ग्राहकानो सावधान

निनावी कॉल येताच गायब होतेय एटीएम खात्यातील रक्कम ...
 
हिमायतनगर(अनिल मादसवार)तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे, नव्याने चालू करावयाचे असले तर एटीएम. कार्डचा सिरियल नंबर व पासवर्ड सांगा.. तरच तुमचे कार्ड पूर्ववत चालू राहील असा निनावी फोन अनेकांना येत आहेत. त्यावरून माहिती दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब होत आहे. त्यामुळे एटीएम.धारकांनी सावधान राहून आपल्या खात्यावरील रक्कम सुरक्षित ठेवावी असे सांगण्याची वेळ बैन्केच्या शाखाधीकारयांवर आली आहे. असाच काहींसा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील मौजे तेम्बी येथील एका शिक्षक ग्राहकासोबत घडल्याने एकच खळबळ उडाली असून, सदर ग्राहकाने या बाबत हिमायतनगर पोलिसात तक्रार दाखल केली असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

सध्या बैन्केतील खात्यात रक्कम असलेल्या ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर निनावी फोनद्वारे कोल येत आहे. कोल रिसीव्ह करताच हैलो मै... एटीएम कोल सेंटर से बोल रहा हूं... क्या आप एटीएम का उपयोग करते हैं.. असा प्रश्न निनावी कोलद्वारे केला जातो. तुम्ही हां म्हणाले कि, लगेच पुढचा प्रश्न कौनसे बैंक का.. तुम्ही बैन्केचे नाव सांगताच, तो म्हणतो कि तुम्हारा एटीएम कार्ड ब्लॉक कर दिया गय हैं... का..? असा प्रश्न विचारताच कंपनी कि और से एटीएम कार्ड व्हेरिफिकेशन किया जा रहा हैं... आप हमेशा एटीएम का उपयोग नही करते हो.. कंपनी ने कोड नंबर बदल गये है..अगर उसे शुरू रखना हैं तो... एटीएम कार्ड के १६ से १९ नंबर के आकडे बताओ... असे सांगून नंबर घेवून, लागलीच कार्ड ऐक्तीवेट करण्यासाठी पासवर्ड(पिन नंबर) मागितला जातो... अन्यथा तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होईल.. त्या नंतर तुम्हाला नवीन नंबर देण्यात येईल असे संगितले जाते. सकाळी तुम्हाला नवीन नंबर दिला जाईल असे सांगितले. सकाळी फोन करून विचारले असता त्याने सांगितले तुमचे काम झाले आहे, आता २४ तासात तुम्ही कधीही ए.टी.एमचा वापर करू शकता असे सांगण्यात आले. मात्र दुसर्या दिवशी ए.टी.एम.चा वापर करताच खात्यातील रक्कम गायब झाल्याचे दिसून आले आहे. ग्राहक आपल्या सोयीचा कॉल समजून माहिती देतात. यावरून कोणत्याही बैन्केचे एटीएम असेल तरी त्या बैन्केतून बोलतो असे सांगून ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पुन्हा एकदा उघड होऊ लागले आहे. ज्या एटीएम धारकांना निनावी फोन आला त्यांनी जर कार्ड क्रमांक व पासवर्ड सांगितला कि काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब झालेली दिसून येत आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील ग्राहकांनी वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे.


असाच कॉल आल्याने हिमायतनगर तालुक्यातील विक्रम विजय कुमार कदम या शिक्षकाने संबंधित कॉल करणार्यास दिला. त्यांच्या भारतीय स्टेट बैन्केतील खात्यातून ४ हजाराहून अधिकची रक्कम होती ती दि.११ मार्च रोजी रात्रीला गायब झाली आहे. हि बाब दि.१२ रोजी हिमायतनगर येथील बैंक शाखेच्या ए.टी.एम. वर रक्कम काढण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात आली. त्यांनी शाखाधिकारी जैन यांना विचारणा केली असता या बाबत आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही अशी विचारणा कोणाला करत नाही असे सांगण्यात आले. सदरची रक्कम एटीएम मधून एकाच  दिवशी दि. ११ मार्च रोजी प्रथम २०२० , दुसर्यांदा १४७५ व तिसर्यांदा ४९९ अश्या पद्धतीने तीन वेळा काढण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे या ग्राहकास धक्का बसला व आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. 

रक्कम गेल्याचे कळताच सदर ग्राहकाने अन्य नंबरवरून संपर्क केला असता तो कॉल उचलला गेला नाही. पुन्हा काही वेळाने संपर्क केला असता कॉल उचलला तुमचे नाव काय असे म्हणताच बैंक ऑफ इंडिया मुंबई शाखेच्या एटीएम कॉल सर्विस मधून बोलतो असे सांगण्यात आले. पुन्हा संपर्काचा प्रयत्न केला असता त्याने नंबर डायवर्ट करून ठेवल्याने आपली फसवणूक झालेल्या सांगून तो फोन मुंबई भागातून आला असल्याचे कदम यांनी सांगितले.  

याबाबत येथील बैन्केचे शाखाधिकारी किशोरचंद जैन म्हणाले कि, अश्या पद्धतीचा फोन आल्यास ग्राहकांनी आपली कोणतीही माहिती सांगू नये. या बाबत माहिती असल्यास थेट बैन्केशी संपर्क साधून शंकेचे निरसन करून घ्यावे, आम्ही ए.टी.एम.बाबत कोनालाळी काहीच विचारीत नसल्याने कोणीही अश्या कॉलवर विश्वास ठेवून नये असे आवाहनही त्यांनी केले. 

सदर तक्रारी बाबत ग्राहकाने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली, मात्र एक वेळा दूरध्वनीवरून संपर्क केला, आणि पुन्हा या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे नुकसानग्रस्त ग्राहकाने बोलताना सांगितले आहे. पोलिसांची विचारणा केली असता ते म्हणाले कि, हे काम आमच्या हद्दीतील नसून आमच्या क्षेत्रात येत नाही. याच्या चौकशीसाठी सायबर क्राइम ब्रैन्चकडे पाठविण्यात येईल असे ते म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी