खासदार हेमंत पाटील यांचा जुन्या आठवणीना उजाळा -NNL

अन आजी- माजी आमदार -खासदारांच्या मातोश्रीचे आशीर्वाद


नांदेड।
राजकारणाच्या पल्याड जाऊनही काही कौटुंबिक संबंध जोपासले जातात यात, शिवसेनेचे तरुण तडफदार खासदार हेमंत पाटील यांनी नेहमीच मैत्रीचं नाते घट्ट केले आहे.  असा अनुभव हदगावकरांना आला . खासदार हेमंत पाटील  तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जि. प. च्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगावकर व माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या मातोश्री यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व जुन्या आठवणींच्या  स्मृती जागविल्या आणि आशीर्वाद घेतले हे सगळं राजकारण विरहित! या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नात्याची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. 

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे जसे धाडसी,  तसेच संवेदनशील मनाचे,  कौटुंबिक मैत्री नातं जपणारे,  कार्यकर्त्यासाठी रात्री-अपरात्री मदत करणारे,  नेतृत्व होय.  त्यामुळे त्यांचा  गोतावळा पक्षाच्या बाहेर ही मोठा आहे.  खासदार हेमंत पाटील व माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी एकाच म्हणजे शिवसेनेत एकत्रित दीर्घकाळ काम केलेले आहे . सुभाष वानखेडे खासदार असताना हेमंत पाटील  शाखाप्रमुख, नगरसेवक, विद्यार्थीसेना ,जिल्हाअध्यक्ष होते पुढे दोघेही हिंगोली लोकसभेत एकमेकांच्या विरोधात लढले.  यात हेमंत पाटील यांनी शिवधनुष्य विक्रमी मतांनी दिल्लीत नेले.  निवडणूक काळात गुरु-शिष्यात  खूप शाब्दिक चकमकी झडल्या पण निवडणूक संपली की वातावरण पूर्वपदावर आले.  खासदार हेमंत पाटील हदगाव दौऱ्यावर असताना ते ल्याहरी  येथे गेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या मातोश्री कमलाबाई  बापूराव वानखेडे वय (वर्ष ८५ )यांची भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला व जुन्या आठवणीला या भेटीत उजाळा मिळाला.  यादोन्ही नेत्यात निवडणुकीतील विरोधाची कटुता यानिमित्ताने गोडव्यात रूपांतरित झाली.


याच दिवशी जवळगाव येथे जि. प. च्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांची भेट घेतली, त्यांचे  आशीर्वाद घेतले.  त्यांचे चिरंजीव कै. पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थी दशेत असताना आपणास कशी मदत केली या जुन्या आठवणींना खासदार हेमंत पाटील यांनी उजाळा दिला. आंदोलनात पोलीस कारवाई  झाल्यानंतर  कै.  पंजाबराव पाटील यांच्याकडेच वाड्यावर आम्ही राहायचो यासह अनेक प्रसंग हेमंतरावांनी या कौटुंबिक गप्पात सांगितले  केले लोकसभा निवडणुकीत हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात प्रचार केला,  पण ती कटुता न येऊ देता गतकाळात केलेली मदत किती उपयुक्त होती.  हे मोठ्या उदार अंतकरणाने खासदार हेमंत  पाटील यांनी सांगताच  उपस्थितांना व मतदारसंघाला खासदार हेमंत पाटील यांच्या विचारांची -मोठेपणाची उंची कळाली.  या दोन्ही कौटुंबिक भेटींची हदगाव तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी