ऊस उत्पादकांचे हित जोपासण्यास कटिबध्द - अशोकराव चव्हाण
अर्धापूर, निळकंठ मदने| भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कर्मचार्याना दिवाळीचे बोनस देणार असून साखरेला चांगला भाव बाजारात मिळत असल्याने आम्ही एफआरपी दिल्याने विरोधकांची एफआरपी ची दरवर्षीची बडबड बंद झाली,विरोधकांनी ठरवून बडबड करण्यापेक्षा एखादा कारखाना यशस्वीपणे चालवून दाखवावा असे प्रतिपादन भाऊरावचे प्रवर्तक पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
शुक्रवारी भाऊराव चव्हाण सह.साखर कारखाना येथे 26 वा अग्निप्रदीपन सोहळ्यास माजी आमदार अमिता चव्हाण,चेअरमन गणपतराव तिडके,उपाध्यक्ष प्रा.कैलास दाड,गुलाबराव भोयर,नरेंद्र चव्हाण, श्रीजया चव्हाण,सुजया चव्हाण,युवकचे जिल्हाध्यक्ष पपू पाटील कोंढेकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले कि,भाऊरावने इथेनॉल प्रकल्प राबविल्याने ऊस उत्पादकांना ऊसाला अधीक भाव मिळेल,शेतकऱ्यांच्या हितासाठी डाॅ.शंकरराव चव्हाण यांनी मोठ्या कष्टाने हा कारखाना उभारला आहे, त्यामुळे आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहोत,दरवर्षी आठ ते नऊ लाख टन ऊसाचे गाळप या युनिट ने केले आहे,त्यामुळे ऊस उत्पादकांना पुर्वीपेक्षा चांगले दिवस आले आहेत.
केंद्र सरकारने भावनीक मुद्दे समोर करून एकाधिकारशाही करीत देशातील मोठे केंद्र, उद्योगधंदे उद्योगपतींना विक्रीला काढले असून,पेट्रोल,डिझेल,गॅस,गोडतेल,रेल्वे तिकीट सह आदिंची विक्रमी भाववाढ केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव धर्माधीकारी यांनी प्रस्तावित गणपतराव तिडके, आभार प्रा.कैलास दाड यांनी मानले.याप्रसंगी संचालक रंगराव इंगोले,केशवराव इंगोले, श्यामराव टेकाळे, व्यंकटराव कल्याणकर, भगवानराव तिडके,उतमराव लोमटे,आनंदराव कपाटे, पारवीण देशमुख, साहेबराव राठोड,नवनाथ कपाटे,दतराव आवातिरक,दता नादरे,ईश्वर इंगोले, डाॅ.उतमराव इंगळे,गोविंद गोदरे,प्रविण देशमुख,मारोतराव गव्हाणे, मोतीराम जगताप,सुभाषराव देशमुख, संजय लोणे,बालासाहेब डोंगरे,दिलीप हट्टेकर,संजय गोवंदे यांच्यासह ऊस ऊत्पादकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.