नांदेड, प्रतिनिधी नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्य आज दि. 01 में रोजी सकाळी 07.05 वाजता जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती बी. एम. बच्चेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, उपाध्यक्ष डॉ. अनिल तोष्णीवाल, उपाध्यक्षा श्रीमती जे. एम. पोपुलवार, अजीव सभासद प्रतिनिधी स. हरबन्ससिंग जमदार, जिल्हा संघटन आयुक्त दिगंबर करंडे, श्रीमती आर. जी. मुधोळकर, टंकलेखक कैलास कापवार, कनिष्ठ लिपिक श्रीमती वनिता भोजराज, शिपाई साईनाथ ठक्कुरवार आदी उपस्थित होते.
स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
नृसिंह न्यूज नेटवर्क
0