NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

शुक्रवार, 5 मई 2017

तहसीलदारांची मूकसंमती व तलाठ्याच्या संगनमताने वाळू दादांचा रेतीवर डल्ला

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेबानी लक्ष देण्याची मागणी 

हिमायतनगर, प्रतिनिधी/                         विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी पात्रातून राजकीय वरदहस्ते असलेल्या वाळू दादांनी रेती चोरीचा प्रकार तहसीलदारांची मूकसंमती व तलाठ्याच्या संगनमताने चालूच ठेवला असल्याची चित्र नदी पात्रातील उत्खननाच्या खांद्यावरुन दिसून येत आहे. याकडे नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेबानी विशेष लक्ष देऊन माफियांच्या मुसक्या आवळाव्या आणि स्वार्थ साधणाऱ्या तहसीलदार, तलाठ्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत ठोस कार्यावाहि झाली नसल्यास पर्यावरणप्रेमी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मांडण्याच्या तयारीत आहेत. 

गुरुवार, 4 मई 2017

रस्ता डांबरीकरणाचे निकृष्ट काम

नांदेड,प्रतिनिधी/ तालुक्यातील पेठवडज रस्त्याला जोडणार्‍या सिरसी (बु) ते गणपती मंदिर रस्त्याच्या डांबरणाचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. सदर काम थांबवून अंदाज पत्रकाप्रमाणे करुन डांबरीकरणाचा दर्जा राखावा अशी मागणी वडार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. साहेबराव बेले यांनी केली आहे.

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंतर्गत येणारे सिरसी (बु) ते गणपती मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू आहे. सदर कामावर संबंधीत कंत्राटदार व उपअभियंता बसवदे यांचे कोणतेही नियंत्रण नाही. या कामासाठी वापरण्यात येत असलेला मुरुम व डांबर दर्जाहिन आहे. त्यामुळे रस्त्याचे होत असलेले काम जास्तकाळ टिकणारे नाही. निव्वळ डागडुजी करुन निधी हडप करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप वडार समाज संघाच्यावतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रा. साहेबराव बेले व व्यंकटी जाधव यांनी केला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या या रस्त्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करुन दर्जा राखावा अन्यथा गावकर्‍यांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Bhokar Agarchi Chake Gatiman

Aamaran Uposhan Suru मन्याडच्या नागरिकांचे उपोषण

Hadgao Dr Lomte Acb Traip वैदकिय अधीक्षक लोमटे जाळ्यात

मंगलवार, 2 मई 2017

सज्जाचे भाडे न देता ११ वर्षे दप्तर गहान ठेवणारा तलाठी निलंबित

नायगाव बाजार, प्रभाकर लखपत्रेवार तलाठी सज्जाच्या कार्यालयाचे भाडे न देता तब्बल ११ वर्षे दप्तर गहान ठेवून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देवून आडवणूक करणारे वादग्रस्त तलाठी एस.ए. शिंदे यांना निलंबित केल्याने तहसिल कार्यालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर कामचुकर व वारंवार सुचना देवून सुध्दा उद्दीष्ट पुर्ण न करणारे आणखी काही तलाठी तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्या रडारवर असल्याची चर्चा होत आहे. 

नायगाव तालुक्यातील काही तलाठ्यांना राजाश्रय मिळाल्याने अशा तलांठ्यांची मोठ्या प्रमाणात मनमानी वाढली होती. पण आठ

विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आज व्यापक आढावा बैठक

नांदेडप्रतिनिधी मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्यासाठी  विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून नियोजन तसेच आढावा घेण्यासाठी व्यापक दौरा सुरु केला आहे. त्याअंतर्गत डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 3 मे 2017 रोजी नांदेड जिल्ह्याची बैठक होणार आहे. बैठक सकाळी 10 वा. ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका येथे होणार आहे.

केंद्रिय अनुदानित कँटीन मधून पोलिसांना मिळणार स्वस्त दारात साहित्य

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मध्यवर्ती कॅटींनच्या निर्देशानुसार अनुदानित कॅटींनच्या सुविधा आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये कार्यरत, सेवानिवृत्त, पात्रताधारक अधिकारी व कर्मचारी तसेच केंद्रीय शस्त्र पोलीस बलाचे आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या अनुदान तत्वावरील कॅटींनमधून जिवनावश्यक साहित्य मिळत होते. 

पोलिसांसाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर असेच वर्गीकरण माणसांचे असते - चंद्रकिशोर मीणा

नांदेड, खास प्रतिनिधी/ पोलीसांसाठी जगात दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. कायदेशीर माणूस आणि बेकायदेशीर माणूस त्यात कायदेशीर माणसाचे संरक्षण करणे हे पोलीसांचे आद्य कर्तव्य असून जनतेच्या सहकार्यानेच कायदेशीर माणसांचे संरक्षण करणे पोलीसांना शक्य आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी केले. 

अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यासाठी काल अकोला

उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी शिंदेचा गौरव

हिमायतनगर, प्रतिनिधी/ विद्दुत पुरवठ्या दरम्यान अचानक उध्दभवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या अडचणीत तातडीने निराकरण करणे, त्याद्वारे विद्दुत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे काम करणारे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व निष्ठावान कर्मचारी परमेश्वर गिरमाजी शिंदे यांचा नांदेड परिमंडळातर्फे कामगार दिनानिमित्त औचित्य साधून मुख्य अभियंता अविनाश पाटोळे साहेब, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ, यांच्याहस्ते 'उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी' म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सन्मान झाल्याबद्दल उपकार्यकारी अभियंता कटकट साहेब, कनिष्ठ अभियंता नरनवरे साहेब विद्दुत सहाय्यक वजीर यांच्यासह वीज परिमंडळातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.  

सोमवार, 1 मई 2017

Datt Murti Pratishthapana दत्तात्रेय मंदिर कलशारोहन

नायगाव मध्ये अवैध रेतीसाठ्यांसह मनमानी तलाठ्यास तहसीलदारांना अभय !


नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू

नांदेड जिल्ह्यातील नायगाव (खै)तालुक्यातील रेतीघाटांवरील अवैध रेती उपसा व रेतीसाठ्यांसह मनमानी तलाठी विजय जाधव यांना अभय देणारे तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या वर दंडात्मक व फौजदारी कारवाई च्या मागणीसाठी परिट धोबी सेवा मंडळाचे राज्य उपाध्यक्ष कैलास तेलंग यांच्या नेतृत्वाखाली गणेश कंदुरके व विरेन्द्र डोंगरे यांनी जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर आज महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण सुरू केले आहे. 

कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा प्रयत्नः खा. अशोक चव्हाण

मुंबई, प्रतिनिधी उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत असून काँग्रेस पक्ष कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

आज सकाळी खा. अशोक चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणा-या हुतात्म्यांना वंदन केले. त्यानंतर टिळक भवन येथे त्यांच्या हस्ते

स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

नांदेड, प्रतिनिधी नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या  वर्धापन दिनानिमित्य आज दि. 01 में रोजी सकाळी 07.05 वाजता जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती बी. एम. बच्चेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा संस्थेचे अध्यक्ष  डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, उपाध्यक्ष डॉ. अनिल तोष्णीवाल, उपाध्यक्षा श्रीमती जे. एम. पोपुलवार, अजीव सभासद प्रतिनिधी स. हरबन्ससिंग जमदार, जिल्हा संघटन आयुक्त  दिगंबर करंडे, श्रीमती आर. जी. मुधोळकर, टंकलेखक कैलास कापवार, कनिष्ठ लिपिक श्रीमती वनिता भोजराज, शिपाई साईनाथ ठक्कुरवार आदी उपस्थित होते.

श्रमिकांच्या संघटन शक्तीतुनच शोषणमुक्त समाज रचना शक्य

‘आयटक’च्या कामगार मेळाव्यात प्रा.सिध्देवाड यांचे प्रतिपादन
नांदेड,प्रतिनिधी श्रमिक, कष्टकर्‍यांच्या संघटन शक्तीच्या माध्यमातुनच शोषणमुक्त समाज रचना निर्माण होवू शकते, असे प्रतिपादन प्रा.अशोक सिध्देवाड यांनी केले. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात आयटकच्या वतीने आयोजित 1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र राज्य निर्मिती दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक ज्येष्ठ नेते ना.रा.जाधव हे तर प्रमुख

गरीब, गरजुंना आधार देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न - पालकमंत्री खोतकर

निराधारासाठींच्या योजनांतील अनुदान वितरण संपन्न

नांदेड, अनिल मादसवार गरीब, गरजूंना आधार देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले. जुने नांदेड गाडीपुरा परिसरातील रेणुकामाता मंदिर येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना खाते-पुस्तक, सानुग्रह अनुदान तसेच शिधापत्रिकांचे वाटप असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पालकमंत्री खोतकर प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यास नांदेड क्लब मध्ये शिवसेना प्रमुखांनी केली मारहाण

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल नूतन जिल्हाधिकारी हजर होऊन काही तास उलटले असतांना आणि नूतन पोलीस अधीक्षक नांदेडला पोहचण्यास काहीच तास शिल्लक असतांना शहरातील नांदेड क्लब मध्ये काल रात्री शिवसेनेचे जिल्हा प्रमुख  धिंगाणा घातला आहे.या क्लबचे अध्यक्ष नांदेडचे जिल्हाधिकारी आहेत. काल झालेल्या धिंगाण्यात सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षकाला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. आज दुपारी भाग्यनगर पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार आली आहे.

आज राज्यभरात कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन

लाखो भाविकांच्या उपस्थितीत दत्तात्रेय मंदिराचा कलशारोहन व दत्तमूर्ती प्रतिष्ठापना

हिमायतनगर, प्रतिनिधी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पिंपळगाव येथील १०८ कुंडी महायज्ञ, दत्त मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहणाची सांगता काशी विश्वनाथ येथील डॉ. चंद्रशेखर महास्वामीजी यांचा हस्ते सोमवारी सकाळी करण्यात आली. यावेळी लाखो भक्तांचा जनसागर उसळला होता. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव - भोकर -हिमायतनगर तालुक्याच्या माध्यभागी असलेल्या पिंपळगावच्या दत्तात्रेय मंदिराच्या कळसारोहण व श्री दत्त मूर्ति प्राण प्रतिष्ठापण निमित्त अखंड

नांदेडच्या विकासाला गवसणी घालण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करु - पालकमंत्री खोतकर

महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ संपन्न 

नांदेड, अनिल मादसवार.......  
नांदेडच्या विकासाच्या अमर्याद संधीना गवसणी घालण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू या, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले, ध्वज वंदनानंतर ते संदेशपर भाषणात बोलत होते.

Gathanachya trakla Aag गठाणाच्या ट्रकला आग