NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

गुरुवार, 30 जून 2016

जिल्ह्यात सरासरी 38.56 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी 38.56 मि.मी. पाऊस...
सहस्रकुंड धबधबा प्रचंड वेगाने वाहतोय


नांदेड(अनिल मादसवार) जिल्ह्यात गुरुवार 30 जून 2016 रोजी सकाळी  8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकुण 616.88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  38.56 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 212.95 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस अर्धापूर तालुक्यात झाला आहे. तर अजूनही जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरूच आहे. वरील पातळीवर झालेल्या पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रचंड वेगाने ओथंबून वाहत आहे. 

जिल्हयात गत 24 तासात सर्वाधिक पाऊस अर्धापूर तालुक्यात 107.33 ‍मिमी पडला असून त्याखालोखाल भोकर तालुक्यात 98.75 मिमी. तर हिमायतनगर तालुक्यात 76.00 मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गुरुवार 30 जून 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 38.50 (260.55), मुदखेड- 55.33 (142.33), अर्धापूर- 107.33 (246.66) , भोकर- 98.75 (338.50) , उमरी- 23.00 (129.67), कंधार- 6.33 (143.16), लोहा- 11.17 (208.48), किनवट- 44.86 (213.55), माहूर- 28.25 (238.50), हदगाव- 53.00 (302.83), हिमायतनगर- 76.00 (316.33), देगलूर- 6.50 (150.00), बिलोली - 17.00 (214.60), धर्माबाद- 31.00 (167.67), नायगाव- 13.00 (155.80), मुखेड- 6.86 (178.56) आज अखेर पावसाची सरासरी 212.95 ( चालू वर्षाचा एकूण पाऊस 3406.19) मिलीमीटर आहे. यात सर्वात जास्त पाऊस अर्धापूर, भोकर हिमायतनगर तालुक्यात झाला आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा जिल्हाभरात पावसाची संततधार सुरूच असून, कालच्या पावसाने आलेय पूर उतरल्याने सर्वच ठिकाणची वाहतूक पूर्ववत झाली आहे. तर जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्र्रकुंड धबधबा ओथंबून वाहू लागला असून, प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याच्या धारांचे फव्वारे पर्यटकांच्या अंगाला शहर आणत आहेत. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी, युवक, युवतींसह अनेक कुटुंब पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. 

मराठवाडा विभागात सरासरी 19.78 मि.मि. पाऊस 

मराठवाडा विभागात आज दि. 30 जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 19.78 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत हिंगोली जिल्हयात सर्वाधिक 61.55 मि.मी. पाऊस झाला. तर उस्मानाबाद जिल्हयात सर्वात कमी 0.88 मि.मि. पाऊस झाला. 

विभागात दि. 30 जून रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या एकूण सरासरी पावसाची आहे. औरंगाबाद 3.48 (79.58 ) जालना 25.49 (123.18 ) परभणी 23.39 (123.19 ) हिंगोली 61.55 (190.29) नांदेड 38.56 (212.82 ) बीड 2.39 (118.16) लातूर 2.48 (157.46 ) उस्मानाबाद 0.88 (127.09). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 97.0 तर वार्षिक सरासरीच्या 18.2 टक्के पाऊस झाला आहे.

सुधा प्रकल्प १००टक्के भरला

भोकरजवळील सुधा प्रकल्प १००टक्के भरला
पावसाच्या पाण्याने बोरगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान


भोकर (मनोजसिंह चौव्हा ण) बुधवारी दुपार पासुन सुरू झालेल्या पावसाने भोकर तालुक्यात सर्वात मोठा आसणारा सुधा प्रकल्प आणि कांडली येथील लघु तलाव १०० टक्के भरला आहेे. बोरगाव येथील ३५ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याने पिकांचे नुकसान झाले असून, दोन दिवसात  ९८•७५ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

भोकर शहरासह तालुक्यात मागील आठवडाभरापासुन रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय २९जूनच्या दुपारपासुन पावसाने दमदार हजेरी लावली रात्रीपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले भोकर तामसा रस्त्यावर आसलेल्या नदीला पुर आल्याने दिड वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती या परिसरात आसलेल्या बोरगावच्या नागनाथ घिसेवाड, साहेबराव लुंगारे, गणेश लुंगारे, बालाजी हुबेवाड, रामचंद्र बोटलेवाड, पांडुरंग जाधव, गोविंद जाधव, शंकर जाधव आनंदराव पाटील, सचिन पांचाळ यांच्यासह ३० ते३५ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जावुन पिकांचे नुकसान झाले. दिवशी येथील नदीला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहु लागल्याने पुलापलीकडे आसलेल्या शाळेत गेलेल्या विद्यार्थींना रात्रीला गावचा संपर्क तुटल्याने शाळेतच मुक्काम करावा लागला थेरबन येथील पाझर तलावही या पाण्यामुळे भरला आहे. आणि या भागातही पाणी शेतात आल्याने कांही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आसल्याची माहिती आहे पुरामुळे बोरगाव, दिवशी खु.जवळील पुलांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

भोकर तालुक्यातील धानोरा लघुतलावात ४२टक्के, आमठाणा तलावात२३टक्के तर इळेगांव, लामकाणी तलावात पाणी आले आहे सावरगांव पाझर तलावही पाण्याने भरत आहे. पावसाच्या पाण्याने कांहीं ठिकाणी नुकसान झाले असले तरी चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे जुन महिण्यात एकूण ३३७•७५मी. मी.पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात जुलै, आँगष्ट मध्ये १००टक्के भरणारा सुधा प्रकल्प मागील बारा वर्षानंतर पावसाळयाच्या प्रारंभीच म्हणजे यावर्षी जुन महिण्यात १००टक्के भरल्याची नोंद झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे शेख अजीज यांनी दिली. भोकर शहराला सुधा मधुनच पाणी पुरवठा करण्यात येतो १ जुनला या प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा होता मात्र आता हा प्रकल्प तुडूंब भरल्याने येत्या उन्हाळ्याच्या शेवटपर्यंतच भोकर शहराला भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

मनपा कर्मचारायची सुखरूप

आसनाच्या पुरात अडकलेल्या मनपा कर्मचारायची सुखरूप सुटका
नांदेड (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार व वरील पातळीवर झालेल्या दमदार पावसाने आसन नदीला पूर आला असून, या पुराच्या पाण्याने महानगर पालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पंपहाऊसला वेढा घातल्याने पाच कर्मचारी अडकले होते. सायंकाळी आपत्कालीन पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

नांदेड, परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे असणं नदी दुथडी भरून वाहत असून, नांदेड जवळील बंधार्यावरचे गेट बंद असल्याने चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या ठिकाणी कामावर आलेले पाणी पुरवठा विभागातील पाच कर्मचारी अडकून पडले. याबाबतची माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिका-यांना भ्रमणध्वनीवरुन दिली. तातडीने मनपाच्या अधिका-यांनी मनपाच्या अग्नीशमन दलासह एअरपोर्टच्या पथकाला सकाळी 8 वाजता अलर्ट करण्यात आले. सकाळी 8.30 च्या सुमारास सर्व साहित्यासह पथक आसना नदीजवळ पोचले. यानंतर लाईफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने या संयुक्त पथकाच्या कर्मचा-यांनी पंपहाऊस गाठले. त्या ठिकाणाहून या कर्मचाऱ्यांना दोरीच्या सहाय्याने कसरतीनंतर दुपारी पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर सर्वानि सुटकेचा निश्वास घेतला. आजचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. 

खरे पाहता पुरा स्थिती लक्षात घेऊन आसना नदीच्या पात्रात असलेल्या बंधा-याचे गेट उघडणे आवश्यक होते. परंतु याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे असणं नदी दुथड्या भरून वाहू लागली. तर बंधारा ओलांडून पाणी जात होते. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे बंधा-याच्या एका बाजूच्या भींतीचे मोठे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसल्याने शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पुरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना परिस्थिती योग्य रित्या हाताळून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशनमध्ये अग्नीशमन अधिकारी रईस पाशा, विक्की ठाकूर, सूर्यवंशी, पारधी आदींसह कर्मचा-यांनी सहभाग घेतला. 

शहर परिसरात आणि आसना नदीच्या वरच्या भागात दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरुच असल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर उड्डाण पुलावरून ये - जा करताना वाहनांची मोठी रीघ लागल्याचे दिसून आले आहे. 

शनिवार, 25 जून 2016

नदी - नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची हजारो हेकटर शेती खरडून गेली

सैराट पावसाने हजारो हेक्टर जमिनी खरडल्या... 
लागवडीचे बियाणे पूर्णतः नुकसानित  
घरात पाणी घुसल्याने अंशतः नुकसान 

हिमायतनगर (अनिल मादसवार) शुक्रवारी दुपारी झालेल्या तास भराच्या सैराट पावसामुळे तालुक्यातील नदी - नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची हजारो हेकटर शेती खरडून गेली आहे. तसेच लागवड केलेले बियाणे जमिनीत दबले असून, शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे अंशतः नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारांची महसूल विभागाने दखल घेतली असून, अनेक ठिकाणच्या नुकसानीची पाहणी मंडळ अधिकाऱ्यांनी केली असून, तात्काळ  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे व आर्थिक मदत मिळवून दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


गतवर्षी झालेल्या अल्प पावसाने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे, यावर्षी चांगला पाऊस असल्याचे सांगितले जात असल्याने मृग नक्षत्रात झालेल्या पहिल्याच पावसावर 90 टक्के शेतकऱ्यांनी कापूस लागवड, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडिदाची पेरणी केली. आता होणाऱ्या पावसाने भरघोस उत्पादन येईल आणि डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल या आशेने शेतकरी शेतात घाम गाळीत आहे. दरम्यान दि.24 शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सुसाटवारे व विजांच्या कडकडाटाने पावसाचे आगमन झाले. सुरू झालेल्या पावसाने गती वाढविली आणि बेभान होऊन धो.. धो ... बरसला. जवळपास तासभर झालेल्या या सैराट पावसाने हिमायतनगर शहर, बारसं बु, खडकी, बा, आंदेगाव, सिरंजणी, पळसपूर, डोल्हारी, घारापुर, टेभी, वडगाव ज, सवना ज, बोरगडी, धानोरा, पवना, मंगरूळ, वारंगटाकळी, टेभूणीं, पावनमारी, किरमगाव, वाघी, कामारी, दिघी, सिरपल्ली, कोठा ज. रेणापूर, एकंबा परिसरातील नदी नाले खळवळून वाहिले. तर अनेक तलाव तुंडुंब भरले असून, बंधारे ओसंडून वाहून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फोडीत जमीन खरडून गेल्या.    

जवळपास 100 मिलीमीटर झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टर नाले, नदी, बंधारे, तलावाच्या काठावरील शेत जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आल्याने पूर्णतः नुकसान झाले आहे. तर खडकी, आंदेगाव, पवना, हिमायतनगर या गावाला पावसाच्या पुराचा फटका बसल्याने सखल भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरून अंशतः नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झाली नसली तरी खडकी बा, घारापुर, आंदेगाव यासह अनेक गवानजीकच्या नाल्यामुळे हजारो हेक्टर शेतकऱ्यांची जमिनीतील बियाणे दबून, जमीन खरडून लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान पावसामुळे अनेक गावाचे रस्ते बंद पडले होते, हळू हळू पाणी कमी झाल्याने गावचे रस्ते पूर्ववत सुरु झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणच्या नाल्याच्या काठावरील नुकसान झाले याची पाहणी संबंधित तलाठी यांनी केली असून, सरसम बु. सज्जाचे मंडळ अधिकारी एम.व्ही, खंदारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल घेतला आहे. लवकरच हा अहवाल वरिष्ठकड़े पाठविणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. यावेळी खडकी बा. येथील शेतकरी तथा सरपंच गजानन यलकदरे, महाराष्ट्र राज्य महारथी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, पत्रकार कानबा पोपलवार, अनिल मादसवार, शेतकरी दिगंबर महाराज, देवराव पवार, नाथ रेखावार, रामराव कावळे, देविदास सूर्यवंशी, किशनराव पाटील, अरविंद भागात, सतीश नारखेडे, संदीप टकले, किशन ठाकरे, गणेश नारखेडे,लक्ष्मण सूर्यवंशी, किशन सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.       

सहस्र्रकुंड धबधबा ओथंबून वाहत आहे

काल झालेल्या मुसळधार पावसाने विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारा सहस्र्रकुंड धबधबा तिन्ही धारांनी ओथंबून वाहत आहे. हे निसर्गनिर्मित विहंगम दृश्य पाण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून येथे पोलीस चौकी उभारून पर्यटकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी जाणकार नागरीकातून व्यक्त केली जात आहे. छाया - अनिल मादसवार  


शुक्रवार, 24 जून 2016

पीक कर्जाबाबत उमरी-बाजार येथे शेतकऱ्यांशी साधला खुला संवाद

बँकांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दयावी - किशोर तिवारी 

नांदेड(अनिल मादसवार)पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज द्या. बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक  दयावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती  स्वावलंबन  मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज उमरी-बाजार (ता. किनवट) येथे बोलताना दिले. पीक कर्ज वेळेत मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमरी-बाजार येथील शेतकऱ्यांशी श्री. तिवारी यांनी मेळाव्यात खुला संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पीक विम्याबाबत पिकांचे कापणी अहवाल चुकीचे दिले असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, किनवटचे तहसिलदार शिवाजी राठोड, माहूरचे तहसिलदार अशिष बिरादार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, नाबार्डचे श्री. धुर्वे यांच्यासह विविध बँकाचे वरीष्ठ अधिकारी तसेच कृषि, पशुसंवर्धन, सहकार आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. तिवारी यांनी उमरी-बाजार  येथील उपस्थित शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. गौरी तांडा येथील जिवला नाईक, खंबाळ्याचे संतोष राठोड यांनी उमरी-बाजार परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने म्हणणे मांडले. उमरी-बाजार व परिसरातील शेतकऱ्यांना कर्ज व त्याचे पूनर्गठन करताना येणाऱ्या अडचणीची माहिती दिली. 

मेळाव्यात शेतकऱ्यांशी खुला संवाद साधताना श्री. तिवारी म्हणाले की, कर्ज पुरवठा करताना बँकानाही अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामध्ये मराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थिती गेली सलग काही वर्षे शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड न झाल्याने बिकट आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या बॅकेला लवकरच पुरेसा पतपुरवठा केला जाणार आहे. जोपर्यंत शेतीतून चांगले उत्पन्न मिळत नाही तोवर शेतकरी कर्जाच्या गर्तेतून बाहेर पडणार नाही याची सरकारला जाणीव आहे. पण काही बँका सरकारच्या आदेशाकडेही दुर्लक्ष करीत आहेत. अशा बँकामध्ये शासकीय ठेवी न ठेवता त्या शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकाकडे वळविण्यात याव्यात असेही श्री. तिवारी म्हणाले. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पुढच्या वर्षीपासून धोरणात अमुलाग्र बदल करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगून श्री. तिवारी म्हणाले की, बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी सन्मानाची वागणूक दयावी. त्यांचा सातबारा कोरा आहे, जे शेतकरी नव्या कर्जासाठी पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्यात यावे. बँकेच्या पतपुरवठ्याबाबतची स्थिती शेतकऱ्यांना समजावून दयावी. त्यासाठी शेतकऱ्यांशी, ग्रामसमित्यांशी संवाद वाढावा. शेतकऱ्याला सावकाराच्या दारातून मुक्त करण्याचा प्रयत्न आहे. सर्व शेतकरी बँकेशी जोडले जावेत असा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही सत्तेत आहोत असेही त्यांनी सांगितले. 

पिकविम्याबाबतच्या अडचणीबाबत श्री. तिवारी यांनी पीक कापणीचे अहवाल चुकीचे दिले गेले असल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असेही सांगितले. यावेळी श्री. तिवारी यांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ प्रभावीपणे आणि सर्व घटकांना पारदर्शकपणे देण्यात यावा, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी करावी,  ग्रामीण व कृषि भागासाठीच्या फीडर पेपरेशन व रोहीत्र बसवण्याबाबत वेळेत कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधीत यंत्रणांना दिले. बॅकांनी कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नयेत. स्टॅम्प ड्युटी, गहाण खत, सर्च रिपोर्ट अशा चक्रात शेतकऱ्यांना अडकवू नये, त्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध व्हावे असेही निर्देश दिले. मेळाव्यात डॉ. भारुड यांनीही मार्गदर्शन केले. उमरी-बाजार परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माहूर पंचायत समितीत कर्ज पूनर्गठनाबाबत बैठक संपन्न 
-----------------------------------------
माहूर  येथे  उपविभागीय स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक श्री. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत श्री. तिवारी यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठीची एक लाख रुपयाची मदत श्रीमती मालाबाई  दिगांबर राठोड यांना धनादेश स्वरुपात सुपूर्द करण्यात आली. बैठकीत उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यासह विविध बँकाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक तसेच महसूल, कृषि, सहकार, आरोग्य, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

माहूर ग्रामीण रुग्णालयास तिवारी यांची भेट 
------------------------
सायंकाळी  श्री. तिवारी यांनी ग्रामीण रुग्णालय माहूरला भेट देऊन तेथेही पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती. रुग्णालयातील सुविधा व तेथील यंत्रणांची माहिती घेऊन श्री. तिवारी यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. माहूर तीर्थस्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात भावीक, पर्यटक येत असल्याने या रुग्णालयात अत्यावश्यक बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर सुरु करण्यात यावे या मागणीबाबत आपण पाठपुरावा करु असेही श्री. तिवारी यांनी सांगितले. 

हळदीची लागवड


मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीची लागवड करत असून त्याप्रसंगाची आज विविध छायाचित्रे छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी कॅमेऱ्यात टिपली.

अग्रवाल बंधूस आठ महिन्याची शिक्षा

निकृष्ट दर्जाचा गुटखा बाळगल्या प्रकरणी 
अग्रवाल बंधूस आठ महिन्याची शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)निकृष्ट दर्जाचा व मानवाच्या शरीराला हानीकारक असणारा राजबाबू हा गुटखा बनावट असल्याची माहिती मिळताच छापा टाकून गुटखा नमुण्यासाठी पाठविण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी डी.टी. वसावे यांच्या न्यायालयात अग्रवाल बंधुस आठ महिन्याची सक्त मजूरी व प्रत्येकी हजार रूपये दंड ठोठावला आहे.

वजिराबाद भागातील मारवाडी धर्म शाळेच्या पाठिमागे शितल एजन्सी या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा गुटखा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. माहिती मिळताच प्रविण काळे व नंदू चंदू गायकवाड या पंचासह सदरील जागी छापा टाकून राजाबाबू या नावाच्या सहा पुड्या विकत घेऊन पुढील तपासासाठी अन्न व औषध विभागाकडे पाठवून देण्यात आल्या. या विभागाने या गुटख्याच्या पुड्यात मानवाच्या शरीरास हानीकारक पदार्थ असल्याचे सांगून यामध्ये 3.15 मॅग्नेशिएम कार्बोनेट हा घटक आढळून आला. या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश ओमप्रकाश अग्रवाल (वय 52 ) व दिनेश ओमप्रकाश अग्रवाल (वय 40) रा. वजिराबाद या दोघांविरूध्द 18 ऑक्टोबर 2006 रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. यात अन्न व औषध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (दि.24) मुख्य न्यायदंडाधिकारी डी.टी. वसावे यांच्या न्यायालयात झाली असता त्यांनी पुराव्याआधारे मुकेश ओमप्रकाश अग्रवाल व दिनेश ओमप्रकाश अग्रवाल यांना अन्न व औषध नियमानुसार आठ महिने सक्त मजूरी व एक हजार रूपये दंड तर अन्न व औषध कलमानुसार सहा महिने सक्त मजूरी व प्रत्येकी एक हजर रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावली लागणार असून दोन्ही बंधूस आठ महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी पक्षाकडून ऍड. एम.के. सय्यद, ऍड. देशमुख संजय यांनी काम पाहिले.

बुधवार, 22 जून 2016

अंदाजपत्रकाच्या बगल देत काम उरकण्याचा गुत्तेदाराचा सपाटा

काम पूर्ण होण्यापूर्वीच कामारीचा प्रधानमंत्री रस्ता उखडू लागला
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील मौजे खिरगाव ते कामारी हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत असून, अंदाजपत्रकाच्या बगल देऊन निकृष्ठ पद्धतीने काम उरकण्याचा सपाटा अभियंत्याशी हातमिळवणी करून गुत्तेदाराने लावला आहे. त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट अशी या रस्त्याची अवस्था होत आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला तर तर अर्धवट असलेल्या रस्ता वाहून जाण्याची शक्यता नागरीकातून वर्तविली जात आहे. 

मौजे खैरगाव - कामारी ते पिंपरी हा साडे सहा किलोमीटर लांबीचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे. सदरील रस्त्यासाठी अंदाजपत्रकीय किंमत ही 03 कोटी 84 लक्ष एवढी असून, शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावावर या कामाचे टेंडर घेण्यात आले आहे. या कंपनीच्या नावाखाली एक्लारे नामक गुत्तेदार हे नांदेडला राहून निर्मल नामक मुनिमाकरवी हे काम करून घेत आहे. त्यामुळे सदरचे काम हे अतिशय सुमार दर्जाचे होत असून, हार्ड मुरूम, हिरवा दगड व मातीच्या मुक्त वापर केला जात असल्याने पुढे काम चालू तर मागे हे काम उखडत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत परिसरातील अनेक जागरूक नागरिकांनी गुत्तेदाराच्या मुनिमास कामच दर्जा उत्तम व्हावा असे सुचविलेले असतं देखील नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत मनमानी पद्धतीने काम उरकून देयके उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावर वापरण्यासाठीचा मुरूम रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिशय खोल नाल्या खोदून माती व मुरूम वापरला असल्याचे आजूबाजूच्या शेतात जाणाऱ्या शेतकरी व जनावरांना खोल नाली पार करून जावे लागत आहे. यामुळे ह्या नाल्या जनावरे व माणसाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. साडेपाच मीटर सरसकट रुंदी असताना अनेक ठिकाणी केवळ 3 ते 4 मीटर रस्ता रुंद करण्यात आल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. राजकीय वराड हस्ते असलेल्या गुत्तेदाराच्या या कामाची उसाचा स्तरीय चौकशी करून गुणवत्ता पूर्ण काम झाल्यावरच देयके काढावीत अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

तूर्तास निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात असूनही काम झपाट्याने उरकण्याचा गुत्तेदाराचा सपाटा चालू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून निर्माण करण्यात येत असलेल्या रस्ता किती काळ टिकेल असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. कारण याच तालुक्यात मागील सह वर्षाच्या काळात करण्यात आलेले पानातप्रधान रस्ते वर्षातच उखडून मातीत मिसळले आज घडीला त्या रस्त्याची कोट्यवधी ऋवयाच्या निधीतून दुरुस्ती करण्यात येत आहे. त्याचा प्रमाणे याही रस्त्याची अवस्था होऊ नये अशीच अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत. 

शुक्रवार, 17 जून 2016

माकडाचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी

लाल माकडाचा उच्छादाणे 
मंगरूळचे गावकरी हैराण...
 
हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे मंगरूळ गावात गेल्या काही महिन्यापासून दोन लाल रंगाच्या माकडाने उच्छाद माडला आहे. दिवस बाहेर खेळणाऱ्या बालकांना मारहाण केल्याने अनेकजण जखमी झाले. तर खायला न देता हाकनार्यांची कपडे ओढणे, सामानाची नासधूस करण्याच्या प्रकाराने विशेषतः महिला वर्ग त्रस्त झाला आहे. या माकडांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करून गावकर्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी करूनही बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या तीन वर्षापूर्वी मंगरूळ येथे तीन माकडे वास्तव्यास आली आहेत. येथील एका जुन्या वाड्यात कोणीच राहत नाही, त्या ठिकाणी असलेल्या झाडे झुडपात राहून गावात फेर - फटका मारण्याची आपली वेळ ठरविलि आहे. दुपारी गावात कोणीही माणसे दिसेनासी झाली कि ते बाहेर पडत असून, बालके दिसल्यास त्यांना मारहाण करत आहेत. तसेच कुठे एखादी महिला काम करताना दिसली कि त्या घराच्या छतावरून उडी मारून घरातील साहित्याची नासधूस करणे, भाकर न देता हाकण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावर धावून येणे, काही वयस्कर नागरिकांना या माकडांनी मारहाण केली आहे. माकडाच्या धुमाकुळाने बालके, महिला, पुरुष हैराण झाले आहेत. यामुळे घरात एकट्या राहणाऱ्या महिला, बालक धजावत नसून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मंगरूळ गावात उच्छाद मांडलेल्या माकडाला पकडण्यासाठी जाळ्याचा पिंजरा लाऊन माकडास बंदिस्त करावे आणि त्यांना जंगलात सोडून नागरिकांना सुरक्षा देऊन संभाव्य धोका टाळावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सरपंचासह गावातील ५० ते ६० गावकर्यांनी केली होती. त्यावर वनविभागाचे काही कर्मचारी आले, परंतु माकडांचा माकडांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही साहित्य नसल्याने बंदोबस्त करण्यास त्यांना यश आले नाही. नुकतेच माकडांनी गावातील ओंकार संदीप पावडे, मोनिका विकास भंगे, शिवाजी माधव पावडे यांच्यासह अनेक बालकावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. माकडांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा यासाठी मागील आठवड्यात १० ते २० गावकर्यांनी हिमायतनगर येथील वनविभागाच्या कार्यालयात येउन केली होती. मात्र संबंधित बीटचे वनपाल व त्यांच्या कर्मचार्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे माकडाच्या उछादाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप संदीप पावडे या युवकासह मंगरूळ येथील अनेकांनी केला आहे.  

अधिकारी - कर्मचार्यांची टाळाटाळ 
---------------------
मागील सहा महिन्यापूर्वी असाच प्रकार खडकी बा, सरसम बु, गाव परिसरात घडला होता, यावेळी सुद्धा वनविभागाने बंदोबस्त करण्यास टाळाटाळ केली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर त्या वानरांच्या टोळीचा व माकडांचा बंदोबस्त करण्यात आला, हे सर्व श्रुत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची  कर्मचाऱ्यावर वचक नसल्याने वनविभागातील अधिकारी, कर्मचारी कर्तव्य पालनात कसूर करत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. 

बेश्रमामुळे पुराच्या धोक्याची शक्यता

नाला खोलीकरण व सरळीकरणासाठी १५ लाख
मंजूर होऊनही काम रखडले....
ओढ्यातील बेश्रमामुळे शहराला पुराच्या धोक्याची शक्यता
 
हिमायतनगर(अनिल मादसवार)रेल्वेस्थानक रस्त्यावरील शहरालगत असलेल्या ओढ्यात बेश्रमाच्या झाडांनी आक्रमण केल्यामुळे संपूर्ण नाला बेश्रममय झाला आहे. हि बाब लक्षात घेता गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण व सरळी करणासाठी जवळपास १५ लाख मंजूर होऊनही अद्याप काम रखडल्याने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन, शहराला पुराचा मोठा धोका बसण्याची शक्यता बळावली आहे. करिता तातडीने कामास सुरुवात करून पावसाळ्यापूर्वी बेशरमास हटउन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर शहर हे तेलंगाना - विदर्भाच्या सीमेवर आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या - जाण्याची नेहमीच वर्दळ असते, शहरात येणारा नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील मार्गावर मोठा ओढा आहे. याच ओढ्याच्या पुलावरून रेल्वे स्थानक, भोकर, हदगाव, नांदेडकडे जाण्याचा मार्ग आहे. येथील रेल्वे कोर्नर्वरिल ओढ्यात व संपूर्ण परिसराला बेश्रमाच्या झाडांनी व्यापले आहे. त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत बेश्रमाचीच हिरवीगार झाडे दिसत असून, याच नाल्याला पावसाळ्यात मोठापूर येउन संपूर्ण गावाला वेढा पडतो. याचा अनुभव सन २००६, २००८ च्या सालात झालेल्या अतिवृष्टीत वाहनधारक, नागरिक व शहरवासियांना आला होता. त्यावेळी तब्बल ५ ते ६ तास वाहतूक ठप्प झाली होती, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून वाहने वाहून जाऊन मोठे नुकसान सुद्धा झाले होते. 

यास कारण ठरले ते बेश्रामाने व्यापलेला परिसर कारण त्यामुळे पावसाचे पाणी थेट ओढ्यातून वाहून जाण्याऐवजी संपूर्ण परिसरात पसरून सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याच नाल्यात पाणी जमा राहून पुढे मार्ग नसल्याने शहरातील रहिम कॉलनी, उमर चौक, रुख्मिणी नगर, दत्तनगर परिसरातील नूतन वस्तीत शिरले होते. त्यामुळे तोच प्रकार एकदम येणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसामुळे घडू शकतो. तेंव्हा आगामी काळात उद्भवणाऱ्या पावसाच्या पाण्यापासूनच शहराचा धोका टाळण्यासाठी जिल्हा  प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जुन्या जानकारानि व्यक्त केली होती. हे लक्षात घेऊन तून व्यक्त होत आहे. विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे शहरवासीय व प्रवाशी वर्गातून संधान मानले जात होते, परंतु अद्याप नाला सरळीकरणाचे काम झाले नसल्याने कृषी विभागाच्या चालढकल कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

याबाबत तालुका कृषी अधिकारी बी.बी.दावलबाजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, या कामास तांत्रिक मंजुरी मिळाली होती, त्यामुळे कामाचा शुभारंभ केला. परंतु प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याने काम रद्द झाले आहे, सदरची कामे आमच्या कार्यालयामार्फत होणार नसून,  यासाठी लघु पाठबंधारे जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांनी प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा केल्यास हे काम मार्गी लागू शकते असे त्यांनी सांगितले.

शुभारंभ होऊन वर्ष लोटले.. काम मात्र झालेच नाही...!
--------------------------
जलसंधारण व कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पावसाची पाणी जमिनीत झिरपून पाणी पातळी वाढविण्यासाठी आणि रेल्वे स्थानकाला जाणार्या नागरिकांना दुर्गंधीपासून कायमची मुक्ती देण्यासाठी नाल्याची दुरुस्ती व बेशरमाचा वेढा काढण्यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर झाला होता. याच निधीतून तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत नाला खोलीकरण व सरळीकरणाची जवळपास ३ मीटर खोली, ६०० मीटर लांबी आणि १३ मीटर रुंदीचे कामाचा शुभारंभ दि.१६ में २०१५ रोजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते झाला होता. यावेळी नाला सरळीकरणाचे काम करताना आजू - बाजूच्या लोकांचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि काम तातडीने पूर्ण करून संभाव्य धोका टाळावा अश्या सूचना तालुका कृषी अधिकारी दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषी पर्यवेक्षक पवार, लखमोड यांना दिल्या होत्या. 

शिष्टमंडळ घेणार आज खासदारांची भेट

हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावे राष्ट्रीय
महामार्गापासून वंचित राहणार

हिमायतनगर(प्रतिनिधी)खा.राजीव सातव यांनी अर्धापूर - माहूरला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून दिल्याचे समजताच हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना आनंद झाला आहे. परंतु सदरचा मार्ग चुकीच्या मार्गाने जात असून यात बदल करून हिमायतनगर - पळसपूर - डोल्हारी - बदली - सिरपल्ली - गांजेगाव - ढाणकी - माहूर असा मंजूर करावी या मागणीसाठी प्रमुख नागरिकांचे शिष्टमंडळ दि.१८ शनिवारी खासदारांची भेट घेणार आहेत. यावरही तोडगा न निघाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब केला जाइल असेही नागरिकांनी सांगितले.
 
गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यानी दिलेल्या माहितीनुसार अर्धापूर - माहूर या १३० किलो मीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी २९० कोटीचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले होते. सदर महामार्ग अर्धापूर - तामसा - आष्टी - जवळगाव - सोनारी फाटा - हिमायतनगर - बोरी - ढाणकी मार्गे माहूर असा जाणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरु होणार असल्याने, हा मार्ग मंजूर होऊन काम झाल्यास हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावे रस्त्यापासून वंचित राहणार आहेत. हा प्रकार लक्षात आणून देण्यासाठी दि.१८ रोजी काही गावच्या नागरिकांचे शिष्टमंडळ हे खा.राजीव सातव यांची भेट घेणार असून, या संबंधीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वरील मार्ग ऐवजी हिमायतनगर - पळसपूर - डोल्हारी - बुदली - सिरपल्ली - गांजेगाव - ढाणकी - माहूर असा मंजूर करून करण्यात यावा अशी मागणी करणार आहेत. या भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ढाणकी हे शहर हिमायतनगरहून केवळ १८ की. मी. अंतरावर आहे. या मार्गावरून सध्या एस टी महामंडळाच्या ९ ते १० फेर्या होत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक रेल्वे प्रवासाचा लाभही गेट आहेत. नांदेड शहरासह मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद, तिरुपती, निझामाबाद अश्या मोठ्या शहराला हा मार्ग जोडला जाऊ शकतो. तसेच हा रस्ता झाल्यास एस.टी.महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन हिमायतनगर - ढाणकी - उमरखेड - माहूर या बाजारपेठेचे नावलौकिक होईल. मराठवाडा - विदर्भातील बाजारपेठेत दळण वळणासाठी सोयीस्कर मार्ग होईल. त्यामुळे तालुक्याची रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता हा रस्ता झाल्यास या मार्गावरील अनेक गावे नावारूपास येतील यासाठी पळसपूर -  डोल्हारी - बदली - सिरपल्ली येथील नागरिकांचे शिष्टमंडळ खा.राजीव सातव यांची भेट घेऊन मार्गात बदल करण्याची विनंती करणार आहेत. हा मार्ग मंजूर न झाल्यास या परिसरातील नागरिक, जनता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे मदनराव पाटील, तुकाराम देवसरकर, विठ्ठलराव वानखेडे, डॉ.प्रकाश वानखेडे, किशनराव वानखेडे, बळीराम राउत, चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, यांच्यासह अनेकांनी सांगितले आहे.

कर आकारणी करा

मोकळे भुखंड व नव्याने बांधकाम झालेल्या
इमारतीची कर आकारणी करा 

नविन नांदेड(प्रतिनिधी)नावामनपाच्या क्षेत्रीय कार्यालय ड अंतर्गत मधील मोकळे भुखंड व नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीची कर आकारणी करुन सादर करावे असे आदेश क्षेत्रीय कार्यालयातील सर्व वसुली लिपीक व कर निरीक्षक यांना सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी दिले आहे. 

नांदेड वाघाळा क्षेत्रीय कार्यालय ड अंतर्गत जवळपास आठरा हाजार एकोन्नव्वद मालमत्ता धारक असुन 15-16 ची मालमत्ता बारा कोटी सहासष्ट लक्ष रुपये मालमत्ता कर रुपये बाकी आहे. नव्यानेच कार्यालयात रुजू झालेले सहाय्यक आयुक्त संजय जाधव व कार्यालय अधिक्षक बंडोपंत उत्तरवार यांनी कार्यालय अंतर्गत असलेल्या अनाधिकृत बांधकाम व मंजुर नकाशा विरुध्द बांधकाम केलेले आशा मालमत्ता धारकांना मालमत्ता करासोबत अनाधिकृत बांधकाम शास्ती लावली आहे. अशा मालमत्ता धारकांनी फक्त मालमत्ता कराचा भरना केला आहे. पण अनाधिकृत बांधकाम शास्तीचा भरणा न करता थकबाकी ठेवली आहे. अशा थकबाकी धारकांना अनाधिकृत शास्तीचा भरणा करणे बंधनकारक असून अनाधिकृत बांधकाम शास्ती भरावीच लागणार आहे. अनाधिकृत शास्ती रद्द होणार नाही. मालमत्ताधारकांना सन 15-16 च्या मालमत्ता कराच्या नोटीसा कार्यालयाअंतर्गत 13 वसूली बिल लिपीकामार्फत वाटप करण्यात आले असून मालमत्ता धारकांनी अनाधिकृत शास्तीसह मालमत्ता कर भरुण प्रशासनास सहकार्य करावे. असे अवाहन केले असून मोकळे भुखंड व नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीच्या कर आकारणी करुन सादर करण्याचे कर निरीक्षक व वसुली लिपीक यांना आदेश दिले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून थकबाकी व अनाधिकृत बांधकामाची शास्ती न भरलेल्या व नव्याने बांधकाम केलेल्या मालमत्ता धारकात आता खळबळ उडाली असून मालमत्ता कर हा भरवाच लागणार आहे. अन्यथा मनपा प्रशासन नियमानुसार कार्यवाही करणारच असल्याचे समजते. 

आयआयटीत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय सिडकोचे यश 
नविन नांदेड(प्रतिनिधी)जनता शिक्षण प्रसारक मंडळ, उमरदरी संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, सिडकोमधील दोन विद्यार्थ्यांनी आयआयटी परिक्षेतील रँक संपादन करुन उत्तुंग यश मिळविले आहे. 

विज्ञान शाखेतील विद्यार्थी कु.श्र्वेता प्रकाश इंगेवाड आयआयटी रँक 277 व शिवराज प्रकाशराव पल्लेवाड आयआयटी रँक 473 हे आयआयटी परिक्षेत वरील रँक संपादन करत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरीचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या प्राचार्या सौ.के.पी. पल्लेवाड, उपप्राचार्य आर.एस.जाधव, पर्यवेक्षक ए.एस.लघुळे, प्रा.व्ही.के.हंगरगेकर, प्रा.एस.व्ही.जाधवव् व सर्व प्राध्यापक वृंदांनी अभिनंदन केले आहे. 

कर्ज पुनर्गठन - वाटपा बाबत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
ताबडतोब कर्ज उपलब्ध व्हावे – पालकमंत्री रावते


नांदेड(अनिल मादसवार)पीक कर्जाचे पुनर्गठन आणि नव्याने कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची सांगड घालून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज मिळेल यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिले. बँकांनी पिककर्ज आणि पिकविमा यांच्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून  त्यांना आधार द्यावा, असे आवाहनही श्री. रावते यांनी केले. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप  आणि  कर्ज पुनर्गठनाबाबतची आढावा बैठक श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली. बैठकीस सर्वश्री आमदार सुभाष साबणे, डी. पी. सावंत, वसंत चव्हाण, प्रदीप नाईक, प्रताप पाटील-चिखलीकर, हेमंत पाटील, नागेश पाटील-आष्टीकर, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, सहकार उपनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे,  विविध विभागांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खासगी व्यापारी तसेच सहकारी आदी  बँकाचे अधिकारी प्रतिनिधींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील  पीक कर्ज पुनर्गठन व नव्याने कर्ज वाटपाचा पालकमंत्री श्री. रावते यांनी सर्वंकष आढावा घेतला. आढाव्यानंतर मार्गदर्शन करताना व निर्देश देताना श्री. रावते म्हणाले की,  दुर्दैवाने यंदाही पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. मराठवाड्यात आणखी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. पावसाकडे आशेने डोळे लावून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज पुनर्गठन आणि नव्याने पीक कर्जाच्या वाटपाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी पुनर्गठनाची प्रक्रिया आणि नव्याने पीक कर्ज वाटप याबाबत सांगड घालण्याची गरज आहे. पात्र शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज वाटप व्हावे यासाठी, पुनगर्ठनाच्या प्रक्रिया चालू ठेवून सोबतच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मदत व्हावी म्हणून नवीन कर्ज वाटपासाठीही प्रयत्न व्हावेत. पात्र शेतकऱ्यांना टप्प्या–टप्प्याने काही रक्कम उपयोगी पडेल अशा पद्धतीने कर्जाच्या रुपाने वितरीत व्हावी. जेणेकरून त्यांची हंगामासाठीची गरज तातडीने पुर्ण होईल. शेतकरी बँकेत येतील, असा विचार न करता, बँकांनी दत्तक गावात आपणहून पोहचावे. अधिकाऱ्यांना पाठवावे आणि कर्ज प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी.

यावेळी पालकमंत्री श्री. रावते यांनी कर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या बँका, तसेच कर्ज आणि पिकविम्याबाबत मध्यस्थ आणि गैरप्रकार यांची गांभीर्याने दखल घेण्याचे निर्देशही दिले. पुनर्गठन आणि नव्याने कर्ज याबाबत आमदार तसेच बँकाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आठवडाभरात बैठक घेऊन आढावा घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कर्ज पुनर्गठन आणि कर्ज वाटप यांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याबाबत स्वयंस्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे याबाबत  वारंवार आढावा घेऊन आणि कार्यवाही न करणाऱ्या बँकाबाबत त्यांच्या संनियंत्रण यंत्रणांना अवगत  करण्यात  येणार  असल्याचेही  श्री. रावते यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित लोकप्रतिनीधींनी विविध मुद्दे उपस्थित केले. पुनर्गठन, कर्ज वाटप तसेच पिकविमा यांच्या अनुषंगाने बँकाच्या प्रतिसादाबाबत ताशेरेही ओढले. काही उपयुक्त सूचनाही त्यांना बैठकीत मांडल्या. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज, विमा आदींबाबत माहिती बैठकीत सादर केली. 

गुरुवार, 16 जून 2016

शिक्षकांसाठी उपोषणाचा इशारा

शिक्षकांची रिक्त पदे भर अन्यथा उपोषण करणार - काळे


हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील जी.प.केंद्रीय कन्या शाळेत रिक्त असलेले शिक्षकांची पदे त्वरित भरवते अन्यथा शाळेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर काळे यांनी दिला आहे. 

कन्या शाळा येथे वर्ग पहिली ते सातवी मराठी मध्यम व वर्ग पहिले ते चौथी पर्यंत उर्दू माध्यमाची शाळा भरविली जाते. मराठी माध्यमासाठी व उर्दी माध्यमाची एकूण विद्यार्थी संख्या जवळपास ६५५ आहे. यात मराठी माध्यमाच्या शिक्षकांची ५ पदे रिक्त असून, उर्दू विभागाचा कारभार मात्र एकाच शिक्षकावर असल्याने विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षांची रुची कमी होत असून, विद्यार्थ्यांचा कल खाजगी शैक्षणिक संस्थांकडे वाढत आहे. अपुर्या शिक्षक अभावी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता अभियान म्हणजे केवळ पोकळ बांबू ठरत आहे. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे तत्काळ भरवित अन्यथा पालक समवेत शाळेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर काळे यांनी गटशिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

याबाबत गटशिक्षण अधिकारी संगपवाड यांच्याशी संपर्क साधला असता या शाळेवर पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त असून, उर्वरित प्राथमिक शिक्षकाची सर्व पदे भरली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात केवळ 9 टक्के पाणीसाठा

राज्यात केवळ 9 टक्के पाणीसाठा शिल्लक,
बारा हजार गावे-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

राज्याच्या जलाशयातील एकूण उपयुक्त साठा केवळ 9 टक्के इतका शिल्लक असून पाणी टंचाईने भेडसावणाऱ्या 4989 गावे आणि 7939 वाड्यांना 6140 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

धरणात 9 टक्के पाणी साठा
------------------------
राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत आज (16 जून) केवळ 9 टक्के साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच सुमारास 16 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे- मराठवाडा-1 टक्के (5), कोकण-29 टक्के (30), नागपूर-17 टक्के (18), अमरावती-10 टक्के (23), नाशिक-9 टक्के (16) आणि पुणे-7 टक्के (18).

तेरा हजार गावे-वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा
-------------------------------
राज्यातील 4989 गावे आणि 7939 वाड्यांना दि. 13 जून पर्यंत 6140 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील 2956 गावे आणि 1027 वाड्यांचा समावेश असून त्यांना 4003 टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

रोहयोच्या कामावर सात लाख मजूर
----------------------
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात 13 जून पर्यंत 40 हजार 443 कामे सुरू असून या कामांवर 6 लाख 90 हजार 925 मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात 4 लाख 17 हजार 147 कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता 1241.14 लाख एवढी आहे.

राज्यातील चारा छावण्यांमध्ये घट
---------------------------
राज्यातील काही भागांत पाऊस पडल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. त्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांच्या संख्येत घट झाली आहे. बीड जिल्ह्यात 43, उस्मानाबाद 23, अहमदनगर 35, लातूर 5आणि परभणी 1 याप्रमाणे 8 जून अखेर एकूण 108 चारा छावण्या सुरु असून त्यात लहान मोठी अशी एकूण 1 लाख 1 हजार 750 जनावरे आहेत.

राज्यात दुष्काळाची तीव्रता जास्त असताना म्हणजे मे महिन्याच्या मध्यात राज्यासाठी एकूण 435 चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील 398 चारा छावण्या सुरु झाल्या होत्या. त्यामध्ये बीड 272, उस्मानाबाद 89, अहमदनगर 31, लातूर 6 अशा छावण्यांचा समावेश. या छावण्यांमध्ये 3 लाख 91 हजार 667 मोठ्या आणि 32 हजार 712 लहान जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय करण्यात आली होती.

खत व बियाण्यांची पुरेसी उपलब्धता
----------------------
राज्यात खरीप हंगामासाठी 43.75 लाख मे.टन खतांची मागणी असून 40.25 लाख मे.टन एवढ्या खतांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय केंद्र शासनाने राज्यासाठी युरिया खताचे एकूण 0.50 लाख मे.टन वाढीव राखीव आवंटन मंजूर केले आहे. खरीप-2015 मधील खत वापराच्या तुलनेत यावेळच्या मागणीचे प्रमाण 26 टक्क्यांनी जास्त आहे. खरीप हंगामातील अपेक्षित क्षेत्र, मागील तीन वर्षाची सरासरी विक्री आणि बियाणे बदल दर यानुसार पिकनिहाय बियाण्याची गरज निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खाजगी क्षेत्राकडे उपलब्ध असणाऱ्या बियाण्याची माहिती घेऊन नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी 14.99 लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून त्या तुलनेत 17.90 लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता आहे.

बुधवार, 15 जून 2016

बांधकाम विभागाचे कार्यालय कुचकामी

अधिकारी - कर्मचार्या अभावी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ठरत आहे कुचकामी

हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले. परंतु सदरील कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नसल्याने हे कार्यालय बिनकामाचे झाले असल्याचे बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत येणाऱ्या हिमायतनगर कार्यालयाच्या कार्यक्षेत्र अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. पूर्वी सदरील कार्यालयाचा कारभार किनवट व हदगाव येथे जोडण्यात आलेल्या अधिकार्य अंतर्गत चालविला जात होता. परंतु हिमायतनगर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र व मागास क्षेत्र जास्त असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हिमायतनगर येथे असलेल्या विश्राम ग्रहात गेल्या वर्षी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियानात कार्यालय थाटले. परंतु स्थापणेपासून आजवर या कार्यालयात कायमस्वरूपी उपाभियांता हे पद भरलेले नाही. ना कर्मचार्यांची पदे भरल्या गेली, केवळ दोन कर्मचारी एक मजूर व एका शाखा अभियंत्याच्या खांद्यावर सदरील कार्यालयाचा बोजा आहे. हे कार्यालय म्हणजे असून ओळंबा तर नसून खोळंबा अशी अवस्था गुत्तेदारी करणाऱ्यांची झाली आहे.

सध्या स्थितीत उपभियांता पदाचा प्रभार माहूर येथील अभियंत्याकडे असल्याचे सांगण्यात येत असले तरी हि माहिती विश्वसनीय नाही. परिणामी शासनाची कोट्यावधी रुपयाची कामे करणाऱ्या गुत्तेदारांचे अधिकारी नसल्याने फावत आहे. येथील अधिकाऱ्या अभावी विकास कामाचा दर्जा ढासळत चालला असून, निधीचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. 
लोकप्रतिनिधीची उदासीनता 
------------------
उपविभाग स्थापन होऊन वर्ष लोटले असतानाही सदरील कार्यालयात मान्य पदे भरण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने वरिष्ठ कार्यालयाकडे आग्रह धरल्याचे ऐकिवात नाही. यासंदर्भात सर्वच लोकप्रतिनिधीची उससिनता स्पष्ट दिसून येते. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाची गुत्तेदारी करणरे बहुतांशी राजकीय कार्यकर्ते किंवा अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधी आहेत. अभियानात प्रत्यक्ष कामावर गुत्तेदाराना नकोच असतो त्यामुळे कदाचित सदरील कार्यालयात अधिकार्याची रिक्त पदे भारने लोकप्रतिनिधी टाळत असावेत अशी चर्चा विकास प्रेमी नागरिक करीत आहेत.

वैरण व पशु खाद्य योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कडबा कुट्टी वितरण

हिमायतनगर (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या वैरण व पशु खाद्य विकास योजना सन २०१६-१७ अंतर्गत दोन हॉर्स पॉवर शक्तीचे कडबा कुट्टी यंत्राचे वितरण बुधवार दि.१५ रोजी करण्यात आले आहे.

येथील पशु वैद्यकीय दवाखाना येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजता येथील पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड यांच्या हस्ते ६ पात्र लाभार्थ्यांना कडब कुट्टी देण्यात आली. यात मारोती गुम्मडवाड बोरगडी, गणेश सूर्यवंशी पोटा बु, किशन येरेकाकामारी, संजय काईतवाड बोरगडी, प्रदीप वानखेडे पळसपूर तर मंगरूळ येथील बबन खंदारे या लाभार्थ्यांचा समावेश आहे. कडबा कुट्टी वितरण प्रसंगी पशुधन विकास अधिकारी धनंजय मादळे, डॉ.लोखंडे, माघाडे, कदम काशिनाथ बोयेवार, मीना उट्टलवाड, सत्यजित कौठेकर, रवींद्र घुंगरे, आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी, लाभार्थी उपस्थित होते.       

आयुर्वेदाद्वारे भारतीय चिकीत्सा प्रणाली

आयुर्वेदाद्वारे भारतीय चिकीत्सा प्रणालीच्या
समृद्धतेसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न व्हावेत - नड्डा 
 
नांदेड (प्रतिनिधी) आयुर्वेदाद्वारे भारतीय चिकीत्सा प्रणाली समृद्ध करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या प्रणालीतील तज्ञ्जांनी आणि अभ्यासकांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाशनड्डायांनी आज येथे केले. येथील आयुर्वेद शासकीय महाविद्यालय व रसशाळा विभागास श्री. नड्डा यांनी भेट दिली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार रामविचार नेताम, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. बी. एच. श्यामकुंवर, संतुकराव हंबर्डे, डॅा. धनाजीराव देशमुख, डॅा. अजित गोपछडे, डॅा. यशवंत पाटील, डॅा. विरेंद्र तळेगांवकर यांची उपस्थिती होती.

मार्गदर्शनपर भाषणात श्री. नड्डा पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद चिकीत्सा प्रणालीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी आयुष विभाग स्वतंत्र करण्यात आला व त्यासाठी आर्थिक तरतूदही स्वतंत्र आणि मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. भारतीय चिकित्सा प्रणालातील या महत्त्वपुर्ण प्रणालीला आणखी बळकट करण्याची जबाबदारी या प्रणालीत काम करणाऱ्यांकडेच येते. या वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनीच या प्रणालीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या चिकीत्सा, रोग-निदान उपचार आदी प्रक्रियांच्या नोंदी ठेवणे, त्याबाबतचे संशोधन यांचे दस्तऐवजीकरण करणे यावर भर द्यावा लागेल. शास्त्रीय पद्धतीने नोंदी ठेवण्याने, त्याबाबत संशोधनात्मक महत्त्व वाढते. आयुर्वेद वैद्यकशास्त्रामध्ये पंचकर्म सारखे महत्त्वाची उपचार पद्धती आहे. अशा महत्त्वपुर्ण उपचार पद्धतींमुळे आयुर्वेद समृद्ध आहे. ती आणखी समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय योगविद्येला जागतीकस्तरावर सन्मान प्राप्त होत असल्याचेही श्री. नड्डा यांनी सांगितले.

सुरवातीला धन्वंतरी पूजन झाले. मधुमेहावरील उपचार क्षेत्रात ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॅा. विरेंद तळेगावकर यांच्यासह आरोग्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या डॅा. यशवंत पाटील, डॅा. अजित गोपछडे यांचाही मंत्री श्री. नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. श्यामकुंवर यांनी प्रास्ताविक केले. डॅा. जातवेद पवार यांनी सुत्रसंचालन केले. डॅा. विजय उखळकर यांनी आभार मानले, डॅा. मंगेश नळकांडे यांनी पसायदान सादर केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक आदींची उपस्थिती होती.

समाजानेही त्यांना आधार द्यावा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी समाजाचीही - देवेंद्र फडणवीस

पुणे(प्रतिनिधी)आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी जे जे करता येईल ते ते शासन करीत आहेचमात्र ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजानेही त्यांना आधार देण्यासाठी पुढे यावेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत शैक्षणिक संस्थेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 700 मुले-मुली व मेळघाट व ठाणे परिसरातील 300 आदिवासी मुलांचा प्रवेशानिमित्त स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेखासदार सर्वश्री अजय संचेतीशिवाजीराव आढळराव- पाटील,अनिल शिरोळेआमदार सर्वश्री बाबुराव पाचर्णेजगदीश मुळीकमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था आदी यावेळी उपस्थित होते. एकीकडे पाश्चात्य समाजामध्ये सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ असा विचार आहेअसे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीआपल्या समाजात मात्र वसुधैव कुटुंबकम्अशी सर्वसमावेशक भूमिका पूर्वीपासूनच आहे. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जगेल आणि त्याची जगण्याची व्यवस्था समाज करेल अशा प्रकारच्या मानसिकतेतून आपल्या संस्कृतीचा विकास झालेला आहे. या भावनेतून पुढे आल्यास समाज किती भक्कमपणे काम करु शकतो हे समोर येते.
गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात झालेल्या अल्प पावसामुळे खूपच गंभीर परिस्थिती उद्भवली. राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करीत आहे. मात्रआपत्तीचं स्वरुपच मोठे असल्यास समाजानेही शासनाच्या हातात हात घालून काम केल्यास आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळून त्यांना जगण्याची नवी उमेद मिळू शकेल. विदर्भात शेतकरी मोठ्या नैराश्यात असताना यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी कुटुंबियांसाठी बळीराजा चेतना अभियान’ राबविले होते. त्याचा परिणाम म्हणून गेल्यावर्षीपेक्षा 50 टक्क्यांहून आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र सर्वत्रच आत्महत्या कमी  व  बंद कशा होतील यादृष्टीने शासनाच काम राहणार आहे. लहरी पावसावर अवलंबून राहणारी शेती हे केवळ आसमानी नाही तर सुलतानीही संकट आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देऊ शकलो नाहीत्यामुळे ते नैराश्यात गेले. मात्र गेल्या दीड- दोन वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे खेडोपाडी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण झाले आहेत. त्यांचा उपयोग करुन शेतकरी आपल्या बळावर स्वत:च्या संसाराचा गाडा हिमतीने हाकू शकतो. जलयुक्त शिवार योजनेचे यश शेतकरीसमाजाच्या लक्षात आल्याने ही केवळ शासनाची योजना न राहता लोकचळवळ झाली आणि चांगले काम होत आहे.
आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या व त्यातील मुलांच्या पुनर्वसनासाठी शासन प्रयत्न करत आहेच. मात्र भारतीय जैन संघटना व अशाच संघटना करीत असलेल्या प्रयत्नांमुळे या मुलांना मोठे बळ मिळणार आहे. या मुलांनी मोठे ध्येय ठेवले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून मोठे व्हावे. त्यातून आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही अशा प्रकारचे मोठे कार्य करुन दाखवण्याची जिद्द बाळगा,असा संदेशही फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांना दिला. पालकत्व गमावलेल्या मुलांची जबाबदारी स्वीकारणे हे समाजाचे कर्तव्य ठरते. शांतीलाल मुथ्था यांनी समाजाची भूमिका स्वीकारुन या मुलांचीकुटुंबाची जबाबदारी एक पित्याच्या रुपात स्वीकारलीहे त्यांचे मोठे कार्य आहेअसे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले कीशिक्षणासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. विद्यार्थी फी सवलतहजारो विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्याची योजना असो किंवा सर्व मागासवर्गीय समाजघटकांतील मुलांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ अशा प्रकारे सर्वच घटकात शिक्षण पोहोचावे म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. श्री. मुथ्था यांनी केलेले कार्यही भरीव आहे. किल्लारी भूकंपग्रस्तांसाठी शाळा,आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पुनर्वसनगुजरात भूकंपावेळी तेथे जाऊन शेकडो शाळांचे बांधकाम,त्सुनामी आलेल्या तामिळनाडू आदी भागात जाऊन तेथील शाळांचे बांधकाम असे त्यांचे काम समाजासाठी एक आदर्श आहेअसेही ते म्हणाले.
अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या कीबीजेएस ने प्रत्यक्ष कृतीतून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार दिला. येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शेतीचेही ज्ञान देण्यात यावेजेणेकरुन शेतीबद्दल नकारात्मक भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाहीअशी सूचनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.शांतीलाल मुथ्था यांनी प्रास्ताविकात बीजेएस विषयी माहिती देताना सांगितले कीसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी राज्यातील 26 जिल्ह्यात सर्वेक्षण करुन चालू शैक्षणिक वर्षात 900 हून अधिक मुलांना शाळेत दाखल करुन घेतले आहे. अजूनही 1 जुलैपर्यंत 100 पेक्षा जास्त मुलांचे प्रवेश होतील.  संस्थेत आदिवासी भागातीलनक्षलग्रस्त भागातीलजम्मू काश्मिर भूकंपग्रस्तजबलपूर भूकंपग्रस्त मुलांचेही शिक्षण झाले आहे.
आत्महत्येसाठी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागणारी बीड जिल्ह्यातील महिला अनिता देवकुळे व त्यांच्या तीन मुली नम्रतासिमरन आणि सोनाली यांचे पालकत्व बीजेएस ने स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. श्रीमती देवकुळे यांना सेवक म्हणून संस्थेत नोकरी देण्यात आली. सर्व एक हजार मुलांचे शिक्षणासाठी प्रवेश प्रतिकात्मक स्वरुपात श्रीमती देवकुळे यांच्या तीनही मुलींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश देऊन करण्यात आले. 90 टक्क्याहून अधिक गुण मिळालेल्या नयन जगदाळेवैष्णवी कारंजे आणि आदिवासी समाजातील उमेश भंडारेतसेच चित्रपटात मुख्य भूमिका मिळालेला विद्यार्थी साईनाथ मोदनकर आणि सहायकाची भूमिका मिळालेला सौरभ कदम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अमृता फडणवीस यांनी विविध चित्रपटात कामासाठी मिळालेल्या मानधनाची रक्कम वंचित मुलांच्या शिक्षणासाठी यावेळी संस्थेला सूपूर्द केली.यावेळी खासदार अजय संचेती आणि आढळराव- पाटील यांचेही भाषण झाले. वाघोलीच्या सरपंच संजीवनी वाघमारेबीजेएसचे पदाधिकारीप्राचार्यमुख्याध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.

डॅा. शंकरराव चव्हाण रुग्णालयात अत्याधुनिक सी.टी. स्कॅन

आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापुर्ण सुविधा
क्षमता वाढीसाठी सरकारकटीबद्ध - नड्डा


नांदेड (अनिल मादसवार) आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापुर्ण सुविधा आणि त्यांच्या क्षमता वाढीसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज येथे केले. विष्णुपूरी येथील डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अत्याधुनिक सी.टी. स्कॅन, डी.आर आणि सी. आर. यंत्राचे लोकार्पण समारंभात श्री. नड्डा बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार रामविचार नेताम, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार डी. पी. सावंत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. दिलीप म्हैसेकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॅा. प्रविण शिनगारे,  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. पी. टी. जमदाडे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. नड्डा म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयात जास्तीत जास्त सुविधा देण्यात याव्यात, त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात. ते स्वस्थ आणि सुखी व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने महाविद्यालय अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्याचे मोठे समाधान आहे. एकूणच आरोग्य क्षेत्राबाबत केंद्र सरकार चिंतनशील अशा पद्धतीने धोरण राबविते आहे. भारतातील आरोग्य सुविधांमध्ये आणि या क्षेत्रातील कामांमध्ये गुणात्मक बदल झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे. विशेषतः प्रतिबंधात्मक लसीकरणांच्या मोहिमांचे कामाची आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेतली जात आहे. देशाचा खंडप्राय विस्तार-आकार आणि विविधतेचे आव्हान स्विकारून दुर्गम ते अतिदुर्गम आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जातो. यात आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सरकारच्या धोरणानुसार राबविण्यात आलेल्या इंद्रधनुष्य या लसीकरण मोहिमेत सात टक्क्यांनी प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य समस्यामुळे होणाऱ्या मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेने वेगाने घटत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

राष्ट्रीयस्तरावरील आरोग्य विज्ञान संस्था, तसेच सुपरस्पेशालिटी सुविधांचेही विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच त्यांनी जिल्हास्तरावर निदान आणि औषधांसाठी तसेच डायलेसीस सारख्या उपचारांसाठीही नाममात्र दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचेही श्री. नड्डा यांनी सांगितले. शासकीय  वैद्यकीय  महाविद्यालयात सुपरस्पेशालिटी  सुविधा देण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सुरवातीला धन्वंतरी पूजन झाले. अधिष्ठाता डॅा. जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री. चव्हाण यांनी आपल्या भाषणात डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आणि आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महत्त्व स्पष्ट करून या आरोग्य संकुलासाठी प्रधानमंत्री ग्रामस्वास्थ योजनेंतर्गत भरीव पाठबळ, तसेच सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली. याप्रसंगी व्यासपीठावर संतुकराव हंबर्डे, संतोष वर्मा, मनोज पांगरकर, डॅा. अजित गोपछडे, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले आदींचीही उपस्थिती होते. डॅा. एस. आर. वाकोडे यांनी आभार मानले. तत्पुर्वी रुग्णालयातील सीटी-स्कॅन विभागातील अत्याधुनिक यंत्र कक्षाचेही श्री. नड्डा यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.त्यांनी या विभागाची पाहणीही केली. याप्रसंगी आमदार सुभाष साबणे यांचीही उपस्थिती होती. लोकार्पण समारंभासमहाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक आदींची उपस्थिती होती.


सोमवार, 13 जून 2016

गुणवत्ता विकास दुस-या टप्प्याला सुरुवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास
अभियानाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात

नांदेड (अनिल मादसवार) नांदेड जिल्हयात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त गेली वर्षभर विविध उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात शिक्षण विभागाला मोठे यश मिळाले आहे. चालू शैक्षणीक वर्षातही या अभियानाच्या दुस-या टप्प्याला 15 जुन 2016 पासून सुरुवात करण्यात येणार आहे.

यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या बैठकीत शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी तसेच प्रत्येक तालुक्यातून 5 शालेय समितीचे अध्यक्ष तसेच सक्रीय सदस्य यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीत शाळेच्या वेळा शालेय व्यवस्थापन समितीने ठरविणे, जे शिक्षक अत्यंत गुणी व मेहनती आहेत त्यांची बदली करु नये अशा शिक्षकांची नांवे शालेय व्यवस्थापन समितीकडून घेऊन शासनास पाठविणे, ज्या शिक्षकांबद्दल शिकविण्याच्या बाबतीत तक्रार किंवा अडचणी आहेत त्यांची नांवे शालेय व्यवस्थापन समितीकडून शासनास पाठविणे, दर महिण्याच्या शेवटच्या शनिवारी पालकसभा घेणे. पालकांनी विद्यार्थ्यांचा रोज एक तास अभ्यास घेणे, रोज रात्री 7 ते 9 या दरम्यान टि.व्ही. बंद करण्याची अंमलबजावणी यशस्वीपणे करणे, 5 वी व 8 वी वर्ग असलेल्या शाळेतील प्रत्येक मुलांना शिष्यवृत्ती परिक्षेत बसवून तो उत्तीर्ण होईलच अशी तयारी करुन घेणे, उन्हाळयात शाळा वातानुकूलीत करणे करणे किंवा डेसर्ट कूलर बसविणे, जिल्हास्तरावर जिल्‍हा गुणवत्ता नियोजन अनौपचारीक मंडळ स्थापन करणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान टप्पा दुसरा याचे केंद्र प्रमुख यांच्याकडून नियोजन करण्यात येत आहे यांसह आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक 15 जुन रोजी जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 2 वाजता होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी दिली आहे.  
  
पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा होणार- संजय बेळगे
                                     
नांदेड(प्रतिनिधी)दिनांक 15 जुन रोजी शाळांना सुरुवात होणार असून जिल्हा परिषदेतील शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा करुन सर्व मुलांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली.

15 जुन पासून सर्व शाळा सुरु होत असून पाच ते सहा वर्ष वयोगटातील सुमारे 69 हजार 574 प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून सर्व विद्यार्थ्यांचे शाळास्तरावर गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. आज मंगळवार दिनांक 14 जुन रोजी सकाळी सात वाजता सर्व क्षेत्रीय अधिका-यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होऊन प्रवेश पात्र बालकांची यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर शाळा व ग्राम पंचायतीच्या फलकावर ही यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी साडेसात दरम्यान लाऊडस्पिकरवरुन सर्व बालकांना 15 जुन रोजी शाळेत पाठविण्याची विनंती करण्‍यात येणार आहे. तसेच दोन तीन शिक्षकांचे गट तयार करुन गृहभेटीसह पदयात्रा काढण्यात  येणार आहे. यात सरपंच, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, युवक बचतगट, ज्येष्ठ नागरीक आदींचा सहभाग घेण्यात येणार आहे. गृहभेटीनंतर सकाळी नऊ वाजता शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. यातही युवक, गावकरी तसेच महिला बचतगटांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

15 जुन रोजी प्रवेशपात्र बालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. गावातील वार्डा-वार्डातून देशभक्‍तीपर गीते व नारे देत बालकांची प्रभातफेरी काढण्यात येईल. प्रभातफेरीनंतर शाळा व्‍यवस्थापन समितीच्या उपस्थितीत मुलांना मोफत पाठयपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. वर्षभर शंभर टक्‍के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देऊन एकही विद्यार्थी शाळाबाहय राहणार नाही याची सर्वांना प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. दरम्यान शाळा प्रवेशाचा उत्साह साजरा करतांना शाळा परिसरात रांगोळी टाकून वर्ग सजावट केली जाणार आहे. शाळेत येणा-या सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणीक वर्षाच्‍या शुभेच्छा देऊन, पुष्‍प देऊन त्यांचे स्‍वागत करण्यात येणार आहे. या उपक्रमात गावस्‍तरावरील सर्व समित्या, महिला बचतगट व नागरीकांनी सहभाग घेऊन हा उत्सव साजरा करावा असे आवाहन शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले आहे. 

रविवार, 12 जून 2016

पाणलोट कामात अनियमितता

पाणलोट कामात अनियमितता मातीच्या बंडाची रुंदी... खोली आणि उंचीही कमी 

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यात सध्या खैरगाव, सोनारी परिसरात पाणलोट अभियानांतर्गत करण्यात येत असलेली कामे अत्यंत थातूर - मातुर पद्धतीने करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात येणाऱ्या मातीच्या बंडाची उंची, खोली, व रुंदी कमी असल्याने या बंडाचा शेतकर्यांना कमी, तर गुत्तेदार व  कृषी अधिकारी यांना मात्र हे बंड मोठ्या फायद्याचे ठरत आहेत.

राष्ट्री एकात्मिक पाणलोट अबियाना अंतर्गत हिमायतनगर तालुक्यात राबविण्यात आलेल्या कामांच्या आजपर्यंत अनेक तक्रारी झाल्या. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड करण्यात आली. अनेक झालेल्या कामाची देयके पर्यवेक्षक, कृषी अधिकार्यांनी उचलूनही काम करणाऱ्याना रक्कम दिली नसल्याने प्रकरण हाणामारी पर्यंत पोचल्याचे दि.१० जून रोजी एका काम करणाऱ्या व्यक्तीचे व लखमोड नामक पर्यवेक्षकाचे झालेल्या वादावरून समोर आले आहे. एकुनच राष्ट्रीय पाणलोट कार्यक्रमास राबवण्यात आलेल्या प्रेरक उपक्रमापासून ते बंधारे व बंदच्या कामापर्यंत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे.

यावर्षी तालुक्यातील मौजे खैरगाव शिवारात नुकत्याच करण्यात आलेल्या मातीच्या बंडावरून हे स्पष्ट होते. सदरील बंडाची रुंदी, खोली, व उंची एक मीटर असणे बंधनकारक असताना या बाबींना गुत्तेदार व पर्यवेक्षकाने हरताळ फसल्याचे दिसून येत आहे. तर गुत्तेदार अधिक टक्केवारी घेऊन काही स्वस्त बसून इतरांना कामे देऊन मलिदा लाटत आहेत. काही स्थानिक राजकीय नेते मात्र गुत्तेदाराकडून कामे टक्केवारीवर घेऊन थातूर - मातुर उरकून आपली पोळी भाजून घेत आहेत. नुकतेच मौजे सोनारी येते झालेल्या पाणलोट अभियानाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरीकातून केली जात आहे. येथील नागरिक उपोषणाच्या तयारीत आहेत.  

देशीची घरपोच डिलिवरी.

देशीदारूची ग्रामीण भागात घरपोच डिलिवरी... पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष 

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध्य देशी दारूची मोठ्या प्रमाणात घरपोच डिलिवरी द्वारे विक्री केली जात असून, याकडे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे दुष्काळी परीस्थित अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. 

सध्या ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शहरात येण्याचे तलत आहेत. परिणामी शहरातील परवानाधारक देशी दारूच्या दुकानातील दारूची विक्री अल्प प्रमाणात होत असल्याने परवानाधारक दुकानदारांनी दारूचा खप वाढविण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून दुकानातील देशी दारूचे बॉक्स ग्रामीण भागात पोहोचवून गल्ला भरत आहेत. यामुळे खेड्या पाड्यातील तरुण युवक व्यसनाकडे वळत असुन अनेक कुटुंबातील करता पुरुष दारूच्या आहारी गेल्याने उध्वस्त होत आहेत. तर दारूमुळे अनेक महिलांना कुंकू पुसावे लागले आहे. य गंभीर प्रकाराकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत अल्स्याचा आरोप सुजन नागरीकातून करण्यात येत आहे.

तालुक्यातील टेंभी, पवना, सरसम बु, खडकी बा, पोटा बु, पारवा, सिरंजणी, वाशी, मंगरूळ, आदी गावासह सबंध वाडी तांड्यामध्ये अवैध्य देशीदारूची वाहतूक व विक्री करण्यात येत असल्याने, हा प्रकार तत्काळ थांबविण्यात यावा. आणि निर्ढावलेल्या दारू विक्रेत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरीकामधून केली जात आहे.  

धूळ पेरणीला सुरुवात

पावसाच्या प्रतीक्षेतील बळीराजाची हिमायतनगर तालुक्यात धूळ पेरणीला सुरुवात 

हिमायतनगर(प्रतिनिधी)मृग नक्षत्र अर्धे संपण्याच्या मार्गावर असताना पाउस झालेल्या भागातील बळीराजाने पेरणीला सुरुवात केली असून, उर्वरित भागात पाउस पडणार या अपेक्षेने शेतकर्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केली आहे. 

रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धात व मृग नक्षत्राच्या पूर्वार्धात पावसाने चुणूक दाखवून हलकीशी सुरुवात केल्याने बळीराजाचे चेहरे आनंदित झाले. तालुक्यातील काही भागात दमदार पाउस झाला तर काही भागात जेमतेम. परंतु बियाणे पेरणीसाठी मृग नक्ष्तर लाभदायी असल्याचा शेतकऱ्यांचा समाज असल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे. तर काही भागात पाउस पडला नसल्याने कोरड्यावरच शेतकर्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केलायचे चित्र दिसून आले आहे. तालुक्यातील मंगरूळ, खैरगाव, वडगाव ज. सिबदरा, धानोरा, वारंगटाकळी, सवना ज., रमनवाडी , महादापूर, एकघरी, वाशी, कार्ला पी, सिरंजणी, एक्म्बा  परिसरातील ५० टक्क्याच्या वर शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत. तर टेंभी, हिमायतनगर, आंदेगाव, पवना, दरेसरसम, खडकी बा., पळसपूर, डोल्हारी, घारापुर येथील शेतकर्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केली असून, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, अल्प पावसामुळे आर्थिक अडचणीत  आलेला बळीराजा यंदा वेळेवर पाउस होईल या आशेत होता. परंतु अद्याप मान्सूनच्या पावसाची हजेरी लागली नसल्याने दिवसभर धूळ पेरणी करून दुपारच्या जेवणाच्या वेळी आभाळाकडे पाहत आहेत. गेल्या दोन दिवसापासून जाणवत असलेल्या उकाड्यामुळे रविवारी सायंकाळी आभाळात ढगांची गर्दी झाली असून, पाउस येण्याची आशा शेतकर्यांना लागली आहे. 

सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हिमायात्नाग्र शहरात पावसाची एन्ट्री झाली असून, १५ मिनिट पाउस झाल्याने नाल्या भरून वाहत होत्या. परंतु हा पाउस शहराच्या बाहेर पडला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

गुंडावार जिल्ह्यात पहिला

श्रीकांत गुंडावार तंत्रनिकेतनमध्ये जिल्ह्यात पहिला

नांदेड(प्रतिनिधी)येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी श्रीकांत सतीश गुंडावार यांने अंतीम वर्षात 89 टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाचे श्रेय त्यांने आई-वडील व गुरूजणांना दिले आहे. या यशाबद्दल त्याचे श्रीमती प्रेमला गुंडावार, सतीश गुंडावार, सुरेश गुडावार, श्याम गुंडावार, संतोषी गुंडावार, दुर्गा गुंडावार, स्मीता उपलंचवार, प्रियंका मोतेवार यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
अखेर चोरट्यावर गुन्हा दाखल.... शहरातील चोर्यांचा उलगडा होणार..?
हिमायतनगर(कानबा पोपलवार)शहरात मागील काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ माजवीत नागरिकांची झोप उडविली होती. दि.०४ जून रोजी रुख्मिणी नगरातील एका घरात शिरलेल्या एका चोरट्यास रंगेहात पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अखेर त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशीतून शहरत झालेल्या चोर्यांचा उलगडा होणार ..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

शहरात एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असल्याने शहरातील नागरिकांची झोप उडाली होती. असे असताना स्थानिक पोलिस चोरट्याचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याने कृत.... पाहुत.... कार्यवाही केली आहे.... लवकरच चोरट्यास गजाआड केले जाईल आशय पोकळ अश्वनाने नागरिकांचे समाधान करत होते. पोलिसांचा नाकर्तेपणा नागरिकांच्या लक्षात आल्याने परिसरातील बहुतांश नागरिकांनी आपली सुरक्षा आपणच करण्याचा संकल्प केला. आणि गेल्या आठ दिवसापासून दक्ष राहून रुख्मिणीनगर परिसरात चोरट्याकडून होत असलेल्या प्रयत्न व  हालचाली कडे लक्ष ठेवून होते. त्यानुसार दि. ०४ च्या रात्री वादळी वार्यासह महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शहरासह सर्व तालुक्यात अंधारात होता. याच संधीचा फायदा घेत सरसम येथील चोरटा विकास परसराम गुंडेकर आणि त्याचे अन्य दोन साथीदार यानी चोरीसाठी हिमायतनगर शहर गाठले. आणि मध्यरात्रीला ११.४५ वाजेच्या सुमारास येथील सावन डाके यांच्या घराजवळील शेडवर एकजण, एकजण ऑटो घेऊन बसता स्थानक परिसरात आणि मुख्य चोरटा विकास गुंडेकर घरावर चढून आत शिरला. त्यावेळी घरातील लोकांनी त्यास पहिले असता समोर आलेल्या डाके यांना ढकलून देऊन छतावर चढून पलायन करण्याच्या उद्देशाने दुसर्या मजल्यावरून उडी मारली होती. यात तो चोरटा जखमी झाल्याने नागरिकांच्या हाती सापडला. आणि शहरातील सर्वच चोर्यांची कबुली नागरीका समक्ष देऊन न मारण्याची याचना करू लागला. शेवटी नागरिकांनी पोलिसांना पाचारण करून त्यास पोलिसांच्या हवाली केले. गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दि. ०६ जून रोजी सावन डाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस डायरीत अखेर पोलिसांनी कलम ३८०, ४२७, ५११ भादवी अनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एएसआय डांगरे हे करीत आहेत.         

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com