पार्श्वनाथ महादेव यात्रा महोत्सवात ०६ जानेवारीपासून
खो-खो, लेझीम, कबड्डी, पशुप्रदर्शन, कुस्त्यासह शंकरपटाचे आयोजन
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील सवना जिरोणा, रमनवाडी, महादापुर, दगडवाडी, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, चिचोंर्डी, एकघरी, वाशी शिवारातील पाचशिवेवर असलेल्या महादेव फाटा येथील पार्श्वनाथ यात्रा दि.०६ ते ११ जानेवारी पर्यंत चालणार आहे. यात्रेची सुरुवात महादेवाचा अभिषेक महापुजेने होणार असुन, यात्रेत विविध धार्मिक, सांकृतिक कार्यक्रम बरोंबरच खो-खो, लेझीम, कबड्डी, पशुप्रदर्शन, कुस्त्यासह शंकरपटाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत सर्व नागरिक, व्यापारी, शेतकर्यांनी सहभागी होवून शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमेटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, सचिव गणेश भुसाळे यांनी नांदेड न्युज लाइव्ह्च्या माध्यमातून केले आहे. ..........