NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

सोमवार, 1 मई 2017

श्रमिकांच्या संघटन शक्तीतुनच शोषणमुक्त समाज रचना शक्य

‘आयटक’च्या कामगार मेळाव्यात प्रा.सिध्देवाड यांचे प्रतिपादन
नांदेड,प्रतिनिधी श्रमिक, कष्टकर्‍यांच्या संघटन शक्तीच्या माध्यमातुनच शोषणमुक्त समाज रचना निर्माण होवू शकते, असे प्रतिपादन प्रा.अशोक सिध्देवाड यांनी केले. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात आयटकच्या वतीने आयोजित 1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र राज्य निर्मिती दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक ज्येष्ठ नेते ना.रा.जाधव हे तर प्रमुख
पाहुणे म्हणून प्रा.देवदत्त तुंगार हे उपस्थित होते. या वेळी बोलतांना अशोक सिध्देवाड म्हणाले की, कामाचे तास ठरावे म्हणून अमेरिकेतील शिकोगो येथील कामगारांनी कडवा संघर्ष केला. त्यातुन आठ तासाचा कामाचा दिवस ही संकल्पना जगभर मान्य झाली. कार्ल मार्क्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषणमुक्त समाजरचनेची मांडणी केलेली आहे. मार्क्स व डॉ. आंबेडकरांचं स्वप्न साकारण्यासाठी कष्टकरी समाजातील विविध संघटनांना राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवुन संघटीत शक्ती निर्माण करावी लागणार आहे. 

मुक्त अर्थव्यवस्थेत भांडवलदार संघटीत आणि कामगार असंघटीत असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातुन शोषणाचे नवनवीन प्रकार पुढे येत आहेत. याचा सामना करण्यासाठी सर्व संघटनांनी संघटीत लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. तुंगार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कामगार चळवळीचे मोठे योगदान असल्याचे सांगुन बदलत्या राजकीय परिस्थितीत सत्ताधार्‍यांना समाजवादी समाजरचना मान्य नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे कामगारांना एकजूटीशिवाय  पर्याय नसल्याचे प्रा.तुंगार यांनी सांगितले. यावेळी बोलतांना कॉ.प्रदीप नागापुरकर यांनी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्व विषद करुन कामगारांनी न्याय हक्कासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले. ना.रा.जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रखर लढा देवून मिळविलेले हक्क हिरावले जात आहेत. कामगार कायद्यामध्ये भांडवलदारांच्या हिताच्या दृष्टीने बदल केल्या जात असल्याचा आरोप करुन सर्वांनी संघटीत व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कॉ.के.के.जांबकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कॉ.देवराव नारे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील कामगार व कामगार क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं: