नांदेड, खास प्रतिनिधी/ पोलीसांसाठी जगात दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. कायदेशीर माणूस आणि बेकायदेशीर माणूस त्यात कायदेशीर माणसाचे संरक्षण करणे हे पोलीसांचे आद्य कर्तव्य असून जनतेच्या सहकार्यानेच कायदेशीर माणसांचे संरक्षण करणे पोलीसांना शक्य आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी केले.
अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यासाठी काल अकोला
जिल्ह्याने त्यांना निरोप दिला आणि आज सकाळी ते नांदेडला हजर झाले. सोबतच त्यांनी सर्वप्रथम पत्रकारांना भेटण्याची संधी घेतली आणि पत्रकारांना बोलावले. पोलीस अधिक्षक कार्यालयातील चिंतन सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकिशोर मीणा म्हणाले की, माझ्या मनातील कांही संकल्पना सांगणे आज ते घाईचे होईल. कारण प्रत्येक जिल्ह्याच्या समक्षा वेगळया, तेथील माणसे वेगळी आणि त्यांचे राहणीमान वेगळे. सोबतच त्या जिल्ह्याच्या भौतिक सुविधा वेगळया याच्यासह जिल्ह्याचा अभ्यास मी करले आणि त्यानुसार कामकाज चालेले. पोलीसांसाठी जगात माणसांच्या दोनच वर्गीकरण आहे. एक कायदेशीर माणूस आणि दुसरा बेकायदेशीर माणूस. बेकायदेशीर माणसापासून कायदेशीर माणसाचे संरक्षण करणे हे पोलीसांचे आत्मकर्तव्य आहे. त्यात हे काम करीत असतांना जनतेचे सहाय्य पोलीसांना अंत्यंत आवश्यक आहे. जनतेचे सहाय्याशिवाय पोलीस आपले काम योग्यरितीने करु शकत नाहीत. त्यामुळे जनतेने पोलीसांची संपर्क ठेवून आपल्या अडीअडचणी मांडाव्यात त्या दुरू करण्यासाठी आम्ही कठीबध्द आहोत. कायद्याला अंमलात आणणे यासाठीच माझी नियुक्ती झाली आहे. आणि हे काम करीत असतांना मी कोणत्याही अडचणीला घाबरणार नाही आणि मागे पाय ठेवणार नाही. नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्त्य करणाऱ्यांनी नांदेड जिल्ह्याची सिमा पाहून आणि या सिमेच्या आत गुन्हेगारी स्वच्छ करायचे काय? याचा विचार करुनच नांदेडच्या हद्दीत प्रवेश करावा असा निर्वाणीचा इशारा चंद्रकिशोर मिणा यांनीगुन्हेगारांना दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना अडचणीत आणणारे आणि पोलीसांचे नाव खाली पाहण्यास लावतील असे कृत्त्य करणारे कोणतेच काम नांदेड जिल्ह्यात आता होणार नाहीत असे मिणा म्हणाले.
अत्यंत पारदर्शकपणे पोलीसींग करणे हाच माझा उद्देश आहे. विशेष करून एखादा तक्रारदार पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याची तक्रार घेतली जात नाही. यावर माझ्या पोलीसांना मी योग्य सुचना देईल. शहरात आणि जिल्ह्यात वाहतूकीस असलेल्या समस्या आणि त्यावर होणाऱ्या उपाययोजना याचा अभ्यास करुन त्याला ही नियमित करण्याचा प्रयत्न करु. एका पत्रकाराने मटका आणि गुटखा याबाबत प्रश्न उपस्थित केला असता मिणा म्हणाले मटका आणि गुटखा सोबत सर्व बेकायदेशीर कामांवर निर्बंध आणण्यासाठी नांदेडची स्थानिक गुन्ह ेशाखा प्रयत्न करील पण त्यात एलसीबीकडून कांही निष्काळजीपणा झाला तर त्यासाठी एक स्वतंत्र पथक कार्यरत असेल. शहरात असलेले सीसीटीव्ही बंद असल्याच्या बाबत बोलतांना मिणा म्हणाले एखादी नवीन योजना उभारणीसाठी मदत मिळते, त्या योजनांना वित्त सहाय्य मिळते, त्या योजना उभ्या राहतात. पण दुर्देवाने त्या योजनांच्या देखभालीसाठी कोणताही निधी पोलीसांना उपलब्ध होत नसतो. त्यासाठी योग्य प्रयत्न केले जाते.
पोलीसांकडून जनतेला असलेल्या अपेक्षांवर बोलतांना मिणा म्हणाले पोलीस कांही सुपरमॅन नाही त्याच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत त्याला दिले जाणारे काम हे जास्त आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवर होता. म्हणून पोलीसांकडून असलेल्या आपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत. या पोलीसांच्या कमी संख्येवर, त्यांच्या कार्यक्षमतेवर केंद्र सरकारचे बी.पी.आर.एन.टी.हा विभाग नेहमी संशोधन करत असतो. पण त्यानंतरची वेगवेगळी कामे विविध कारणांनी प्रलंबित राहतात. त्याबाबत मला कांहीच बोलायचे नाहीत. मला देण्यात आलेल्या कायदा अंमलबजावणीचे काम योग्य व्हावे त्यासाठी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या संख्याबळावरच ते मला कसे चांगले करता येईल हे पहाणे माझी जवाबदारी आहे. जनतेने पोलीस विभागाचा वापर करावा आणि आपण पोलीसांच्या मदतीने कसे चांगल्यात चांगले जिवन जगू यावर भर द्यावा. एकंदरीतच सद्रक्षणाय खलनिग्रहनाय या पोलीस लोगोवर असलेल्या शब्दांचा अर्थ चंद्रकिशोर मिणा यांच्या बोलण्यातील प्रत्येक शब्दात जाणवत होता. कायदा हा सर्वांसाठी समान असून, जिल्ह्यात कायदा हातात घेवून गैरकृत्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, असा इशारा नांदेडचे नुतन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिला. चंद्रकिशोर मिणा हे 2006 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. प्रथम गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि अकोला या चार जिल्ह्यात काम करुन नांदेडला मराठवाड्यातील त्यांची पहिली नियुक्ती आहे. त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सोबतच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप गुरमे आणि नांदेड जिल्ह्याचे अनेक पोलीस यांच्या परिश्रमाने ही पत्रकार परिषद संपन्न झाली.