नांदेड। नांदेड येथे दैनिक युवा राज्य तर्फे हॉटेल गणराज येथे आयोजित पुरस्कार कार्यक्रमात साहीत्यीक कथा उत्कृष्ट पत्रकार दीपक मठपती यांना युवाराज्य तर्फे दिला जानारा "युवा पत्रकार" 2022 हा देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अजित पाटील मुख्य संपादक असलेले दैनिक युवा राज्य चे आवृत्ती संपादक श्री गणेश शिंदे सर आणि आजच ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री भीमाशंकर कापसे मामा यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आझादग्रुप चे संस्थापक भीमाशंकर कापसे मामा, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रिय सचिव प्रवक्ता- वैजनाथ स्वामी, मा.प्रशासकीय अधिकारी एसएम स्वामी, कोनाळे सर दीपक रायफळे, गणेश शिंदे सर व शेकडोंचा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित होता.