थंडीत मजुरांचे उपोषण

कडाक्याच्या थंडीत मजुरांचे उपोषण सुरु
मजुरांचे पैसे परस्पर हडपनार्यांची चौकशी, पोलिस कार्यवाही करा 



हिमायतनगर(वार्ताहर)महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पळसपूर ते हिमायतनगर रस्त्यावर गतवर्षीपासून दुतर्फा झाडे लावण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार करून परस्पर मजुरांचे पैसे हडप केल्या प्रकारांच्या चौकशी मागणी करूनही कार्यवाही गुलदस्त्यात ठेवून मास्तर मध्ये सुधारणा करत प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप करीत येथील मजुरांनी कडाक्याच्या थंडीत दि.१५ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. 

सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डे खोडून रोपे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. परंतु सदरील कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, खोदलेल्या अर्ध्या खड्डया मध्ये रोपेच लावले नसल्याने लाखो रुपये खर्च करून रोपवाटिकेत वाढविलेले रोपटे फेकून देण्याचा पराक्रम सामाजिक वनीकरण विभागाने करून लाखो रुपयाचे कामे केल्याचे दाखवून शासनाच्या निधीची पुरती वाट लावली असल्याचे मजुरांनी निवेदनात म्हंटले आहे.

कामावर मजुरी करणारे खरे मजुरांना गत वर्षभरापासून मजुरीच्या प्रतीक्षेत ठेवून बनावट मजुरांना मात्र घरपोच मजुरीची रक्कम दिल्या आहेत. बोगस मजुरांच्या नावावर लाखो रुपयाचे बिले पोस्टाच्या अधिकार्यास हाताशी धरून एका रोजंदारीवर काम करणाऱ्या ढोणे नामक व्यक्तीने केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने स्वतःच्या घरी ढिगाशी मजुरांच्या नावाचे खाते ठेवले असून, मजुरांचे पैसे परस्पर उचल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. यात सामाजिक वनीकरण अधिकारी लागवड अधिकारी, रोजगार सेवक, यांनी संगनमताने खर्या मजुरांना मजुरीपासून वंचित ठेवले असल्याने याची चौकशीची मागणी मागील आठ दिवसापूर्वी केली होती. परंतु याबाबत कोणतीही चौकशी झाली नसल्याने वंचित मजुरांनी दि.१५ पासून तहसील कार्यालयसमोर सायंकाळी ४ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरु केले आहे. यात गणेश वानखेडे, चांदराव बोंबीलवार, पुंजाराम वानखेडे, बाबुराव भावराव वानखेडे, शिवाजी वानखेडे, मुकिंद वाडेकर, बाबुराव परमेश्वर वानखेडे, लक्ष्मण साहेबराव वानखेडे, भुजंगराव बोंबीलवार, संजय कोमलवाड, सुभाष कांबळे, दयानंद वानखेडे, सरस्वतीबाई शिवाजी वानखेडे, केवळाबाई घोडगे, यांच्यासह अनेक मजुरांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी