ग्रामपंचायत निवडणुक

हिमायतनगर ग्रामपंचायत निवडणुकीत त्रिशंकू 
सवना - महादापूर काँग्रेस, वाघी - एकघरी शिवसेना, 
चिंचोर्डी - दगडवाडी राष्ट्रवादीकडे
 
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील पाच गावच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकाचे निकाल  आज जाहीर झाले असून, १० जागा बिनविरोध, ४ रिक्त, तर २३ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शरद झाडके यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला आहे. यात सवना ज. येथे काँग्रेस तर वाघी येथील ग्रामपंचायतीवर   शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीसाठी मंगळवार दि.23 रोजी मतदान झाल्यानंतर दुसर्या दिवशी बुधवारी दि.२४ रोजी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी चोख पोलिस बंदोबस्तात पार पडली. यातून समोर आलेला निकाल पुढील प्रमाणे आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी - दगडवाडी मध्ये ७ पैकी वार्ड क्र.३ मधील परसराम रानबा ढाले, बेबीताई रामदास भडंगे, गोदावरी हन्मंतराव भडंगे व वार्ड क्र. २ मधील दत्त यादवराव टारपे हे बिनविरोध निवडून आले. तर वार्ड १ आणि २ मधील एकूण ३ जगासाठी मतदान झाले. यात उभे असलेल्या उमेद्वारातून जनमतांनी दिलेल्या निकालाने संदीप शंकरराव झळके, पंचफुलाबाई विठ्ठल देशमुखे, पंचफुलाबाई विठ्ठल देशमुखे, या विजयी झाल्या आहेत. एकच महिला उमेदवार हि दोन वार्डातून निवडून आल्याने एका जागेचा राजीनामा त्यांना आगामी सात दिवसात द्यावा लागणार आहे. परिणामी चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीची एका जागा रिक्त राहणार आहे. सध्या तरी हि ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

एकघरी-रमनवाडीत ७ जागा पैकी ६ जागेवर सत्यव्रत्त महादू ढोले, द्वारकाबाई माधव वाकोडे, देविदास माधवराव मेंडके, लताबाई दिलीप आडे, सुशीला शाहीर शिरडे, धमाबाई रतन जाधव या बिनविरोध निवडून आल्या असून, वार्ड क्र.३ मधील एका जागेसाठी रमनवाडीचे उमेदवार आमने-सामने असल्याने चुरशीचे मतदान झाले होते. यातून प्रतिस्पर्धी उमेदवारास पिछाडीवर टाकून प्रकाश उदा जाधव यांनी विजय मिळविला आहे. यात सर्वाधिक उमेदवार हे शिवसेनेचे असल्याने पुन्हा हि ग्रामपंचायत शिवसेनेकडेच राहणार आहे.

सवना ज.ग्रामपंचायतीत ९ जागा पैकी वार्ड क्र.१ मधील मधुकर पंडित यांची बिनविरोध निवड झाली आहे. वार्ड क्रमांक २ व वार्ड क्र. ३ मध्ये जात वैधता प्रमाणपत्राअभावी एस.सी. महिला २ जागा व एसटी महिला १ जागा रिक्त आहेत. तर पाच जागेसाठी निवडणूक झाली होती. यात पुढील उमेदवारांच्या चारी मुंड्या चित्त करून कलावतीबाई परमेश्वर गोपतवाड, प्रणीता अरविंद आहिरवाड, माधव जळबाजी बिरकलवाड, परमेश्वर संभाजी सांगणवाड, पुष्पाताई लक्ष्मण गायकवाड यांनी विजय मिळविला आहे. यात गोपतवाड गटाचा विजय झाल्याने येथील ग्रामपंचायतीत पुन्हा काँग्रेस चे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. 

महादापूर ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न झाल्यांनतर चुरशीच्या लढतीत मारोती जळबा  देशमुखे, सुनिता यादवराव बुरकुले, गोरखनाथ देवराव भुसारे, कांताबाई एकनाथ बुरकुले, भीमराव सुभानराव बनसोडे, मंजुळाबाई किशन डवरे, सुनिता यादवराव बुरकुले, या निवडून आल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा एका अनुसूचित जमातीतील महिला दोन जगावर निवडून आल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची एक जागा रिक्त राहणार असून, ये ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.    

वाघी ग्रामपंचायतीची निवडणूक सात जागेसाठी अतीतटीची झाल्यांनतर मतमोजणीत नागोराव संभाजी देवसरकर, जोत्सना संतोष माने, रमाबाई प्रकाश गायकवाड, नामदेव रामराव खांडरे, गणपत नागोराव बाकोटकर, सागरबाई पुंजाराम बासरकर हे सहा उमेदवार विजयी झाले असून, या ठिकाणची नामाप्र (स्त्री)राखीव जागा रिक्त आहे. या ठिकाणी वार्ड क्र.३ मधील दोन्ही प्रतिस्पधी  उमेदवारांना समान मते मिळाली होती. त्यामुळे दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनून एका चीमुकलीच्या हाती काढण्यात आली यात सागरबाई पुंजाराम बासरकर हि महिला उमेदवार विजयी ठरली आहे. तसेच याचा ठिकाणच्या मतदान यंत्रात तब्बल २० मते हि नोटाला पडल्याचे मात्मोजानीतून दिसून आहे हे विशेष आहे. या एका उमेदवारामुळे येथील ग्रामपंचायत हि आता शिवसेनच्या ताब्यात आली असून, विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करून परमेश्वर मंदिरात जल्लोष साजरा केला आहे.
      
१० जागा बिनविरोध...सहा रिक्त जागेसाठी पोट निवडणुका होणार..!
------------------------------------------------
चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीच्या ३ तर एकघरी - रमनवाडी मधील ६, आणि सवना (ज.) येथील १ जागा बिनविरोध निवडण्यात आली होती. महादापूर ग्रामपंचायतीत दोन जागेवर एक महिला व चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीच्या दोन जागेवर एक महिला निवडून आल्याने येथील एक एक अश्या दोन जागा रिकामी होणार आहे. तसेच सवना ज. येथील तीन रिक्त व वाघी येथील एक रिक्त अश्या सहा जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी