शेतकर्याची आत्महत्या

रेल्वेसमोर उडी घेवून जीवनयात्रा संपविली
घटनेमुळे बोरगाव ता. गावावर शोककळा
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच

हिमायतनगर(अनिल मादसवार)जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, काहीही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. सततची नापिकी व दुबार पेरणीला कंटाळून एका ५५ वर्षीय शेतकर्याने रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.२० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारवा खु.शिवारात घडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे आता सरकारसमोर एक मोठे आव्हान आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, या वर्षीच्या खरीप हंगामात अल्प प्रमाणतात झालेल्या पावसाने कोरडवाहू जमिनीत पेरलेली बियाणे उगवली नाही. तसेच दुबार पेरणी करूनही उगवलेली पिके तग धरली नसल्याने शेती पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. गत दोन वर्षापासून अशीच परिस्थिती उद्भवल्याने हिमायतनगर तालुक्यातील बोरगाव ता. येथील मयत शेतकरी अर्जुन रामा मुनेश्वर वय ५५ वर्ष हे मागील आठ दिवसापासून चिंताग्रस्त झाले होते. आगामी काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला बाळाचे शिक्षण कसे करावे या विवंचनेत दि.२० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदेड हून आदिलाबाद कडे जाणार्या इंटरसिटी एक्सप्रेस समोर उडी घेवून पारवा खु शिवारात जीवनयात्रा संपविली आहे. अशी फिर्याद मयताचे पुतणे किशन तुकाराम मुनेश्वर यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकात दिली असून, सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी आत्महत्येची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार असून, एक मुलगी लग्नाची असल्याची चित सुद्धा त्यांना सतावत होती असे उपस्थित नागरिकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

अल्पभूधारक शेतकर्याने अश्या परिस्थितीत मृत्युला कवटाळल्याने परिसरातील शेतकरी व नागरीकातून हळहळ व्यक्त होत असून, मयताच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी प्रशासनाने मदतीचा हातभार लावावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी