बँकर्सनी 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत दरवर्षी अतिउत्कृष्ट व सक्षम बचतगटांना जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनामार्फत दिला जातो. जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य असलेल्या बँक शाखांनी आपले प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरुन संबंधित गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड
यांचे कार्यालयात मंगळवार 28 नोव्हेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
यांचे कार्यालयात मंगळवार 28 नोव्हेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रामुख्याने बँकेशी संबंधित असल्याने याअंतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता गटासंबंधी जिल्हास्तरावर सन 2016-17 साठी सर्वोत्कृष्ट काम असलेल्या व पतपुरवठ्याचे जास्तीतजास्त उद्दिष्ट साध्य केलेल्या एका बँक शाखेस प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी ई-स्कॉलरशीप पोर्टल सुरु.. प्रस्तावासाठी 30 नोव्हेंबरची मुदत
प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16, सन 2016-17 साठी मार्च अखेर पर्यंत ऑनलाईन अर्ज केली आहेत परंतू शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा आदी लाभ मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज, नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयानी ई-स्कॉलरशीप संकेतस्थळावरुन गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
काही विद्यार्थ्यांची शुल्क, भत्ता प्रलंबित असल्याने तो अदा करण्यासाठी ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा निर्वाह भत्ता, विद्यावेतन आदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 साठी राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती महा-डीबीटी पार्टलमार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्याने सामाजिक न्याय विभागाचे https://mahaeshol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ संस्थागित करण्यात आले होते.
शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले सन 2015-16 व 2016-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव त्वरीत सादर करावीत. अधीक माहितीचे परिपत्रक आणि वेळापत्रक www.sjsa.maharashtra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आवाहन समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.