अवैद्य धंदे

हिमायतनगर शहर परिसरातील अवैद्य धंदे हळू हळू ..पूर्वपदावर

हिमायतनगर(अनिल भोरे)तालुक्याचे  पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या कार्यकालात बंद करण्यात आलेले अवैद्य धंदे पूर्ववत चालू होताना दिसून येत आहेत. तालुक्यातील टेंभी, पवना, अंदेगाव, खडकी बा.,सरसम, इंदिरा नगर, सवाना, मंगरूळ आदी खेड्यापाड्यात देशी दारूचा दुचाकीवरून पुरवठा सुरु झाल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.

अवैद्य धंद्यात अग्रगण्य असलेली देशी दारू, अवैद्य वाहतूक, मटका, जुगार या धंद्यावर चाप बसवून महिला वर्गाना सुरक्षा देण्यात अनिलसिंह गौतम यांना पूर्णपणे यश आले होते. त्यांच्या काळात हिमायतनगर तालुका आणि परिसरात सर्वच अवैद्य धंदे वाल्यांनी आला गाशा गुंडाळला होता. आणि हीच गोष्ट अनेक धंदेवाल्यांना व गैरप्रकार करणार्यांना खटकली होती. गौतम यांच्या बदलीची अनेक दोन नंबर वाल्यांना आस लागलेली होती. अनेकदा अश्या अफवाही उठविण्यात आल्या होत्या परंतु काही केले तरी बदली होत नव्हती. परंतु अचानक आलेल्या संकटामुळे व त्यात चटणी मिट टाकणार्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांची येथून नांदेड नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. 

खुले आम घरपोच मिळणारी देशी दारू, उघड्यावर घेतल्या जाणारा मटका, खचाखच प्रवाशी भरणाऱ्या अवैद्य टैक्सी, रिक्षा आणि बेशिस्त वाहतुकीला लावलेला लगाम गौतम यांच्या बदलीने पुन्हा डोके वर काढू लागल्याने अनेक नागरिक पोलिस निरीक्षक श्री गौतम यांची आठवण काढत आहेत. त्यांच्या पावलावर पावूल ठेवत नव्याने पदभार सांभाळलेले पोलिस निरीक्षक श्री गिरी यांनी अवैद्य धंदेवाल्यांना चाप लावत घरपोच मिळणारी देशी दारू, दिवसा ढवळ्या दुचाकीवरून खुलेआम खेळला जाणारा मटका, शहरातील बेशिस्त वाहतूक व अवैद्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे अशी रास्त मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी