उरली -सुरली पिकांचे नुकसान झाल्याने ऐन पोळ्याच्या सानापुर्वीच शेतकऱ्यांवर  चिंतेचे सावट पसरले आहे. 

सोमवार, 18 अगस्त 2014

दुष्काळाचे बाशिंग

बैलपोळ्याला कोरड्या दुष्काळाचे बाशिंगनांदेड(अनिल मादसवार) बळिराजासाठी आनंदाची पर्वणी असलेल्या बैलपोळा सणानिमित्ताने शहरातील बाजारपेठ सजली आहे. बळिराजाचे दैवत आणि शेतीत राबणा-या बैलांना सजविण्यासाठी आवश्यक साहित्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीने वाढ झाली असून, मोठा पाऊस झाला नसल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतक-यांना वाढत्या महागाईत कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली हा सण साजरा करण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे. तर बहुतांश शेतकरी साध्या पद्दतीने हा सन साजरा करून केवळ नैवेद्यावर समाधान मानण्याची वेळ आल्याचे सांगत आहेत. 

दर वर्षी श्रावण मासाची समाप्तीच्या अमावस्येदिवशी येणारा हा बैलपोळा सण यावर्षी सुद्धा त्याचा मुहूर्तावर आला आहे. शहरी भागात बैलपोळ्यास विशेष महत्त्व नसले तरी ग्रामीण भागात हा सण शेतकरी, सामान्य नागरिक, मजूरदार,व्यापारी अत्यंत उत्साहात साजरा करतात. या सणानिमित्ताने शहरातील जुना मोंढा, वजिराबाद रोड, यासह नांदेड रस्त्यावरील काही दुकाने महाराजा गोंडा, महाराणी गोंडा, काळा कंटा, कमरी, मटाटी, गजरा, घुंगर माळा, कवडी माळा, मणीमाळा, झुला, बाशिंग, सूत दोरी, नॉयलॉन दोरी अशा साहित्यांसह बैलांची शिंगे रंगविण्यासाठी आवश्यक असलेले विविध कंपन्यांचे वॉरनेश, बेगड, झुली, यासह अनेक साहित्यांनी सजली आहेत. शेतात वर्षभर राबणा-या बैलांना पोळ्याच्या पूर्व संध्येला नदी, नाल्यावर स्वच्छ धुवून खंडमळणी केली जाऊन घरधनींनीच्या हस्ते पूजा करून नैवद्य दाखविला जातो आणि मनोभावे पूजा करून, आज आवतान उद्या जेवायला असे निमंत्रण दिले जाते. 

परंतु या वर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी बहुतांश तालुक्यातील नदी, नाले, तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे काही तालुक्यात आजही पाणी टंचाई जाणवत असून, अनेक ठिकाणच्या नागरिकांची तहान टैन्कर द्वारे पाणी पुरवठा करून भागविली जात आहे. परिणामी जनावरांना भीषण चारा टंचाईचा सामना करावा लागत असून, पिण्यासच पाणी नाही तर बैल पोळ्यासाठी बैलांना घाईच बाकीटातील पाण्याने अंघोळ घालावी लागणार आहे.     

तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैलपोळ्यासाठी लागणा-या साहित्याच्या दरात दीडपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यासमोर यंदाही अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती व चारा - पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कमी-जास्त रिमझिम पावसामुळे पाणी असलेल्या शेतकयांच्या शेतीतील पिके साधारण तर ७० टक्क्याच्या वरून पिके हातची गेली, तर पाऊस उशिरा झाल्याने १० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी पाडीत पडल्याने शेतकरी संकटाच्या फे-यात सापडला आहे. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईचा सामना करणे जिकीरीचे ठरत आहे. त्यामुळे शेतक-यांसमोर हा सण साजरा करणे कसरतीचे ठरत आहे. शेतकरी जास्त किंमतीचे साहित्य खरेदी करण्याऐवजी कमी किंमतीचे लहान साहित्य खरेदी करीत असून, ते सुद्धा तुरळक प्रमाणात असल्याने साहित्य विक्रेते शेतकरी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे व्यापी वर्गातून सांगितले जात आहे. 

शुक्रवार, 15 अगस्त 2014

शेतकऱ्यांचे उपोषण

पिक - कर्जासाठी स्वातंत्र्यदिनी तहसील
कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण सुरु 


हिमायतनगर(अनिल मादसवार) सततची नापिकी व यंदा ओढवलेल्या कोरड्या दुष्काळात सापडलेला शेतकरी आता बैन्केकडून पिक कर्ज मिळत नसल्याने हवालदिल झाल आहे. बैन्कांच्या नाकर्तेपणाला कंटाळून स्वातंत्र्य दिनी पीककर्ज मिळावे या मागणीसाठी शेतकर्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरु केली आहे.  

तालुक्यातील मौजे कामारी, कांडली बु, वाघी, विरसनी, टेंभूर्णी, कामारवाडी, खैरगाव, दिघी, रावणगाव, लिंगापूर, धोतरा, पारवा बु, पारवा खु, पोटा बु, आदि गावातील रहिवाशी शेतकर्यांनी मौजे कामारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बैन्केच्या शाखेत पिक कर्जासाठी वारंवार मागणी करूनही बैन्कांच्या अडेलतटू धोरणामुळे शेतकर्यांना पिककर्ज देण्यात येत नसल्याने कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्या ऐवजी बैंक अधिकारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केल्या जात आहे. 

अगोदरच दुबार, तिबार पेरणी करून सर्वस्व गमावलेल्या बळीराजास शासनाने मदतीचा हात पुढे करत पिक कर्ज देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु वरिष्ठांचे आदेश नसल्याचे बैंक अधिकारी सांगत असल्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्यांना स्वातंत्र्य दिनीच आपल्या अधिकारासाठी आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. आजच्या पहिल्या दिवशी बहुतांश शेतकरी या उपोषणात सामील झाले असून, मागण्यामान्य न झाल्यास उद्यापासून सर्वच गावातील शेतकरी सामील होणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.            

स्वातंत्र्य दिन

ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील सर्वच शासकीय- निमशासकीय कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा ध्वज फडकवून जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले.

सर्वात प्रथम येथील पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या हस्ते सकाळी ७.०५ वाजता तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी शहरातील अनेक मान्यवर नागरिक, पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर ग्रामपंचायतीत सरपंच गंगाबाई शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार श्री मंतावार यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण पार पडले. तसेच शहरासह तालुक्यातील शाळा, कोलेज, महाविद्यालय, बैंका, संस्था, यासह अनेक ठिकाणी शांततेत ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवर, नागरिक, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

रक्तदान शिबिराने स्वातंत्र्य दिन साजरा 


हिमायतनगर(वार्ताहर)रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे, म्हणून तीन महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले. ते शहरातील डॉक्टर व मेडिकल असोशियनच्या वतीने महात्मा फुले सभागृहात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी मागदर्शन करताना बोलत होते. 

शिबिराची सुरुवात तथा उद्घाटन गौतम यांच्या हस्ते धन्वंतरी देवीच्या पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी मंचावर नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनील मादसवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड,  डॉ. चव्हाण,  डॉ. असोशियनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, मेडिकल असोशियानाचे प्रमुख झिय्या भाई आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, रक्तदानाचा हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो हि बाब अभिनंदनीय आहे. विज्ञानाने मानवी जीवनात कितीही प्रगती केली तरी रक्ताला दुसरा कोणताच पर्याय नाही. आपण डोनेट केलेले रक्त हे एखाद्या रुग्णाचे  प्राण वाचवू शकते. संकटातील व्यक्तीला सहकार्य केल्याचे पुण्य रक्तदात्याला मिळते. सध्या सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. मात्र काही लोकांना रक्तदान  करण्याबाबत शंका निर्माण होते, परंतु रक्तदान केल्याने कोणताही अशक्तपणा येत नसून, त्यामुळे उलट आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होते. म्हणून कोणतीही भीती न बाळगता प्रत्येकाने तीन महिन्यातून एक वेळा तरी रक्तदान करून समाजसेवेचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहनही त्यांनी केले. रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे कार्य गुरु गोविंदसिंघ ब्लड बैन्केचे डॉक्टर जयदीप हजारी, महेंद्र अटकोरे, उज्वला, कपिल, सचिन, मोहन, गणेश यांनी पार पडले. सायंकाळ पर्यंत ७७ महिला - पुरुष नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी डॉक्टर असोशियनचे डॉ. गणेश कदम, डॉ. प्रसन्न रावते, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, डॉ.दिलीप माने, डॉ.दिगंबर वानखेडे, डॉ.पावणेकर, डॉ.ढगे, डॉ.शेवाळकर, डॉ.मुक्कावार, मेडिकल असोशियनचे प्रभाकर चव्हाण, वानखेडे, शिवकुमार गांजरे, किसन कदम, संदीप पाटील, बंडू गायकवाड, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल पेन्शनवार यांनी मानले.   

गुरुवार, 14 अगस्त 2014

उपोषण

पोषणआहार कामगारांचे उपोषण सुरु होताच मागण्या मान्य


हिमायतनगर(वार्ताहर)शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार कामगारास कायम कामावर घेण्याचे आदेश असताना निर्णयाची अंमल बजावणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय समोर उपोषण सुरु करताच मागण्या मान्य करण्यात आल्याने उपोषण सोडण्यात आले आहे.   

शालेय पोषण आहार कामगार संघटना (सिटू) हिमायतनगरच्या वतीने दि.१४ गुरुवारी १२ वाजता विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. १४ जुलै २०१४ च्या निर्णयानुसार शालेय पोषण आहार कामगारास कायम कामावर घ्यावे असे आदेश शासनाने दिले आहे. मात्र सादर निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तालुक्यातील वाशी जी.प.के.शाळा, मंगरूळ, सिबदरा, एकंबा, घारापुर, विरसनी, कामारी जी.प.शाळा, किरमगाव, पवना या शालेवार्जुन्याच कामगारांना तातडीने कामावर घ्यावे. महिन्याच्या पहिल्या तारखेला बैन्के मार्फत मानधनाचे बिल वाटप करावे, कामगारास ओळखपत्र वाटप करावे यासह विविध मागण्यासाठी कॉ.दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल घेत गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांनी लेखी श्वासनातून काही मागण्या मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.               
     

महामोर्चा धडकला

इज्रायलच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांच्या महामोर्चा तहसीलवर धडकला    

हिमायतनगर(अनिल मादसवार)इज्रायलकडून पैलेस्तीनी नागरिकांवर केला जात असलेल्या क्रूर अन्यायाच्या निषेधार्थ हजारो मुस्लिम बांधवांसह तालुक्यातील सर्व धर्मीय नागरिकांनी महामोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. 

गाजा पट्टीतील नागरिकांवर सातत्याने इज्रायल अन्याय करीत असल्याने असंख्य निष्पाप नागरिकांसह महिला आणि मुलांचे हत्याकांड घडविल्या जात आहे. हि घटना मानवतेच्या सर्व सीमा पार करणाऱ्या इज्रायलच्या विरोधात जागतिक स्थरावर कठोर निर्णय होणे गरजेचे आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून गाज पट्टीतील नागरिकांना संरक्षण पुरविण्याचा विचार जगातील मानवता वादी दुष्टीकोन ठेवणाऱ्या देशांनी करणे गरजेचे आहे. परंतु जागतिक स्तरावर काही देश याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या गोष्टीचा निषेध करत गाजा पट्टीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी गुरुवारी दुपारी २ वाजता हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरातील दारूल - उल्लुम येथून मुस्लिम बांधवांनी हजारोच्या संखेने काळ्या फिती लावून इज्रायलचा निषेध करत महामोराचा काढला होता. सदर मोर्चा हा पामेश्वर मंदिर ते नांदेड -किनवट राज्य रस्त्यावरून तहसील कार्यालयावर धडकून मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मजहर मौलाना म्हणाले कि, इज्रायलकडून गाजा पट्टीतील नागरिकांवर होत असलेले क्रूर हल्ले हे मानवता वादाला कलंक लावणारे आहे. निष्पाप चिमुकल्या मुलांची व महिलांची राजरोसपणे हत्या केली जात असल्याने हे मानवजातीला न शोभणारे आहे.  

जगातील भारतासह सर्व देशांनी मानवतावादाचा खातमा करून दहशतवाद पसरविणाऱ्या इज्रायलचा निषेध करावा व पैलेस्तीनच्या गाजा पट्टीतील नागरिकांना संरक्षण पुरविण्याची मागणी संबोधित करताना केली. तसेच इज्रायलकडून उत्पादित होण्याऱ्या सर्व वस्तुवर नागरिकांनी बहिष्कार घालून स्वदेशी बनावटी वस्तूंचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार गायकवाड यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात मुस्लिम कमेटीचे अध्यक्ष फेरोज खान, जी.प. सदस्य समद खान पठाण, मेराज मुल्ला, अ.जावेद गन्नि, आश्रफ खान, झिय्या भाई, प्रकाश अण्णा तुप्तेवार, रफिक सेठ, मुफ्ती नसीम साब, फेरोजखान युसुफ खान, जफर महम्मद खान, गौतम पिंचा, कासीम मौलाना, युनुस हाफिस साब, अजीफ हाफिस साब, अजीज मौलाना, असद मौलाना, नारायण कात्रे, सुभाष दारवंडे, सरदार खान, शे.रहिम सेठ, जावेद खातीब, मेराज मुल्ला यांच्यासह अनेक मुस्लिम, हिंदू नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.    

रविवार, 10 अगस्त 2014

भक्तांचा हिरमोडहिमायतनगर(अनिल मादसवार)शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पांडवकालीन तलाव पावसाळ्याचे आडीच महिने संपूनही कोरडच आहे. परिणामी या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य वाढविणारे कमळपुष्प व पक्षांचे थव्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गनिर्मित्त मनोहारी दृष्य पहावयास मिळत नसल्याने श्रावण मासात व गणेश उत्सव दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा व पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

१९७४ काळातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीत याच कनकेश्वर तलावातील विहिरीच्या पाण्याने शहरवासियांचे तहान भागली होती. या वर्षी ऑगस्ट महिना अर्धा होत असताना देखील पावसाभावी कोरडा तलाव पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. दर वर्षी श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वीच संदेश देत तलावाची सौंदर्या खुलून दिसत असे, यात उमललेली कमलपुष्प हि येणाऱ्या -जाणार्यांना आकर्षित करीत आसे. याबाबत इतिहासात सांगितले जाते कि, हस्तिनापुर कुरुक्षेत्रात कौरव - पांडवाच्या भीषण युद्धा प्रसंगी पांडवानी माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी बचावासाठी पांडवानी द्रोपदिसह पूर्वीचे वाढोणा(वारणावती)सध्याचे हिमायतनगर जवळील याच कनकेश्वर तलावाच्या ठिकाणच्या महादेव व वरद विनायक मंदिरात आसरा घेतला होता. या ठिकाणी कीही दिवस राहिल्यावर पांडवानी तलावास चंद्राचा आकार दिला, तसेच या तलावात कमाल पुष्प व बदकाच तसेच अन्य प्राणिमात्राचे पालन पोषण द्रोपदीने केले होते असे जुन्या जन्कारातून सांगण्यात येते.

त्यामुळे येथील पांडव कालीन तलावास विशेष महत्व प्राप्त झाले असून, तेंव्हापासून या तलावास कनकेश्वर तलाव या नावाने ओळखले जाते. आज हे नैसर्गिक सौंदर्य असलेले तलाव पावसाच्या अवकृपेने कोरडे पडले असून, आता या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कधी चांगला पाऊस पडेल व येथील निसर्ग सौंदर्य पहावयास मिळेल याकडे नजरा लागल्या आहेत.

येथील महादेवाचे मंदिर हे राजकालात गाडल्या गेल्याचे या ठिकाणी सापडणार्या मोठ मोठ्या शिळांच्या अवशेषावरून दिसून येत, आज घडीला या ठिकाणी तलावाच्या काठावर चंद्राच्या बिम्बावर वरद विनायकाचे मंदिर वसलेले असून, दर महिन्यातील चतुर्थी, श्रावण मास, गणेशोत्सव यासह दर शनिवारी भक्तांची गर्दी होते हे विशेष. 

शुक्रवार, 8 अगस्त 2014

क्रीडाहिमायतनगर(वार्ताहर)तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेला दि.०८ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून, किडा स्पर्धेचे रीतसर उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार श्री मंतावाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

०८ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा दि.०४ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, यात किकेत, हॉलीबॉल, कब्बडी, खो.खो.यासह मैदानी खेळ होणार आहेत. यात १४, १७, १९, १६ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धाचे खेळसुद्धा हिमायतनगर येथील राजाभगीरथ विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथे आगामी काळात जिल्ह्यासह १६ तालुक्यातील खेळाडूंची वर्दळ वाढणार आहे.

पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर तहसीलदार मंतावार यांच्या हस्ते क्रिकेट स्पधेला सुरुवात करण्यात आली. दि.१३ व १४ ऑगस्ट रोजी कबड्डी, २२, २३ रोजी खो-खो, १ सप्टेंबर रोजी व्हॉलिबॉल, ३ व ४ रोजी मैदानी स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन क्रीडा संयोजक के.बी.शन्नेवाड यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक बर्लेवाड, शिक्षण विभागाचे गटसमन्वयक के.बी.डांगे, मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल, मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, खम्माईतकर, भावडे सर, पांडे सर, हमंद सर, चव्हाण सर, शेवडकर सर, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार कानबा पोपलवार, दत्ता शिराने, धम्मपाल मुनेश्वर आदींसह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

गुरुवार, 7 अगस्त 2014

रस्ते झाले खड्डेमय

नेत्यांच्या आगमनानंतर रस्ते झाले खड्डेमय हिमायतनगर(वार्ताहर)येथील विविध शासकीय इमातीचे उद्घाटन करण्यासाठी मागील आठवड्यात दिग्गज नेत्यांचे आगमन होत असल्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली मुरूम व मातीचा वापर करून बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा जैसे ठेच झाल्याने वाहनधारक व पादचार्यांना मार्ग क्रमान करताना कसरत करावी लागत आहे. 

शहराच्या वैभवात भर टाकणारे ग्रामीण रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपनिबंधक कार्यालयाच्या इमातीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा काँग्रेसचे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. नेयांचा प्रवास सुखकर व्हावा व केलेल्या कामास शाब्बासकी मिळावी म्हणून सावजानिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली माती व मुरुमाचा वापर करून तकलादू पद्धतीने खड्डे बुजविण्याचे कार्य पार पाडले होते. नेते आले आणि गेले खड्डे पुन्हा जागे झाले असे चित्र हिमायतनगर - भोकर राज्य रस्त्याच्या चाळणी वरून दिसून येत आहे.

माण्यावाना प्रावास कताना खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागली नसेल, मात्र हलक्याश्या पावसाने माती - मुरूम वाहून गेले खड्डे पुन्हा सक्रिय झाले असा अनुभव सामान्य नागरिकांना, वाहनधारकांना येत आहे. रस्त्यावरून जाणारे वाहन भाधव वेगात जाताना पाई चालणाऱ्या  नागरिकाच्या अंगावर चिखल व पाणी उडत असून, त्यामुळे चालणार्या वाहनाचा अंदाज घेत स्वतः सुद्धा खड्ड्यात जाणार नाही याचा अंदाज घेत मार्ग काढावा लागत आहे. 

परंतु नेत्यांच्या आगमनाच्या नावाखाली रस्त्याची थातुर माथुर दुरुस्ती करून, यासाठी झालेला खर्च किती..? बहुतांश निधी अभियंत्यांच्या घश्यात उतरविण्यात येउन शासनाच्या तिजोरीला हलून  उखळ पांढरे करण्यात आले कि काय..? अशी चर्चा वाहनधारक, पादचारी यांच्या माध्यमातून सुरु आहे.   

रस्ता वाहून गेलाअल्पश्या पावसाने पदाधिकारी गुत्तेदाराचे पितळे उघडे 

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरात अवघ्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी करण्यात आलेला सिमेंट रस्ता अल्पश्यः पावसाने वाहून गेला असून, पंचायत समितीच्या पदाधिकारी महिला गुत्तेदाराच्या कामाचे पितळे उघडे पडले आहे. 

लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी दाजेदार विकास कामे करण्यासाठी कि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी असा प्रश्न संबंधित कामाच्या दर्ज्यावरून नागरिक विचारीत आहेत. पंचायत समिती स्तरावरील निधीचा वापर अप्रत्यक्षपणे स्वतःच्या हितासाठी होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते आहे. 

शहरातील कन्या शाळा, आंबेडकर चौक व रहिम कॉलनी येथे करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामात रेती, सोलिंग, गिट्टी व अल्प प्रमाणात सिमेंटचा वापर केल्याने काल झालेल्या पावसाने सदरील रस्त्यावरील सिमेंट वाहून जाऊन गिट्टी उघडी पडली आहे. पंचायत समिती सदस्य यांना आपल्या गणाच्या विकासासाठी पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात येते. परंतु काही पुढारी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आपले वजन वापरून निकृष्ठ कामाचे मोजमाप अभियंत्यांकडून पूर्ण करून घेतात. पदाधिकाऱ्यांचे काम असल्याने अगदी "ब्र" शब्दही न काढता मोजमाप करून अंतिम देयक काढले जाते.असाच काहींसा प्रकार या कामावरून दिसून येत आहे. 
०१ लक्ष ९२ हजार अंदाजपत्रकीय किंमत असलेला हा सिमेंट रस्ता थातूर - माथुर पद्धतीने करून पंचायत समितीच्या महिला पदाधिकारी गुत्तेदाराने आपले उखळ पांढरे करून घेत असल्याची चर्चा विकास प्रेमी नागरीकातून होत आहे. 

कन्या शाळेसमोरील रस्त्याचे अल्पश्या पावसाने तीन तेरा झाल्याचे बघता चिमुकल्यांना या रस्त्यावरून सोलिंग गिट्टी तुडवत जाण्याशिवाय पर्याय नसून परिणामी चिमुकल्यांना दुखापतही सहन करावा लागणार असल्याने नागरीकातून या निकृष्ठ कामाविषयी संताप व्यक्त करण्यात येउन चौकशीची मागणी केली जात आहे. 


बुधवार, 6 अगस्त 2014

सात टक्के आरक्षण द्या

हिमायतनगर(बी.आर.पवार)रानावनात राहून गुरा-ढोरावर उपजीविक भागविणाऱ्या तथा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बंजारा समाजाला अनुसिचीत जाती- जमाती प्रमाणे स्वतंत्र्य सूची तयार करून सात टक्के आरक्षण देऊन बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आण असे मत बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांनी केले.

ते समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी दि.११ रोजी नांदेड येथे काढण्यात येणाऱ्या थाळी, नगर बजाव आंदोलन व मोर्चा संदर्भात हिमायतनगर येथे आयोजित समाज बांधवाच्या बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि, देशभरात बंजारा समाजाची १२ कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्र राज्यात जवळपास ०१ कोटी असून, बंजारा समाजाला वेगवेगळ्या भागात बंजारा, लमाण, लामांनी, लुभान, लावणी, आदी नावाने ओळखले जाते. या समाजास इंग्रजी राजवटीने गुन्हेगारी जमात ठरवून छळले आहे. हा समाज वाडी - तांड्यात राहतो. या समाजाला स्वतहाची भाषा, वेशभूषा, संस्कृती देशभरात एकच आहे. तरीसुद्धा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या हा समाज अत्यंत मागे आहे. खर्या अर्थाने या समाजाला मुख्य परवाहत आणण्यासाठी शैक्षणिक, नौकरी व राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

या मागण्यासाठी येत्या सोमवार दि.११ ऑगस्ट रोजी नांदेड येथे बंजारा समाज बांधवांचा विशाल मोर्चा काढण्यात येउन थाळी नगारा बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. यात बंजारा समाजास अनुसूचित जाती - जमाती प्रमाणे केंद्रस्तरावर स्वतंत्र सूची तयार करून शासकीय नौकर्या शैक्षणिक व राजकीय आरक्षण द्यावे. नांदेड गुरुतागद्दी गद्दीच्या धरतीवर बंजारा समजाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्र पोहरा देवी येथे स्वतंत्र निधी देऊन विकास करावा, महाराष्ट्रातील किमान ३०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बंजारातान्द्याना स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करावी, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळास पुरेसा निधी देऊन बंजा युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या, तांडा वस्ती विकास योजनेसाठी प्रतीवस्ती २५ लाखाचा निधी द्यावा, उसतोड मजुरांना प्रतीटन २५० रुपये मजुरी द्यावी, नांदेड येथेइल वसंतराव नाईक यांचा पुतळा बसविण्यासंदर्भात पास झालेल्या ठरावाची तत्काळ अंमल बजावणी करावी यासह अन्य मागण्या शासनाकडे केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राम राठोड, परसराम पवार, आशिष सकवान, राजेश राठोड, वसंत राठोड, अनिल पवार, बळवंत राठोड, यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव, पत्रकार उपस्थित होते.

दुकानदाराना २० लाखाचा चुना...

कारागिरांनी लावला दुकानदाराना २० लाखाचा चुना

रोख रक्कमेसह सोन्या - चांदीचा कच्चा माल घेऊन फरार.. हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील सात वर्षापासून शहरातील सराफा बाजारात सोने - चांदीच्या कच्च्या मालापासून मनी, मंगळसूत्र, डिझाईन, पॉलीशचे काम करणाऱ्या कारागिरांनी येथील व्यापार्यांना चुना लावल्याची घटना दि.०५ रोजी घडली आहे. या घटनेमुळे ज्वेलरी व्यापार्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील सराफा व्यापार्यांकडे  सोन्या -चांदीच्या कच्च्या मालाचे विविध प्रकारचे डिझायनिंग व पॉलीशिंगचे काम बंगाल राज्यातील चार युवक मागील सात वर्षापासून करत होते. त्यांनी सर्व व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे येथील सर्वच व्यापारी त्यांच्याकडे कच्चा माल देऊन विविध प्रकारचे साहित्य बनऊन घेत होते. नुकतेच  त्यांनी बहिणीचे लग्न आहे असे सांगून काही व्यापारी व मित्रत्वातील काही लोकांकडून चार ते पाच लाख रुपये नगदी स्वरूपात रक्कम जमा केली. तर गावाकडून येण्यास उशीर लागेल म्हणून शहरातील जवळपास १८ व्यापायांचा सोने - चांदी, असा कच्चा माल साहित्य बनून देण्यासाठी व्यापार्यांनी त्यांच्याकडे नुकताच दिला होता.  

जवळपास १५ लाखाचे सोने व ०३ लाखाची चांदी आणि नगदी रक्कम असे मिळून २० लाखाचा माल व स्वतःचे मशीन, काटा यासह स्वतःचे अन्य महागडे साहित्य घेऊन दि. ०५ रोजी सकाळी ०४ वाजता बंगाल येथील सोने कारागीर तथा प्रमुख आरोपी साजन इसूब मंडल वय २२ वर्ष व शेजमल उर्फ सोहेल इसूब मंडल वय ३० वर्ष पोबारा यांनी केला. 


तसेच गत दोन महिन्यापूर्वी सुरज वासुदेव पाल व अनिरुद्ध यानी काम सोडून देऊन गेल्याचे व्यापारी सांगतात. वरील सर्व आरोपी हे बंगाल राज्यातील असल्याने त्यांनी संगनमताने हे केले असल्याचा आरोप सराफा व्यापार्यांकडून करण्यात येत आहे. सदरील चारही युवकांचा भ्रमणध्वनी बंद येत असल्याने आपल्याला लुबाडण्यात आल्याचे लक्षात येताच, सराफा व्यापार्यांनी पोलिस स्थानकातून फिर्याद देणार असल्याचे सांगितले. सदरील वृत्त लिहीपर्यंत पोलिस डायरीत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू होती. याबाबत पोलिसात विचारणा केली असता, या घटनेचा पंचनामा सुरु आहे, सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात येउन तपास केला जाईल असे पोलिस सुत्रानी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.   

मंगलवार, 5 अगस्त 2014

रस्ता बनला खड्डेमय

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे पोटा खु.रस्त्याची मागील वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पाचवी ते बारावीच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थीनीना या खडतर रस्त्याचा सामना करत शिक्षण घ्यावे लागत आहे. तर कधी कधी पावसामुळे वाहने अडकली कि खुद्द विद्यार्थ्यांना वाहने ढकलून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे. 

नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर असलेल्या पोटा खु.येथून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या पोटा खु.रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी या रस्त्यावर पडलेल्या टोंगळा भर खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांना पाई चालून रजया रस्ता गाठावा लगत आहे. या गावातील जवळपास ३० ते ४० विद्यार्थी हे येथून १८ कि.मी.अंतरावरील असलेल्या हिमायतनगर येथील शाळा - कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. मात्र दयनीय रस्त्यामुळे शिक्षणासाठी जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथून जाणारी वाहने हि खड्डेमय व चिखलातील रस्त्यात अडकून बसत असल्याने अक्षरश्या विद्यार्थ्यांना वाहने ढकलून काढण्याची वेळ येत आहे, या प्रकारामुळे वेळेवर शाळेवर पोहोन्चू शकत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, गंभीर रुग्ण अथवा गरोदर महिलेला उपचारासाठी आणण्यासाठी बैलगाडी अथवा खाटेचा वापर करावा लागत आहे. 

या भागातील जी.प.सदस्या ह्या अशिक्षित व आडाणी असल्यामुळे केवळ स्वार्थ असलेल्या बंधारे, सिमेंट रस्ते या कामात जास्त लक्ष देऊन निवडणुकीतील खर्च काढण्यावर भर देत आहेत. परिणामी सामान्य जनता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समस्येनी त्रस्त झालेल्या जनतेतून केला जात आहे. या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दयनीय अवस्था सुधारावी अशी मागणी ग्रामस्थामधून केली जात आहे. 

दुधड - कामारी गटातील बंधारे, सिमेंट रस्त्याची कामे निकृष्ठ... 

दुधड - कामारी गटाच्या जी.प.सदस्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे दुधड, वाळकेवाडी, पारवा खु., वडगाव, टाकाराळा, कांडली तांडा, दाबदारी, कामारवाडी यासह या गटातील व गणातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. परंतु सदरची कामे हि अंदाजपत्रकाला बगल देऊन अभियंत्याच्या संगनमताने केली जात आहेत. सदर कामात निकृष्ठ पद्धतीचा दगड, माती मिश्रीत रेती, कमी ग्रेडचे सिमेंट व मोठ मोठे टोळक्या दगडाचा वापर करून केले जात आहे. त्यामुळे सदरची कामे हि अल्पावधीतच मातीत मिसळणार असून, या निकृष्ठ कामाची चौकशी वरिष्ठांनी करून गुत्तेदाराना दंड लावावा. तसेच कामाचा दर्जा सुधारून शासन निधीचा परीसरतील विकासापासून वंचित गावांना फायदा करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

शाखाधिकारी चतुर्भुज

शंभर रुपयाची लाच घेताना नाजीम बैन्केचे शाखाधिकारी चतुर्भुज 

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैन्केचे शाखाधिकारी यांना शंभर रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैन्केच्या माध्यमातून गत वर्षी अतिवृष्टी व या वर्षी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाईची मावेज्याचे वितरण केले जात आहे. जवळपास सर्वच शेतकर्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले असून, अंतिम टप्प्यातील काही उर्वरित शेतकर्यांना अनुदान दिले जात आहे. याबाबत तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खरड्याच्या अनुदानाची उर्वरित ६ हजाराची रक्कम उचलण्यासाठी आला होता. मात्र सदर रक्कमेसाठी शाखाधिकारी पांडुरंग विठ्ठल कदम यांनी तक्रारदार शेतकर्यास १०० रुपयाची लाच मागितली होती. अगोदरच पाऊस नाही, त्यामुळे आगामी काळात होणारी नापिकी यात हक्काचे १०० रुपये का म्हणून द्यायचे असा विचार केला. आणि तक्रार दराने नांदेड लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे दि.०२ ऑगस्ट रोजी रीतसर तक्रार दिली. 

यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी प्रथमतः लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर आज दि.०५ रोजी सापळा रचून तक्रारदाराकडून १०० रुपयाची लाच स्वीकारताना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैन्केचे शाखा व्यवस्थापक पांडू कदम(पाटील)यांना पंचासमक्ष रंगे हात पकडले. याबाबत एसीबीचे पोलिस निरीक्षक एस.जे.माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बैंक अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस अधीक्षक एन.व्ही.देशमुख, पोलिस उपाधीक्षक एम.जी.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली एस.जे.माने हे करीत आहेत. 

हा सापळा यशवी करण्यासाठी पोहेका.चंद्रकांत कदम, पो.ना.बाबू गाजलवार, विठ्ठल खोमणे, पो.को.विनायक कीर्तने, संदीप उल्लेवार, चालक शिवहार किडे, यांनी कामगिरी बजावली.     

सोमवार, 4 अगस्त 2014

प्रेमीयुगलांचा संसार

गौतमच्या वर्दीतील माणुसकीने जुळविला प्रेमी युगलांचा संसार.. वरून राजाचीहि हजेरी  हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे पळसपूर येथील येथील एका प्रेमी जोडप्यांचा पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी पोलिस ठाण्यात विवाह जुळवून लग्न लाऊन दिले आहे. उभयतांच्या विवाह सोहळ्यानंतर निसर्गानेही आशीर्वाद देत पावसांच्या सरींची बरसात केली. 

याबाबत सविस्तर असे कि, मौजे पळसपूर येथील सुचिता वाडेकर हिचा गावातीलच तंत्र निकेतनचे शिक्षण घेणाऱ्या आकाश वाकोडे याच्याशी काही दिवसापूर्वी प्रेम संबंध जुळून आले. बघता बघता दोघांच्या प्रेमाचा वेलू गगनावरी गेला. परंतु घरच्यांचा रुसवा या दोघांच्या विवाहात आडकाठी ठरत होता.   हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या वर्दीतील माणुसकीने दोन्ही कुटुंबास कायद्याच्या अनंत कटकटीतून सुटका करून देत सामंजश्य घडविले. एकमेकांना समजून घेऊन दोघांच्या सहमतीने विवाह समारंभ उपस्थिता समक्ष ठाण्यातच पार पडला. 

अनेक वाद विवाद करत कोर्टाच्या चकरा मारण्यापेक्षा दोन्ही कुटुंबांनी पोलिस निरीक्षक गौतम यांनी दिलेला वडिलकीचा सल्ला लक्षात घेत प्रेमाने संसार फुलविण्याचा संकल्प केला. भविष्यात काही अडचण आल्यास मी केंव्हाही आपणास मदत करण्यास तयार आहे असे अभिवचन गौतम यांनी नवदाम्पत्यास दिले. त्यांच्या या कौतुकास्पद कार्याने तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदांचा वर्षाव केला जात असून, वर्षानुवर्ष हाच अधिकारी असावा असा मनोदय अनेक नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी नागोराव पतंगे, शंकर पाटील, सुभाष दारवंडे, शाहीर रामराव वानखेडे, बाबुराव वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, कानबा पोपलवार, अनिल मादसवार, दिलीप शिंदे, असद मौलाना, धम्मा मुनेश्वर, शुद्धोधन हनवते, वधू वरांचे माता- पिता व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.    

जीवदान

रिमझिम पावसाने कोवळ्या पिकांना जीवदान..


हिमायतनगर  (अनिल मादसवार)पावसाने डोळे वटारल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून, दुबार तिबार पेरणी करून हताश झालेल्या शेतकर्यास आज झालेली रिमझिम पावसाने दिलासा मिळला आहे. नुकत्याच बीजातून अंकुरलेल्या पिकास आजच्या पावसाने जीवदान मिळाले असले तरी बळीराजाच्या एका डोळ्यात आसू..तर एका डोळ्यात हसू.. असे चित्र आहे.

अर्धा पावसाळा संपत आला तरीहि हिमायतनगर तालुक्यातील नदी - ओढे अजूनही खळवळून  वाहिला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत असतानाच जनावरांच्या चार्याचा प्रश्नही उग्ररूप धारण करून समोर उभा आहे. जून - जुलै महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली, तरी पाऊस झाला नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे.  निसर्गाच्या अवकुपेने मराठवाड्यातील शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. दुकानदार उधार देईना.. आन काळ्या आईला पाडीत पडू देऊ वाटेना.. अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. अश्यावेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची आपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात असून, आर्थिक मदतीसह जनावरासाठी चारा छावण्या, वीज बिल माफी, मजुरांच्या हाताला काम, कृषीकर्ज माफी देऊन शेतकर्यांना दुष्काळाच्या संकटातून वाचवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे.

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करण्याची सवय जडलेल्या बळीराजास मात्र बुडत्याला काडीचा आधार म्हटल्या प्रमाणे, सर्वन महिन्यात सुरु झालेल्या रिमझिम पावसाने अंकुरलेल्या पिकांना जीवदान मिळाले खरे, मात्र पिकांची वाढ खुंटून आगामी काळातील शेती उत्पन्नात ७० टक्क्याहून अधिक उत्पादन घटणार असल्याचे चित्र परिसरातील पिकांच्या पाहणीवरून स्पष्टपणे जाणवत आहे.