माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रमुख उपस्थिती
हदगाव, शे.चादपाशा| विकासापासून नेहमीच वंचित असलेल्या हदगाव तालुक्यातील वायफना- घोगरी- चिकाळा - दिग्रस या रस्त्याच्या कामामुळे आगामी काळात विकासकामांना गती मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले . खासदार हेमंत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील वायफना- घोगरी- चिकाळा - दिग्रस या ८ कोटी ७३ लक्ष रुपये खर्चाच्या स्त्याच्या कामाचे उदघाटन आज (दि.13 ) माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी आ.माधवराव पाटील जवळगावकर,यांची प्रमुख उपस्थिती होती . हदगाव तालुक्यातील या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा मार्ग सुकर होणार असून रस्त्याचे लोकार्पण करताना मनस्वी आनंद होत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून आगामी काळात सुद्धा आणखी दर्जेदार आणि पक्या रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याचेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्यासह माजी उपजिल्हाप्रमुख रमेश घंटलवार,तालुकाप्रमुख शामराव चव्हाण,जि. प.सदस्य विजय बास्टेवाड, युवासेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर,सभापती मादाबाई तमलवाड,उपसभापती शंकरराव मेंडके,शिवसेना नेते झाकीर चाऊस, शहरप्रमुख राहुल भोळे, डॉ.संजय पवार,भगवान पाथरकर,भागवत देवसरकर,तामसा येथील सरपंच बालाजी महाजन,नगरपालिका गटनेते अमित अडसूळ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे नांदेड जिल्हा कार्यकारी अभियंता ओमप्रकाश नीला , उपअभियंता सुधीर पाटील यांच्यासह आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामांना मंजुरी मिळाली असून पुढील काळात उर्वरीत तालुक्यातील कामांना निधी मंजूर करून दिला जाणार आहे .हदगाव तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या 12 पासून सुरू होणाऱ्या वायफना- घोगरी- चिकाळा - दिग्रस या 13 कि. मी लांबीच्या कामासाठी एकूण 8 कोटी 73 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे . मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही याकडे लक्ष दिले जात नव्हते परंतु खासदार हेमंत पाटील यांनी विशेष लक्ष देऊन या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवून आणली आणि भरीव निधी सुद्धा उपलब्ध करून देण्याबाबत सात्यत्याने प्रयत्न केले होते.
रस्त्याअभावी या भागातील नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता या रस्त्यामुळे येथील शेतकरी , शालेय विद्यार्थी , सर्वसामान्य नागरिक, यांना हदगाव आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. हदगाव तालुका विकासकांमा पासून वंचित राहिला आहे आता या तालुक्यात विकासाचे वारे वाहणार यात दुमत नाही . आपण करत असलेल्या कामांना सर्व सामान्य जनतेचे आशीर्वाद असावेत हीच माफक अपेक्षा असून हदगाव तालुकयातून ती निश्चितच मिळेल असा मला विश्वास आहे सोबतच सर्वसामान्य जनतेसुद्धा समाजाला दिशा देणारे लोकप्रतिनिधी जपले पाहिजेत याच अनुषंगाने माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या आमच्या मार्गदर्शिका सूर्यकांताताई पाटील यांच्या गावातील रस्ता करताना मनापासून आनंद होत आहे. असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .