गौतमच्या वर्दीतील माणुसकीने जुळविला प्रेमी युगलांचा संसार.. वरून राजाचीहि हजेरी
हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे पळसपूर येथील येथील एका प्रेमी जोडप्यांचा पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी पोलिस ठाण्यात विवाह जुळवून लग्न लाऊन दिले आहे. उभयतांच्या विवाह सोहळ्यानंतर निसर्गानेही आशीर्वाद देत पावसांच्या सरींची बरसात केली.
याबाबत सविस्तर असे कि, मौजे पळसपूर येथील सुचिता वाडेकर हिचा गावातीलच तंत्र निकेतनचे शिक्षण घेणाऱ्या आकाश वाकोडे याच्याशी काही दिवसापूर्वी प्रेम संबंध जुळून आले. बघता बघता दोघांच्या प्रेमाचा वेलू गगनावरी गेला. परंतु घरच्यांचा रुसवा या दोघांच्या विवाहात आडकाठी ठरत होता. हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या वर्दीतील माणुसकीने दोन्ही कुटुंबास कायद्याच्या अनंत कटकटीतून सुटका करून देत सामंजश्य घडविले. एकमेकांना समजून घेऊन दोघांच्या सहमतीने विवाह समारंभ उपस्थिता समक्ष ठाण्यातच पार पडला.
अनेक वाद विवाद करत कोर्टाच्या चकरा मारण्यापेक्षा दोन्ही कुटुंबांनी पोलिस निरीक्षक गौतम यांनी दिलेला वडिलकीचा सल्ला लक्षात घेत प्रेमाने संसार फुलविण्याचा संकल्प केला. भविष्यात काही अडचण आल्यास मी केंव्हाही आपणास मदत करण्यास तयार आहे असे अभिवचन गौतम यांनी नवदाम्पत्यास दिले. त्यांच्या या कौतुकास्पद कार्याने तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदांचा वर्षाव केला जात असून, वर्षानुवर्ष हाच अधिकारी असावा असा मनोदय अनेक नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी नागोराव पतंगे, शंकर पाटील, सुभाष दारवंडे, शाहीर रामराव वानखेडे, बाबुराव वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, कानबा पोपलवार, अनिल मादसवार, दिलीप शिंदे, असद मौलाना, धम्मा मुनेश्वर, शुद्धोधन हनवते, वधू वरांचे माता- पिता व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.