नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू
नांदेड जिल्ह्यातील नायगाव (खै)तालुक्यातील रेतीघाटांवरील अवैध रेती उपसा व रेतीसाठ्यांसह मनमानी तलाठी विजय जाधव यांना अभय देणारे तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या वर दंडात्मक व फौजदारी कारवाई च्या मागणीसाठी परिट धोबी सेवा मंडळाचे राज्य उपाध्यक्ष कैलास तेलंग यांच्या नेतृत्वाखाली गणेश कंदुरके व विरेन्द्र डोंगरे यांनी जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर आज महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
नायगाव तालुक्यातील मनूर, सातेगांव, बरबडा, आंतरगांव व यासह अनेक रेती धक्क्यावरिल अनागोंदी कारभार तसेच, रेती घाटावरील जेसीबी द्वारे होत असलेले रेती उत्खनन व उपसा अवैध रेती साठा याविरोधात तसेच,नरसीचे अति. तलाठी विजय जाधव यांचा पदभार काढावा यासाठी दि.11 एप्रिलपासून तहसिल कार्यालय नायगाव खै.येथे आमरण उपोषण करण्यात आले होते त्यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी दि. 12 रोजी रेती प्रकरणात संबधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून अहवाल मागवून घेऊ त्याचबरोबर तलाठी विजय जाधव यांचा नरसी येथिल अति.पदभार काढल्याचे आदेश दिले यामध्ये तलाठी आय.एन.डोंम यांचा नियुक्ती करण्यात आली परंतू, महत्त्वाचे म्हणजे रेती बाबत पूर्वी अहवाल प्राप्त असतांना तो दडवून ठेवून दिशाभूल केली व तलाठी जाधव यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्याऐवजी पुनश्च नरसी येथेच कायम ठेवले त्यामुळे सदर दोन्ही प्रकरणांत लक्ष द्यावे यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांना विनंती करण्यात आली होती तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अर्जून खोतकर यांनाही नरसी भेटीत कार्यकर्ते यांनी विनंती केली होती त्यांनी उपविभागीय अधिकारी, बिलोली यांना धारेवर धरले होते माञ संबधितांही त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिट धोबी सेवा मंडळाचे राज्य उपाध्यक्ष कैलास तेलंग यांच्या नेतृत्वाखाली आज दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पञकार गणेश कंदुरके व विरेंद्र डोंगरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या उपोषणास कैलास तेलंग टेंभूर्णीकर, माहिती अधिकार तपास समिती, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मणराव मा. भवरे,म.रा.मराठी पञकार संघ नांदेड महानगर सचिव सुरेश काशिदे, नायगाव मराठी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष सय्यद जाफर, गोविंद टोकलवाड, गंगाधर गंगासागरे यांच्यासह विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांसह पञकारांनी भेट देऊन सदर न्यायिक मागण्यांसाठी पाठींबा दिला.