रस्ता वाहून गेला



अल्पश्या पावसाने पदाधिकारी गुत्तेदाराचे पितळे उघडे 

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरात अवघ्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी करण्यात आलेला सिमेंट रस्ता अल्पश्यः पावसाने वाहून गेला असून, पंचायत समितीच्या पदाधिकारी महिला गुत्तेदाराच्या कामाचे पितळे उघडे पडले आहे. 

लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी दाजेदार विकास कामे करण्यासाठी कि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी असा प्रश्न संबंधित कामाच्या दर्ज्यावरून नागरिक विचारीत आहेत. पंचायत समिती स्तरावरील निधीचा वापर अप्रत्यक्षपणे स्वतःच्या हितासाठी होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते आहे. 

शहरातील कन्या शाळा, आंबेडकर चौक व रहिम कॉलनी येथे करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामात रेती, सोलिंग, गिट्टी व अल्प प्रमाणात सिमेंटचा वापर केल्याने काल झालेल्या पावसाने सदरील रस्त्यावरील सिमेंट वाहून जाऊन गिट्टी उघडी पडली आहे. पंचायत समिती सदस्य यांना आपल्या गणाच्या विकासासाठी पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात येते. परंतु काही पुढारी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आपले वजन वापरून निकृष्ठ कामाचे मोजमाप अभियंत्यांकडून पूर्ण करून घेतात. पदाधिकाऱ्यांचे काम असल्याने अगदी "ब्र" शब्दही न काढता मोजमाप करून अंतिम देयक काढले जाते.असाच काहींसा प्रकार या कामावरून दिसून येत आहे. 
०१ लक्ष ९२ हजार अंदाजपत्रकीय किंमत असलेला हा सिमेंट रस्ता थातूर - माथुर पद्धतीने करून पंचायत समितीच्या महिला पदाधिकारी गुत्तेदाराने आपले उखळ पांढरे करून घेत असल्याची चर्चा विकास प्रेमी नागरीकातून होत आहे. 

कन्या शाळेसमोरील रस्त्याचे अल्पश्या पावसाने तीन तेरा झाल्याचे बघता चिमुकल्यांना या रस्त्यावरून सोलिंग गिट्टी तुडवत जाण्याशिवाय पर्याय नसून परिणामी चिमुकल्यांना दुखापतही सहन करावा लागणार असल्याने नागरीकातून या निकृष्ठ कामाविषयी संताप व्यक्त करण्यात येउन चौकशीची मागणी केली जात आहे. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी