वृत्तपत्र लांबविले..

वृत्त प्रकाशित होताच ग्रामसेवकाची झोप उडाली...

हिमायतनगर(अनिल मादसवार)फौजदारी गुन्हा दाखल होऊनही ग्रामसेवक कर्तव्यावर कसा...? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच ग्रामसेवकाची झोप उडाली असून, सदरचे वृत्तपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे पर्यंत पोंचू नये म्हणून दाबदरी येथे आलेले सर्व वर्तमान पत्राचा गठ्ठाच गायब कार्यक्रम संपताच तातडीने गावातून पळ काढल्याचे दिसून आले आहे.

दोन वर्षापूर्वी कार्यरत ग्रामसेवक भारती यांनी शासनाकडून मंजूर योजनेतील कामे मनमानी पद्धतीने कागदावरच पूर्ण करून, रक्कम हडप केली. या प्रकारची होऊ नये म्हणून सर्व अधिकार्यांना धरून ग्रामसेवकाचा कारभार सुरूच होता. याबाबत चार ग्रामपंचायत सदस्यांनी चौकशीची मागणी करूनही वरिष्ठ अधिकार्याच्या अभयामुळे अजूनही भारती यांची मनमानी सुरूच होती. याबाबतची माहिती पत्रकारांना समजताच दि.२६ च्या अंकात फौजदारी गुन्हा दाखल होऊनही ग्रामसेवक कर्तव्यावर कसा...? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सदर ग्रामसेवकाची झोप उडाली. आज २६ रोजी तालुक्यातील मौजे दाबदरी येथे निर्मल भारत अभियाना अंतर्गत चालू असलेल्या शौचालय बांधकाम धारकांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच गाव हागणदारी मुक्त करण्यासंदर्भात आयोजित कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे आले होते. त्यामुळे त्यांच्या हातात छापून आलेल्या बातमीचे वृत्तपत्र पडू नये म्हणून सर्वचे पेपरचा गठ्ठा गायब केला. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर तातडीने त्या ठिकाणाहून पळ काढला, ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या बालाजी राठोड यांनी पेपर कुठे गेले असे विचाताचा गावातीलच एकाने सर्व पेपर ग्रामसेवकाने नेले असे सांगितल्याने ग्रामसेवकाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

अपहरकर्त्या ग्रामसेवकास निलंबित करा..मागणीचे निवेदन

दरम्यान अपहर कर्त्या ग्रामसेवक भारती यांच्यावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन येथील ग्राम पंचायत सदस्य संतोष बन्सी आडे, प्रल्हाद मोतीराम जाधव, सौ.शांताबाई गंगाराम जाधव, सौ.विमलबाई गणपत आडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देऊन निलंबित करण्याची मागणी केली आहे. यात तंटामुक्त समितीचे बांधकाम, मानव विकास योजनेतून बांधकाम, बी.आर.जी.एफ., एम.आर.ई. जी.एस., १३ वा वित्त आयोग, ग्राम पंचायत बांधकाम, स्मशान भूमी, पेयजल जी.प.शेष पाणी विभागाकडून आलेला बंधारा, इतर योजना मधील बंधारा, रस्ता, रोप वाटिका, राष्ट्रीय पाणलोट विकासाची कामे, ठक्कर बाप्पा योजनेतील कामे, ग्राम पंचायतीच्या मासिक बैठका, प्रोसिडिंग रेकोर्ड आदी मध्ये मोठ्या प्रमाणात अफरा - तफर करून अनेक कामे कागदोपत्री केली. तसेच अनेक वेळा ग्रामसभा न घेता, जवळपास सर्वच कामाचा निधी उचलून कामे न करता शासन व जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली आहे. या प्रकारची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी