पोषणआहार कामगारांचे उपोषण सुरु होताच मागण्या मान्य
हिमायतनगर(वार्ताहर)शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार कामगारास कायम कामावर घेण्याचे आदेश असताना निर्णयाची अंमल बजावणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय समोर उपोषण सुरु करताच मागण्या मान्य करण्यात आल्याने उपोषण सोडण्यात आले आहे.
शालेय पोषण आहार कामगार संघटना (सिटू) हिमायतनगरच्या वतीने दि.१४ गुरुवारी १२ वाजता विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. १४ जुलै २०१४ च्या निर्णयानुसार शालेय पोषण आहार कामगारास कायम कामावर घ्यावे असे आदेश शासनाने दिले आहे. मात्र सादर निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तालुक्यातील वाशी जी.प.के.शाळा, मंगरूळ, सिबदरा, एकंबा, घारापुर, विरसनी, कामारी जी.प.शाळा, किरमगाव, पवना या शालेवार्जुन्याच कामगारांना तातडीने कामावर घ्यावे. महिन्याच्या पहिल्या तारखेला बैन्के मार्फत मानधनाचे बिल वाटप करावे, कामगारास ओळखपत्र वाटप करावे यासह विविध मागण्यासाठी कॉ.दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल घेत गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांनी लेखी श्वासनातून काही मागण्या मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.