सेवानिवृत्त अधिकाऱ्यास नांदेड क्लब मध्ये शिवसेना प्रमुखांनी केली मारहाण

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल नूतन जिल्हाधिकारी हजर होऊन काही तास उलटले असतांना आणि नूतन पोलीस अधीक्षक नांदेडला पोहचण्यास काहीच तास शिल्लक असतांना शहरातील नांदेड क्लब मध्ये काल रात्री शिवसेनेचे जिल्हा प्रमुख  धिंगाणा घातला आहे.या क्लबचे अध्यक्ष नांदेडचे जिल्हाधिकारी आहेत. काल झालेल्या धिंगाण्यात सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षकाला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. आज दुपारी भाग्यनगर पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार आली आहे.

आज राज्यभरात कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन
साजरा करण्याची तयारी काल पासूनच सुरु होती.या तयारी साठी प्रशासन आणि जनतेचे लोक झटत होते.नांदेड शहरात एक नांदेड क्लब आहे.या क्लब मध्ये खाण्या पिण्याची पिण्याची सर्व सोय आहे.क्लब चांगले चालावे या साठी अशी सोय उभारण्यात आली आहे.या क्लबचे सचिव एक वैद्यकीय व्यवसायी आहेत तसेच एक  मोठे चांदीचे व्यापारी पदाधिकारी आहेत.या व्यापाऱ्याने या क्लब मधील एका बांधकामाच्या संदर्भाने अनेक कृत्य केले आहेत.त्या बाबतची एक तक्रार भाग्यनगर पोलीस ठाण्यात प्रलंबित आहे.

1 मे च्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी नांदेडचे पालक मंत्री अजून खोतकर हे नांदेड मुक्कामी असतांना रात्री  नांदेड क्लबच्या बार मध्ये शिवसेना प्रमुख मिलिंद देशमुख आणि त्यांचे इतर साथीदार गेले.त्या ठिकाणी बार चालक अशोक गंगाधर साखरे कार्यरत आहेत.या ठिकाणी साखरे यांनी आपले मित्र सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक साहेबराव गंगाधर बागेलवाड यांना बोलावले होते.ते बार मालकाच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले होते.या ठिकाणी सेना कंपनीने 'औषध' घेतले की नाही माहित नाही पण काहीतरी वाद झाला.त्या वादात शिवसेना प्रमुख मिलिंद देशमुख हे आपल्या टेबलावरून उठले आणि बार मालकाकडे गेले.योगायोगाने त्याच नेमक्या वेळेस बार मालक अशोक गंगाधर साखरे हे स्वयंपाक गृहात गेले होते.तेव्हा मिलिंद देशमुख यांना बार मालक कळलेच नाही आणि त्यांनी सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक साहेबराव गंगाधर बागेलवाड याच्याशी वाद घातला.त्यात मी कोण आहे ? हे माहित नाही काय ? सर्व जाळून टाकतो असे शब्द वापरल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक साहेबराव गंगाधर बागेलवाड यांचे काही तरी मिलिंद देशमुख यांना पटले नाही आणि त्यांनी आपल्या साथीदारांसह सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक साहेबराव गंगाधर बागेलवाड यांना जबर मारहाण केली आहे.


नांदेडचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या क्लबचे नूतन अध्यक्ष नांदेड जिल्हाधिकारी हजर होऊन काहीच तास उलटले आहेत.तसेच नूतन पोलीस अधीक्षक काही तासातच येणार आहेत.अश्या वेळी घडलेला हा सेना पदाधिकाऱ्यांचा धिंगाणा चर्चेचा विषय बनला आहे.तेथे हजर असणाऱ्या काही जणांनी सांगितले की,मिलिंद देशमुख आणि सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक साहेबराव गंगाधर बागेलवाड यांच्या वयातील अंतर पाहता वाईट वाटते आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज 1 मे 2017 रोजी दुपारी 2 वाजेच्या आसपास भाग्यनगर पोलीस ठाण्यात आपल्याला आणि बागेलवाड यांना झालेल्या मारहाणीची तक्रार अशोक साखरे यांनी दिली आहे. आपली तब्येत बरी नसल्याने तक्रार देण्यास उशीर झाला असे त्या तक्रारीत लिहिले आहे. भाग्यनगर पोलिसांनी ती तक्रार घेतली आहे.मारहाण झालेल्या लोकांना सरकारी दवाखान्यात पाठवले आहे. अशी माहिती प्राप्त आहे.या याबाबत कायद्याची माहिती जाणून घेण्यासाठी ऍड.महिंद वावळे याना विचारणा केली असतांना त्यांनी सांगितले की,या प्रकरणात फक्त अदखल पात्र गुन्हा होऊ शकतो.अश्या प्रकारे जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या नांदेड मध्ये घडले नाटय. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी