दंडाची रक्कम वसूल करा

त्या गौण खनिज माफियाकडून दंडाची रक्कम वसूल करा...दिलीप स्वामी



हिमायतनगर(वार्ताहर)सिरंजणी ते शेल्लोडा रस्त्याचे मजबुतीकरण कामासाठी विना परवाना चोरीच्या मार्गाने उत्खनन करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या त्या गौण खनिज माफियाकडून दंडाची रक्कम वसूल करा, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी प्रभारी तहसीलदार गायकवाड यांना दिले. ते कुपोषणमुक्त चळवळ गतिमान करणे व सुवर्ण जयंती राजस्व अभियान संदर्भात पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, अनिल मादसवार, कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, अनिल भोरे, जांबुवंत मिराशे, ज्ञानेश्वर पंदलवाड, परमेश्वर शिंदे, सचिन माने आदींसह नायब तहसीलदार शिरफुले, अंगणवाडी सुपरवायजर महिला आदींसह अनेकांची उपस्थिती होती.    ............
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=5169&cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी