पोळा

वरून राज्याच्या वर्षावात वृषभराजाचा पोळा संपन्न

हिमायतनगर(अनिल मादसवार)भारतीय परंपरेनुसार वर्षातून एक वेळा येणाऱ्या वृषभराजाचा पोळा सन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला असून, येथील मारोती मंदिर परिसरात हजारो शेतकरी आपल्या सर्जा - राज्याची जोडी घेऊन उपस्थित झाले होते. ठरलेल्या वेळेवर पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठकात ०४ वाजून ४५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. ऐन लग्नाच्या काळात वरून राजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. परंतु लगेच पाऊस गायब झाल्याचे दिसून आले आहे.

श्रावण मासातील अमावास्येच्या गुरुवारी पोळ्याच्या सन आला असून, सकाळी ५ वाजताच उठून  शेतकर्यांनी पळसाच्या मेढ्या आणून लक्ष्मी मानल्या जाणर्या उकिरड्यावर, गावातील देवाला व घराच्या प्रवेश द्वाराच्या दॊन्हि बाजूने ठेऊन दर्शन घेतले. सकाळी हनुमंतरायाला शेंदुराचे लेप व झंडे लाऊन, पूजा - अर्चना करून नारळ व साखरेचा प्रसाद चढून पोळ्याच्या मिरवणुकीची तयारी केली. तर महिलांनी देखील सकाळच्या रामप्रहरी उठून सडा-संमार्जन करून पानात वापरला जाणारा चुना व गेरूने शेती अवजारे व मेड्याची पूजा - अर्चना केली. लग्न मुहूर्त सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांचा असल्याने लगेच बैलना अंघोळ घालून वार्निश, घुंगरमाळ, मोरके, कासरे, झुली, गोंडे, बेगडी, बाशिंग, नाडापुडी, नागेलीचे पान आदिने सजउन उत्सवाची जय्यत तयारी केली होती. येथील हनुमान मंदिर व ग्रामपंचायतीकडून लग्न मुहूर्ताची निश्चित वेळ सांगताच शेतकर्यांनी नवे वस्त्र परिधान करून आप -आपली बैल जोडी गावातील प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन मिरवणुकीत  सामील झाले. 

या दिवशी प्रथम बैलजोडीचा मान ग्रामपंचायतीचा असल्याने येथील सरपंच श्रीमती गंगाबाई शिंदे व त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर शिंदे, माजी जी.प.सदस्य समद खान यांच्या हस्ते मनाच्या बैलांची पूजा करून ढोल - ताश्याच्या गजरात पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली होती. पोळ्याची मिरवणूक येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात येउन हनुमान मंदिराकडे रवाना झाली. वाजत गाजत, नाचत पोळ्याची निघालेली मिरवणूक शहरातील लहान - थोरांसाठी आकर्षण बनली होती. शहरातील दक्षिण मुखी मारोती मंदिराजवळ पोहोन्चताच पुरोहितांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठकात विवाह सोहळा वरून राजाच्या साक्षीने अक्षदा टाकून थाटात पार पडला. यावेळी पोळा मिरवणुकीत शहरातील प्रमुख मान्यवर, राजकीय नेते, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, शेतकरी, नागरिक, लहान थोर मंडळीनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर लगेच पोळ्याची रीघ सुसाट वेगाने धावत सुटली, ते आपल्या घरी जाईपर्यंत थांबली नाही, घरी जाताच वृषभ राजाची आरती, महापुजा करून पुरण पोळीचे नैवेद्य दाखविण्यात आले. तर बळीराजाच्या पायावर काकडी फोडून मजूरदार व निमंत्रीताना ग्राम पंचायतीच्या वतीने पुरण पोळीचे भोजन देण्यात आले. उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता.          

बैलपोळ्यावर पावसाचे संकट 

यंदा नाही पाऊस पाणी टोपल्यातल्या पाण्याने बळीराजाची केली अंगधुनी..या वर्षीच्या खरीप हंगामात वरून राजाच्या अवकृपेमुळे शेतकर्यांना टोपल्यात पाणी घेऊन बैलांना अंघोळ घालावी लागली असून, बैल पोळ्याच्या सणावर पाणी टंचाई चे सावट दिसून आले आहे. मात्र लग्न लावण्यागोदर आभाळ गडगडून येउन पावसाने बळीराजाच्या लग्न सोहळ्याचे स्वागत वर्षावाने केल्याचे दिसून आले. परंतु म्हणावा तसा पाऊस झाला नाही, याची खंत शेतकर्यात दिसून आली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी