हिमायतनगर, प्रतिनिधी/ विद्दुत पुरवठ्या दरम्यान अचानक उध्दभवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या अडचणीत तातडीने निराकरण करणे, त्याद्वारे विद्दुत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे काम करणारे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व निष्ठावान कर्मचारी परमेश्वर गिरमाजी शिंदे यांचा नांदेड परिमंडळातर्फे कामगार दिनानिमित्त औचित्य साधून मुख्य अभियंता अविनाश पाटोळे साहेब, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ, यांच्याहस्ते 'उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी' म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सन्मान झाल्याबद्दल उपकार्यकारी अभियंता कटकट साहेब, कनिष्ठ अभियंता नरनवरे साहेब विद्दुत सहाय्यक वजीर यांच्यासह वीज परिमंडळातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.