NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

सोमवार, 29 दिसंबर 2014

साहित्य पाठविण्याचे आवाहननांदेड(प्रतिनिधी)आगामी महाशिवरात्री उत्सव तथा नांदेड न्युज लाईव्हच्या तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवपर्व २००५ या विशेषांक प्रकाशित केला जाणार असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार तथा विशेषांकाचे संपादन कर्ते भास्कर दुसे यांनी दिली असून, यासाठी धार्मिक साहित्य, कविता पाठविण्याचे आवाहन केले आहे.

हिमायतनगर नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त तथा नांदेड न्युज लाईव्ह या वेब पोर्टलच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त शिवपर्व २०१५ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याची तयारी संपादक अनिल मादसवार यांनी सुरु केली असून, यासाठी अनेक मान्यवर लेखक लेखन करीत आहेत. या दर्जेदार अंकात धार्मिक साहित्य, कविता प्रकाशित केल्या जाणार असून, यासाठी नाविडीत लेखक, कवी व विनोदकार यांनी आपले धार्मिक साहित्य उत्कर्ष फोटो गैलरी, रुख्मिणीनगर, हिमायतनगर जी.नांदेड येथील पत्त्यावर पाठवावे. तसेच इंटरनेट सुविधा असलेल्या साहित्यकारांनी इमेलद्वारे nandednewslive@gmail.com, anilmadaswar@gmail.com यावर साहित्य पाठवावे. यातील दर्जेदार साहित्यांना या विशेषांकात स्थान देण्यात येईल अशी माहिती भास्कर दुसे यांनी दिली आहे. साहित्य हे मात्र धार्मिक पद्धतीचे आसवे याची साहित्यकार लेखकांनी नोंद घ्यावी असेही सुचविले आहे.

रविवार, 28 दिसंबर 2014

अप्रतिम कलाविष्कार

आनंददायी बाल मेळाव्यात विद्यार्थ्यांची अप्रतिम कलाविष्कार

हिमायतनगर(वार्ताहर)दीप नगर खडकी येथे संपन्न झालेल्या बालमंत्री मंडळाच्या कला अविष्कार कार्यक्रमात अप्रतिम अभिनय प्रस्रेत करून चिमुकल्यांनी उपस्थित मान्यवर, पालक व श्रोत्यांची मने जिंकून ग्रामीण भागातील बालक सुद्धा मागे नाहीते हे यातून दाखवून दिले आहे.

ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठावर आपल्या नागातील सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याचा धाडस निर्माण व्हावे. आणि मुलींबाबत पालकात निर्माण झालेली द्वेष भावना दूर करून मुलगा - मुलगी समान या बाबत जागृती व्हावी, व बालकांना त्यांचे हक्क अधिकार मिळावेत या उदात्त हेतूने गत अनेक वर्षापासून हिमायतनगर येथील सिप्रा सामाजिक संस्था कार्य करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे तालुक्यातील दत्तक घेतलेल्या शाळांची गुणवत्ता वाढीस लागली असल्याचे उत्तम उदाहरण पहावयास मिळत आहे. तो उद्देश पूर्णपणे सफल व्हावा यासाठी वर्षातून एक वेळा विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद लुटता यावा म्हणून दि.२८ रविवारी आनंददायी मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटना भारतीय स्टेट बैन्केचे क्षेत्रीय अधिकारी श्री काळेवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामसा येथील कायपलवाड सर, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, श्री कारकडे सर, संस्थेचे सचिव दिलीप राठोड हे होते.

स्वागतानंतर बोलताना श्री काळेवाड म्हणाले कि, स्त्री हि मत आहे..स्त्रीमुळेच हि सृष्ठी शाबूत असून, स्त्रीच्या पोटातून जन्मलेला अनेक्स शूर वीर या देशात होऊन गेले आहेत. त्यामुळे स्त्रीला कमी लेखू नका, मुलगा हा केवळ नावाचा आहे, परंतु खरी तळमळ हि आईनंतर मुलीलाच असते. कारण सुख दुखात मुलगीच मुलापेक्षा जास्त विचारपूस करून काळजी घेते. त्यामुळे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. म्हणून सर्वांनी मुलीबाबत ची वाईट धारणा मनातून काढून टाका आणि भरून हत्या टाळा. असा संकल आजपासून करून आपल्या गाव परिसरात प्रत्येकाला याची जाणीव करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनतर कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली, चिमुकल्यांनी आपल्या कला गुणांचे सादरीकरण जलवा तेरा जलवा जलवा....या गाण्याने करून हे मां काली...जान चाहे देणी पडे... या गीतांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यानंतर नाच रे मोर आंब्याच्या बनात...नाच रे मोर नाच..., पैरोमें बंधन है...पायाल ने मचाया शोर...,  चल जेजुरीला जावू...इमान डोल जायेगा..., चांदण चांदण झाली रात.., ठा..ठा...ठा....दुनिया कि ..., माझा कृष्ण लहान ग बाई.., चुडी जो हनाके हतो में..., रिबा रिबा.., यासह एकांकी नाटिका, चाद्द्याची नक्कल, मायची पाखरे यासह, लोकगीत, कोळीगीत, भावगीत, पोवाडे सादर करून चिमुकल्यांनी उपस्थितांची दाद मिळविली. चुइमुक्ल्यनि सादर केलेले कला अविष्कार शहरातील मुला - मुलीना लाजविणारे ठरले. यावरून ग्रामीण भागात असलो तरी काय झाले आम्ही सुद्धा कमी नाही हे या चिमुकल्यांनी दाखवून दिले. या बालमंत्री मंडळ मेळाव्याच्या कार्यक्रमात किनवट, हदगाव, हिमायतनगर या तीन तालुक्यातील ३० शाळांच्या जवळपास ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमात रंगत आणली होती.            

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार साईनाथ पालदेवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद राठोड, साईनाथ गोडसे, पद्माकर सर्कुडे, बालाजी कावळे, बाबू जाधव, सुनिता बोनगीर, वनिता हनवते, रेखा चव्हाण, आदीसह सिप्रा संस्थेचे कार्यकर्ते, उपस्थित शाळांचे शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

गतिरोधक बसवा...

कन्या शाळेसमोर गतिरोधक बसवा...
पालक -नागरिकांची मागणी

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील गजबजलेल्या व राहाद्दरीच्या ठिकाणावर असलेल्या जी.प.कन्या शाळेसमोर गतिरोधक बसवून संभाव्य अपघात टाळण्याची विनंती येथील युवक व पालकांनी ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

बसस्थानक परिसर रस्त्यावर इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची शाळा व अंगणवाडी आहे. याच रस्त्यावर परमेश्वर मंदिर, रेल्वे स्थानक, व अन्य शाळा कोलेज असून, विदर्भ - मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याने अन्य गावाला जाणार्या वाहनांची मोठी वर्दळ असते. शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींची तोबा गर्दी होते. या रस्त्याची रुंदी कमी असल्याने भरधाव वेगत येणाऱ्या -जाणार्या वाहनामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून, या ठिकाणच्या शाळेजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. परंतु या प्रमुख मागणीकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असून, केवळ स्वार्थ असलेल्या रस्ता कामाकडे जास्त लक्ष दिले जात आहे. परिणामी येथील कन्या शाळेजवळ अपघात होण्याची शक्यता बळावली असून, तत्काला शाळेसमोर दोन ठिकाणी गतिरोधक बसवून संभाव्य अपघात टाळावा, तसेच शाळेत ये - जा करणर्या मुलीना व वृद्ध बालकांना होणारा अडथळा दूर करावा. अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावरही उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे. यावर गजानन हरडपकर, राम सूर्यवंशी, गोविंद शिंदे, परमेश्वर सातव, विनोद आरेपल्लू, विलास वानखेडे, अनिल ढोणे, निळू  पवार, व्यंकटेश मोतेवार, जगदीश चलमेलवार, परमेश्वर जाधव, मधुकर चव्हाण, महेश अम्बीलगे, भास्कर चिंतावार, खंडू चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रतिक ठाकरे, रामराव देवसरकर, दिलीप डाके, किशन ढोणे, परसराम फुलके, आदीसह अनेक युवकांच्या स्वाक्षर्या आहेत.     

शनिवार, 27 दिसंबर 2014

तात्काळ उपाययोजना

पंचायत समितीचे ढिसाळ नियोजन
१७७ पैकी १७० गावातील बोर - विहिरी आटल्या
२०० फुटाची सवलत ३०० फुटापर्यंत करावी
ग्रामसेवक हे लबाड बोलून हात झटकतात
 

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना केल्या जातील व तालुक्यातील नागरिकांना कदापि पाणी टंचाई जणू देणार नाही असे आश्वासन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. ते हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात आयोजित पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी तहसीलदार शरद झाडके, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, पोलिस निरीक्षक श्री गिरी, प.स.सभापती आडेलाबाई हातमोडे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, माजी सभापती वामनराव वानखेडे, प.स.सदस्य पंडित रावते, बालाजी राठोड, पाणी पुअरवथ विभागाचे उपअभियंता भोजराज, स्वीय सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, रामभाऊ ठाकरे, विजय वळसे, चंद्रकला गुड्डेटवार, सिधुताई मेरगेवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियांता नीळकंठ, अभियंता गायकवाड आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीने उध्वलेल्या पाणी टंचाई कृती आढावा बैठकीचे दि.२७ शनिवारी पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अल्प पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील ५२ ग्राम पंचायतीतील १७७ वाडी - तांडे गावांपैकी १७० ग्रामीण भागातील गावात विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नोव्हेंबर मधेच कोरडीठाक पडल्याने पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विशेषतः नदी काठावरील गावातील नागरिकाना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करून भांडेभर पाणी आणावे लागत आहे. तसेच अनेक गावात राबवण्यात आलेल्या भारत निर्माण योजनेच्या कामात भ्रष्टाचार व अर्धवट राबविल्या गेल्या तर काही ठिकाणी तोकड्या प्रमाणात राबविल्याने अनेकांनी तक्रारी केल्या. तसेच अनेक ठिकाणी नळ योजनेचे प्रस्ताव मंजुरीसाठी जी.प.सदस्य टक्केवारी मागत असल्यामुळे योजना मंजूर होत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. 

एकघरी रमनवाडी ग्रामपंचायतीला ४८ लाख रुपयाची नळयोजना मंजूर झाली. मात्र सरसम जी.प.गटाचे जी.प.सदस्य हे टक्केवारी मागत असल्याने अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रा.प.सदस्य प्रकाश उदा जाधव यांनी बैठकीत सांगितल्याने टक्केवारीचा मुद्धा चांगलाच गाजला. एकंबा येथील नालायोजानेला पाणी असताना मोटार बंद असल्याने व तीन हात पंपाची दुरुस्ती केली गेल्या नसल्याने नागरिकांना पाणी टंचाई चा सामना कराव लागत असल्याचे पिटलेवाड यांनी सांगितले. 

तसेच हिमायतनगर येथील २.१८ लाखाची नळयोजना अपहाराच्या कारणाने रखडली असल्याची तक्रार देवूनही चौकशी होत नसल्याचा मुद्दा सरदार खान यांनी उपस्थित केला. त्यामुळे शहरातील बार्हाली तांडा, फुले नगर, रोयाल नगर, मुर्तुजा कॉलनी, जनता कॉलनी, नेहारी नगर यासह शहरातील अनेक वस्त्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या प्रकारांची चौकशी करून रखडलेले काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणी केली. या बाबतचे उत्तर देताना अक्षरश्या ग्रामसेवकाची भम्भेरी उडाली होती. तर पोटा येथील युवक पुलेवाड यांनी तर या अगोदरच्या काळात पाणी टंचाईचा अहवाल हा बंद खोलीत होत होता त्यामुळेच आम जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करून चालू असलेल्या मोटारी महावितरण कंपनीच्या बेजाबदार कर्मचार्यामुळे सुद्धा बंद पडून पाणी टंचाई उद्भवत असल्याचे सांगितले. 

सवना ज. येथील सरपंच गोपतवाड यांनी पाणी टंचाई बरोबर बोअरसाठी शासनाकडून देण्यात आलेली २०० फुटाची सवलत वाढवून ३०० फुटापर्यंत करावी अशी मागणी करून, त्यासाठीचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा असे सुचविले. कारण ठेकेदाराकडून यात केली जाणारी दिरंगाई, व बसविण्यात येणारे हलक्या कंपनीचे मोटार पमाप यामुळे दरवर्षी पाणी समस्येसाठी सरपंच व ग्रामसेवकांना हैराण व्हावे लागते असे सांगितले. त्यांच्या या सूचनेला उपस्थित सर्व सरपंच व प.स.साड्यांनी अनुमोदन दिले. तसेच येथील ग्राम पंचायत सदस्य मधुकर पंडित यांनी दलित वस्तीत घन पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करून मागील काळातील केलेल्या खर्चाचा तपशील सदर करावा अशी मागणी केली. यावेळी सरपंच यांनी शुद्ध पाणी मिळत नसल्याचे मान्य करून अडगळीत आलेल्या पाणी पुरवठ्याच्या टाकीचा मुद्दा मांडून नव्याने टाके बांधण्याची मागणी केली. 

तसेच तालुक्यातील सिबदरा येथील नळ योजनेचे काम अर्धवट असून, या विहिरीला भरपूर पाणी आहे, परंतु येथील काही राजकीय पुढारी या विहिरीचे पाणी स्वतःच्या शेतीला घेवून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करायला लावतात असा आरोप येथील युवक लाखां जयस्वाल यांनी केला. सिरपल्ली - शेलोडा, टाकाराळा, पिछोंडी, बोरगडी, पारवा बु., यासह अनेक ठिकाणच्या स्वजलधारा नळयोजना अर्धवट करून संबंधितानी यात अपहार केल्याने नागरिकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे. याबाबत अनेकदा संबंधित अभियंता यांना सूचना करूनही ते कामावर येत नाहीत असे म्हणत अनेकांनी पाणी पुरवठा अभियंता यांना धारेवर धरले होते. तर काहींनी संबंधीत ग्रामसेवक हे लबाड बोलून हात झटकण्याचे काम करीत आहेत असे सांगितले. त्यांच्या कडून मिळाले उत्तर व पंचायत समिती कार्यालयातील संभाव्य बोअर, हातपंप चालू - बंदचा अहवाल पाहता मोठ्या प्रमाणात तफावत दिसत असल्याने आ.आष्टीकर यांनी नाराजी व्यक्त करीत येथे सर्व मुर्खांचा बाजार भरला आहे, अश्या शब्दात अधिकार्यांना खडसावून कोणत्याही गावाला पाणी टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेवून तात्काळ पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मात्र तालुक्यातील हिमायतनगर, कामारी, सरसम जी.प.गटाचे तीनही सदस्य व काही प.स.सदस्य, हिमायतनगर येथील सरपंच, दाबदरीचे ग्रामसेवक भारती, घारापुर व सोनारीचे ग्रामसेवक, महावितरणचे अभियंते -कर्मचारी अनुपस्थित दिसून आले. यावरून निवडून दिलेल्या सदस्यांना सामान्य नागरिकांच्या महत्वाच्या पाणी टंचाईच्या समस्येचे काही देणे घेणे नाही असे उपस्थित चर्चा होत असल्याचे जाणवले. याप्रसंगी ग्रामसेवक, सरपंच, पत्रकार नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. 

पंचायत समितीचे ढिसाळ नियोजन 
-------------------------------------- 
पाणी टंचाई कृती आराखडा बैठकी दरम्यान उपस्थित सरपंचाना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था करण्यात आली नसल्याने पंचायत समिती गटविकास अधिकार्यांना उपस्थित सरपंचाचा रोष पत्करावा लागला. त्यामुळे काही वेळ बैठकीत गोंधळ निर्माण झाला. तेंव्हा खुद्द आमदार महोदयांनी उपस्थितांची अधिकारी -कर्मचार्यांच्या वतीने माफी मागून ढिसाळ नियोजनाबाबत खेद व्यक्त केला. त्यांनतर सदर बैठक सुरळीत व शांततेत संपन्न झाली.

खाती उघडण्यासाठी नागरिकांची लुट

एसबीआय बैंक अधिकार्याचा उर्मटपणा.. 
खाती उघडण्यासाठी नागरिकांची लुट

हिमायतनगर(वार्ताहर)प्रधानमंत्री जनधन योजनेत सहभागी होऊन खाते खोलाण्यासाठी बिन अधिकार्याकडून नागरिकांची आर्थिक लूर करण्यात येत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. या बाबत एसबीआय बैंक अधिकार्याचा उदासीनपणा यास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.

भारतीय स्टेट बैंक हिमायतनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महात्वाकांशी जनधन योजनेसाठी खाते खोलानार्या ग्राहकांची अक्षरश्या रीघ लागत आहेत. परंतु एसबीआय अधिकारी सदरचे खाते खोलाण्यास अनुत्सुक असून, ग्राहकांना थेट ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला देवून लुट करण्यास एक प्रकारे अभय देत आहेत. सदरचे खाते हे विनामूल्य झिरो बजेटवर खोलणे गरजेचे आहे. मात्र येथील अधिकार्याच्या मनमानीमुळे खाते उघडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकार्याकडून उर्मटपणाचे दर्शन दर्शन घडत बाहेरच खाते खोलण्याचा उपदेश केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन खाते खोलण्यासाठी खाजगी ऑनलाईन सेन्टरवर शंभर ते २०० रुपयाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे मोदी यांच्या योजनेतून खिश्यात काही पडेल अश्या आशेने खाते उघडण्यात येत असले तरी खाते काढताना नागरिकांचा खिसा खाली होत आहे. भारतीय स्टेट बैन्केच्या ग्राहक सेवा केंद्रात खाते उघडा असे सांगणार्या अधिकार्यांना मात्र किंबहुना याची जाणीव नसावी. भारतीय स्टेट बैन्केत विनामूल्य खाते उघडण्यासाठी ग्राहकांना सोई सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे असताना खाते काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना येथील शाखा व्यवस्थापककडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या असंख्य तक्रारी या पूर्वी वरिष्ठ  अधिकार्यांना यापूर्वी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याचा काहीही उपयोग होत नसून, वरिष्ठ अधिकारी हिमायतनगर शाखेतील उर्मट अधिकारी व कर्मचार्यांना अभय देत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. 

या प्रकारापासून तालुक्यातील नागरिक व ग्राहकान दिलास देण्यासठी शहरात स्टेट बैंक ऑफ हैद्राबाद शाखेची स्थापना करण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे.       

शुक्रवार, 26 दिसंबर 2014

अवैद्य धंदे

हिमायतनगर शहर परिसरातील अवैद्य धंदे हळू हळू ..पूर्वपदावर

हिमायतनगर(अनिल भोरे)तालुक्याचे  पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या कार्यकालात बंद करण्यात आलेले अवैद्य धंदे पूर्ववत चालू होताना दिसून येत आहेत. तालुक्यातील टेंभी, पवना, अंदेगाव, खडकी बा.,सरसम, इंदिरा नगर, सवाना, मंगरूळ आदी खेड्यापाड्यात देशी दारूचा दुचाकीवरून पुरवठा सुरु झाल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.

अवैद्य धंद्यात अग्रगण्य असलेली देशी दारू, अवैद्य वाहतूक, मटका, जुगार या धंद्यावर चाप बसवून महिला वर्गाना सुरक्षा देण्यात अनिलसिंह गौतम यांना पूर्णपणे यश आले होते. त्यांच्या काळात हिमायतनगर तालुका आणि परिसरात सर्वच अवैद्य धंदे वाल्यांनी आला गाशा गुंडाळला होता. आणि हीच गोष्ट अनेक धंदेवाल्यांना व गैरप्रकार करणार्यांना खटकली होती. गौतम यांच्या बदलीची अनेक दोन नंबर वाल्यांना आस लागलेली होती. अनेकदा अश्या अफवाही उठविण्यात आल्या होत्या परंतु काही केले तरी बदली होत नव्हती. परंतु अचानक आलेल्या संकटामुळे व त्यात चटणी मिट टाकणार्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांची येथून नांदेड नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. 

खुले आम घरपोच मिळणारी देशी दारू, उघड्यावर घेतल्या जाणारा मटका, खचाखच प्रवाशी भरणाऱ्या अवैद्य टैक्सी, रिक्षा आणि बेशिस्त वाहतुकीला लावलेला लगाम गौतम यांच्या बदलीने पुन्हा डोके वर काढू लागल्याने अनेक नागरिक पोलिस निरीक्षक श्री गौतम यांची आठवण काढत आहेत. त्यांच्या पावलावर पावूल ठेवत नव्याने पदभार सांभाळलेले पोलिस निरीक्षक श्री गिरी यांनी अवैद्य धंदेवाल्यांना चाप लावत घरपोच मिळणारी देशी दारू, दिवसा ढवळ्या दुचाकीवरून खुलेआम खेळला जाणारा मटका, शहरातील बेशिस्त वाहतूक व अवैद्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे अशी रास्त मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.    

गुरुवार, 25 दिसंबर 2014

आरोग्य केंद्राचे काम निकृष्ठ

सिरंजनी येथील आरोग्य केंद्राच्या सुरक्षा भिंत व सिमेंट बेडचे काम निकृष्ठ  

 हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सिरंजनी येथील आरोग्य केंद्राच्या सुरक्षा भिंत व सिमेंट बेडचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असून, तेही अर्धवट ठेवून गुत्तेदाराने काम बंद केल्याने केंद्रातील साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामाची चौकशी वरिष्ठांनी करूनच देयके अदा करावीत अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

विकास्पासून कोसो दूर असलेले हिमायतनगर जिल्हा परिषदेतील सिरंजनी गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी येथे आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. परंतु जनतेच्या आरोग्याची देव करणाऱ्या केंद्राचीच दुरवस्था झाल्याने याची दुरुस्तीच्या माध्यमातून  सुरक्षा भिंत व सिमेंट बेडच्या कामासाठी जिल्हा परिषद उत्तर विभागाअंतर्गत ४ लाखाचा निधी मंजूर झाला होता. सदरचे काम अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने करून घेण्याची जिम्मेदारी या भागचे जिल्हा परिषद सदस्य शे.रेहाना बी शे.चंद यांच्याकडे होते. परंतु सदरचे काम करणाऱ्या गुत्तेदाराने शाखा अभियंता मुधोळकर यांच्याशी संगनमत करून लाखोचे काम हजारोत उरकण्याच्या दृष्ठीने नाल्याची माती मिश्रीत रेती, हलक्या दर्जाचे सिमेंट व निकृष्ठ दर्जाचे पाईप द्वारे बनविण्यात आलेले सुरक्षा गेट बसविले आहे. सदरचे काम होताना गावातील काही जागरूक नागरिकांनी या कामाबाबत संबंधित अभियंता यांना सूचना केली होती. मात्र स्वार्थापोटी डोळे असून आंधळ्याची भूमिका सकारात अभियंता मुधोळकर यांनी निकृष्ठ कामाला अभय देत अल्पावधीत काम उरकून घेतले आहे. तसेच या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचे व बेडचे काम अर्धवट ठेवून काम बंद केले आहे. या बाबतही ग्रामस्थांनी जी.प.सदस्य व अभियंत्यास सूचना केली असता, निधी संपला आहे, पुन्हा मंजूर होताच काम पूर्ण करण्यात येईल असे सांगून हात वर केले आहे. 

निकृष्ठ साहित्याच्या वापराने झालेले काम हे अल्पावधीतच उखडून व पडून जाण्याची शक्यता बळावली असून, शासनाचा निधी गिळंकृत करण्याच्या उद्देशाने शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत काम पूर्ण केल्याचा आरोप येथील नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केला आहे. या प्रकाराकडे अधीक्षक अभियंता धारासूरकर यांनी लक्ष देवून सदर निकृष्ठ कामची चौकशी करून हे काम दुसर्यांद दर्जेदार पद्धतीने करून घेवून गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे. याची चौकशी न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.

सुरक्षा भिंतीचे काम करताना हि भिंत थेट अंगणवाडी व आरोग्य कंद्र समोर बांधण्यात आली असून, अंगणवाडीच्या बाजूने गेट लावले नसल्याने आरोग्य केंद्रात जाण्यासाठी मोकळी वाट आहे. यातून गुरे -ढोरे आत येत असून, कर्मचारी जर सुट्टीवर गेले तर रात्रीला चोरीची घटना होण्याची शक्यता बळावली आहे. खरे पाहता सुरक्षा भिंतीत अंगणवाडी व रुग्णालय यातील आडवी भिंत बांधून पूर्ण करणे गरजेचे होते असे ग्रामस्थांचे म्हनणे आहे.

या बाबत अभियंता मुधोळकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, सदरचे काम हे मंजूर निधी अनुसार पूर्ण झाले असून, चांगले झाल्याचे म्हंटले आहे.    

   

बुधवार, 24 दिसंबर 2014

थंडीचा कडाका

थंडीचा कडाका कायम असल्याने मनुष्यासह प्राणी मात्र हैराण

हिमायतनगर(अनिल मादसवार)गत आठ दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्याने मनुष्यासह प्राणी मात्र हैराण झाले आहेत. परिणामी सकाळच्या सुर्यकिरणाचा उबदारपणा घेण्यासाठी वन्य प्राणी मोकळय जागेवर गर्दी करताना तर मनुष्य शेकोट्यावर भर देत असल्याचे दिसत आहे.

हल्ली हिमायतनगर थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सध्याचे तापमान १६ अंशावर असून, सायंकाळी पाच वाजेपासूनच हुडहुडी भरायला सुरुवात होऊ लागली असून, जिकडे - तिकडे मनुष्य शेकोट्यावर भर देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेकजण उबदार वस्त्रांचा पेहराव करून घराच्या बाहेर पडत आहेत. गरम आणि उबदार कपड्यांचे आच्छादन घालून फिरणारा मनुष्यप्राणी थंडीपासून बचाव करीत आहे. परंतु रात्रंदिवस जंगलात आणि उघड्यावर फिरणार प्राणी हरिणाचे कलप, वानरांची टोळी, मोरांचे थवे, चिमण्यांचे थवे, सकाळी सह वाजल्यापासून सूर्याच्या कोवळ्या किरणासाठी उघड्यावर रानावनात गर्दी करताना दिसून येत आहेत. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सूर्याच्या उबदार किरणांचा मोह वन्य प्रण्यानाही आवरता येत नसल्याने निसर्गाने प्रदान केलेल्या उन्हाचा आनंद घेताना अनेक वन्यप्राणी फेरफटका मारताना दिसून येत आहेत. गत १५ दिवसापासून थंडीत वाढ होत असून, याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याने शेतकर्यांना उत्पादन वाढीची अशा वाढली आहे. परंतु जमिनीतील पाणी पटली खोल जात असल्याने चिंतेत भर पडली हे विशेष... 

ग्रामपंचायत निवडणुक

हिमायतनगर ग्रामपंचायत निवडणुकीत त्रिशंकू 
सवना - महादापूर काँग्रेस, वाघी - एकघरी शिवसेना, 
चिंचोर्डी - दगडवाडी राष्ट्रवादीकडे
 
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील पाच गावच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकाचे निकाल  आज जाहीर झाले असून, १० जागा बिनविरोध, ४ रिक्त, तर २३ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शरद झाडके यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला आहे. यात सवना ज. येथे काँग्रेस तर वाघी येथील ग्रामपंचायतीवर   शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीसाठी मंगळवार दि.23 रोजी मतदान झाल्यानंतर दुसर्या दिवशी बुधवारी दि.२४ रोजी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी चोख पोलिस बंदोबस्तात पार पडली. यातून समोर आलेला निकाल पुढील प्रमाणे आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी - दगडवाडी मध्ये ७ पैकी वार्ड क्र.३ मधील परसराम रानबा ढाले, बेबीताई रामदास भडंगे, गोदावरी हन्मंतराव भडंगे व वार्ड क्र. २ मधील दत्त यादवराव टारपे हे बिनविरोध निवडून आले. तर वार्ड १ आणि २ मधील एकूण ३ जगासाठी मतदान झाले. यात उभे असलेल्या उमेद्वारातून जनमतांनी दिलेल्या निकालाने संदीप शंकरराव झळके, पंचफुलाबाई विठ्ठल देशमुखे, पंचफुलाबाई विठ्ठल देशमुखे, या विजयी झाल्या आहेत. एकच महिला उमेदवार हि दोन वार्डातून निवडून आल्याने एका जागेचा राजीनामा त्यांना आगामी सात दिवसात द्यावा लागणार आहे. परिणामी चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीची एका जागा रिक्त राहणार आहे. सध्या तरी हि ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

एकघरी-रमनवाडीत ७ जागा पैकी ६ जागेवर सत्यव्रत्त महादू ढोले, द्वारकाबाई माधव वाकोडे, देविदास माधवराव मेंडके, लताबाई दिलीप आडे, सुशीला शाहीर शिरडे, धमाबाई रतन जाधव या बिनविरोध निवडून आल्या असून, वार्ड क्र.३ मधील एका जागेसाठी रमनवाडीचे उमेदवार आमने-सामने असल्याने चुरशीचे मतदान झाले होते. यातून प्रतिस्पर्धी उमेदवारास पिछाडीवर टाकून प्रकाश उदा जाधव यांनी विजय मिळविला आहे. यात सर्वाधिक उमेदवार हे शिवसेनेचे असल्याने पुन्हा हि ग्रामपंचायत शिवसेनेकडेच राहणार आहे.

सवना ज.ग्रामपंचायतीत ९ जागा पैकी वार्ड क्र.१ मधील मधुकर पंडित यांची बिनविरोध निवड झाली आहे. वार्ड क्रमांक २ व वार्ड क्र. ३ मध्ये जात वैधता प्रमाणपत्राअभावी एस.सी. महिला २ जागा व एसटी महिला १ जागा रिक्त आहेत. तर पाच जागेसाठी निवडणूक झाली होती. यात पुढील उमेदवारांच्या चारी मुंड्या चित्त करून कलावतीबाई परमेश्वर गोपतवाड, प्रणीता अरविंद आहिरवाड, माधव जळबाजी बिरकलवाड, परमेश्वर संभाजी सांगणवाड, पुष्पाताई लक्ष्मण गायकवाड यांनी विजय मिळविला आहे. यात गोपतवाड गटाचा विजय झाल्याने येथील ग्रामपंचायतीत पुन्हा काँग्रेस चे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. 

महादापूर ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न झाल्यांनतर चुरशीच्या लढतीत मारोती जळबा  देशमुखे, सुनिता यादवराव बुरकुले, गोरखनाथ देवराव भुसारे, कांताबाई एकनाथ बुरकुले, भीमराव सुभानराव बनसोडे, मंजुळाबाई किशन डवरे, सुनिता यादवराव बुरकुले, या निवडून आल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा एका अनुसूचित जमातीतील महिला दोन जगावर निवडून आल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची एक जागा रिक्त राहणार असून, ये ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.    

वाघी ग्रामपंचायतीची निवडणूक सात जागेसाठी अतीतटीची झाल्यांनतर मतमोजणीत नागोराव संभाजी देवसरकर, जोत्सना संतोष माने, रमाबाई प्रकाश गायकवाड, नामदेव रामराव खांडरे, गणपत नागोराव बाकोटकर, सागरबाई पुंजाराम बासरकर हे सहा उमेदवार विजयी झाले असून, या ठिकाणची नामाप्र (स्त्री)राखीव जागा रिक्त आहे. या ठिकाणी वार्ड क्र.३ मधील दोन्ही प्रतिस्पधी  उमेदवारांना समान मते मिळाली होती. त्यामुळे दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनून एका चीमुकलीच्या हाती काढण्यात आली यात सागरबाई पुंजाराम बासरकर हि महिला उमेदवार विजयी ठरली आहे. तसेच याचा ठिकाणच्या मतदान यंत्रात तब्बल २० मते हि नोटाला पडल्याचे मात्मोजानीतून दिसून आहे हे विशेष आहे. या एका उमेदवारामुळे येथील ग्रामपंचायत हि आता शिवसेनच्या ताब्यात आली असून, विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करून परमेश्वर मंदिरात जल्लोष साजरा केला आहे.
      
१० जागा बिनविरोध...सहा रिक्त जागेसाठी पोट निवडणुका होणार..!
------------------------------------------------
चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीच्या ३ तर एकघरी - रमनवाडी मधील ६, आणि सवना (ज.) येथील १ जागा बिनविरोध निवडण्यात आली होती. महादापूर ग्रामपंचायतीत दोन जागेवर एक महिला व चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीच्या दोन जागेवर एक महिला निवडून आल्याने येथील एक एक अश्या दोन जागा रिकामी होणार आहे. तसेच सवना ज. येथील तीन रिक्त व वाघी येथील एक रिक्त अश्या सहा जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. 

सोमवार, 22 दिसंबर 2014

रस्त्याचे काम रखडल्याने

सव्वा कोटीच्या हिमायतनगर -उमरखेड रस्त्याचे काम रखडल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त
 
हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील आठ महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या सव्वा कोटीच्या रस्त्याचे काम गत सहा महिन्यापासून रखडले असून, रस्त्यावरील गिट्टी उघडी पडल्याने पादचारी भक्तगन व वाहन धारक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधितानी तातडीने लक्ष देवून काम मार्गी लावावे अशी मागणी जोर धरत आहे.  

स्वातंत्र्याच्या साठीनंतर तालुक्यातील घारपुर - हिमायतनगर रस्ता विकासाच्या प्रतीक्षेत होता. हा रस्ता व्हावा म्हणून घारपुर, दिघी, टेंभूर्णी येथील नागरिकांनी उपोषण, आंदोलने काळी. तेंव्हा कुठे माजी आमदार माधव पाटील यांनी यासाठी १ कोटी २० लाखाचा निधी मंजूर करून आणला. त्यांच्याच हस्ते एप्रिल महिन्यात या रस्त्याचे नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊन उमरखेड, यवतमाळ, अकोला, मध्य मार्ग सुरु होऊन दालन वळणात वाढ होऊन हिमायतनगर शहराच्या बाजारपेठेला महत्व प्राप्त होईल असे वाटले होते. परंतु सदर रस्त्याचे काम हे केवळ दीड महिने मजबुतीकरण करे पर्यंत सुरु होते. त्यानंतर पावसाळा  आणि लोकसभा - विधानसभा निवडणुका लागल्या. तेंव्हापासून सव्वा कोटीच्या रस्त्याचे काम रक्जाडले आहे. निवडणुका संपून दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदाराने या कडे लक्ष दिले नाही. परिणामी रस्त्यावरील मजबुतीकरणात वापरण्यात आलेली गिट्टी पूर्णतः उखडून वर आली आहे. उखडलेल्या गिट्टीचा रस्ता पार करताना वाहनधारक, बैलगाडी हाकणारे शेतकरी, मजूरदार व याचा रस्त्यावर असलेल्या वरद विनायक, कनकेश्वर, शनिदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताच्या नाके नऊ येत आहेत. वाहन चालविताना रस्त्यावरील गिट्टी उडून लागणे, वाहने स्लीप होणे, तोल जावून पडणे, दुचाकी पंक्चर होणे, अश्या छोट्या मोठ्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने जाणारे भक्त, शेतकरी व नागरिकावर बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदाराच्या नावाने बोटे मोडण्याची वेळ आली आहे. 

खरे पाहता हा रस्ता अकोला- निर्मल मध्य मार्ग आहे, याचे काम पूर्ण होतच विदर्भ - तेलंगाना आवक - जावक व दालन वाल्नास्ठी कमी खर्चातला व सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे हिमायतनगर शहराच्या बाजारपेठेला सुद्धा विशेष महत्व प्राप्त होणार आहे. अश्या महत्वपूर्ण रस्त्याकडे विद्यमान खा.राजीव सातव व आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष देवून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना संबंधित विभागास द्यावात. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून विदर्भ - मराठवाडा -तेलंगणाची एकसूत्री नाळ जोडावी अशी मागणी विकास प्रेमी नागरीकातून केली जात आहे.      


रविवार, 21 दिसंबर 2014

पूरस्काराने सन्मानित

उल्लेखनीय कार्य करणार्यांना पूरस्काराने सन्मानित करण्याजोगे कार्यक्रम राबवावे - गौतमी कांबळे 


हिमायतनगर(वार्ताहर)विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा पुरस्काराने सन्मान करण्याचे कौतुकास्पद काम भवरे कुटुंबियांकडून केले गेले हि बाब अभिनंदनीय आहे. ज्या व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान झाला त्याना नव्याने कार्य करण्याची उर्जा मिळते म्हणून समाजात चांगले काम करणार्यांना विविध संस्था व शासनाने पूरस्काराने सन्मानित करण्याजोगे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माहूरच्या नगराध्यक्ष कु.गौतमी कांबळे यांनी व्यक्त केले. त्या हिमायतनगर येथे स्मृतिशेष गुरुवर्य एम.पी.भवरे बहु उद्देशीय सेवाभावी संस्था, सा.वारसदार व बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शाहीर व कलावंतांच्या मेळाव्यात गुरुवर्य एम.पी.भवरे (कामारीकर) स्मृती पुरस्काराचे वितरण सोहळ्या प्रसंगी बोलत होत्या. 

सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर मंदिर संस्थांचे जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जी.प.सदस्य रमेश सरोदे, प.स.उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, गटशिक्षण अधिकारी एस.एस.सुरजुसे, एम.एम.पांचाल, बी,जी.कावळे, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष शंकर तमनबोइनवाड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी सभापती माणिक लोहगावे, नायगावचे माधव मामा कोकुरले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, प्रीतम जोंधळे, साहेबराव नरवाडे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्तेचे विजय नरवाडे, हिमायतनगर पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष कानबा पोपलवार, आदींसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी कु.गौतमी कांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम शाहीर चंद्रकांत धोटे यांच्या स्वागत गीतासह नृत्य दिग्दर्शक प्रा.गणेश वानसागर यांच्या नटरंग नृत्याने कार्यक्रमास रंगत आली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार सुमनबाई मारोतीराव भवरे, संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, सौ.उज्ज्वला भवरे, दिलीप कावळे, दिपाली कावळे, स्वागताध्यक्ष बालाजी राठोड, निमंत्रक डॉ.मनोज राउत, आयोजक लक्ष्मण भवरे, कु.दिपाली बोंडलेवाड यांच्या हस्ते हास्य सम्राट शीलवंत वाढावे, वनाधिकारी के.डी.देशमुख, मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर, डॉ.पी.बी.नामवाड, शैलेंद्र वडजकर, नागराज कांबळे, सौ.महादेवी मठपती यांना गुरुवर्य एम.पी.भवरे (कामारीकर) स्मृती पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले. तर शाहीर व्यंकट बेटकबिलोलीकर, प्रा.गणेश वनसागर, जगन शेळके, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, आकाशवाणी कलावंत दिलीप वंजारे, शाहीर बाबुराव गाडेकर, शाहीर मोतीराम कांबळे, वामनदादाकार अशोक एडके, सचिन कांबळे, शाहीर रमेश नार्लेवाड, शाहीर बळीराम जाधव, यांना विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना कु.कांबळे म्हणाल्या कि, ग्रामीण भागात विविध प्रकारचे लोककलावंत वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या कलेला वाव मिळत नाही हि खेदाची बाब असून, या कलावंताना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन असे आश्वासन उपस्थितांना बोलताना दिले. यावेळी उपस्थित कलावंताना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील नायेगाव, उमरी, भोकर, किनवट, माहूर, कंधार, हदगाव, आदी तालुकायासह जिल्हाभरातील कलावंत, शाहीर, पत्रकार व हिमायतनगर येथील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशवी करण्यासाठी जगन्नाथ नरवाडे, दिलीप भवरे, विजयेंद्र सरपे, शाहीर सुभाष गुंडेकर, शे.खायुम, गणेश राउत, पाशा, खातीब, बापूराव कदम, यशवंत थोरात, किरण वाघमारे, प्रल्हाद पवार, दाऊ सूर्यवंशी, संघरत्न भवरे, राहुल लोने, दत्ता गडलवार, अशोक आळने, शाहीर नरेंद्र दोराटे, धम्मा कांबळे, सुर्यकांत खिराडे, आदींनी परिश्रम  घेतले.

शनिवार, 20 दिसंबर 2014

शेतकर्याची आत्महत्या

रेल्वेसमोर उडी घेवून जीवनयात्रा संपविली
घटनेमुळे बोरगाव ता. गावावर शोककळा
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच

हिमायतनगर(अनिल मादसवार)जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, काहीही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. सततची नापिकी व दुबार पेरणीला कंटाळून एका ५५ वर्षीय शेतकर्याने रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.२० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारवा खु.शिवारात घडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे आता सरकारसमोर एक मोठे आव्हान आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, या वर्षीच्या खरीप हंगामात अल्प प्रमाणतात झालेल्या पावसाने कोरडवाहू जमिनीत पेरलेली बियाणे उगवली नाही. तसेच दुबार पेरणी करूनही उगवलेली पिके तग धरली नसल्याने शेती पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. गत दोन वर्षापासून अशीच परिस्थिती उद्भवल्याने हिमायतनगर तालुक्यातील बोरगाव ता. येथील मयत शेतकरी अर्जुन रामा मुनेश्वर वय ५५ वर्ष हे मागील आठ दिवसापासून चिंताग्रस्त झाले होते. आगामी काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला बाळाचे शिक्षण कसे करावे या विवंचनेत दि.२० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदेड हून आदिलाबाद कडे जाणार्या इंटरसिटी एक्सप्रेस समोर उडी घेवून पारवा खु शिवारात जीवनयात्रा संपविली आहे. अशी फिर्याद मयताचे पुतणे किशन तुकाराम मुनेश्वर यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकात दिली असून, सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी आत्महत्येची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार असून, एक मुलगी लग्नाची असल्याची चित सुद्धा त्यांना सतावत होती असे उपस्थित नागरिकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

अल्पभूधारक शेतकर्याने अश्या परिस्थितीत मृत्युला कवटाळल्याने परिसरातील शेतकरी व नागरीकातून हळहळ व्यक्त होत असून, मयताच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी प्रशासनाने मदतीचा हातभार लावावा अशी मागणी होत आहे.

नदी व कालव्यात पाणी

२५ डिसेंबर पर्यंत नदी व कालव्यात पाणी येणार... नागेश पाटील आष्टीकर

हिमायतनगर(वार्ताहर)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत व उपकालव्यात येत्या २५ डिसेंबर पर्यंत पाणी येणार असून, जनावरांना व रब्बीच्या ओइकन त्याचा फायदा होईल. असे उद्गार आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी काढले ते, तालुक्यातील विरसनी, दिघी, वाघी येथील ग्रामस्थ व शेतकर्यांना बोलताना काढले. 

सध्या हिमायतनगर सह तालुक्यातील अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी कोरडी पडल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच पाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतकर्यांना व नदीकाठावरील गावकर्यांना पाणी टंचाईच्या झाला सोसाव्या  लागत आहेत. तसेच उर्ध्व पैनगंगा कालव्यात सोडलेलं पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत पोन्चत नसल्याने शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात आली आहेत. हि बाब लक्षात घेता मागील ५२ दिवसापूर्वी पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे व उजव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोन्चवे अशी मागणी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे केली होती. तर कालव्याच्या कामावर कार्यरत अधिकार्यांना तश्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून जिल्हाधिकार्यांनी या बाबतची गंभीरतेने दाखल घेवून संबंधित विभागांना सुचित केल्याने इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी येत्या २५ डिसेंबर पर्यंत कालव्याच्या टोकापर्यंत व पैनगंगा नदीत येईल अशी माहिती आ.नागेश पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. तसेच यावेळी काहींनी कालव्याचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ ध्वजारोहनाला येतात, त्यामुळे आम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो असे सांगितले. यावरून लगेच येथे उपस्थित अधिकार्यांना खडसावत आजवर झाले ते झाले यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही. असे सुचित करून पडझड झालेल्या कालव्याची दुरुस्ती व वाढलेली झाडे झुडपे तोडून आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्येवर आताच उपाय करा असे सुचित केले. यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे, यावर मात करण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आगामी काळातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संगीतल्याने ग्रामस्थांना विकास व गरजू समस्यांचा निपटारा होईल अशी अशा वाढली आहे. 

बुधवार, 17 दिसंबर 2014

पळसपूर येथील मजुरांचे उपोषणहिमायतनगर(वार्ताहर)पळसपूर येथील मजुरांनी समाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानी कारभाराला वैतागून मजुरीची मागणी व रोपवाटीकेतील फेकून दिलेल्या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितावर पोलिस कार्यवाही करावी अशी मागणी करत दि.१५ पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. बुधवारी यास तीन दिवस झाले असून, जोपर्यंत मजुरीची रक्कम नगद स्वरूप दिली जात नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. असे मजुरांनी ठणकावून सांगत चौकशीच्या आश्वासनांचे पत्र घेण्यास नकार दिल्याने सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यांची धडधडी वाढली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, पळसपूर येथील १४ मजुरांनी सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत पळसपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डे व रोपे लावण्याचा कार्यक्रमात सहभाग घेवून काम केले. परंतु अद्याप मजुरांना मजुरीची रक्कम मिळाली नाही. घाम गाळणाऱ्या मजुरांना हक्काच्या मजुरीसाठी आज देवू ..उद्या देवू अशी बनवाबनवी करीत संबंधितानी वर्ष लोटले. अनेक अधिकारी बदलले, मात्र मजुरी काही मिळाली नाही. यासाठी नव्याने आलेल्या अधिकाऱ्यासह देखरेख करणार्यांना मजुरीची मागणी केली. एवढेच नव्हे तर गावात तंटा मुक्त समितीत हे प्रकरण ठेवण्यात आले होते. बैठकीला मजूर उपस्थित होते, परंतु या प्रकरणात बोगस मजुरांच्या नावावर लाखो रुपयाचे बिले पोस्ट अधिकार्यास हाताशी धरून उचलणाऱ्या एकाहाही अधिकारी, रोजगार सेवक अथवा कोम्पूटर ऑपरेटर तथा दोन दलाल यापैकी एकही जन उपस्थित झाला नाही. १५ दिवस वाट पाहून मजुरांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना या बाबतचे पत्र देवून चौकशीची मागणी केली. मात्र चौकशी तर केलीच नाही उलट कालेबरे केलेल्या मास्तर मध्ये झालेला घोळ मिटविण्याचा आटोकाट पर्यटन व्हाईटनराच्या माध्यमातून केला गेला. तर प्रत्यक्ष एका एका मजुरास भेटून तुझे पैसे देतो असे सांगून मजुरांचा गट फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. हि बाब लक्षात आल्याने येथील मजूर गणेश वानखेडे हे आमरण उपोषण तर चांदराव बोंबीलवार, पुंजाराम वानखेडे, बाबुराव भावराव वानखेडे, शिवाजी वानखेडे, मुकिंद वाडेकर, बाबुराव परमेश्वर वानखेडे, लक्ष्मण साहेबराव वानखेडे, भुजंगराव बोंबीलवार, संजय कोमलवाड, सुभाष कांबळे, दयानंद वानखेडे, सरस्वतीबाई शिवाजी वानखेडे, केवळाबाई घोडगे, यांच्यासह अनेक मजुरांनी साखळी उपोषणात सहभाग घेवून दि.१५ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

सदरील कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, लावण्यात आलेली रोपे वळून गेल्याने व न लावता शेकडी रोपे फेकून दिल्याने सामाजिक वनीकरण विभागाने शासनाच्या या उपक्रमाला केराची टोपली दाखविली आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आग्रह धरून उपोषणास बसलेल्या मजुरांना परस्पर येथून पळविण्यासाठी तहसीलदार यांनी पोस्टाच्या माध्यमातून पत्र पाठवून आमची चौकशी होईपर्यंत उपोषणाला बसू नका असे सांगत अकलेचे तारे तोडल्याचा आरोप मजुरांनी पत्रकारांची बोलताना केला आहे. एवढेच नव्हे तर तीन दिवसापासून तहसीलदार हे आमच्या समोरून गेले, परंतु आम्हाला भेटून चौकशी केली नाही अशी नाराजी व्यक्त केली. उलट बुधवारी एका कर्मचार्याच्या हस्ते २१ दिवसात चौकशी करतो तुम्ही उपोषण सोडा असे पत्र पाठवून सांगितले. त्यामुळे माजुरीपासून वंचित असलेल्या उपोषण कर्त्यांनी हे पत्र घेण्यास नकार देवून नगदी स्वरुपात मजुरीची रक्कम उपविभागीय अधिकारी घाडगे अथवा तहसीलदार झाडके यांनी स्वता: उपोषणस्थळी भेटून समस्या सोडवावी. अन्यथा आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्ही घरी उपाशीच आहोत..येथेसुद्धा उपाशीपोटी राहू असे त्या कर्मचार्यास ठणकावून सांगितल्याने सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची धडधडी वाढली आहे. 

सोमवार, 15 दिसंबर 2014

थंडीत मजुरांचे उपोषण

कडाक्याच्या थंडीत मजुरांचे उपोषण सुरु
मजुरांचे पैसे परस्पर हडपनार्यांची चौकशी, पोलिस कार्यवाही करा हिमायतनगर(वार्ताहर)महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पळसपूर ते हिमायतनगर रस्त्यावर गतवर्षीपासून दुतर्फा झाडे लावण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार करून परस्पर मजुरांचे पैसे हडप केल्या प्रकारांच्या चौकशी मागणी करूनही कार्यवाही गुलदस्त्यात ठेवून मास्तर मध्ये सुधारणा करत प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप करीत येथील मजुरांनी कडाक्याच्या थंडीत दि.१५ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. 

सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डे खोडून रोपे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. परंतु सदरील कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, खोदलेल्या अर्ध्या खड्डया मध्ये रोपेच लावले नसल्याने लाखो रुपये खर्च करून रोपवाटिकेत वाढविलेले रोपटे फेकून देण्याचा पराक्रम सामाजिक वनीकरण विभागाने करून लाखो रुपयाचे कामे केल्याचे दाखवून शासनाच्या निधीची पुरती वाट लावली असल्याचे मजुरांनी निवेदनात म्हंटले आहे.

कामावर मजुरी करणारे खरे मजुरांना गत वर्षभरापासून मजुरीच्या प्रतीक्षेत ठेवून बनावट मजुरांना मात्र घरपोच मजुरीची रक्कम दिल्या आहेत. बोगस मजुरांच्या नावावर लाखो रुपयाचे बिले पोस्टाच्या अधिकार्यास हाताशी धरून एका रोजंदारीवर काम करणाऱ्या ढोणे नामक व्यक्तीने केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने स्वतःच्या घरी ढिगाशी मजुरांच्या नावाचे खाते ठेवले असून, मजुरांचे पैसे परस्पर उचल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. यात सामाजिक वनीकरण अधिकारी लागवड अधिकारी, रोजगार सेवक, यांनी संगनमताने खर्या मजुरांना मजुरीपासून वंचित ठेवले असल्याने याची चौकशीची मागणी मागील आठ दिवसापूर्वी केली होती. परंतु याबाबत कोणतीही चौकशी झाली नसल्याने वंचित मजुरांनी दि.१५ पासून तहसील कार्यालयसमोर सायंकाळी ४ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरु केले आहे. यात गणेश वानखेडे, चांदराव बोंबीलवार, पुंजाराम वानखेडे, बाबुराव भावराव वानखेडे, शिवाजी वानखेडे, मुकिंद वाडेकर, बाबुराव परमेश्वर वानखेडे, लक्ष्मण साहेबराव वानखेडे, भुजंगराव बोंबीलवार, संजय कोमलवाड, सुभाष कांबळे, दयानंद वानखेडे, सरस्वतीबाई शिवाजी वानखेडे, केवळाबाई घोडगे, यांच्यासह अनेक मजुरांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. 

रविवार, 14 दिसंबर 2014

आदर्शग्राम

हिमायतनगर(अनिल मादसवार)पंतप्रधान यांच्या उपक्रमाने विकासापासून दूर असलेल्या गाव आदर्श बनविले जाणार आहे. त्यासाठी तुमच्या वाळकेवाडी गावची निवड केली असून, गाव दत्तक घेतले म्हणून आपण शांत बसता कामा नये. कारण तुमचे गाव हे कोणी अधिकारी येवून आदर्श बनविणार नाहीत यासाठी आपला लोकसहभाग आवश्यक आहे. असे मत खा.राजीव सातव यांनी व्यक्त केले. ते वाळकेवाडी या दत्तक गावाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या प्रथम ग्रामसभेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर माजी आ.माधवराव पाटील, विजय खडसे, गंगाधर चाभारेकर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु.ए.कोमवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राठोड, पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड, नरेगाचे टोम्पे, पाणी पुरवठ्याचे डावखरे, तहसीलदार शरद झाडके आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रथम संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर येथील एका शिक्षकाने बनविलेले रिमोट वरील मशाल खा.सातव यांच्या हस्ते पेटविल्या गेली. मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर पुढे बोलताना ते म्हणाले कि, आपले गाव स्वच्छ - सुंदर व निरोगी ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपल्या घरासह गावची स्वच्छता करण्याकडे सर्वांनी एकजुटीने लक्ष द्यायला हवे. तसेच व;एके वाडी हे गाव दत्तक घेतले म्हणजे सर्व काही याच ठिकाणी होईल असे नाही. या गावाबरोबर आजू- बाजूच्या परिसरातील गावाला याचा फायदा झाला पाहिजे. तेंव्हा आगामी काळात आपले व आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित व निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी लोकसहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षीय भाषणात माजी आ.माधवराव जवळगावकर म्हणाले कि, गावातील सर्व नागरिकांनी मिळून सामुहिक रित्या आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावेत. सन २०१६ नंतर नव्याने निवडण्यात येणाऱ्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या गावाच्या विकासाच्या पाहणीसाठी आदर्श गाव म्हणून सर्व गावकरी वाळकेवाडी या गावाकडे पाहतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या गावाची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३८६ असून, १६५८ महिला, १७२८ पुरुष असून, येथे एकूण ६३४ कुटुंब वास्तव्य करतात. स्वच्छ मिशन भारत योजनेनुसार हे गाव हगणदारी मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. आदर्श गाव संकल्पनेनुसार या गावात पाणी पुरवठा नळ योजना, पाणलोट क्षेत्रांतर्गत कामे, त्याचबरोबर पाझर तलाव, शेततळे, बंधारे, रोजगार हमी योजनेनुसार पाणदन व शेत रस्त्यांचे मजबुतीकरण, गावातील अंतर्गत रस्ते, सिमेंट रस्त्याने जोडणे, गावाचे सुशोभिकरण व पर्यावरणासाठी रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे, दर्जेदार शिक्षणासाठी विविध शालेय योजना राबविणे, दर आठवड्याला गावात आरोग्य शिबीर घेणे, गावात पक्के घर बांधणेसाठी बँकेकडून गृहकर्ज योजना आणि गावातील संपूर्ण कुटूंबाचा विमा उतरविणे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे, शेतक-यांना विविध शेती विषयक प्रशिक्षण राबविणे. गावात शुध्द पाणी पुरवठा योजना आदि विकास कामे या योजनेतून करण्यात येणार आहे. यासाठी गावातील नागरिकांचा यात आर्थिक व स्रामादानातून लोकसहभाग मिळणे गरजेचे आहे. त्यातून प्रथम व्यसनमुक्त, पिण्याचे स्वच्छ पाणी, सर्वांनी शौच्चालय बांधावे, तरच गाव स्वच्छ होईल असे पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणात श्री गोरेगावकर म्हणाले कि, गावातील पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलभुत सुविधेकडे लक्ष द्यावे. गावात नुसती शाळा चांगली राहून फायदा नाही, तर गुणवत्तेचा विकास झाला पाहिजे, हेच आदर्श ग्रामयोजनेचे ध्येय आहे. गाव विकासाचा आराखडा मार्च अखेर पर्यंत पूर्ण होईल, तत्पूर्वी गावकर्यांनी स्वच्छतेला महत्व देवून स्राम्दानातून गाव संपूर्ण स्वच्छ करून घाण पाणी, नळाच्या तोट्या नीटनेटक्या कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता ल.पा. श्री पैलवाड, उपजिल्हाधिकारी कैलास शेळके, जी.प.सदस्य सुभाष राठोड, दिलीप बास्टेवाड, पंचायत समिती सभापती आडेलाबाई हातमोडे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती परसराम पवार, विकास पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडूरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, माजी अध्यक्ष कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, असद मौलाना, धम्मपाल मुनेश्वर, आदीसह अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

धुक्याच्या साम्राज्य

अंबा, तूर, संत्रा, मोसंबीच्या बागांना धोका
कामकाजाला सुद्धा उशिराने सुरुवात

नांदेड(अनिल मादसवार)कालपासून सुरु असलेल्या गारठा व सकाळी पडलेल्या भयंकर धुक्याच्या साम्राज्याने वाहनधारक, पदाचार्यासह शेतकरी नागरिक हैराण झाले. तर दि.१४ रोजी सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांना पिकाची चिंता लागली आहे. 

एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळी पाऊस, दुष्काळात तडाखा, यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे. नुकतेच हिमाचल प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने त्याचा तडाखा आता महाराष्ट्राला बसला आहे.त्यामुळेच कि काय..? आता कालपासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सह बहुतांश तालुका परिसर गारठ्याने गारठला आहे. दिवसभर थंडीमुळे आबाल वृद्ध घरातून बाहेर पडण्यास धजावत नाहीत. दि.१४ रोजी आजवरच्या काळात कधीच नी एवढे धुके पडले असून, अक्षरश्या १०० फुट दूरवरील व्यक्ती अथवा परिसर दिसत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. सकाळी ४ वाजता बाहेर पडणारे नागरिक चक्क ६ नंतर बाहेर पडले तरी वाहन चालविताना धीम्या गतीने व लाईट लावून चालविण्याची वेळ आली होती. पादचारी तर विचार करून पावुले टाकत रस्ता पार करीत होते, शेतकरी सुद्धा नेहमीपेक्षा सकाळी ६.३० वाजता बैलगाड्या घेवून बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून सकाळच्या प्रहरी ६.१० वाजता जाणारी रेल्वे हि आज धुक्यामुळे उशिरा दाखल होऊन ६.३५ला येथून रवाना झाली. ती सुद्धा शहरात दाखल होताना ५ कि.मी. व पुढे मार्गक्रमण करताना ५ कि..मी.पर्यंत शिट्टी वाजवत गेल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. सकाळी ६ वाजता डोक्यावर येणारा सुर्य आज माथ्यावर आला असतान देखील धुक्याच्या वातावरणामुळे दडून बसल्याचे दिसून आले आहे. असेच वातावर दिवसभर राहिले तर या धुक्यातून व्हायरल इन्फेक्षण होऊन अनेकांना विविध आजाराला बळी पडावे लागणार आहे. तर बहरात आलेल्या तुर, सुर्यफुल, आंब्याचे फुल धुक्यामुळे करपून जावून तुरीचे नुकसान होणार असल्याने शेतकरी धुक्याने चिंताग्रस्त झाला आहे. आजच्या या परिस्थिमुळे तथा रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने सर्वत्र कामकाजाला सुद्धा उशिराने सुरुवात झाले आहे. दिवसभराचे नियोजन कोलमडले होते. हवामान खात्याचा अंदाज
------------------------
देशाच्या उत्तर भागात थंड हवेची लाट आल्याने, दक्षिण भारत मात्र अवकाळी पावसाच्या छायेखाली आला आहे. दोन-तीन दिवसांत विदर्भ वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपपासून उत्तर गुजरातपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मध्य-महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी, कोकण-गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणा-या बाष्पयुक्त ढगांमुळे राज्यात ही अवस्था निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. फुलो-यात आलेल्या रब्बी पिकांसाठी आणि प्रामुख्याने आंबा व द्राक्ष, संत्रा, मोसंबी, तूर आदी पिकासाठी पाऊस, ढगाळ व धुक्याचे हवामान त्रासदायक होणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवीत आहेत.

किमान तापमान

मुुंबई - २३.८, रत्नागिरी - २१.१, नगर १७.२, जळगाव - १७.६, महाबळेश्वर १६.६, मालेगाव - १९, नाशिक - १७, सोलापूर २०.७, उस्मानाबाद - १७.७, औरंगाबाद - १८, परभणी - १९.२, नांदेड - १७, बीड - १९.८, अकोला - १७.९, अमरावती - १६.२, नागपूर - १४.२.

शनिवार, 13 दिसंबर 2014

ग्राहकानो सावधान

निनावी कॉल येताच गायब होतेय एटीएम खात्यातील रक्कम ...
 
हिमायतनगर(अनिल मादसवार)तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे, नव्याने चालू करावयाचे असले तर एटीएम. कार्डचा सिरियल नंबर व पासवर्ड सांगा.. तरच तुमचे कार्ड पूर्ववत चालू राहील असा निनावी फोन अनेकांना येत आहेत. त्यावरून माहिती दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब होत आहे. त्यामुळे एटीएम.धारकांनी सावधान राहून आपल्या खात्यावरील रक्कम सुरक्षित ठेवावी असे सांगण्याची वेळ बैन्केच्या शाखाधीकारयांवर आली आहे. असाच काहींसा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील मौजे तेम्बी येथील एका शिक्षक ग्राहकासोबत घडल्याने एकच खळबळ उडाली असून, सदर ग्राहकाने या बाबत हिमायतनगर पोलिसात तक्रार दाखल केली असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

सध्या बैन्केतील खात्यात रक्कम असलेल्या ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर निनावी फोनद्वारे कोल येत आहे. कोल रिसीव्ह करताच हैलो मै... एटीएम कोल सेंटर से बोल रहा हूं... क्या आप एटीएम का उपयोग करते हैं.. असा प्रश्न निनावी कोलद्वारे केला जातो. तुम्ही हां म्हणाले कि, लगेच पुढचा प्रश्न कौनसे बैंक का.. तुम्ही बैन्केचे नाव सांगताच, तो म्हणतो कि तुम्हारा एटीएम कार्ड ब्लॉक कर दिया गय हैं... का..? असा प्रश्न विचारताच कंपनी कि और से एटीएम कार्ड व्हेरिफिकेशन किया जा रहा हैं... आप हमेशा एटीएम का उपयोग नही करते हो.. कंपनी ने कोड नंबर बदल गये है..अगर उसे शुरू रखना हैं तो... एटीएम कार्ड के १६ से १९ नंबर के आकडे बताओ... असे सांगून नंबर घेवून, लागलीच कार्ड ऐक्तीवेट करण्यासाठी पासवर्ड(पिन नंबर) मागितला जातो... अन्यथा तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होईल.. त्या नंतर तुम्हाला नवीन नंबर देण्यात येईल असे संगितले जाते. सकाळी तुम्हाला नवीन नंबर दिला जाईल असे सांगितले. सकाळी फोन करून विचारले असता त्याने सांगितले तुमचे काम झाले आहे, आता २४ तासात तुम्ही कधीही ए.टी.एमचा वापर करू शकता असे सांगण्यात आले. मात्र दुसर्या दिवशी ए.टी.एम.चा वापर करताच खात्यातील रक्कम गायब झाल्याचे दिसून आले आहे. ग्राहक आपल्या सोयीचा कॉल समजून माहिती देतात. यावरून कोणत्याही बैन्केचे एटीएम असेल तरी त्या बैन्केतून बोलतो असे सांगून ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पुन्हा एकदा उघड होऊ लागले आहे. ज्या एटीएम धारकांना निनावी फोन आला त्यांनी जर कार्ड क्रमांक व पासवर्ड सांगितला कि काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब झालेली दिसून येत आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील ग्राहकांनी वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे.


असाच कॉल आल्याने हिमायतनगर तालुक्यातील विक्रम विजय कुमार कदम या शिक्षकाने संबंधित कॉल करणार्यास दिला. त्यांच्या भारतीय स्टेट बैन्केतील खात्यातून ४ हजाराहून अधिकची रक्कम होती ती दि.११ मार्च रोजी रात्रीला गायब झाली आहे. हि बाब दि.१२ रोजी हिमायतनगर येथील बैंक शाखेच्या ए.टी.एम. वर रक्कम काढण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात आली. त्यांनी शाखाधिकारी जैन यांना विचारणा केली असता या बाबत आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही अशी विचारणा कोणाला करत नाही असे सांगण्यात आले. सदरची रक्कम एटीएम मधून एकाच  दिवशी दि. ११ मार्च रोजी प्रथम २०२० , दुसर्यांदा १४७५ व तिसर्यांदा ४९९ अश्या पद्धतीने तीन वेळा काढण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे या ग्राहकास धक्का बसला व आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. 

रक्कम गेल्याचे कळताच सदर ग्राहकाने अन्य नंबरवरून संपर्क केला असता तो कॉल उचलला गेला नाही. पुन्हा काही वेळाने संपर्क केला असता कॉल उचलला तुमचे नाव काय असे म्हणताच बैंक ऑफ इंडिया मुंबई शाखेच्या एटीएम कॉल सर्विस मधून बोलतो असे सांगण्यात आले. पुन्हा संपर्काचा प्रयत्न केला असता त्याने नंबर डायवर्ट करून ठेवल्याने आपली फसवणूक झालेल्या सांगून तो फोन मुंबई भागातून आला असल्याचे कदम यांनी सांगितले.  

याबाबत येथील बैन्केचे शाखाधिकारी किशोरचंद जैन म्हणाले कि, अश्या पद्धतीचा फोन आल्यास ग्राहकांनी आपली कोणतीही माहिती सांगू नये. या बाबत माहिती असल्यास थेट बैन्केशी संपर्क साधून शंकेचे निरसन करून घ्यावे, आम्ही ए.टी.एम.बाबत कोनालाळी काहीच विचारीत नसल्याने कोणीही अश्या कॉलवर विश्वास ठेवून नये असे आवाहनही त्यांनी केले. 

सदर तक्रारी बाबत ग्राहकाने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली, मात्र एक वेळा दूरध्वनीवरून संपर्क केला, आणि पुन्हा या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे नुकसानग्रस्त ग्राहकाने बोलताना सांगितले आहे. पोलिसांची विचारणा केली असता ते म्हणाले कि, हे काम आमच्या हद्दीतील नसून आमच्या क्षेत्रात येत नाही. याच्या चौकशीसाठी सायबर क्राइम ब्रैन्चकडे पाठविण्यात येईल असे ते म्हणाले.

बुधवार, 10 दिसंबर 2014

मेळाव्यास प्रारंभ..

ध्वजरोहनने स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्यास प्रारंभ..


हिमायतनगर(अनिल मादसवार)४२ व्या स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्यास बुधवारी सुरुवात झाली असून, सायंकाळ पर्यंत जवळपास २ हजाराहून अधिक स्काऊट गाईडचे विद्यार्थी परमेश्वरनगरी मध्ये दाखल झाले असून, उद्या गुरुवारी उद्घाटनापर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यातील २५०० ते ३००० विद्यार्थी दाखल होतील अशी माहिती मेळावा उपप्रमुख एन.एम.तीप्पलवाड यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली आहे. 

विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासून स्ववालाम्बानाचे धडे मिळावेत स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळावे या उद्दात हेतूने हिमायतनगर येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर केंद्रीय निवासी विद्यालय व परिसरात स्काऊट गाईड, कब बुल बुल या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे नांदेड भारत स्काऊट गाईड व जिल्हा शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी २.३० वाजता संचालन व ध्वज रोहनने मेळाव्यास सुरुवात झाली असून, सायंकाळ पर्यंत रेल्वे, जीप, टेम्पो, ट्रक, बस, ऑटो यासह अन्य वाहनाने जवळपास २ हजाराहून अधिक स्काऊट गाईड व गाईडर दाखल झाले आहेत. शहरात दाखल होणार्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी बैनर लावण्यात आले असून, शहर परिसरात गात १६ वर्षानंतर जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दाखल होणार्या विद्यार्थ्यांची प्रथम नोंदणी, तंबू उभारणी, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. रात्री मेळावा आयोजन समिती व पदाधिकारी स्काऊटर, गाईडर सब कैम्प प्रमुखाची सभा व शेकोटी कार्यक्रम संपन्न झाला. रात्रीला १० नंतर रात्र गस्त दिवे बंद पहारा सुरु करून ग्राम सुरक्षेचे धडे विद्यार्थ्यांनी घेतले आहे. दि.१० बुधवार ते १३ शनिवार पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात शालेय कार्याक्रमची रेलचेल चालणार असून, रामधून, वैक्तिक स्वच्छता, व्यायाम - योगा, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध गुणदर्शन, कमवा आणि शिका, स्वतः स्वावलंबी बना, शोभा यात्रा, सराव, विविध देखावे, वेळेचे बंधन, शेकोटी आदीसह स्वयंशासन याला वाव मिळणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील जवळपास ५० हून अधिक शाळांचे कैम्प दाखल झाले असून, यात स्काऊट -७८४, गाईड -३६६, स्काऊटर - १०७, गाईडर - ५० हून अधिक प्रमाणात दाखल झाले आहेत. यासाठी जिल्हा संघटक श्री दिगंबर करंडे, जिल्हा आयुक्त जी.जी.जाधव, कोषाध्यक्ष बी.आर.काचावार, माजी कोषाध्यक्ष डी.व्ही.देशमुख, विश्वनाथ बडूरे, मेळावा प्रमुख श्री बेळगे, गाईड संघटक सौ.रुपाली गुंडाळे, आयुक्त सौ.एम.एस.बच्चेवार, श्री जलदावार, भुसलवाड, कैलास कापवार, सैप्रसाद, उदय हंबर्डे, मोरे, सोनटक्के आदी आहेत. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी हिमायतनगर सह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे प्रमुख शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी परीश्रम घेत आहेत.    

स्काऊट गाईड मेळाव्याचे आज उद्घाटन 
------------------------------------
स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.प.अध्यक्ष मंगलाताई गुंडले, तर प्रमुख अतिथी म्हणून जी.प.उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिक्षण सभापती संजय बेळगे, अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहिफळे, समाजकल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई लहानकर, स्काऊट गाईडचे राज्य आयुक्त डॉ.वसंत काळे, प.स.सभापती आदेलाबाई हातमोडे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, जी.प.सदस्य सुभाष राठोड, शे.रेहाना बेगम, गोपिकाबाई माजळकर, आदींसह अनेक मान्यवर, पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

निसर्गाचा चमत्कार

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याच्या बोअरला रमसाठ पाणी .. निसर्गाचा चमत्कार

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालक्यातील मौजे खडकी बा.येथील एका शेतकऱ्याच्या बोअरवेल मधून ६.५ इंच पाईप भरून पाणी वर येत असल्याने पाण्याचा पाट पाहून कुतूहल निर्माण झाले असून, जुन्या जानकारातून हा निसर्गाचा चमत्कार व देवाची देण असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या सर्व मराठवाडा दुष्काळात होरपळत असतान पाण्याच्या एका ठेम्बासाठी असोसलेल्या शेतकर्यास निसर्गाने चमत्कार दाखविला असून, खडकी बा. येथील देवराव किशनराव बारडकर या शेतकर्याने आज सकाळी ६ वाजता स्वतःच्या शेतात बोअरवेलची मशीन आणली. कोरडवाहू शेतातील पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्याने स्वतःचे दोन एकर शेती देवराव यास विकावे लागले होते. उर्वरित शेतात पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने दि.१० बुधवारी बोअर घेण्याचा मुहूर्त  ठरविला. त्यानुसार २१० फुट बोअरवेल झाल्याने अचानक पाण्याचा स्त्रोत उफाळून वर आल्याने मशीन बंद पडली. मशीन वर काढून पाहतात तर काय..? अक्खा ६.५ इंची पाईप पूर्णपणे भरून पाण्याचा पाट वाहू लागला. या पाण्याच्या पटाने दोन तासात २ एकराहून अधिक रान भिजले असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. कोणत्याही विद्दुत पाम्पाशिवाय सतत पाणी वाहू लागल्याची बातमी पसरताच पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी हे दृश्य पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. 

सबंध मराठवाडा दुष्काळात असतांना या लागलेल्या पाण्याने शेतकऱ्याच्या अश्या पल्लवित झाल्या असून, समाधानचे भाव चेहर्यावर दिसू लागले. या पाण्याने हिरवे स्वप्न पूर्ण करणार प्रतिक्रिया देवराव बारडकर याने प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केल्या आहेत.  

सदर शेतकऱ्याच्या शेतात लागलेल्या पाण्याची पाट पाहण्यासाठी जमलेल्या शेतकरी व नागरिकांनी हि तर देवाची देन आहे. यातून शेतकर्याने चांगला उपयोग घेतल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल अश्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.   

मंगलवार, 9 दिसंबर 2014

परवाना एकच चालक दुसराच

हिमायतनगरच्या पुरवठा विभागात सावळा गोंधळ.. परवाना एकच चालक दुसराच  
हिमायतनगर(वार्ताहर)अनेक स्वस्त धान्य व केरोसीन वितरण चालक दुकानदारांचा परवाना दुसर्याचा तर दुकान चालवणारे तिसरेच असल्याने तालुक्यात काळ्या बाजाराचा गोरखधंदा जोमात सुरु आहे. या बाबतची माहिती पुरवठा विभागातील संबंधिताना असताना स्वर्थापोठी मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ चालविला जात असल्याचे यावरून उघड होत आहे. 

हिमायतनगर तालुक्यात स्वस्त धान्य व किरकोळ रॉकेल विक्रीचे परवाने हा चर्चेचा विषय ठरत असून, गत तीन वर्षात वारंवार येथील धान्य काळ्या बाजारात जाताना भोकर पोलिसांनी ताब्यात घेवून कार्यवाही केली आहे. त्यामुळे हिमायतनगर येथील पुरवठा विभाग चर्चेत आला आहे. परवाना एकच आणी चालक दुसराच असल्याने मागील वर्षी याचा वादातून येथे निर्मल हत्याकांड घडले असले तरी येथील पुरवठा विभागाने मात्र यातून काही बोध घेतला नाही. सध्या शहर व ग्रामीण भागात चालविण्यात येणारे अनेक परवानाधारक हे मयत झाल्याने त्या दुकानाचे पुन्हा प्रगटन काढणे महत्वाचे आहे. परंतु सदरील दुकानांचा परवाना हा वारस हक्काने कुटुंबातील इतर व्यक्तीला देण्यात येत असल्याने स्वस्त धान्याचा परवाना म्हणजे प्रायवेट प्रोपरटी आहे कि काय..? असा प्रश्न जाणकार व्यक्तीकडून उपस्थित केला जात आहे.  

अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी व शहरी - ग्रामीण भागातील किरकोळ केरोसीन विक्रेत्यांनी तर हि दुकाने भाडेतत्वावर चालवण्यास दिली असल्याचे समजते. त्यामुळे हा कारभार अधिकचि माया जमवण्यासाठी दुकान चालवणारे मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य व केरोसिनचा कला बाजार करत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे पुरवठा विभागाच्या संबंधिताचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मयत परवानाधारक व भाड्याने परवाना देणारे दुकानदार यांची पुरवठा विभागाने चौकशी करावी. यात गत २५ ते ३० वर्षापासून परवाना असलेल्यांची चौकशी केल्यास  गैरफायदा घेणाऱ्या परवानाधारकांचे व काळा बाजार करणाऱ्या दलालांचे बिंग फुटेल अशी मागणी धान्य व केरोसिनच्या लाभापासून वंचित लाभार्थी व जागरूक नागरीकामधून व्यक्त होत आहे.   

सोमवार, 8 दिसंबर 2014

क्राईम घटना

विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू 

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे वाशी येथील शिवारातील एका विहिरीत या गावच्या जावयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याबाबत हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, किनवट जिल्ह्यातील मयत जनार्धन राजाराम पाचपुते कामगार आपल्या कुटुंबासह आंध्रप्रदेशात कामाला गेला होता. कामे संपल्याने परत येताना हिमायतनगर तालुक्यातील वाशी गावात सासरवाडी असल्याने कुटुंबासह आला होता. दरम्यान काल दि.०७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वाशी शिवारातील शेतातील विहिरीत पडून बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. या बाबत मारोती बाबाराव पाचपुते याने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको.जाधव हे करीत आहेत.  

विवाहितेचा शारीरक व मानसिक छळ ..गुन्हा दाखल
हिमायतनगर(वार्ताहर)तुला स्वयंपाक येत नाही..मुलबाळ होत नाही असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा.येथील स्वाती हिच विवाह यवतमाळ जिल्ह्यातील वरुड येथील नारायण गाड्चीलवार याच्याशी झाला होता. सुरुवातील चांगला संसार चालला त्यानंतर नवर्यासह सासरच्यांनी संगनमताने विवाहितेस मारहाण करणे, उपाशी पोटी ठेवणे, जमिनीवर झोपविणे, तुला स्वयंपाक येत नाही, असे म्हणून मारहाण करणे,  तसेच मेकैनिक दुकान टाकण्यासाठी माहेराहून रक्कम घेवून ये म्हणून शाश्रीरिक व मानसिक छळ सुरु केला. नेहमीच सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहिता सौ. स्वाती नारायण गाड्चीलवार हिने हिमायतनगर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून नारायण गाड्चीलवार, वसंत नामदेव गाड्चीलवार, जिजाबाई वसंत गाड्चीलवार, कैलास वसंत गाड्चीलवार, स्वाती कैलास गाड्चीलवार, आनंद मारोती कटकेतेलवार, सर्व रा.वरुड ता.जी.यवतमाळ यांच्यावर विवाहितेचा छळ प्रकरणी कलम ४९८(अ),३२३, ५०४,५०६,(२)३४ भादवी अनुसार हुंडाबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको.हरण करीत आहेत.    

मूर्तीची प्रतिष्ठापना

माता चिंदलदेवी मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना
 
हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मत चिंदल देवीच्या नियोजित जागेवर दि.०८ सोमवारी पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत माता चिंदलदेवी मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पोतराज व मोठ्या प्रमाणात महिला मंडळाची उपस्थिती होती. 

सवना रेल्वे गेटजवळ असलेल्या संजय नरवाडे यांच्या शेताच्या धुऱ्यावर लिंबाच्या झाडाजवळ गत अनेक वर्षापासून चिंदल देवीची नवीन कपडा, हळदी कुंकवाने पूजा अर्चना केली जाते. या ठिकाणी चिंदल देवी मातेची मूर्ती उभारली जावी अशी भक्तांची इच्छा होती. यासाठी मागील महिन्यापूर्वी समिती नेमून अध्यक्षपदी सौ लक्ष्मीबाई गड्डमवार, उपाध्यक्ष संजय नरवाडे, सचिव पदी बाब्राव शिंदे पाटील यांची निवड करण्यात आली होती. या समितीच्या पदाधिकार्यांच्या पुढाकारातून निधी संकलन करण्यात येवून भोकर येथील मूर्तिकार तुळशीराम येताळकर यांच्या हस्ते बनविण्यात आलेली मूर्ती येथे आणण्यात आली. दि.०८ सोमवारच्या शुभ मुहूर्तावर वेदशास्त्र संपन्न पुरोहित वसंत कळसे यांच्या मधुर वाणीतील मंत्रोचाराने आदिलाबाद येथील देवकरीनबाई सौ.सुनंदाबाई यांच्या हस्ते महाभिषेक, पूजा अर्चना करण्यात आली तसेच रात्रभर पोतराज पापय्या गायकवाड, कोत्तलवाडी, यांनी व त्यांच्या संचानी हलगीच्या तालावर भक्तिगीते म्हणून मातेचा जागर केला. त्यानंतर मातेच्या मूर्तीची वाजत गाजत शहरातील मुख्य रस्त्यावरून सर्व देव - देविकांचे दर्शन घेत भव्य शोभा यात्रा काढण्यात येवून सायंकाळी ५.३० वाजता विधिवत मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून मूर्ती विजमान करण्यात आली. लगेच  भव्य महाप्रसादाने कार्याक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध ठिकाणचे मान्यवर, नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते.      

शनिवार, 6 दिसंबर 2014

खंडित करू नका...नागेश पाटील

नांदेड(प्रतिनिधी)खरीप हंगामात नुकसानीत आलेल्या शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामात उत्पन्न काढून जगण्याची धडपड करीत आहे. त्यांच्या या मेहनतीवर महावितरण कंपनीने डोळा ठेवून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून तत्काळ हा प्रकार रोकून शेतकर्यांना सहकार्य करा अशी मागणी हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हदगाव - हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी गात दोन वर्षापसून अतिवृष्टी, गारपीट व या वर्षी खरीप हंगामात झालेला अल्प पावसाने नुकसानीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, नुकसानीच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी रब्बी पिके घेवून उत्पन्न काढण्याच्या तयारीत आहे. तर निराश झालेल्या अनेक शेतकर्यांनी मृत्युला कवटाळले आहे. अश्या वेळी यांना मदतीची गरज असताना महावितरण कंपनीकडून शेतीपंपाचा वीजपुरवठा सक्तीने खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा आर्थिक अडचणीत आला असून, अश्या प्रकारे वीज पुरवठा खंडित करणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याजोगा प्रकार आहे. करिता मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या या प्रकारची तातडीने दखल घेवून सक्तीने केला जात असलेल्या विद्दुत पुरवठ्याची कार्यवाही तत्काळ थांबवावी अश्या सूचना विद्दुत मंडळाला देवून शेतकर्यांना साथ द्यावी अशी मागणी आ.नागेश पाटील यांनी दि.०४ डिसेंबर रोजी केली आहे.

महामानवास अभिवादन

नालंद बौद्ध विहारात महामानवास अभिवादन
हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील नालंद बौद्ध विहरत आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाहीर बळीराम हनवते, रामभाऊ ठाकरे, बंडू पाटील आष्टीकर, हनुसिंग ठाकूर, राम नरवाडे, योगेश चिलकावार, यांच्यासह आंबेडकर नगरातील बौद्ध उपासक, उपासिका व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी आ.पाटील यांनी निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून आगामी काळात सर्व सामन्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले. 

पंचायत समितीत महामानवास अभिवादन
 
हिमायतनगर(वार्ताहर)येथील पंचायत समिती कार्यालयात ०६ डिसेंबर डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सभाग्रहात प्रतिमेला पुष्पहार अर्पण अरुण अभिवादन करण्यात आले.

हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  गटविकास अधिकारी विलास गंगावणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, अनिल भोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, बाळू दमकोंडवार, पत्रकार संघाचे माजी कानबा पोपलवार, पत्रकार संजय मुनेश्वर, परमेश्वर शिंदे, सुभाष गुंडेकर, धम्मपाल मुनेश्वर, सोपान बोम्पीलवार, यांच्यासह पंचायत समिती कार्यालयाचे कार्यालईन अधीक्षक, शाखा अभियंता   बासीद आली, कर्मचारी, ग्रामसेवक, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.    

गुरुवार, 4 दिसंबर 2014

दुधड -वाळकेवाडी आज आणि उद्यातेलंगाना - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या जंगलाच्या पायथ्याशी दुधड -वाळकेवाडी हे गाव वसलेले आहे. हे गाव हिमायतनगर शहरापासून १९ कि.मी.अंतरावर आहे. हा भाग आदिवासी बहुल भागात येणारा असून, जास्त प्रमाणात आदिवासी बांधवांची संख्या आहे. आदिवासी भागात येणाऱ्या या गावात वीज, पाणी, आरोग्य यासह मुलभुत सुविधांचा अभाव आहे. जवळपास ५० टक्के गावाचे जंगलात विलीनीकरण करण्यात आले आहे. अंतर्गत गावात सांडपाणी समस्या कायम असून, नाली बांधकाम होणे गरजेचे आहे. तसेच छोट्या गावात जाण्यासाठी साधा पक्का रस्ता नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक पशुवैद्यकीय केंद्र, स्मशानभूमी, सरकारी तथा निमसरकारी बैंक यासह शैक्षणिक, सामाजिक, आरोग्याचा अनेक समस्या कायम आहेत.

दुधड गावाच्या गटग्रामपंचायतीत दुधड आबादी, वाळकेवाडी, उखळवाडी, रामनगर, वडाचीवाडी, बुरकुलवाडी, धनवेवाडी अशी छोटी छोटी गावे येतात. यापैकी दत्तक घेतलेल्या वाळकेवाडी या गावाची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३८६ असून, १६५८ महिला, १७२८ पुरुष असून, येथे एकूण ६३४ कुटुंब वास्तव्य करतात. यापैकी २२० कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असून, त्यांना शासनाच्या माध्यमातून सर्वाना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. अशी माहिती विद्यमान सरपंच दिलीप दिगंबरराव धुमाळे यांनी दिली. सध्या गावातील कामे उपसरपंच अवधूत वाळके, पोलिस पाटील पंजाबराव सूर्यवंशी, ग्रामसेवक शैलेंद्र वडजकर, हे गावचे मुख्य कारभारी असले तरी शिवसेना, भाजपाचे कार्यकर्ते मिळून -मिसळून कामे करून आदर्श गाव बनविण्यासाठी धडपड करीत आहेत.

वाळकेवाडी गावात पहिली ते पाचवी पर्यंत जी.प.शाळा असून, मुख्याध्यापक व ४ शिक्षक असे एकूण ५ कर्मचारी कार्यरत असून, २ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शाळेत १२२ मुली, १३८ मुले अशी एकूण २६० विद्यार्थी संख्या आहे. भविष्यात या शाळेत इयत्ता सहावी ते सातवी वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी, संगणकाचे ज्ञान पालक वर्गांच्या सहकार्याने दिले जाते आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा आहे. येथे इयत्ता ५ वि ते १० वि पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून, २२ अधिकारी - कर्मचारी कार्यरत असून, ७ जागा रिक्त असून, आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत येथील विद्यार्थ्यांना सर्व सोई - सुविधा दिल्या जातात अशी माहिती मुख्याध्यापक श्री नरवाडे यांनी दिली.

गावात तीन अंगणवाड्या कार्यरत असून, यातून बालकांना व गरोदर मातांना पोषण आहार वितरीत केला जात आहे. तसेच गरजेनुसार अंगणवाडी इमारतीचे काम करण्यात आले असून, लवकरच अंगणवाड्यांना आय एस.ओ.चा दर्जा दिला जाणार आहे. त्या संबंधाने गावकरी, नागरिक व विद्यमान पदाधिकारी प्रयत्न करीत असून, मागील महिन्यात संपन्न झालेल्या ग्रामसभेत गावाच्या विकासात लोक सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खा.राजीव सातव यांनी दिलेल्या भेटीत गावकर्यांनी एकजुटीने गावाला आदर्श गाव बनवीत चेहरा - मोहर बदलावा यासाठी लोकसहभाग नोंदविण्याचा संकल्प केला आहे.

या गावाला विकासाची नवी दिशा देण्यासाठी जी.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानातून शौच्चालय बांधकाम सुरु आहे. पूर्ववत १२३ खाजगी शौच्चालय असून, ६२७ शौच्चालय काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे ध्येय आहे. सध्या परिस्थितीत १५० शौच्चालयाचे काम सुरु असून, गावातील सांडपाण्यासाठी भूमिगत गटारे तथा ६०० शोषखड्डे बांधण्याचे काम सुरु आहेत. गावात कृषी विभागाच्या माध्यमातून पाणलोट विकास कार्यक्रम व त्याअंतर्गत रस्त्याची कामे होणार आहेत.

दुधड - वाळकेवाडी गावातील नागरिकांच्या सोयीसाठी १९८३ साली बांधण्यात आलेली पाण्याची चिरेबंदी टाकी असून, आजघडीला यातून पाणी पुरवठा अपुरा पडतो आहे. येथील पाणी समस्या कामस्वरूपी सोडण्यासाठी नव्याने जी.प.पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. येथील आराध्य दैवत रामबापू महाराज व संत तुकाराम महाराजांचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी आठवडाभर उत्सव साजरा केला जातो.

या गावातील प्रमुख समस्या हि पाणी टंचाईची आहे. तालुक्यातील सर्वच गावाप्रमाणे या गावातही भीषण पाणी टंचाई आहे. गावाच्या लगत तलाव असून, यातून मिळणारे पाणी केवळ दुधड गावापुरते मिळते. तर या तलावात मच्छिमार संस्थेच्या वतीने माशांचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तलावातील पाणी साठा मृतावस्थेत आहे. या भागातील सिंचनासाठी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाने कैनोल निर्मित्ती केली नसल्याने शेती कोरडवाहू पद्धतीने केली जाते. बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, चना आदी पिके घेतात. गावात व काही शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या विहिरी बोअर ने तळ गाठला असून, परिणामी रब्बी पिकांची अशा मावळली आहे.

या गावात महिला बचत गटांची संख्या भरपूर आहे, त्यांना रोजगार मिळावा व शौच्चालय बांधकाम करणार्यांना तालुका स्थरावरील रास्त भावात साहित्य मिळावे यासाठी याच ठिकाणी दुकान लावण्यात आल्याने बचतगट अधिक सक्षम होत असल्याचे चित्र गावात दिसत आहे.

जिल्हाधिकारी धीरजकुमार, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, खा.राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाला आदर्श गाव बनविण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या ग्रामसभेत गावाच्या विकासात लोकसहभागाची भर पडल्याने वाळकेवाडी गाव आदर्श गावाच्या वाटेवर असल्याचे ग्रामसेवक शैलेंद्र वडजकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्यावरून जाहीर केलेल्या, खासदार आदर्श गाव योजनेचा शुभारंभ जय प्रकाश नारायण यांच्या जन्मदिनानिमित्त केल्यानंतर हिंगोलीचे खासदार व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव कोणते गाव दत्तक घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सदर योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराने गाव दत्तक घेऊन विकसनशील कामे, संस्थात्मक संसाधनांची आणि त्याच्या विकासाची जबाबदारी घेवून अडगळीला पडलेल्या गावाचे आदर्श गावात रुपांतर करावे अशी अपेक्षा आहे.

याबाबत खा.राजीव सातव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असत संपर्क होऊ शकला नाही.
..... अनिल मादसवार, हिमायतनगर -९७६७१२१२१७, ९७६४०१०१०७

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com