सागवान तस्करी जोमात

आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरून सागवान तस्करी जोमात

हिमायतनगर(वार्ताहर)आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमा रेषेवरील वाशी, पवना, दरेसरसम, वाळकेवाडी, दुधड, वायवाडी, पोटा बु. वनपरिक्षेत्रातील जंगलातून मौल्यवान सागवानाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. परिणामी जंगले भुईसपाट होत असून, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या वरिष्ठ अधिकारी कर्मचार्यांच्या आशीर्वादाने तस्करीच्या प्रमाणात वाढ होत आहे. हि बाब येथील वनाधिकार्यांना माहित असताना स्वार्थापोटी दुर्लक्ष करीत असल्याने जंगलाचे रक्षकच भक्षक बनत असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसून येत आहे. या प्रकाराकडे वनमंत्री पतंगराव कदम , नांदेड जिल्हा वनाधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे. .......

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी