बांधकाम विभागाचे कार्यालय कुचकामी

अधिकारी - कर्मचार्या अभावी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ठरत आहे कुचकामी

हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले. परंतु सदरील कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नसल्याने हे कार्यालय बिनकामाचे झाले असल्याचे बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत येणाऱ्या हिमायतनगर कार्यालयाच्या कार्यक्षेत्र अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. पूर्वी सदरील कार्यालयाचा कारभार किनवट व हदगाव येथे जोडण्यात आलेल्या अधिकार्य अंतर्गत चालविला जात होता. परंतु हिमायतनगर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र व मागास क्षेत्र जास्त असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हिमायतनगर येथे असलेल्या विश्राम ग्रहात गेल्या वर्षी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियानात कार्यालय थाटले. परंतु स्थापणेपासून आजवर या कार्यालयात कायमस्वरूपी उपाभियांता हे पद भरलेले नाही. ना कर्मचार्यांची पदे भरल्या गेली, केवळ दोन कर्मचारी एक मजूर व एका शाखा अभियंत्याच्या खांद्यावर सदरील कार्यालयाचा बोजा आहे. हे कार्यालय म्हणजे असून ओळंबा तर नसून खोळंबा अशी अवस्था गुत्तेदारी करणाऱ्यांची झाली आहे.

सध्या स्थितीत उपभियांता पदाचा प्रभार माहूर येथील अभियंत्याकडे असल्याचे सांगण्यात येत असले तरी हि माहिती विश्वसनीय नाही. परिणामी शासनाची कोट्यावधी रुपयाची कामे करणाऱ्या गुत्तेदारांचे अधिकारी नसल्याने फावत आहे. येथील अधिकाऱ्या अभावी विकास कामाचा दर्जा ढासळत चालला असून, निधीचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. 
लोकप्रतिनिधीची उदासीनता 
------------------
उपविभाग स्थापन होऊन वर्ष लोटले असतानाही सदरील कार्यालयात मान्य पदे भरण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने वरिष्ठ कार्यालयाकडे आग्रह धरल्याचे ऐकिवात नाही. यासंदर्भात सर्वच लोकप्रतिनिधीची उससिनता स्पष्ट दिसून येते. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाची गुत्तेदारी करणरे बहुतांशी राजकीय कार्यकर्ते किंवा अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधी आहेत. अभियानात प्रत्यक्ष कामावर गुत्तेदाराना नकोच असतो त्यामुळे कदाचित सदरील कार्यालयात अधिकार्याची रिक्त पदे भारने लोकप्रतिनिधी टाळत असावेत अशी चर्चा विकास प्रेमी नागरिक करीत आहेत.

वैरण व पशु खाद्य योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कडबा कुट्टी वितरण

हिमायतनगर (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या वैरण व पशु खाद्य विकास योजना सन २०१६-१७ अंतर्गत दोन हॉर्स पॉवर शक्तीचे कडबा कुट्टी यंत्राचे वितरण बुधवार दि.१५ रोजी करण्यात आले आहे.

येथील पशु वैद्यकीय दवाखाना येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजता येथील पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड यांच्या हस्ते ६ पात्र लाभार्थ्यांना कडब कुट्टी देण्यात आली. यात मारोती गुम्मडवाड बोरगडी, गणेश सूर्यवंशी पोटा बु, किशन येरेकाकामारी, संजय काईतवाड बोरगडी, प्रदीप वानखेडे पळसपूर तर मंगरूळ येथील बबन खंदारे या लाभार्थ्यांचा समावेश आहे. कडबा कुट्टी वितरण प्रसंगी पशुधन विकास अधिकारी धनंजय मादळे, डॉ.लोखंडे, माघाडे, कदम काशिनाथ बोयेवार, मीना उट्टलवाड, सत्यजित कौठेकर, रवींद्र घुंगरे, आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी, लाभार्थी उपस्थित होते.       

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी