NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

मंगलवार, 31 दिसंबर 2013

कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा

आरोपींना जमानातीचा घोर... पोलिसांचा मात्र वसुलीवर जोर .../

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुका आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल असून, काहीही करा..आणि पैसे मोजून बिनधास्त राहा...? असा नवीन पायंडाच काही नव्याने रुजू झालेल्या पोलिसांनी पडला आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनसुबे वाढत आहेत. ....

येळकोट...येळकोट...

येळकोट...येळकोट... जयमल्हार च्या जयघोष्यात यात्रेला सुरुवात

नांदेड(अनिल मादसवार)दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाची यात्रा मंगळवार 31 डिसेंबर पासून सुरु झाली. 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात हजारो भक्तांच्या साक्षीने खंडोबाच्या देवस्वारीने यात्रेस प्रारंभ झाला. ....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5492&cat=Mainnews

सोमवार, 30 दिसंबर 2013

दोन वेळा कर्मचार्यांची हजेरी

पंचायत समिती कार्यालयात आता दोन वेळा कर्मचार्यांची हजेरी ... सुरोशे

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील पंचायत समिती कार्यालयातील दांडी बहाद्दर कर्मचार्यांची संख्या वाढली या मथळ्याखाली नांदेड न्युज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले असून, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे यांनी दि.३० रोजी कर्मचार्यांची बैठक घेवून कार्यालईन वेळेत हजार न राहिल्यास कार्यवाहीला सामोरे जावे लागेल अश्या कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. ...........

सागवान तस्करी जोमात

आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरून सागवान तस्करी जोमात

हिमायतनगर(वार्ताहर)आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमा रेषेवरील वाशी, पवना, दरेसरसम, वाळकेवाडी, दुधड, वायवाडी, पोटा बु. वनपरिक्षेत्रातील जंगलातून मौल्यवान सागवानाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. परिणामी जंगले भुईसपाट होत असून, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या वरिष्ठ अधिकारी कर्मचार्यांच्या आशीर्वादाने तस्करीच्या प्रमाणात वाढ होत आहे. हि बाब येथील वनाधिकार्यांना माहित असताना स्वार्थापोटी दुर्लक्ष करीत असल्याने जंगलाचे रक्षकच भक्षक बनत असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसून येत आहे. या प्रकाराकडे वनमंत्री पतंगराव कदम , नांदेड जिल्हा वनाधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे. .......

शनिवार, 28 दिसंबर 2013

नांदेडचे ७, परभणीचे ३, पूर्णा येथील ३ प्रवासी एसी डब्यात ...

आंध्र प्रदेशात जळालेल्या गाडीत नांदेडचे 40 विद्यार्थी सुखरूप
जळालेल्या लोकांची ओळख अजून पटली नाही

नांदेड(अनिल मादसवार)बेंगलुरू -नांदेड या रेल्वेला आज पहाटे झालेल्या अपघातानंतर नांदेड-परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 13 प्रवासी बोगी क्र. बी-1 मधुन प्रवास करत होते मात्र ज्या मृतदेहांचे अवशेष मिळाले आहेत त्यावरून कुठलाही थांगपत्ता लागत नसल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान दि. 23 डिसेंबर रोजी नांदेडच्या ग्यानमाता शाळेचे 40 विद्यार्थी या बोगीच्या बाजुच्याच डब्यात होते ते मात्र बचावले आहेत. ..............

दांडीबहाद्दार

पंचायत समिती कार्यालयातील दांडीबहाद्दार कर्मचाऱ्यांची संख्या वाढली ...

हिमायतनगर(वार्ताहर) येथील पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी बिनदिक्कतपणे कार्यालईन वेळेत गैरहजर राहत असल्याने कामासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची कामे खोळंबले आहेत. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोखले यांनी केला आहे. ...

शुक्रवार, 27 दिसंबर 2013

पार्श्वनाथ महादेव यात्रा महोत्सवात ०६ जानेवारीपासून

पार्श्वनाथ महादेव यात्रा महोत्सवात ०६ जानेवारीपासून
खो-खो, लेझीम, कबड्डी, पशुप्रदर्शन, कुस्त्यासह शंकरपटाचे आयोजन

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील सवना जिरोणा, रमनवाडी, महादापुर, दगडवाडी, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, चिचोंर्डी, एकघरी, वाशी शिवारातील पाचशिवेवर असलेल्या महादेव फाटा येथील पार्श्वनाथ यात्रा दि.०६ ते ११ जानेवारी पर्यंत चालणार आहे. यात्रेची सुरुवात महादेवाचा अभिषेक महापुजेने होणार असुन, यात्रेत विविध धार्मिक, सांकृतिक कार्यक्रम बरोंबरच खो-खो, लेझीम, कबड्डी, पशुप्रदर्शन, कुस्त्यासह शंकरपटाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत सर्व नागरिक, व्यापारी, शेतकर्यांनी सहभागी होवून शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमेटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, सचिव गणेश भुसाळे यांनी नांदेड न्युज लाइव्ह्च्या माध्यमातून केले आहे. ..........

महारक्तदानाची सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

महारक्तदानाची सुप्रिया सुळेंनी घेतली दखल
शिराढोण व उस्माननगरचा पाणी प्रश्‍न सोडविण्यास कटीबध्द-चिखलीकर

नांदेड(अनिल मादसवार)उस्माननगर व शिराढोणचा पाणी प्रश्‍न सोडविण्यास आपण कटीबध्द असून लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून दोन्ही गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १८ कोटी रुपये मंजूर करण्याची हमी ना. दिलीप सोपल यांनी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली...........

लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

नांदेड(प्रतिनिधी)राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिण्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येत असतो. त्यानुसार सोमवार 6 जानेवारी 2014 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. ............

कुऱ्हाडीने मारहाण

शेतातील लाकडे नेण्याच्या कारणावरून एकास कुऱ्हाडीने मारहाण ..गुन्हा दाखलहिमायतनगर(वार्ताहर)येथून जवळच असलेल्या हिमायतनगर शिवारातील शेतातील लाकडे नेण्याच्या कारणावरून एकाने कुऱ्हाडीने डोक्यात मारून फिर्यादीस गंभीर जखमी केल्याची घटना दि.२६ गुरुवारी घडली असून, तक्रार देवून गुन्हा दाखल करणाऱ्यास प्रथम पोलिसांनी दमदाटी करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला होता.................
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=5424&cat=Crime

गुरुवार, 26 दिसंबर 2013

भाजपच्या कार्याकारीनि निवड

हिमायतनगर भाजपच्या तालुकाध्यक्षपदी तुप्तेवार तर सरचिटणीस पदी डोंगरगावकर यांची निवड

हिमायतनगर(वार्ताहर)येथील भाजपच्या नूतन कार्याकारीनिच्या तालुकाध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती गजाजन तुप्तेवार तर सरचिटणीसपदी डॉ. प्रसाद डोंगरगावकर, तर उपाध्यक्षपदी साहेबराव चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी मंचावर हिमायतनगर येथील जेष्ठ कार्यकर्ते भास्कर दुसे, नारायण करेवाड, यल्लप्पा गुंडेवार, कांतराव वाळके, सुधाकर पाटील, मिलिंद जन्नावार, दिनकर संगणवार, राजीव बंडेवार यांच्यासह अनेक जेष्ट कार्यकर्ते उपस्थित होते. ..........

बुधवार, 25 दिसंबर 2013

काँग्रेसचा खटाटोप

अशोकरावांसाठी काँग्रेसचा खटाटोप सुरु../मुंबई(खास प्रतिनिधी)पेड न्युज व आदर्श घोटाळ्या प्रकरणात अडकलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हायकमांडच्या वरिष्ठांनी नेहमीच कृपादृष्टी दाखविली असून, आगामी निवडणुकीचे धेय्य डोळ्यासमोर ठेवून आदर्श प्रकरणाची फाईल गुंडाळून त्यांना वाचविण्याचा खटाटोप सुरु केल्याचे दिसत आहे...........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5402&cat=Latestnews

मंगलवार, 24 दिसंबर 2013

अटलजी वाढदिवस विशेष

राजकारणातील राजहंस अटलजी

अटलजींना ईश्वराने एक जादुई व्यक्तिमत्व बहाल केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. कोणत्या पैलूत ते अधिक सुंदर दिसतात, हे सांगणे अत्यंत कठीण आहे. ते एक प्रतिभाशाली कवी आहेत. वक्ता दससहेशु आहेत. सुसंस्कृत आहेत, मुत्सद्दी आहेत, राष्ट्रभक्त आहेत, तसेच सभ्य राजकारणी आहेत. किती म्हणून त्यांचे गुण आहेत, त्यातील कोणता गुण श्रेष्ठ आहे. हे सांगणे अतिशय अवघड आहे. पण माल भावले ते अटल बिहारी वाजपेयी, या सर्वगुनावरून हि वेगळे वाटतात. ते असे कि, राजहंस या पक्षाला सर्वश्रेष्ठ स्थान प्रदान करण्यात आले आहे. सत्तेच राजकारण खेळत असताना अटलजींनी याच गुणाचा परिचय देशाला करून दिला आहे. ............

वर्षभरातून ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नांदेड जिल्ह्यात वर्षभरातून ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या ..
नांदेड न्युज लाईव्हचा हा एक्सक्ल्युजीव्ह रिपोर्ट.


नांदेड(अनिल मादसवार)दरवर्षी शेतका-यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाना सरकार लाखाचे पॅकेज देवून मोकळे होते आहे. परंतु काही केल्या शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नसून, एकट्या नांदेड जिल्ह्यात या वर्षभरात तब्बल 40 शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून, त्यात हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या आत्महत्या कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा हे दुश्टचक्र सुरूच असल्याने यावर उपाय करण्यास शासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. ...................

हिमायतनगरच्या बैन्केत दलालांचा सुळसुळाट

हिमायतनगरच्या बैन्केत दलालांचा सुळसुळाट ...गरिबांची लुट खाते काढण्यासाठी ५०० ते १००० रुपये घेवून पासबुकाची घरपोच डिलिवरी..

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैन्केला गेल्या काही वर्षात अवकळा आल्याने ग्रामीण भागातील काही शाखा बंद झाल्या आहेत. त्यामुळे या बैन्केशी संलग्न असलेल्या शेतकरी, नौकारदार व्यापारी व सामान्य नागरिक हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैन्केकडे वळला आहे. त्यामुळे खाते काढण्यासाठी बैन्केच्या फेऱ्या करू लागला आहे. परंतु त्या ग्राहकांना अपवाद वगळता अत्यंत अप्नासापद वागणूक देण्यात येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ............

सोमवार, 23 दिसंबर 2013

पोलिस व यात्रा कमेटीचे दुर्लक्ष

पोट्याच्या यात्रेत देशीच्या महापुरासह जुगार अड्डे सुरु... गुटख्याची सर्रास विक्री...पोलिस व यात्रा कमेटीचे दुर्लक्ष 

हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील दोन दिवसापासून सुरु झालेल्या पोट्याच्या दत्तात्रेय उत्सवाच्या यात्रेत देशी दारूचा महापूर वाहत असून, जुगार अड्ड्यासह जुगार व गुटख्याची सर्रास विक्री केली जात आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरु असताना हप्तेखावू पोलिसांच्या या कामगिरीबद्दल महिलांसह सामान्य नाग्रीकातून आश्चर्य व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक विठ्ठल जाधव व अतिरिक्त पोलिस अधिकारी तानाजी चिखले यांनी लक्ष देवून या प्रकारावर आला घालावा अशी मागणी होत आहे........

मटका फोडो

मनसेच्या मटका फोडो आंदोलनाने परिसर दणाणला

नांदेड(अनिल मादसवार)गौतम नगर येथील घरकुल योजनेतून मिळालेल्यांना प्राथमिक सुविधांचा अभाव असून, अपुर्या पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन व नवीन घरांचा ताबा मिळविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुधाराकारातून येथील नागरिकांनी महानगर पालिकेवर भव्य मोर्चा काढून मटका फोडो आंदोलन केले. यावेळी फोडलेल्या हजारो मटक्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. .............

रविवार, 22 दिसंबर 2013

मोदीच्या भाषणाच्या वेळी हिमायतनगरातील लाईट व केबल बंद

मुंबई येथील मोदीच्या भाषणाच्या वेळी हिमायतनगरातील लाईट व केबल बंद
मोदीने नावासह उल्लेख करून काँग्रेसवर डागली तोफ

नांदेड(अनिल मादसवार)मुंबई येथे झालेल्या नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या महागर्जना सभेत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीला आता ५० वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्र हा मोठा तर गुजरात छोटा भाऊ आहे. परंतु, महाराष्ट्रातला दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, विजेचा तुटवडा, यासह अन्य राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी राज्याची अधोगती कडे वाटचाल होत असल्याचे चित्र जाहीर सभेतून मांडले. त्याच क्षणी नांदेड जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याने दूरध्वनिवरून भाषणाच्या वेळी आलेल्या व्यत्ययाचा आवर्जुन उल्लेख केल्याने जिल्ह्यात तो कार्यकर्ता कोण अशी एकाच चर्चा सुरु होती. .............

शनिवार, 21 दिसंबर 2013

मोदी धर्मांधतेचे मोडेल

मोदी विकासाचे नव्हे धर्मांधतेचे मोडेल होय.. उमेश पाटील

लोहा(हरिहर धूतमल)भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी महार्सःत्राची कृषी, औद्योगिक - आर्थिक - शैक्षणिक गुणवत्तेची बरोबरी करून दाखवावी. गुणवत्तेच्या बाबतीत पिछाडीवर असलेले गुअजरात देशाचे विकास मोडेल नसून ते धर्मांध शक्तीचे मोडेल आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केले. ते माजी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या लोह्यातील संपर्क कार्यालयात आज संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते..

पत्नीला जाळणाऱ्यास जन्मठेप

पत्नीला जाळणाऱ्यास जन्मठेप..आणि 1 हजार रूपये दंड

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)लग्नाच्या दहा वर्षानंतर आपल्या पत्नीने रॉकेल टाकून जाळणाऱ्यास येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश डी.यु.मुल्ला यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे..........

शुक्रवार, 20 दिसंबर 2013

आगामी काळातील चिखलीकरांचे यश

आगामी काळातील चिखलीकरांचे यश काळही रोकू शकणार नाही
प्रसिध्द सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांचा विश्‍वास

नांदेड(अनिल मादसवार)कंधार-लोहा तालुक्याचे कुटूंब प्रमुख या नात्याने भव्यदिव्य सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करणार्‍या प्रताप पाटील चिखलीकर यांचे आगामी काळातील यश काळही रोकू शकणार नाही असा विश्‍वास प्रसिध्द सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी व्यक्त केला आहे . .राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोहा येथील महारक्तदान शिबीरात रक्तदान करणार्‍या कापसी जि.प.सर्कलमधील रक्तदात्यांचा सत्कार सिनेअभिनेत्री निशीगंधा वाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते.कापसी येथील सोहळा जि.प.सदस्य गणेश सावळे पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. ..........

सभापती उमेश पवळे

महानगरपालिकेच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर देवू - सभापती उमेश पवळे

नांदेड(अनिल मादसवार)नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेअंतर्गतच्या बीएसयुपी घरकुलांच्या कामांना गती देऊन जास्तीत जास्त गरिबांना पक्की घरे मिळवून देणे, शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात सुधारणा करण्यासाठी कृती कार्यक्रम आखणे तसेच महापालिकेच्या उत्पन्नवाढीशी निगडीत असलेल्या घटकांवर लक्ष केंद्रीत करुन कर्मचा-यांचे वेतन नियमित करण्यावर आपला विशेष भर राहील, अशी माहिती महापालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांनी दिली...............

गुरुवार, 19 दिसंबर 2013

समारोप

मनपा शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या बाल महोत्सवाचा थाटात समारोप

नांदेड(अनिल मादसवार)महापालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दि. 3 ते 7 डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आणि बालमहोत्सवाचा बुधवारी (दि.18) शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात थाटात समारोप झाला. ..........

बुधवार, 18 दिसंबर 2013

ध्वजदिन निधी

ध्वजदिन निधी उद्दिष्ट दुप्पट साध्य करण्यास हातभार लावावा - जिल्हाधिकारी

नांदेड(अनिल मादसवार)देशाच्या सीमेचे अहोरात्र सरंक्षण करीत असलेल्या सैनिकाप्रती आदर बाळगून जास्तीत जास्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी हातभार लावावा आणि जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट 200 टक्के साध्य करण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे. .......

जि.प.सभागृहात रणकंदन

उच्च न्यायालयाने जि.प.च्या कामकाजाला स्थगिती दिल्यामुळे जि.प.सभागृहात रणकंदन

नांदेड(विशेष प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या सर्वच कामकाजावर बंदी टाकली. यावरुन सबंध जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाल्याने अंगाचा तिळपापड झालेल्या कॉंग्रेस सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. उलट राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने सभागृहाला तब्बल एक तास धारेवर धरले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षानीही तक्रार करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनाही चांगलेच खडसावले.............

बैन्केचा सुलतानी कारभार

बुलडाणा अर्बन बैन्केचा सुलतानी कारभार ..
सोने तारण कर्जावर आकारले वर्षात मुदलाबरोबर व्याज

हिमायतनगर(वार्ताहर)येथील बुलढाणा अर्बन बैन्केकडून गरजवंताची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात येत असून, सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या खातेदाराकडून अव्वाच्या - सव्वा दराने व्याज लावण्यात येत आहे. ........

अभ्यास दौरा संपन्न

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा " आत्मा " अंतर्गत राज्यस्तरीय शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा संपन्नहिमायतनगर(वार्ताहर) " आत्मा " योजने अंतर्गत चे प्रकल्प संचालक मा.पी.एस.डहाळे व जिल्हा कृषी अधीक्षक मा.संजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगर येथून पुणे येथील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनास भेट देवून व अभ्यास दौर्यातून माहिती घेवून परतले आहेत. अशी माहिती तालुका तंत्रज्ञान एस.जी.कांबळे, व आर.व्ही.सिलाम्वर यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली.
 http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=5281&cat=Himayatnagar

मंगलवार, 17 दिसंबर 2013

हभप. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तनाचे आयोजन

स्व.पंजाबराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने
हभप. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तनाचे आयोजन

हिमायतनगर(अनिल मादसवार)स्व.पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप.बाबामहाराज सातारकर यांच्या तीन दिवसीय कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या भक्तिमय व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील तमाम जनतेने घ्यावा असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे. .......

सोमवार, 16 दिसंबर 2013

निसर्गाचा आविष्कार

 एका दांडीतून उमलले दोन गुलाबाचे पुष्प.../


२२ व्या शतकात निसर्गात विविध चमत्कार दिसून येत असून, असाच चमत्कार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहराचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर परिसरात असलेल्या अजंठा फुल भांडारचे मालक हिदायत खान यांना दिसला. काल आणलेल्या गुलाबाच्या फुलाच्या गुछ्यात एका बुलाबाच्या दांडीतून दोन गुलाब पुष्प उमलल्याचे आढळले. याची माहिती त्यांनी नांदेड न्युज लाईव्हला कळविल्याने निसर्गाच्या किमया उजेडात आली असून, त्याचे छायाचित्र नागरिकांच्या निदर्शनास आणण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. पाहूया या निसर्गाच्या आविष्काराला किती लाईक मिळतील....? छाया - अनिल मादसवार

रविवार, 15 दिसंबर 2013

शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड(अनिल मादसवार)खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील संपूर्ण पिके उध्वस्त झाली, बैन्केचे कर्ज कसे फेडून परिवाराचे पालनपोषण कसे करावे या विवंचनेने ग्रासलेल्या धानोरा ज.येथील शेतकर्याने विषारी औषध प्राषण करून जीवन यात्रा संपविल्याची घटना दि.१४ रविवारी घडली. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ......

देशीची डोअर तो डोअर डीलेवरी

हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात देशीची डोअर तो डोअर डीलेवरी ...
उत्पादन शुल्क अधिकारी व पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

हिमायतनगर(वार्ताहर)तालुका व शहर परिसरात सध्या देशी दारूचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले असून, रात्री उशिरा पासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत चार चाकी आणि दुचाकीवरून मोठ्या परमाणात अवैद्य रित्या देशी दारूचा पुरवठा केला जात आहे. परिणामी ग्रामीण भागात दारूचे लोट वाहत असून, याकडे मात्र स्थानिक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.............

धबधब्यात पडून दोन मित्राचा मृत्यू

सहस्रकुंड धबधब्यात पडून दोन मित्राचा मृत्यू ...

हिमायतनगर(अनिल मादसवार)धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आलेल्या आदिलाबाद जिल्ह्यातील दोन पर्यटक युवकांचा हिमायतनगर - किनवट तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या सहस्रकुंड धबधब्याच्या धारेतून खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना दि.१५ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घडली आहे. शे.सलमान शे.सलीम व शे.सलीम शे.सत्तार असे मृतांची नावे आहेत............

शनिवार, 14 दिसंबर 2013

राज्यात ई-गव्हर्नन्स


राज्यात ई-गव्हर्नन्स जागरुकता अभियानाचे 
17 डिसेंबर ते 15 मार्च या कालावधीत आयोजन


मुंबई(प्रतिनिधी)केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात ई-गव्हर्नन्स जागरुकता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून अत्यंत दुर्गम भागात ही मोहीम .....

जी.प.उपाध्यक्षवर गुन्हा

अश्लील शिवीगाळ प्रकरणी जी.प.उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांच्यावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)अंगणवाडी नेमनुकीविरोधात विचारणा कार्नार्ण्यासाठी गेलेल्या एका महिलेस शिवीगाळ केल्याची घटना दि.१३ रोजी ४ वाजेच्या सुमारास जी.प.कार्यालयात घडली असून, या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जी.प.उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्यावर वजिराबाद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने एक्काह खळबळ उडाली आहे. .............

शुक्रवार, 13 दिसंबर 2013

प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन

औषधी विक्रत्यांचा बंद ;प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन


नांदेड(अनिल मादसवार)औषधी विक्रेत्यांच्या बंद काळात आपत्कालिन व्यवस्थेसाठी अन्न व औषध प्रशासन नांदेड यांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5172&cat=Latestnews

सामाजिक सहभाग

कुपोषणमुक्तीसाठी सामाजिक सहभाग महत्वाचा - दिलीप स्वामी

हिमायतनगर(अनिल मादसवार)कुपोषणमुक्ती ही निरंतर चालणारी प्रक्रीया असून, जागतिक पातळीवर एक चिंतेचा विषय बनली आहे. कुपोषणमुक्तीची चळवळ अधिक परिणामकारक करण्यासाठी अंगणवाडी असलेल्या प्रत्येक गावात कुपोषणमक्त ग्राम समिती गठीत करण्यात येणार आहे. परंतु यात यश मिळविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येवून बालकांच्या आरोग्यासाठी काळजी घेतली तर कुपोषण मुक्तीचा लढा यशस्वी होण्यासाठी फार वेळ लागणार नाही. त्यासाठी सामाजिक सहभाग महत्वाचा असल्याचे मत अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. ............

दंडाची रक्कम वसूल करा

त्या गौण खनिज माफियाकडून दंडाची रक्कम वसूल करा...दिलीप स्वामीहिमायतनगर(वार्ताहर)सिरंजणी ते शेल्लोडा रस्त्याचे मजबुतीकरण कामासाठी विना परवाना चोरीच्या मार्गाने उत्खनन करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या त्या गौण खनिज माफियाकडून दंडाची रक्कम वसूल करा, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी प्रभारी तहसीलदार गायकवाड यांना दिले. ते कुपोषणमुक्त चळवळ गतिमान करणे व सुवर्ण जयंती राजस्व अभियान संदर्भात पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, अनिल मादसवार, कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, अनिल भोरे, जांबुवंत मिराशे, ज्ञानेश्वर पंदलवाड, परमेश्वर शिंदे, सचिन माने आदींसह नायब तहसीलदार शिरफुले, अंगणवाडी सुपरवायजर महिला आदींसह अनेकांची उपस्थिती होती.    ............
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=5169&cat=Himayatnagar

गुरुवार, 12 दिसंबर 2013

अनधिकृत बांधकाम सुरु

ग्रामपंचायतीच्या नोटीशीला केराची टोपली दाखवून घराचे अनधिकृत बांधकाम सुरु ....

हिमायतनगर(विशेष प्रतिनिधी)एका शासकीय गुत्तेदाराने पोलिस स्थानकाला भिडून घराचे बांधकाम अनधिकृत रित्या सुरु केले असून, या बाबत ग्रामपंचायतीने काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या आदेशाला केराची टोपली दाखून संबंधिताने बांधकामाचा धडका सुरूच ठेवल्याने ग्राम पंचायतीच्या कारभाराबाबत सामान्य नागरिकात साशांक्ता निर्माण झाली आहे. ............

कुलूप बंद घरातून ५८ हजारचा ऐवज लंपास

हिमायतनगर चोरटे सक्रिय.......कुलूप बंद घरातून ५८ हजारचा ऐवज लंपास

[Updated at : 12-12-2013 ]
हिमायतनगर(वार्ताहर)मागील अनेक दिवसापासून थांबलेले चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, काल दि.११ च्या मध्यरात्री शहरातील जनता कॉलनीतील आंबेडकर गल्लीत राहणाऱ्या एका कुलुपबंद शिक्षकाच्या घरात शिरून जवळपास ५८ हजाराचा सोन्या - चांदीचा ऐवज व रक्कम लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ..............

प्रतिष्ठापना

एकंबा येथील मंदिरात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना

सिरंजणी(वार्ताहर)मौजे एकंबा येथील मारोती मंदिरात नागरिकांच्या सहभागातून हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना दि.१२ गुरुवारच्या शुभ मुहूर्तावर टाळ - मृदंगाच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून करण्यात आली.............

गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी - धीरजकुमार

बंद काळात प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था औषध विक्रेत्यांनी सर्वसामान्य रुग्णांची
गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी - धीरजकुमार

नांदेड(अनिल मादसवार)राज्यातील औषध विक्रेत्यांनी 16, 17 आणि 18 डिसेंबर 2013 रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बंद कालावधीत कोणत्याही गरजू रुग्णांची औषधीअभावी गैरसोय होणार नाही याची गंभीरपणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. .........

८ हजार १५३ रक्तदान

प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे " महारक्तदान शिबीर " ८ हजार १५३ रक्तदात्यांच्या सहकार्याने ठरले मराठवाड्यातील विक्रमी शिबीर

नांदेड(अनिल मादसवार)रक्तदान करायचा म्हंटले कि... माणसाचा मन धीर देत नाही..पण आम्ही आपण कोन्हासाठी रक्तदान करणार आहोत..यावरही मन धीर धरतं.. आणि चला..एक चांगलं काम करू ..म्हणत...रक्त दानासाठी तयार होतं... लोह्यातील प्रतापराव पाटील यानी आयोजित केलेलं..महारक्त दान शिबीर ..तरुणांच्या रंग..घंटा ..घंटा..वाट पाहत रक्तदान करणारे हि दाते मंडळी..महिलांचा सहभाग लक्षणीय....मराठवाड्यात नोंद घ्यावी असे विक्रमी रक्तदान घेण्याचा बहुमान प्रतापरावांना मिळाला. त्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ८ हजार १५३ रक्तदात्यांच्या सहकार्याने आजचे शिबीर मराठवाड्यातील विक्रमी शिबीर ठरल्याची एकाच चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. ........

बुधवार, 11 दिसंबर 2013

महारक्तदान शिबीर

माजी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचा नवोपक्रम
केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्यातील पहिलेच महारक्तदान शिबीर

नांदेड(अनिल मादसवार)देशाचे नेते केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य पातळीवर दाखल घ्यावी असे मराठवाड्यातील पहिले महारक्त दान शिबीर लोह्यात माजी.आमदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून होत आहे. सात हजार तीनशे रक्तदाते या सामाजिक उपक्रमात सहभागी होत असून, रक्तदात्यांच्या पन्नास हजार रुपयांचा विमा व महिलांचा साडी चोळी देवून सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक जी.प.आरोग्य सभापती श्री प्रवीण पाटील चिखलीकर यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले. ............
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5132&cat=Mainnews

आयुक्तांनी केली विवाहाची नोंदणी

माजी मुख्यमंत्र्यांची इच्छा मनपा आयुक्तांनी केली पूर्ण
महापालिका क्षेत्रिय कार्यालयात केली विवाहाची नोंदणी

नांदेड(अनिल मादसवार)माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण यांनी एका कार्यक्रमात मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या विवाहाचे नोंदणी प्रमाणपत्र देण्याची व्यक्त केलेली इच्छा आयुक्तांनी प्रत्यक्षात पूर्ण करुन दाखवली तसेच शासनाने हुंडाबंदी दिनानिमित्त सर्वांना दिलेल्या शपथेतील संकल्पाचीही अंमलबजावणी केली. एका आयएएस अधिका-याच्या दुर्मिळ व आगळ्यावेगळ्या विवाहाचा योग प्रथमच शहरवासियांना अनुभवता आला. आयुक्तांनी आंतरजातीय आणि हुंड्याशिवाय लग्न केल्यामुळे सा-या समाजालाही एक चांगला संदेश मिळाला आहे. ....http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5129&cat=Latestnews

स्थागुशाचा छापा...

हिमायतनगरच्या अवैद्य साठ्याच्या गोडावून वर स्थागुशाचा छापा....
आर्थिक तडजोडीने केवळ दोन रॉकेलच्या टाक्याच्या नोंदीची शुल्लक कार्यवाही

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील उमर चौकात एका राजकीय पुढार्याच्या वरद हस्ताने चालविण्यात येणाऱ्या गोडावून वर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग(एल.सी.बी.)च्या पथकाने दि.१० रोजी रात्री छपा टाकला असून, या ठिकाणी रॉकेल व गैसच्या टाक्या मोठ्या प्रमाणात सापडल्या असताना केवळ दोन रॉकेल टाक्या जप्त केल्याची शुल्लक कार्यवाही करून मोठी आर्थिक तडजोड केल्याची चर्चा शहरात सुरु आहे. ...........

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com