क्रीडा



हिमायतनगर(वार्ताहर)तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेला दि.०८ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून, किडा स्पर्धेचे रीतसर उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार श्री मंतावाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

०८ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा दि.०४ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, यात किकेत, हॉलीबॉल, कब्बडी, खो.खो.यासह मैदानी खेळ होणार आहेत. यात १४, १७, १९, १६ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धाचे खेळसुद्धा हिमायतनगर येथील राजाभगीरथ विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथे आगामी काळात जिल्ह्यासह १६ तालुक्यातील खेळाडूंची वर्दळ वाढणार आहे.

पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर तहसीलदार मंतावार यांच्या हस्ते क्रिकेट स्पधेला सुरुवात करण्यात आली. दि.१३ व १४ ऑगस्ट रोजी कबड्डी, २२, २३ रोजी खो-खो, १ सप्टेंबर रोजी व्हॉलिबॉल, ३ व ४ रोजी मैदानी स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन क्रीडा संयोजक के.बी.शन्नेवाड यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक बर्लेवाड, शिक्षण विभागाचे गटसमन्वयक के.बी.डांगे, मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल, मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, खम्माईतकर, भावडे सर, पांडे सर, हमंद सर, चव्हाण सर, शेवडकर सर, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार कानबा पोपलवार, दत्ता शिराने, धम्मपाल मुनेश्वर आदींसह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी