पाणलोट कामात अनियमितता

पाणलोट कामात अनियमितता मातीच्या बंडाची रुंदी... खोली आणि उंचीही कमी 

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यात सध्या खैरगाव, सोनारी परिसरात पाणलोट अभियानांतर्गत करण्यात येत असलेली कामे अत्यंत थातूर - मातुर पद्धतीने करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात येणाऱ्या मातीच्या बंडाची उंची, खोली, व रुंदी कमी असल्याने या बंडाचा शेतकर्यांना कमी, तर गुत्तेदार व  कृषी अधिकारी यांना मात्र हे बंड मोठ्या फायद्याचे ठरत आहेत.

राष्ट्री एकात्मिक पाणलोट अबियाना अंतर्गत हिमायतनगर तालुक्यात राबविण्यात आलेल्या कामांच्या आजपर्यंत अनेक तक्रारी झाल्या. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड करण्यात आली. अनेक झालेल्या कामाची देयके पर्यवेक्षक, कृषी अधिकार्यांनी उचलूनही काम करणाऱ्याना रक्कम दिली नसल्याने प्रकरण हाणामारी पर्यंत पोचल्याचे दि.१० जून रोजी एका काम करणाऱ्या व्यक्तीचे व लखमोड नामक पर्यवेक्षकाचे झालेल्या वादावरून समोर आले आहे. एकुनच राष्ट्रीय पाणलोट कार्यक्रमास राबवण्यात आलेल्या प्रेरक उपक्रमापासून ते बंधारे व बंदच्या कामापर्यंत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे.

यावर्षी तालुक्यातील मौजे खैरगाव शिवारात नुकत्याच करण्यात आलेल्या मातीच्या बंडावरून हे स्पष्ट होते. सदरील बंडाची रुंदी, खोली, व उंची एक मीटर असणे बंधनकारक असताना या बाबींना गुत्तेदार व पर्यवेक्षकाने हरताळ फसल्याचे दिसून येत आहे. तर गुत्तेदार अधिक टक्केवारी घेऊन काही स्वस्त बसून इतरांना कामे देऊन मलिदा लाटत आहेत. काही स्थानिक राजकीय नेते मात्र गुत्तेदाराकडून कामे टक्केवारीवर घेऊन थातूर - मातुर उरकून आपली पोळी भाजून घेत आहेत. नुकतेच मौजे सोनारी येते झालेल्या पाणलोट अभियानाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरीकातून केली जात आहे. येथील नागरिक उपोषणाच्या तयारीत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी