खंडित करू नका...नागेश पाटील

नांदेड(प्रतिनिधी)खरीप हंगामात नुकसानीत आलेल्या शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामात उत्पन्न काढून जगण्याची धडपड करीत आहे. त्यांच्या या मेहनतीवर महावितरण कंपनीने डोळा ठेवून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून तत्काळ हा प्रकार रोकून शेतकर्यांना सहकार्य करा अशी मागणी हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हदगाव - हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी गात दोन वर्षापसून अतिवृष्टी, गारपीट व या वर्षी खरीप हंगामात झालेला अल्प पावसाने नुकसानीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, नुकसानीच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी रब्बी पिके घेवून उत्पन्न काढण्याच्या तयारीत आहे. तर निराश झालेल्या अनेक शेतकर्यांनी मृत्युला कवटाळले आहे. अश्या वेळी यांना मदतीची गरज असताना महावितरण कंपनीकडून शेतीपंपाचा वीजपुरवठा सक्तीने खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा आर्थिक अडचणीत आला असून, अश्या प्रकारे वीज पुरवठा खंडित करणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याजोगा प्रकार आहे. करिता मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या या प्रकारची तातडीने दखल घेवून सक्तीने केला जात असलेल्या विद्दुत पुरवठ्याची कार्यवाही तत्काळ थांबवावी अश्या सूचना विद्दुत मंडळाला देवून शेतकर्यांना साथ द्यावी अशी मागणी आ.नागेश पाटील यांनी दि.०४ डिसेंबर रोजी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी