सज्जाचे भाडे न देता ११ वर्षे दप्तर गहान ठेवणारा तलाठी निलंबित

नायगाव बाजार, प्रभाकर लखपत्रेवार तलाठी सज्जाच्या कार्यालयाचे भाडे न देता तब्बल ११ वर्षे दप्तर गहान ठेवून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देवून आडवणूक करणारे वादग्रस्त तलाठी एस.ए. शिंदे यांना निलंबित केल्याने तहसिल कार्यालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर कामचुकर व वारंवार सुचना देवून सुध्दा उद्दीष्ट पुर्ण न करणारे आणखी काही तलाठी तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्या रडारवर असल्याची चर्चा होत आहे. 

नायगाव तालुक्यातील काही तलाठ्यांना राजाश्रय मिळाल्याने अशा तलांठ्यांची मोठ्या प्रमाणात मनमानी वाढली होती. पण आठ
महीण्यापुर्वी नायगाव येथे रुजू झालेले तहसिलदार काशीनाथ पाटील यांनी तलाठ्यांच्या रजाकारी कारभाराचा आढावा घेवून आपल्या कामात सुधारणा करण्याच्या कडक शब्दात सुचना दिल्या होत्या पण काही तलाठी सुधारण्याच्या मनस्थितीतच नसल्याने त्यांच्याबद्दल कठोर भुमिका घेण्यास सुरुवात केली असून. तलाठी सज्जाचे भाडे न देता तब्बल ११ वर्षे घरमालकाकडे दप्तर ठेवणा-या तलाठ्यास निलंबनाचा झटका दिला आहे.

नायघाव तालुक्यातील लालवंडी सज्जाचा पदभार असतांना तलाठी एस.ए. शिंदे यांनी नायगाव येथील व्यापारी जवादवार यांच्या घरी तलाठी सज्जासाठी भाड्याने खोली घेतली पण त्याचे भाडे न देता तब्बल ११ वर्षे लालवंडी येथील शेतक-यांचे दप्तर गहाण ठेवून तेथील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार केला. त्याचबरोबर सनस२०१६-१७ या वर्षात कोलंबी सज्जातंर्गत अल्प वसुली केली आहे. एन एल आर एम पी चे काम आजपर्यंत अपुर्ण आहे. त्यामुळे नायगाव तालुक्याचा संकलीत अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात अडचणी येत आहेत. एन एल आर एम पी सारखे अत्यंत महत्वाचे काम असतांना ते काम टाळण्यासाठी अर्जीत रजेवर गेले.रजा संपल्यानंतर रुजू झाले नाहीत अथवा रजा वाढवून न घेताच विनापरवानगी गैरहजर राहीले आहेत. विशेष बाब म्हणजे रजा कालावधीत कोलंबी सज्जाचा पदभार दुस-या तलाठ्याकडे सोपवण्याचे आदेश तहसिलदारांनी देवून सुध्दा पदभार दिला नाही अशा त्यामुळे शासकिय कामाप्रती निष्काळजीपणा ल बेजबाबदारपणा दाखवणे वरिष्ठांच्या आदेशाचा अनादर करणे आणि शासकीय कामामध्ये सचोटी न दाखविणे अदि ठपके ठेवत तलाठी शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिंदे यांच्या निलंबनानंतर असेच काही तलाठी तहसिलदारांच्या रडारवर असून त्यांनी आपल्या कामात सुधारणा न केल्यास त्यांनाही दणका बसू शकतो अशी चर्चा होत आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी