शालेय वयात संस्कार

हिमायतनगर(अनिल मादसवार)शालेय जीवन एक असे माध्यम आहे ज्या ठिकाणी आपल्यावर चांगले संस्कार घडविले जातात. परंतु संस्कारमय व चांगले बनणे हे आपल्याच हातात असून, त्यासाठी शालेय वयात विद्यार्थ्यांनी चांगल्या तेवढ्या गोष्टीचे अनुकरण करून संस्कार व शिस्तीचे पालन करावे. असे आवाहन हिमायतनगर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आशिष मारगोडे यांनी केले.

ते हिमायतनगर शहरातील हुजपा महाविद्यालयात विधी सेवा समिती व बार असोशियनच्या वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना माहिती देताना बोलत होते. यावेळी मंचावर सरकारी वकील शे.मुस्ताक, एड.शिंदे, एस.जाधव, एड.राठोड, क्लार्क कापसे, प्राचार्य वसंत क्षीरसागर, मुख्याध्यापिका खंबायतकर, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, शिपाई अहेमद, प्रा.भुरे, प्रा.डाके यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुढे बोलताना ते न्यायाधीश म्हणाले कि, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून चांगल्या त्या गोष्टी आत्मसात कराव्यात. शिक्षक वृन्दांकडून दिली जाणारी शिकवण हि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असते. म्हणून सर्वांचा आदर सन्मान करून उच्च शिक्षण घ्यावे तरच यश आपल्या पदरात पडेल असेही ते म्हणाले. या प्रसंगी एड. शिंदे यांनी शिक्षणाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे, कारण शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे असे करणार्यांना ०२ वर्ष सक्त मजुरी ०१ लाखाच्या दंडाची तरतूद असल्याचे सांगितले. सरकारी वकील एड. मुस्ताक यांनी महाराष्ट्र प्रदूषण व रेगिंग कायद्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने कोणत्याही विद्यार्थी - अथवा विद्यार्थीनीना त्रास देऊ नये नये अन्यथा त्यास २ वर्षाची शिक्षा व पाच वर्ष कोणत्याही शाळा - कॉलेजात प्रवेश बंदीची तरतूद असल्याचे सांगितले. एड. जाधव यांनी सायबर कायद्याची माहिती देऊन मोबाईल, फेसबुक आदीचा वापर चांगल्या माहितीच्या देवाण - घेवानसाठी वापर करावा, अयोग्य वापर व अश्लील एस.एम. एस. तथा छायाचित्र वापरणे, पाठविणे हा सायबर गुन्हा मनाला जातो असे सांगितले. तर एड.राठोड यांनी मालकी हक्क कायदा स्वरक्षणासाठी बनल्याचे सांगून कायद्यात नवनवीन बदल होतात, त्यासाठी सर्वांनी कायदा विरोधी पद्धत बदलली पाहिजे असे सांगितले.

या कार्याक्रमचे सूत्रसंचालन ताडकुले सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सूर्यप्रकाश जाधव यांनी मानले. कार्यक्रमच समारोप वन्दे मातरम या गीताने करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व अनेकांची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी