आगामी काळात उर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढू..आ.जवळगावकर
हिमायतनगर(अनिल मादसवार)आई जगदंबा, कालीन्का मातेच्या आशीर्वादाने हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील विकास कामाला गती देण्याची शक्ती मिळाली असून, आगामी काळात उर्वरित विकास कामाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन आ. जवळगावकर यांनी दिले. ते हिमायतनगर(वाढोणा) येथील कालीन्का देवी मंदिराच्या सभामंडपाचे पायाभरणी शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी जी.प.सदस्य सुभाष राठोड, कृउबा.सभापती दत्तराम पाटील करंजीकर, जनार्धन ताडेवाड आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सकाळी १२.३० मिनिटांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते २५ तीर्थक्षेत्र निधीतून मंजूर सभामंडपाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुरोहित साईनाथ बडवे यांच्या मधुर वाणीतील मंत्रोचाराने झाला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, मागील काळात आजी - माजी मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने अनेक विकासाची कामे केली असून, हे सर्व आपण जनतेनी निवडून दिल्यामुळे करू शकलो असेही ते म्हणाले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष राजीव रामदिनवार, सेक्रेटरी रामकृष्ण मादसवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, शरद चायल, नारायण गुंडेवार, गणपत गुंडेवार, ज्ञानेश्वर शिंदे, विकास देवसरकर, सुरेश पळशीकर, बाळू चवरे, अभियंता मुधोळकर, मुरारी यंगलवार, रामराव मादसवार, पामेश्वर मादसवार, अ.जावेद अ.गन्नि, अनिल मादसवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.